तुम्ही कोणते युट्यूब चॅनल्स सबस्क्राइब केले आहेत?

Submitted by वर्षा on 12 April, 2020 - 10:22

यूट्यूब हे म्हटलं तर वेळ वाया घालवणारं नाहीतर योग्य हेतूसाठी वापरलं तर फार उपयुक्त साधन आहे. Happy कित्येकदा मी गूगल करण्याऐवजी सरळ यूट्यूबवरच शोध घेते.
करमणूक म्हणा किंवा नवीन स्कील्स शिकणं म्हणा, यूट्यूब या सगळ्यांचं भांडार आहे.
यूट्यूबवर बरेच छान कॉन्ट्रीब्यूटर्स आहेत. माझे आवडते असे आहेतः

स्कील्स लर्निंग (शिक्षण्/नोकरी/करीयर् इ.)
Traversy Media (टेक्निकल स्कील्स)
Bridging the Gap (बिझनेस अ‍ॅनलिसिस)
Nihongo no mori (जपानी भाषा)

आरोग्य
Rujutadiwekarofficial
Damle Uvach

करमणूक्/पर्यटन इ.
MostlySane
Bharatiya Touring Party
Dhanya Te Foreign
Rang Pandhari

तुम्ही कोणते चॅनल्स सबस्क्राइब केलेत जे तुम्हाला उपयुक्त वाटले आहेत किंवा करमणूकीसाठी आवडतात ते लिहा. शक्यतो लिंकही द्या. तुमचे आवडते यूट्यूबर्स कोण आहेत?
यातून माहित नसलेले अनेक उपयुक्त चॅनल्स कळतील असं वाटतंय. तर सांगा तर मग!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी करमणूकीसाठी भरपूर प्रमाणात युट्यूब बघते. त्यामुळे खूप चॅनल्स फॉलो करते.
उर्दू लिपी शिकताना युट्यूबचा बराच उपयोग केला. https://www.youtube.com/playlist?list=PLpIoKKr38VwCp0-FEEdBV2xd7s1Pdmg9C
सध्याचे फेवरेट म्हणजे
Bon apetit: The entire team is fantastic! Love each and every one of them. Absolutely a stress buster. It's a channel for cooking and food but actually it is so much more than that! जेव्हा एका आवडीची मंडळी एकत्र येतात तेव्हा त्या संवादांमध्ये आपोआपच एक जादू असते. BA फॅमिली has that vibe Happy जितके जास्त व्हिडिओ पहाल तितके या सगळ्या मंडळींच्या प्रेमात पडाल! अर्थात माझे आवडते Clair आणि Brad!
Our stupid reactions: मी यांचे व्हिडिओ पहायचे पण जेव्हा हैदरचा परीक्षणाचा व्हिडिओ पाहीला तेव्हा subscribe केल्याशिवाय राहावले नाही. मजा आणतात रिक आणि कॉर्बिन! Stupid and sincere at the same time!
Jaby Koay: आधीच्या reactions आवडायच्या पण आत्ताचे सगळे व्हिडिओ मी बघत नाही.
Film companion: For all (most) my film fix! सुचारिताचे not a movie review आवडतात.
Living big in a tiny house: जगभरातली tiny houses (आपल्याकडची नेहमीची घरं खरंतर! तीनशे ते चारशे स्क्वेअर फूट साधारण) बघता येतात. त्यांच्या मालकाशी गप्पांमधून वेगवेगळ्या जरा हटके विचारांशी ओळख होते.
Our rich journey: एका लवकर (चाळीशीत) निवृत्ती घेऊन लिस्बन पोर्तुगालमध्ये स्थायिक झालेल्या अमेरिकन नवरा बायको आणि त्यांच्या दोन मुली यांचे अनुभव असतात.
Pick up limes: vegan lifestyle/food related videos असतात.
अजून भरपूर चॅनल्स आहेत माझ्या लिस्ट मध्ये पण आत्ता इथे थांबते.
इथे अजून काही नवीन चॅनल्स कळतील म्हणून इतरांच्या पोस्ट्स वाचण्यास उत्सुक आहे!

सबस्क्राईब फुकट होते का? मी कधी पैसे जातील या भितीने क्लिकच नाही केले.
बाकी गरज अशी पडली नाही मुद्दाम एखादा चॅनेल सब्स्क्राईब करायची. असा ईतका कुठला पॅशन वा छंद नाही. जे फावल्या वेळेत वारंवार बघितले जाते म्हणजे क्रिकेट, शाहरूख वगैरे ते नेहमी आपल्यासाठी वर आणले जातेच. ते पुरते..

मी बरच युट्युब बघतो. स्वतःहून कधी सबस्क्रिब केलं नाही, पण हे चॅनेल शोधून बघतो.
१. फिल्मी इंडियन - ही बाई एकदम मस्त फिल्म रिवयु देते. साऊथ फिल्मच प्रेम माझ्याइतकच Lol
२. ट्रॅकिन टेक - अरुण प्रभुदेसाई हा टिपिकल मराठी माणूस. खूप मस्त नवीन फोन आणि गॅजेटविषयी माहिती सांगतो.
३. आशिष चंचलनी वाईन्स - मस्त कॉमेडी विडिओ असतात.

