विचित्र विश्व - रोचक माहिती, संकल्पना आणि घटना

Submitted by मामी on 17 April, 2020 - 01:40

जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.

शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.

तेवढाच विरंगुळा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉयनिचचे हस्तलिखित बाड - The Voynich Manuscript

आतापर्यंत जगातील सर्वांत गूढ लिखाण कोणतं? असा प्रश्न आला तर एकच उत्तर येईल ते म्हणजे वॉयनिचचे बाड.

१९१२ मध्ये न्युयॉर्कचा एक जुन्यापुराण्या दुर्मिळ पुस्तकांची खरेदी विक्री करणारा माणूस अश्याच दुर्मिळ पुस्तकांच्या शोधात रोमला गेला होता. तिथल्या एका मॉनेस्ट्रीमधे एका ट्रंकेत त्याला हे बाड मिळाले आणि तेव्हापासूनच हे अनाकलनीय पुस्तक प्रकाशात आले. या दलालाचे नाव होते विल्फ्रेड वॉयनिच आणि त्यामुळे या पुस्तकाला वॉयनिच बाड म्हणून ओळखले जाते.

काय आहे हे? Voynich Manuscript या नावानं प्रसिद्ध असलेलं हे एक कातडी वाळवून त्यावर लिहिलेलं २४० पानांचं हस्तलिखित आहे. काही काही पानं तर घड्या घालून दुमडून ठेवली आहेत. ती उघडल्यावर चांगलीच मोठी आहेत हे लक्षात येतं. पुस्तकात भरपूर चित्रांसह कोणत्यातरी अगम्य लिपीत मजकूर लिहिलेला आहे. हस्तलिखितात जवळजवळ प्रत्येक पानावर रंगित चित्रं काढलेली आहे आणि त्या चित्रांवरून या पुस्तकाचे पाच विभाग आहेत असं दिसून येतं - वनस्पती, ज्योतिष (ग्रहतार्‍यांची माहिती), जीवशास्त्र, औषधं आणि पाककृती. चित्रं काढण्यासाठी हिरवा, निळा, विटकरी रंग वापरले गेले आहेत. कार्बन आणि इतरही काही टेस्टस करून हे हस्तलिखित १४०४ ते १४३८ या कालखंडात कधीतरी लिहिले गेले आहे असा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे.

ही लिपी आता आतापर्यंत तरी कोणालाही उकलता आली नव्हती. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांमध्ये सांकेतिक भाषेत लिहिलेले संदेश पाठवले जात आणि हे संदेश पकडून त्यांची उकल करणारे अनेक निष्णात तज्ञ अनेक देशांत नेमले गेले होते. यापैकी कोणालाही ही लिपी किंवा जर सांकेतिक भाषा असेल तर ती शोधून काढता आली नाही. यामुळे या हस्तलिखिताभोवतालचे गूढ वाढतच गेले. अनेकांनी अनेक शक्यता आणि सिद्धांत मांडले पण तरीही नक्की काहीच त्यातून निष्पन्न झालं नाही.

दोनेक वर्षांपूर्वी यातील लिपी उकलून काही मजकूर वाचता आला आहे असा काहींचा दावा आहे पण तरीही ही संदिग्धता तशीच आहे आणि त्यामुळे गूढही. हे बाड १९६९ पासून येल युनिवर्सिटीच्या Beinecke Rare Book & Manuscript Library मध्ये ठेवले गेले आहे.

ही सर्व रोचक माहिती खालील दुव्यांवर तुम्ही वाचू आणि ऐकू/बघू शकता.

हे हस्तलिखित ऑनलाईन बघता येईल. फार मस्त आहे हे : https://archive.org/details/TheVoynichManuscript/mode/2up

https://en.wikipedia.org/wiki/Voynich_manuscript

The Voynich Code - The Worlds Most Mysterious Manuscript - The Secrets of Nature : https://www.youtube.com/watch?v=awGN5NApDy4

Voynich Manuscript Revealed (2018) : https://www.youtube.com/watch?v=p6keMgLmFEk

The mysterious Voynich manuscript has finally been decoded [UPDATED]

Has the Voynich Manuscript Finally Been Decoded?: Researchers Claim That the Mysterious Text Was Written in Phonetic Old Turkish

Has Voynich Manuscript Been Decoded? Mysterious Book May Be Written in Proto-Romance Language

साप विंचु अश्या प्राण्यांच विष मंत्राच्या मदतीन उतरवतात ...

आणि
काहिंना हे उलट करण्याची मह्ती असते

मामी खूपच रोचक माहिती! नव्यानेच कळतय हे, आणि अजूनही ह्याची उकल कशी काय झाली नाही ह्याचं आश्चर्य वाटतय

धन्यवाद.

