कुत्रा अथवा मांजर पाळण्याबद्धल

Submitted by कटप्पा on 15 May, 2020 - 11:24

कोरोना काळात समर आला आहे आणि घरात एक पाळीव प्राणी असावा असे वाटू लागले आहे .
दर वर्षी समर सिक्स फ्लॅग चा सिझन पास घेऊन आरामात निघायचा सध्या तर बच्चे कंपनी ला बाहेर पार्क्स मध्ये घेऊन देखील जाता येत नाही आहे . बॅकयार्ड मध्ये झोका आणि स्लाईड चा आता त्यांना कंटाळा आला आहे .
कुत्रा पाळावा कि मांजर याबाबत निर्णय होत नाही आहे .
घराला फ्रंट आणि बॅकयार्ड आहे काही झाडे आहेत त्यामुळे मांजर मजेत राहील असे वाटत आहे . कुत्र्याला रोज फिरायला घेऊन जाणे गरजेचे असते का? कारण ते कितपत जमेल सांगता येत नाही . लहान मुलांना मांजर किंवा कुत्रा त्रास देईल का ?
घरात घाण कमी कोण करेल ?
किटन किंवा पपी आणणार आहे .
Mewcatrescue कोणी वापरला आहे का ?

धागा विरंगुळा मध्ये नाही आहे - सिरीयस धागा आहे .
आपल्या गाईडन्स चा आभारी आहे .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घोडा पाळा - बहुगुणी बहुआयामी उपयोगी पाप्रा. कुत्रा-मांजर एवढ्या मोठ्या घराला शोभणार नाहीत. मांजर हवीच असेल तर मावशीबाई मांजरीच्या ठिपकेवाल्या किंवा पट्टे पट्टे वाल्या भाच्याला पाळा. अतिशय लाघवी पाप्रा.

हॅपी ... धागा विरंगुळा मध्ये नाहीय .
विरंगुळा मधला कटप्पा वेगळा हा वेगळा .
कुत्रा मांजर बद्धल खरंच इनपुट्स असतील तर द्या .

बर्र मग ऐका -
१) कुठलाही पाळीव प्राणी घेण्यापूर्वी आपण त्याला आपल्या दैनंदिन जीवनातून किती वेळ देवू शकणार हे आधी ठरवा.
२) जनरली कुठलीही पाप्रा लहान असताना अतीच क्यूट दिसतात म्हणून घरात सर्वांच्या फार लाडाचे असतात मात्र जसे जसे मोठे होऊ लागतात आणि त्यांचे पालनकर्ता म्हणून जबाबदारी + दैनंदिन आणि नैमित्तिक खर्च वाढत जातो तेव्हा तोच आनंद मानसिक त्रास बनु पाहतो. आणि त्यांच्या आजारपणात व वार्ध्यकात अजाणता हेळसांड घडते.
३) वरील २ही मुद्दे जर ह्या केसमध्ये पॉझिटिव्ह असतील तर नक्कीच पाप्रा आणु शकता आणि मग आता प्रश्न उरतो ते निवडीचा. ह्यात खुप साऱ्या गोष्टीचा काळजी पूर्वक परामर्ष घ्यायला हवाय जसे की -
>> तुमच्या फॅमिलीचा आहार वेज की नॉनवेज
>> घरात ५ वर्षाखालील मूल आहे का ?
>> तुम्ही नवरा बायको कामावर (घराबाहेर) किती वेळ असता ?
>> लॉंगवीकेंडसाठी जाताना पाप्राला सुद्धा सोबत नेऊ शकणार की दुसऱ्यांच्या ताब्यात सांभाळ करायला देणार ?

वरची उत्तरे समाधानकारक मिळाली तर कुत्रा की मांजर आणि मग त्यातून नक्की कुठली ब्रीड घ्यायची त्याच्यावर मी बोलीन.

मांजरीं बाबत पास...

फेन्स्ड बॅकयार्ड असेल तर कुत्र्याकरता उत्तम. तुमची मुलं टॉडलर, प्रि-टिन्स असतील तर पपी बेस्ट. कुटुंबाची आवड, लाइफस्टाइल, इ. चा विचार करुनंच ब्रीड ठरवा. उदा. एखादा टॉय डॉग घरांत २४ तास रमेल पण लॅब, गोरि ला अ‍ॅक्टिव लाइफस्टाइल लागते. पपी हाउसब्रेक होइस्तोवर थोडा त्रास आहे पण नंतर निव्वळ अनकंडिशनल लव...

अवांतरः काहि महिंन्यापुर्वि "आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन" हा अतिशय सुंदर चित्रपट पाहिला. पुस्तकावर आधारित आहे, एका रेसकार ड्रायवर आणि त्याच्या चार पायाच्या मित्राच्या (एन्झो) आयुष्यावर. केविन कॉस्नरचा आवाज आहे एन्झो करता. जरुर बघा...

