अति शहाण्यांची जत्रा

Submitted by अनिकेत कुंदे on 24 July, 2020 - 05:28

गावाचं नाव मोरेवाडी, गुहेत खजिना सापडतो पण या वाडीत मोरे जरा जास्तच सापडले. आणि यांनी पण लगेच नामकरण करून घेतले अस म्हणायला हरकत नाही. तस गाव साऱ्या धर्म , जातीच्या व्यक्तींनी भरलेलं असुन काही कुणाची ओळख त्यावरून नव्हती.

सलीम भाई गावचे सरपंच, उपसरपंच आप्पा मोरे, खुनशी राजकारण नव्हते गावात. पण जत्रेवरून लई तुफान भांडणे व्हायचे बघा!!!

३-४००० लोक वस्ती असलेल्या मोऱ्यांच्या मोरेवाडी मध्ये सर्वात तरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे आबा उर्फ नीलकंठ मोरे, वय फक्त ७५ वर्ष, त्यांच्या बरोबरचे आबाची वाट पाहतच होते स्वर्गात.

ह्यांच्या साठी मध्ये पिंपळाचा पार राखीव होता, त्या पारावरून खाली काही उतरले म्हणजे नवलच!!!!! ७,८ जणांची चांगली मैत्री होती. गावाच्या वेशी जवळचं पार आहे म्हणुन गावात येणाऱ्या बस, टमटम चे सगळे चालक, बस कंडक्टर रामराम करून चं जायचे ह्या प्रतिष्ठित मंडळीला!!!

क्रिकेट च्या विकेट जशा पडायला सुरुवात होती, तशी मग पहिले अण्णा गेले, मग दादा मग काका, मग तात्या मग गोट्या काका, मग बाबा मग नाना आणि आबा कसकाय तेंडुलकर निघाले हा साऱ्या गावाला प्रश्न!!या महावीरांमद्ये सर्वात अतरंगी कलाकार कोणी असेल तर ते आबा, केवळ मी नाही आख्खा गाव बहुमताने निवडून देईल आबाला!!

मी विवेक ह्या मोरेवाडीचाचं पण शिक्षणानंतर नोकरी मिळाल्याने पुण्यालाच राहतो. आबा माझे आजोबा माझ्या आजीचं नाव वसुंधरा,
माझे वडील रामराव, आई जानकी, एक काका आहे त्याचं नावं सुनिल त्याचं लग्न व्हायचं बाकी आहे, वयाने चाळिशी ओलांडली होती .

म्हणजे ठरले होते, आमच्या घरचे नवरी बघायला गेले, जेव्हा माझा काका 25 चा असेल, पण काही कारणांमुळे नाही झाले.

काय सांगता माहीत नाही तुम्हाला?

आम्ही त्यांच्या घरात जात असताना आबांनी कोंबडी पाहिली बाहेर, आम्हाला म्हणे तुम्ही व्हा पुढं मी तरी डोकावुन पाहू लागलो हळुच कोणी बघत नाही हे पाहुन आबाने ती उचलुन आमच्या जीप च्या मागच्या बाजुला असलेल्या कॅरेट खाली दाबुन ठेवली.

मुलीचे वडील -: नमस्कार आबासाहेब, या या !! ( आबांची पंचक्रोशीत ख्याती होती)

घरात अगदी दिमाखात स्वागत झाले होतं आमचं, पंच पक्वान्न समोर अस टेबल वर पसरेल इतके होते. मग नेहमीचं तेच मी लहान होतो म्हणुन आबांच्या मांडीवर बसलेलो. त्यांना भुक लागली होती मग काय " काय विव्या ( मला विव्या च म्हणतात) घरून खाऊन घे काहीतरी म्हंटलं होते ना आता अशी पंचायत होती"

मग मुलीचे वडील -: विसरलोच आम्ही घ्या ना काहीतरी, सुरू करा मुलगी येईलच एवढ्यात.

