पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 05:43

नमस्कार मायबोलीकर,

यावर्षीचा आपला मायबोलीचा बाप्पा २१ वा! आणि २१ म्हंटले की बाप्पाचे आवडते २१ मोदक आलेच. म्हणूनच यावर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मोदक बनवण्याची स्पर्धा. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सर्वच घरात मोदक बनवले जातात. त्या बनवलेल्या मोदकांचाच छान सजवून आणि फोटो काढून तुम्ही पाठवायचा आहे.

kujbuj_modak.jpg

यात फक्त उकडीचेच नाही तर सर्व प्रकारच्या मोदकांचा समावेश होईल.. खवा, सुका मेवा, fusion, पारंपारिक उकडीचे मोदक, तळणीचे मोदक इ. तसेच मोदकांशी साम्य असलेले व्हेज मोमोज ही चालतील.

नियम-
१) मोदक स्वतः बनवायचे आहेत. बाहेरून विकत आणलेल्या मोदकांची प्रवेशिका आढळून आल्यास बाद ठरवण्यात येईल.
२) पाककृती स्वतः तयार केलेली असावी.
३) पाककृती मध्ये वापरण्यात येणारे पदार्थ शाकाहारी असावेत.
४) मिठाई, खवा इ. मोदक बनवताना अत्यंत आवश्यकता असेल तरच साचा वापरावा. उकडीचे मोदक बनवताना साच्याचा वापर करू नये.
५) स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट २०२० पासून तुम्ही पाठवू शकता. (IST)
६) एक id प्रत्येकी २ प्रवेशिका देऊ शकेल.
७) स्पर्धा महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी खुली आहे.
८) पाककृतींचे step by step किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
९) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - {तुमचा आयडी}"
१०) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

विजेते मोदकांचा सुबकपणा, त्यांच्या कळ्या इ. निकषांवरून पोल घेऊन ठरवण्यात येतील.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

< स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.>

हे छान आहे.

बाबो
फारच सुंदर आहेत लेखात वापरलेले मोदक.केवढ्या सुबक कळ्या.
मला नव्याने वैफल्य आले.

मंडळी ह्या नियमांकडे लक्ष असू द्या

८) पाककृतींचे step by step किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
९) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - {तुम्ही केलेल्या मोदकाचे नाव} - {तुमचा आयडी}"

बाबो
फारच सुंदर आहेत लेखात वापरलेले मोदक.केवढ्या सुबक कळ्या.
मला नव्याने वैफल्य आले.>>> Lol अनु
आणि बाकी च्या सर्वांचे मोदक ही छान

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे,
उकडीचे मोदक
IMG-20200823-WA0005.jpgIMG_20200822_114420932.jpg

उर्मिला, देवकी, सिद्धी, शरदजी - मस्त मस्त आहेत सर्वांचे मोदक. जरा एखादा फोडुन व वरुन तूपाची धार घातलेला ही द्या Wink Wink

urmila mhatre गणेशोत्सव 2020 ग्रुप मध्ये नवीन धागा बनवून प्रवेशिका द्या. वर दिलेल्या नियमांकडे लक्ष असुद्या.

सगळ्यांचे मोदक मस्त..आता रोज रोज मस्त मस्त मोदक फक्त बघायला मिळणार..लॉटरी काढून रोज एका मेंबर ला मोदक खायला बोलवायला हरकत नाही.

एवढे सगळे सुंदर सुंदर मोदक बघून.मला पण मोदक करून बघायची इच्छा होते..

"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - {तुम्ही केलेल्या मोदकाचे नाव} - {तुमचा आयडी}">>>>
मोदकाचे नाव म्हणजे ??
"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - जाडा मोदक - हाडळीचा आशिक"

मोदकाचे नाव म्हणजे ??>>> जसे आपण उकडीचे, तळणीचे, माव्याचे, चाॅकलेट, काजू, केसर मोदक म्हणतो तसे नाव लिहायचे असेल. नाव देता नाही आले तर नुसते मोदक लिहा ना.
संयोजकांना प्रत्येक शब्दात पकडणे बरे नव्हे.

जाडा मोदक Happy आपलाच मोदक मग असं कसं म्हणून चालेल ... अतरंगीपणाच करायचा असेल तर नाव कसं "X Æ A-Xiii मोदक" असं काही ठेवायचं. निदान इलॉन मस्क नंतर आपणच म्हणून जगात वाहवा तरी होईल जराशी...

जसे आपण उकडीचे, तळणीचे, माव्याचे, चाॅकलेट, काजू, केसर मोदक म्हणतो तसे नाव लिहायचे असेल. >> +१०० प्रकार शीर्षकात दिला तर वाचायला बरे पडते. उदा: एखाद्याने शेंगदाणा मोदक केले आणि असेल एलर्जी तर तो वाचताना वगळता येतो.

Pages