वय वर्ष दोन आणि चार .
नॉन व्हेज .
कामानिमित्त घराबाहेर सध्या नाही . WFH .
ऑफिस सुरु झालंच तरी लंच ला घरी असतो दोघे .
फेन्स आहे .
लॉन्ग विकेंड चा विचार केला नाही . मांजरीला किंवा पपी ला घरी ठेवून जाता येईल का भरपूर खायला ठेवून?

वीकेंडकरता किंवा २-४ आठवड्यांकरता घराबाहेर जाल तेंव्हा पा प्रा कोण सांभाळेल? कुत्र्याकरता दिवसाचे २५-५० डॉलर भरावे लागतात केनेलमधे किंवा प्रायव्हेट डॉग सिटर कडे.
शुक्रवारी संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळी कोणाकडे पार्टीला , किंवा जेवण सिनेमा इ प्लॅन्स असतील तर कुत्र्याच्या खाण्यापिण्याच्या, शी शूच्या वेळा पाळाव्या लागतात. शनिवार, रविवार , सुट्टीच्यादिवशी सुद्धा सकाळी उठून त्याला बाहेर न्यावे लागते.
एका अडल्टची फिरतीची नोकरी असली तर दुसर्‍या अडल्टची हे सर्व करायची तयारी हवी .
तुम्ही कुठे रहाता त्यावरुन कुत्र्याची शी उचलण्याची तयारी हवी - ट्रेल्स, नेबरहूड मधे फिरवणार असाल तर नक्कीच. आसपास जंगल असेल तर चिंता नाही,
जवळपास सर्वच कुत्रे काही ना काही प्रमाणात केस/ फर शेड करतात. त्याप्रमाणात घरातले व्हॅक्युमिंग वाढवावे लागेल .

एकदम कुठलाही पा प्रा आणायच्या आधी शक्य असल्यास कोणा परिचितांचा पा प्रा घरी ४-६ दिवस ठेवून बघा. जवळपास शेल्टर असतील तर तिथे फॉस्टर पॅरेंट ऑप्शन असेल तर ते चांगले ट्रायल ऑप्शन आहे.

म्हणूनच मांजर फायनल करतोय . कुत्रा मोठी जबाबदारी आहे .
मांजर असल्याने साप वगैरे पण घाबरतील .

मांजर पाळणारे कोणी आहेत का इथे ? लहान मुलाला त्रास तर नाही देणार ?

कोरोना काळात समर आला आहे आणि घरात एक पाळीव प्राणी असावा असे वाटू लागले आहे .
>>>>>
कोरोनापश्चात आणि समर गेल्यावर काय?
त्यानंतर तो प्राणी सोडायचा असेल तर कुत्रा पाळू नये. जीव लागतो बोलतात. ससा पाळणे उत्तम. ते जीव नाही लावत. आमच्या पोरांना मांजरी फार आवडतात. त्यामुळे मुलांना काय आवडते ते विचारा.

अमेरीकेत पाळायचाय हे हायलाईट केलेय. ते पाहता अमेरीकेत कुत्रा मांजर पाळताना काही वेगळ्या अडच्णी असतील तर कल्पना नाही.

टेंपररी इंटरटेंटमेंट म्हणून हां पाप्रा प्रपंच डोक्यात आला असावा किंवा फॅमिली मेंबरापैकी कोणीतरी भरवला असेल. ना कुत्रा ना मांजर ... गो फॉर फिश. एक फिश टैंक आणा छोटुसा ह्यात स्ट्रॉन्ग फिल्टरेशन आणि ऑटोमेटिक फीडर सिस्टीम लावली तर बिंदास कधिपण कितीपण दिवसाला बाहेर जा.. बाहेरगावी जा. हौस फिटली / लॉक डाउन संपले की पाप्रा मधला इंटरेस्ट संपला तर सर्व सेट विकूपण शकता. हा का ना का

मेधा+१
मान्जर पाळण त्यामानाने सोपे आहे अस म्हणतात, इन्डोअर असते, फिरायला न्या वैगरे अटि नसतात, लिटर बॉक्स वैगरे अ‍ॅरेज केले की झाले.
कुठलाही पेट आणताना करोना, लॉकडाउन हे निकष मनात ठेवु नका .ही एक लाइफटाइन कमिटमेन्ट आहे त्याद्रुश्टिने विचार करा.

कसला सही वेळेत धागा निघालाय. आम्ही पण अगदी डेस्परेटली शोधत आहोत अ‍ॅनिमल शेल्टर मधले किटन्स किंवा पपीज.
पण सध्या तरी काही एवढा रिस्पॉन्स मिळत नाहीये. पण हा धागा वाचनात ठेवेन.

