चला आता मायक्रोफोन मध्ये बोलून टायपिंग करू या

Submitted by नितीनचंद्र on 27 July, 2020 - 09:40

चला आता मायक्रोफोन मध्ये बोलून टायपिंग करू या

बरेच दिवस टायपिंग चा त्रास कसा कमी करता येईल याचा विचार मी करत होतो दोन चार दिवसापूर्वी मला असे ऐकायला मिळाले आता गुगल मी मराठी भाषा केली आहे तर मायबोली वरचे कसे मायक्रोफोन वरती बोलून टाईप करता येतील याचा विचार करताना मला सापडली

गुगल डोक्स ओपन करा. आपला मायक्रोफोन सुरु करा. जिथे मायक्रोफोन दिसतोय सेटिंग आहे त्यामध्ये जाऊ मराठी भाषा सेट करा आपण बोलायला लागला आज मराठी टायपिंग होऊ लागेल. थोडे एडिटिंग करावे लागेल

आता टायपिंग केलं आहे ते कॉपी-पेस्ट करा मायबोली वर

झाले. असे करणे सोपे आहे. एडिटिंग करावे लागेल. पण याला फार कष्ट नाही पडणार.

याच कारणाने मागे २००१० साली लिहलेली व प्रसिध्द न झालेली कादंबरी आता मला पुर्ण करुन मायबोलीवर प्रसिध्द करायची आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नितीनचंद्र, बर्‍याच काळाने दिसताय. तुम्हांला लागलेला शोध अनेक मायबोलीकरांना माहीत आहे आणि ते हा पर्याय वापरतही आहेत.
https://www.maayboli.com/node/74229

तसंच त्या दीक्षित डाएटवर मायबोलीवर घमासान चर्चा झडलेल्या आहेत.

अर्थात तुमचं नेहमीसारखं फक्त आउटगोइंग चालू असेल तर तुम्ही हे प्रतिसाद वाचणार नाहीच.

याच कारणाने मागे २००१० साली लिहलेली व प्रसिध्द न झालेली कादंबरी आता मला पुर्ण करुन मायबोलीवर प्रसिध्द करायची आहे....

अरे बापरे, ते कोरोना का काय त्याच्यामुळे लॉकडाऊन झाला त्यात इतकी वर्षे निघून गेली??? मला वाटले अजून २०२० च सुरु आहे. म्हणजे किती वर्षे मी गाढ झोपेत होतो???

हलकेच घ्या!!!

ही सुविधा खूप दिवसापासून आहे.
बोलून टाईप करायची.
हे च नाही तर मराठी मध्ये बोलून बाकी कोणत्या ही भाषेत टाईप होवू शकत.