एक नाते -dear friends

Submitted by Santosh zond on 2 August, 2020 - 13:34

एक नाते
Dear Friends
सगळे जन कॉलेज कॅन्टीन ला बसलेले असतात तेवढ्यात ओर्डर येते किती चहा? कुणाला माहित असत की आज बळी का बकरा कोण बनणार आहे ते, तेवढ्यात जो बळी का बकरा बनणार असतो तो सांगतो "आम्ही सगळे ऐवढे आहोत तर एवढया चहा लागतील "मग कुठ चहा येतो...
चहा घेऊन झाल्यावर सगळे तिथुन निघुन जातात तेवढयात चहावाला पैसे?
सगळे ओर्डर घेणार्याकड बघुन हसतात आणि निघुन जातात.......
अस कुणीतरी रोजच ठरलेलच असायच बकरा बनवण्यासाठी.पण आता सोबत ते चहा बिस्कीट तर आहे पण ते मित्र नाही ज्यांच्यासोबत खरी चहा पिण्याची काही वेगळीच मज्जा असायची.......
शेवटी आपल आयुष्य पण त्या चहा बिस्कीटासारख असत चहात पडण्याआधी जगुन घ्यायच असत.....
पण शेवटी एक दिवस पक्ष्यालाही त्यांच आवडत घरट सोडून जावच लागत ,कारण त्याला त्याच नवं क्षितिज खुणावत असतं.....
खरचं खुप सुंदर म्हटलेले आहे कुणीतरी आपल्याला जे जे पाहिजे ते ते जर मिळाल असत तर जगायला गंम्मत आणि देवाला किंमत ती राहीलच नसती....
Missing all of you my friends.......
Happy friendship day....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" नात " म्हणजे मुलाची किंवा मुलीची मुलगी असते हो !!

तुम्हाला " नातें " म्हणायचे आहे का?

कोठे नेऊन ठेवली मराठी माझी.