पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 05:43

नमस्कार मायबोलीकर,

यावर्षीचा आपला मायबोलीचा बाप्पा २१ वा! आणि २१ म्हंटले की बाप्पाचे आवडते २१ मोदक आलेच. म्हणूनच यावर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मोदक बनवण्याची स्पर्धा. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सर्वच घरात मोदक बनवले जातात. त्या बनवलेल्या मोदकांचाच छान सजवून आणि फोटो काढून तुम्ही पाठवायचा आहे.

kujbuj_modak.jpg

यात फक्त उकडीचेच नाही तर सर्व प्रकारच्या मोदकांचा समावेश होईल.. खवा, सुका मेवा, fusion, पारंपारिक उकडीचे मोदक, तळणीचे मोदक इ. तसेच मोदकांशी साम्य असलेले व्हेज मोमोज ही चालतील.

नियम-
१) मोदक स्वतः बनवायचे आहेत. बाहेरून विकत आणलेल्या मोदकांची प्रवेशिका आढळून आल्यास बाद ठरवण्यात येईल.
२) पाककृती स्वतः तयार केलेली असावी.
३) पाककृती मध्ये वापरण्यात येणारे पदार्थ शाकाहारी असावेत.
४) मिठाई, खवा इ. मोदक बनवताना अत्यंत आवश्यकता असेल तरच साचा वापरावा. उकडीचे मोदक बनवताना साच्याचा वापर करू नये.
५) स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट २०२० पासून तुम्ही पाठवू शकता. (IST)
६) एक id प्रत्येकी २ प्रवेशिका देऊ शकेल.
७) स्पर्धा महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी खुली आहे.
८) पाककृतींचे step by step किमान २-३ प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
९) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - {तुमचा आयडी}"
१०) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

विजेते मोदकांचा सुबकपणा, त्यांच्या कळ्या इ. निकषांवरून पोल घेऊन ठरवण्यात येतील.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बऱ्याच लोकांना ज्याची खाण्याची ऍलर्जी असते ते ऐकण्या वाचण्याची ऍलर्जी सुद्धा असते, लगेच ईईईईईई करतात वाचण्यात आले/कानावर आले तरी.

इथे डिकन्सट्रकटेड मोदक चालतील का हो संयोजक?
माझी एक रेसिपी आहे. तुमच्या सगळ्या नियमांत बसते फक्त शेवटच्या निकषात बसत नाही. कळ्या मोजण्याच्या.

एक कळीचा नारद मोदक करा कुणीतरी. मोदकाच्या नाकाचे टोक खूप लांब करा आणि एक नेवरी तंबोऱ्याच्या आकाराची करून अडकवा मोदकाच्या गळ्यात.

सई, कळ्या असो की फुले, हौसेने अन् उत्साहाने घडलेल्या गोष्टीचा आनंद महत्त्वाचा. मोदकांचा अर्थच आनंद देणारे. तो नाही मोजता येत. येऊ देत तुमच्या मोदकांना.

राणी 'गणेशोत्सव 2020' या ग्रुप चे सभासद व्हा. मग तुम्ही त्या गृप मध्ये लिखाण करू शकता

उकडीचे मोदक

नारळाचा चव आणि गूळ
सारणासाठी शिजवावा
सारण नसावे फार कोरडे
मिसळा वेलचीपूड व बारीक मेवा

भेसळ नसलेली पिठी
तीन वाट्या पाणी उकळीचे
चमचाभर तूप साजूक
तयार साहित्य उकडीचे

काढावी छानशी उकड
मऊ लुसलुशीत व्हावी
गरम गरमच मळावी
आता वाट कशाची पहावी?

बेताच्या आकाराचा गोळा
हातातल्या हातात दाबावा
गोल पारी तयार होता
कळ्यांचा आकार देत जावा

सारणाने पारीचे भरावे पोट
कळ्या एकत्र करुन दाबावे
केळीच्या पानावर मांडावे
तयार मोदक मोदकपात्रात उकडावे

गणपती प्रिय खाद्य मोदक
बघा झाले मेहनतीने तयार
दाखवू नैवेद्य, बंद डोळे
खाल्ले गणेशाने, खाऊ आपण सगळे

विजया केळकर________

ग्रीन - गुलकंद स्टुफ्फेड पान मोदक
गुलाबी - रूहअफझ फ्लेवर गुलकंद स्टफीबाग
मँगो मावा मोदक
तळणिचे मोदक
m1_0.jpgm2_0.jpgm3_0.jpgm4.jpgm3.jpgm1.jpgm2.jpg

सर्व स्पर्धांच्या प्रवेशिकांचा एकत्र धागा अजून बनवण्यात आला नाहीये. स्पर्धा संपल्यावर संकलन केले जाईल.

Pages