तुम्हीही कोणी इथे लिहू शकता. अशी काही गूढ, अतर्क्य वेगळीच गोष्ट अथवा घटना माहित असेल, वाचली असेल तर. हा धागा त्यासाठीच आहे.

आपल्या देशातील सर्व मुस्लिम पश्मिम दिशेला तोंड करून नमाज पढतात हे आपल्याला माहीत आहे. बेसिकली, मक्केच्या दिशेला तोंड करून नमाज पढावा असा नियम आहे. त्याप्रमाणे त्या त्या देशाप्रमाणे ही दिशा बदलते.

पण मुळात मक्का नक्की कुठे आहे? आता जी मक्का मानली जाते तीच खरी मक्का आहे का? यावर एक अतिशय सविस्तर आणि रोचक डॉक्युमेंटरी पाहिली मी. जरा मोठी आहे पण अतिशयच इंटरेस्टिंग आहे.

The Sacred City of Mecca: Have We Got It Wrong? : https://www.youtube.com/watch?v=TIw1OPH6QvM

कोंबडीवर हिप्नॉटिझम

चमत्काराशिवाय नमस्कार नाही. या उक्तीप्रमाणे अंनिस ( अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ) लोक (श्री शाम मानव आणि प्रभृती) आपल्या प्रबोधन करण्याच्या बैठकांत लोकांना ( कोंबडीवर हिप्नॉटिझम) कोंबडीवर मंत्र घालून तिला कह्यात करून दाखवण्याचे प्रयोग करत असत. यानंतर लोकांना हे सर्व हातचलाखी आहे असे सांगून बाबा, फकीर, पाद्री हे लोक जे चमत्कार दाखवतात ती हातचलाखी आहे असे समजावत असत.

लोकांना कोंबडीचा आत्मा कह्यात आणू शकतो याचे भयंकर आश्चर्य वाटत असे.

याबद्दल येथे वाचून पहा.
https://en.wikipedia.org/wiki/Chicken_hypnotism

धागा छान Happy . माझे दोन पैसे...
या डोक्यूमेन्टरी मध्ये spiral ची माहिती दिलेली आहे. फूलांच्या पाकळ्यात पण Fibonacci गणित आहे,. हे कळले...Super interesting ...
spiral
यांच्या इतरही चार डोक्यू आहेत. सर्वच आवडतात मला.
तुम्ही दिलेल्या दुपारी निवांतपणे बघते. धन्यवाद Happy .

आदिश्री यांनी एका धाग्यावरती एक दुवा दिलेला होता ज्यामधुन मला फ्रॅक्टल या विशिष्ठ रचनेविषयी माहीती मिळाली. निखळ मनोरंजक व अद्भुत अशी ही माहीती, जितके तुम्ही शोधाल, सापडत जाइल. हा एक विशिष्ठ पॅटर्न आहे, ज्यामध्ये लहान व मोठ्या रचनेत हुबेहूबता असते. म्हणजे ही रचना जर तुम्ही सूक्ष्मदर्शकामधुन पाहीली तर तशीच दिसते जशी तुम्ही अधिकाधिक विस्तारत गेलात तर दिसेल. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी अशा प्रकारची ही रचना आहे. झाडे, हिमकण हे काही निसर्गातले नमुने.

कागदाची कमाल आणि धमाल

कागदाची एक पट्टी कापली आणि टोकं जोडून एक वर्तूळ तयार केलं तर त्या वर्तुळाला दोन बाजू असतील - एक आतली आणि एक बाहेरची. याच पट्टीला एक पीळ देऊन मग टोकं जोडली तर केवळ एकच बाजू असलेली मोबियस स्ट्रीप बनते. हे बहुतेक सगळ्यांना माहित असतं.
पण Tadashi Tokieda या पट्ट्या आणखी एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातो.

Unexpected Shapes (Part 1) : https://www.youtube.com/watch?v=wKV0GYvR2X8&t=2s

आणि

Unexpected Shapes (Part 2) : https://www.youtube.com/watch?v=mh3eMt09EAs

आता आपल्याकडे वेळ आहे सध्या, तर ही गंमत करून बघता येईल आणि घरातल्या लोकांना चकीत करता येईल. लहान मुलांना पण यात मस्त मजा येईल. मनोरंजनाबरोबरच ज्ञानवर्धन.

आदिश्री यांनी एका धाग्यावरती एक दुवा दिलेला होता ज्यामधुन मला फ्रॅक्टल या विशिष्ठ रचनेविषयी माहीती मिळाली. निखळ मनोरंजक व अद्भुत अशी ही माहीती, जितके तुम्ही शोधाल, सापडत जाइल. हा एक विशिष्ठ पॅटर्न आहे, ज्यामध्ये लहान व मोठ्या रचनेत हुबेहूबता असते. म्हणजे ही रचना जर तुम्ही सूक्ष्मदर्शकामधुन पाहीली तर तशीच दिसते जशी तुम्ही अधिकाधिक विस्तारत गेलात तर दिसेल. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी अशा प्रकारची ही रचना आहे. झाडे, हिमकण हे काही निसर्गातले नमुने. >> हो बरोबर सामो. मस्त आहे ती संकल्पना.