टेंपररी इंटरटेंटमेंट म्हणून हां पाप्रा प्रपंच डोक्यात आला असावा किंवा फॅमिली मेंबरापैकी कोणीतरी भरवला असेल.
->>>
नाही . हा विचार खूप आधीपासून होता . माझी स्वतःची ईच्छा आहे मांजर पाळण्याची .
कुत्रा कधी कधी नको वाटतो कारण ते गळ्यात दोरी बांधणे फार विचित्र वाटते . दया येते .
फिश नको वाटतो . फिश मरतात आणि उगाच मुलांना वाईट वाटेल .

कसला सही वेळेत धागा निघालाय. आम्ही पण अगदी डेस्परेटली शोधत आहोत अ‍ॅनिमल शेल्टर मधले किटन्स किंवा पपीज.
-->>>
अंजली तुम्ही काय फायनल करताय . मांजर कि कुत्रा ?

प्राण्याना घरच्या सदस्यासारखे ( यात सगळी उत्तरं सापडायला हवीत. नाही तर धागा काढूनही उपयोग नाही) वागवता येण्याची तयारी नसेल तर शक्यतो प्राणी घरी आणू नका.

फिश मरतात आणि उगाच मुलांना वाईट वाटेल >> नाही हो असे काही नाही ... उलट aquarium हा एक उत्तम नॉन मेन्टेनन्स पर्याय आहे. माझ्या कडे आहे फिश टॅंक, मासे टाकून ६ महिने झालेत आणि सगळे एकदम उत्तम आहेत. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा थोडे खाणे दिले कि झाले.

तुम्हाला थोडी माहिती वाचावी लागेल कि कोणते फिश एकत्र ठेवायचे ते. मी स्वतः बऱ्यापैकी एक्स्पर्ट आहे म्हणजे बेट्टा फिश चे ब्रीडिंग पण केले आहे.

हा एक उत्तम पर्याय आहे, विचार करावा

उडाणटप्पू नक्की विचार करेन . मात्र फिश ला पेट करता येणार नाही . लहान मुलांना प्राण्याला पेट करण्यात खूप मजा वाटते .

कुत्रे मांजरी आपल्यासोबत खेळतात... फिशसोबत खेळायला त्यांना बाहेर काढायचे की आपण आत ऊतरायचे.. उगाच काचेवर टकटक करून त्यांना त्रास द्ययचा खेळ मला रुचत नाही..

मॉरल - रंगीत मत्स्यपालन हा फक्त शोभेचा ऊपक्रम आहे. डोन्ट गो फॉर ईट !

प्राण्याना घरच्या सदस्यासारखे वागवता येण्याची तयारी नसेल तर शक्यतो प्राणी घरी आणू नका.
>>>

हे जीव लागला की आपसूक होते. नाही लागला तर नाही होत. पुढचा विचार करायची गरज नही. पेट पाळायची आवड असणे पुरेसे आहे. आवड नसलेलेही पुढे बदलताना पाहिलेत.

सहमत, या घरात भुभु राहीन नाहीतर मी
या बोलावरून ते पिल्याच खाणं झालं का इथवरचा प्रवास पहिला आणि अनुभवला आहे

अंजली तुम्ही काय फायनल करताय . मांजर कि कुत्रा ?>>>>>>> खरं सांगायचं तर माझी मुलं आता जे मिळेल ते या पॉईंटला आली आहेत. पण वरचे सगळे देखरेखीचे मुद्दे लक्षात घेता माझा प्रेफरन्स माऊ !

ससा पाळणे उत्तम. ते जीव नाही लावत.>>>>इथे खूपच हसले,
रच्याकने माझी मुले सुद्धा पेट पाळूया म्हणून खूप मागे लागायची पण लॉक डाऊन मुळे त्यांना स्वतःलाच जाणीव झाली आहे ,सतत घरात बसणे किती बोरिंग आहे,
मला कुठलाच पेट पाळणे आवडत नाही सो माझा पास

आम्ही जातो आहेत black Labrador retriever बघायला बुधवारी Happy माझ्या मुलांनी हाता तोंडाशी आलेल्या मनीमाऊ ला नाही म्हटले . आणि कुत्रा हवा आहे असा नाद लावला आहे. अमेरिकेत असाल तर प्लीज शेल्टर प्रेफर करा. प्रायव्हेट ब्रीडर नको. Per finder वर खूप आहेत एरीआ प्रमाणे. मी तर इतके पाहिले pet finder वर आणि pause for paws वर की आता डोळे मिटले की कुत्रे येत आहेत डोळ्यासमोर Lol

Pages