ऋतू हा हवासा

Submitted by कविन on 26 July, 2020 - 05:27

ऋतू हा हवासा, हवा ही गुलाबी
तुझा हात हाती असा राहूदे -२

तुझा हात हाती गुंफूनिया मी
जरी टाकते हे पाऊल नवे
वाटा नव्या या, खुणवी मला; पण
मनी हुरहुरी का उगा दाटते

तुझी साथ असता, तुझ्या सोबतीने
मिटवीन साऱ्या शंका प्रिये
तुझा स्पर्श होता, स्पर्शातूनीया
मुक्यानेच सारे मला आकळे

तुझे स्वप्न हलके बिलगले मला अन्
अता काही दुसरे मला ना दिसे
अनवट सुरांच्या किनाऱ्यावरी या
तुझ्या भावनांचे उमटले ठसे

हे यांचे गाणे आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो मस्तय गाणं!
तुझे स्वप्न हलके बिलगले.. आणि अनवट सुरांच्या किनार्यावर भावनांचे ठसे विशेष आवडले.