नशीब नेत राहिले ............!

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 5 May, 2020 - 10:14

नशीब नेत राहिले.........!
- महेश मोरे (स्वच्छंदी)

मला उन्हात ठेवुनी कसे मजेत राहिले
नकोच जायला तिथे नशीब नेत राहिले

खुडून टाकले कुणी, कुणी जखम उरी दिली
उभ्या जगास तेच फुल सुगंध देत राहिले

असेच काल एकदा अधर चुकून चुंबिले
नि श्वास काळजातले तिच्या कवेत राहिले

जसा गझल लिहायला म्हणून शब्द शोधला
समोर नेमके तिचेच नाव येत राहिले

सुखांस भेटली अधीर वाहवा तुझी-तिची
नि दु:ख मैफलीत फक्त दाद देत राहिले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...
>>>असेच काल एकदा अधर चुकून चुंबिले
नि श्वास काळजातले तिच्या कवेत राहिले<<<
हे मस्तच..