मन वढाय वढाय...

Submitted by मन्या ऽ on 5 May, 2020 - 04:51

मन वढाय वढाय...

nimita यांची 'मन वढाय वढाय' ही कथा वाचल्यावर मनात विचारांची रांग लागली होती... तेच विचार कवितेत शब्दबद्ध करायचा माझा केविलवाणा प्रयत्न... Happy

पसारे ते भावनांचे
आवरावे किती?
मनास माझिया मी
सावरावे किती?

ओढ तुझी, कि
धुंदी आठवांची
मनास माझिया मी
समजवावे किती?

ठेहराव मनाचा
हरपत चालला
निष्फळ उसासे
टाकावे किती?

तु घर नाहीस माझे
तु तर मुक्त आभाळ
हे भान असुनही
पुन्हा गुंतताना
स्वतःला रोखु कशी मी?

(Dipti Bhagat)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मला तर कथेतली संसारी बाई दोघांची प्रतारणाच करते आहे असे वाट्ते. दोन्ही कडुन फायदे घेत आहे असे वाट्ते. शी इज इन अ‍ॅन अ‍ॅड्वांटेजिअस पोझिशन. आयदर वे.

पारिजातका, अमा, अजयदा प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद! Happy

@अमा, मेबी तिला फक्त आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण जमा करायचे असतील. आणि ते ती तिच्या नवऱ्याकडुन मिळत नाहीयेत तर एक्स कडुन मिळवायचा प्रयत्न असेल.. ऍडवांटेज घेतीये पण स्वानंदासाठी.. हे माझ मत. Happy

ऍडवांटेज घेतीये पण स्वानंदासाठी.. हे माझ मत>> पन म्हणजे दोघे फसले जात आहेत. मग स्वानंदा साठी शारीर संबंधही ठेवावेत. उगीच भावनिक नखरे करून दोघांना अडकवून ठेवले आहेत. मी काही जज करत नाही . पुरुष असे च वागत असतात. पण कोणी माझा असा फाय्दा करून घेत असेल व लट कवुन ठेवत असेल त्यांच्या वैकक्तिक आनंदा साठी तर खपवून घेणार नाही. वाचायला मजाच येते आहे. फायनली ती नवरा सोडून मित्रा बरोबर राहते का ते बघायचे आहे. इमोशनल ड्रामा तो चलता रहेगा.

अमा, अहो एक सांगु का??
तुम्ही म्हणत आहात तेवढी दुनियादारी अजुन मी पाहीलेली नाही. नात्यांचा गुंता वैगेरे अजुन आयुष्यात अनुभवणं बाकी आहे. त्यामुळे स्नेहाच्या गोष्टीकडे एक कथा म्हणुन बघतीये. पण एका नायिकेच्या मनातले विचार कवितेत मांडायचा प्रयत्न केलाय. आता तो प्रयत्न फसलाय का नाही ते वाचक च सांगु शकतात. Happy

मन्या,
कविता खूपच छान वाटली. माझं लिखाण वाचून तुम्हांला त्यावर काही लिहावंसं वाटणं यातच मला सगळं मिळालं. Happy पुन्हा एकदा धन्यवाद Happy