फूलांच्या पाकळ्यात पण Fibonacci गणित आहे,. हे कळले.<<<फ्रॅक्टल या विशिष्ठ रचनेविषयी माहीती मिळाली. निखळ मनोरंजक व अद्भुत अशी ही माहीती, जितके तुम्ही शोधाल, सापडत जाइल <<<<

नेफ़्लि वर ' द कोड' नावाची documentary आहे. तीही बघा. मस्त आहे.

तुम्हाला जर कुणी सांगितलं की अवकाशात एक असा ग्रह जो पूर्णपणे हिर्यांचा बनलेला आहे तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण खरचं असा एक ग्रह आहे ज्यांच नाव आहे - PSRJ1719 1438B. ह्या ग्रहाला डायमंड प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं.. हा ग्रह चार हजार प्रकाशवर्षे दुर असून सध्या तार्यापासून वेगळाच होऊन भ्रमण करत आहे.. हा ग्रह आकाराने गुरू ग्रहाइतका मोठा जरी असला तरी त्याचा "मास" हा गुरूपेक्षा अर्धाच आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे हा आपल्या तार्यापेक्षा आकाराने मोठा आहे..

एक प्रकाशवर्ष = एका वर्षात प्रकाश जिथपर्यंत पोहचेल तेवढं अंतर

गुरूच आकारमान = गुरू आकाराने इतका मोठा आहे की त्यामध्ये जवळपास 1300 पृथ्वी आरामात मावतील..

"पृथ्वीवर माणुस उपराच " या पुस्तकात अशा अनेक गोष्टींचा बराच उहापोह केलेला आहे.
भुतलावर सध्या न सुटलेल्या कोड्यांपैकी (जागा किंवा गुढ आकृत्या) किंवा आश्चर्यांवर प्रकाश टाकलाय बर्‍यापैकी.

हे निळावंती तर नाही? Wink
>>>>
ते फेक आहे
लहानपणापासून गप्पा ऐकतोय

तो नॉस्त्रादेमस सुद्धा असेच एक फेक प्रकरण आहे. तिसरे महायुद्ध. एक दक्षिणेकडचा हिंदू नेता. जगात हिंदूंचे राज्य येणार काय काय गप्पा ऐकलेल्या. ईतर देशात वेगळ्या गप्पा असतील. सोयीचे अर्थ काढून प्रत्येकाने आपली पोळी भाजली असेल..
क्या करे.. गंदा है पर धंदा है

निलावंतीची काही पाने माझ्याकडे आहेत. अक्षरे समजत नसली, तरी ग्रंथ अतिशय जुना असून वाचताही येत नाही.
बघण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा Happy
ही पाने Authentic मानतात. आहेतच असा दावा अजिबात नाही.

लहानपणापासून गप्पा ऐकतोय

तो नॉस्त्रादेमस सुद्धा असेच एक फेक प्रकरण आहे. तिसरे महायुद्ध. एक दक्षिणेकडचा हिंदू नेता. जगात हिंदूंचे राज्य येणार काय काय गप्पा ऐकलेल्या. ईतर देशात वेगळ्या गप्पा असतील. सोयीचे अर्थ काढून प्रत्येकाने आपली पोळी भाजली असेल..
क्या करे.. गंदा है पर धंदा है
हे एवढे ठाम पने लीहले आहे रूनमेश तुम्ही.
तुमचा काही अभ्यास आहे का ह्या विषयात .
अभ्यास असेल असंख्य प्रसंगाची चिकिस्ता करून मत व्यक्त केले असेल तर ठीक आहे .
पण काहीच अभ्यास नसताना,कोणतीच चीकिस्ता केली नसताना मत व्यक्त करणे ते पण ठाम पने हे शहाणपणाचे लक्षण नक्कीच नाही.

Australia तील लाल खेकडे :
दर वर्षी ऑस्ट्रेलियातील एका बेटावरील कोट्यवधी खेकडे जंगलातून समुद्राच्या दिशेने समूहाने स्थलांतर करतात. खेकड्यांची ही अजस्त्र फौज प्रवासात खडतर रस्ते, घरे, शेती, मैदाने, लोकांच्या चपला, गाड्या अश्या अनेक चित्रविचित्र जागांतून वाट काढून पुढे मार्गक्रमण करते.
https://mr.quora.com/prthvivara-ghadanarya-kahi-durmila-naisargika-ghata...

Pages