आबा म्हणजे तल्लख बुद्धीचा नमुना असा काही देतील मला कळले पण नव्हते.

मुलगी बाहेर हळूहळू पावलांनी येत होती, तिच्या सोबत तिची मैत्रीण पण होती. काकाच्या भुवया उंचावत होत्या, मीही पक्क करून टाकले होते हीच आपली काकू आता !!
पण तिच्या मैत्रिणीची नजर काही काकाच्या दिशेने वळली, आणि काकाचीही तिच्या दिशेने ,,,तू??? जोरात ओरडली ती।।।

हा आता तुम्ही तीन वेळा सीन रिपीट करून वाचू शकता, तू , तू ,तू धुमताना, धुमताना असं काहीसं संगीतही गृहीत धरू शकता.

काकू चे वडील- काय ग का ओरडली ??

काकु ची मैत्रीण -: काका हा मुलगा हिच्या साठी योग्य नाही.

आबांचा पारा चढायला लागला होता, मी त्यांच्या जवळचं बसलेलो असल्याने जाणवत होते.

काकुचे वडील -: अग पण का ?

सगळे कान टवकारून ऐकत होते.... विशेषतः आबा अधिकचं, आबा आणि काका यांची जबरदस्त खुन्नस होती.

काकुची मैत्रीण -: अहो काका, आम्ही एकाच कॉलेज ला होतो, आणि हा दारू पिऊन यायचा आणि मुलींची छेड काढायचा. माझ्या सह कित्येक मुलींचे फटके खाल्लेत याने, आणि शिक्षक काही म्हंटले का तेव्हा म्हणायचा , " तुम्हाला माहितीये का माझा बाप कोण आहे? "

मला अस का वाटतं होत का ? आगेत तेल, तूप, पेट्रोल, रॉकेल एकदाचं त्या न होणाऱ्या काकूंच्या मैत्रिणीने त्या शेवटच्या वाक्यातचं टाकलं होतं.

आता मात्र न होणाऱ्या काकूंचे वडील -:माफ करा आबासाहेब !!!! पण.......

आबांनी हाताने थांबा असा इशारा केला, काका दारू पितो आणि असले धंदे करतो, हे घरात कोणालाही अपेक्षित नव्हतं. पण आबांना त्यांच्या इज्जतीची पडली होती त्यांनी सरळ काकाच्या कानाखाली वाजवुन दिली.

काही काळ शांतता होती मग काका तडक बाहेर निघून गेला पायी पायी ।।।।

आजी -: अहो?

चला आम्ही निघतो म्हणुन, आबांनी त्यांना कळवले ते बाहेर सोडायला आले, आम्ही निघालो, त्यांचं घर दिसेनासा झाल्यावर ।।। वडिलांना जीप थांबवायला लावली.

आबा-: जाणके, ( आई ला आबा अशीच हाक मारायचे)
कोणाचं आबा ऐको ना ऐको आईचं ऐकायचेचं।।।आणि कितीही रागात असले तरी आई सोबत रागात बोलत नव्हते।।

आई -:हा आबा !!

आबा-: ती मागे कॅरेट मध्ये कोंबडी असेल ती दे सोडुन!!!

आई -: का हो आबा ? ती तर आपली पण दिसत नाहीये।।

आबा -: आपलीच हाय, जर ठरले आस्त तर त्यांना द्यायला आणली होती. आता तिचा काय उपयोग दे सोडून!!!

आई-: होय आबा!!!

मी आबांकडे वळून पाहत होतो कदाचित आबा मनात हेच म्हणत असतील
हातची कोंबडी सोडणे म्हणजे हेंच का ???

त्या गावाच्या वेशीवर येऊन थांबलो काका तिथवर येऊन पोहोचला होता.

अशी एकंदरीत ही स्टोरी ।।।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिचारा काका Happy
चांगले लिहीताय. लिहीत रहा.

धन्