जि, हो पिक अप लाईम्स छान आहे. बघते मीही अधूनमधून.
अवर स्टुपिड रिअ‍ॅक्शन्स माहिती आहे. आणि बरेच लोक करतात हा रिअ‍ॅक्शन प्रकार.
Living big in a tiny house आणि Our rich journey बघायला हवे. धन्यवाद!
@एसआरडी, हो गार्डनिंग विषयावरचे व्हिडिओ मस्त असतात.

>>सबस्क्राईब फुकट होते का?
हो ते फुकट असतं.

@अज्ञातवासी
>>२. ट्रॅकिन टेक - अरुण प्रभुदेसाई हा टिपिकल मराठी माणूस. खूप मस्त नवीन फोन आणि गॅजेटविषयी माहिती सांगतो.
अरे वा, बघते आता.
३. आशिष चंचलनी वाईन्स - मस्त कॉमेडी विडिओ असतात.
हाहा हो बघितलाय त्याचा कंटेंट. पण माझं मत आपली मराठी मुलगी मोस्टलीसेन प्राजक्ता कोळीला Happy

यु ट्यूब बरेचदा थोड्या वेळात काही बघायचे असेल ता, काही शिकायचे असेल तर बघते. मी केलेले काही चॅनेल्स
करमणुकीसाठी...
मोस्टली सेन प्राजक्ता कोळी - कोळी फॅमिली मस्त आहे
बीबी कि वाईन्स भुवन बाम ची थोडी adult कॉमेडी आहे पण खूप टॅलेंटेड आहे हा.
भारतीय डिजिटल पार्टी
Beyounick हल्लीच पाहायला सुरु केला आहे चांगला वाटला

होम डेकोर मध्ये इंटरेस्ट असल्याने तेही बरेच चॅनेल्स बघते
Xo Macenna ही thrift store च्य वस्तूंचा makeover करते
Lone fox भारी आहे हा मुलगा
hermione chantal
इंडियन होम डेकोर चॅनेल्स बरेचदा बाहेरच्या चॅनेल्सची कॉपी करून कन्टेन्ट करतात असे वाटते म्हणून त्यांना बघणे सध्या बंद केले आहे
पण त्यात Disha Mishra Dubey आवडते

कूकिंग मध्ये kabita's kitchen
gardening चे बरेच बघायचे आधी पण आता कंटाळा येतो गरज लागली तरच बघते पण
garden up चॅनेल आवडत होते

अजून खूप आहेत सध्या एवढेच

अरे बापरे, बाकीच्यांची यादी बरीच मोठी आहे. मी madhurareciepies subscribe केलं आहे, कूकिंग साठी. आणि एक गावाकडची वाट चॅनेल पण subscribe केलंय. बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, दोघे नवराबायको साध्या सध्या गावाकडील रेसिपी दाखवतात त्यांचं सादरीकरण, साधेपणा आणि भाषा खूप आवडते. बाकी काही drawing ची चॅनेल्स पण केली आहेत.

मी हे केले आहेत, खूप बघतो.
Amazing places on planet, 5 min crafts, Aloha crafts,Amoeba sisters for kids biology, Being Marathi recipes, Bodyfit By Amy ,Chef Ranveer
,CNBC, Cooking Shooking, Draw so cute
,GoTraveler .Hebbars kitchen,It's okay to be smart, JeevanKadamVlogs
Mini food key and miniature cooking , minimum cafe , miniature land , NASA, NatGeo kids, Novaspirit Tech, pingu, pocket films, Sara beauty corner, science max , Shankar Tucker(music), Sony marathi , Space videos , tecmath , The big bang theory, The Daily show with Trevor Nova, Tom and Jerry, Travel with Deepti Bhatnagar, visa2explore, yummy cookies, Liziqui.
They are all free.
मी, मुलगा, मुलगी आणि नवरा यांच्या आवडीनिवडी प्रमाणे Happy .
फारच रेंज आहे. Happy

https://www.youtube.com/channel/UC0f9eqCKyfXBoqvSKg0l0hA - सॅम जेप्पी - वेदिक अ‍ॅस्ट्रॉलॉजर
https://www.youtube.com/channel/UCRd4Q_6QLranEYmnho_j9BQ - विवेक बुवा गोखले
https://www.youtube.com/channel/UCsyj8uf4agVPHvXyCkY9sYw - वासुदेव शाश्वत अभियान
https://www.youtube.com/channel/UC-SDVoqMi6g1EjGLPV5ooig - स्वोन्नती / प्लेलिस्टस
https://www.youtube.com/channel/UCYXn_jH9iacFT2Hwiq_3ydA - सद्गुरु डॉ. बालाजी तांबे
हा एक विनोदी चॅनल आहे - https://www.youtube.com/channel/UCVBXum_ntfgHgHCOYtGOmEw

माझ्याकडे सध्या हे स्ब्स्क्राईब केलेले आहेत. - The Print, The Lallantop, 李子柒 Liziqi , TAG TV आणि Interesting Facts . आणि हे मी अगदी नेमानं बघते देखिल.

बाकी गार्डनिंग, गार्डन इम्प्रुव्हमेंट, अधूनमधून रेसिपीज आणि अनेक क्राफ्टसचे व्हिडिओ बघते त्यामुळे ते सजेस्ट होत रहातात.

इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रीकल रिपेरिंगचे विडिओ काम निघेल तेव्हा शोधून पाहतो. यात बंगाली, बिहारी लोक अगदी चांगली माहिती देतात. ( कुठली वायर कुठे जोडायची नाही याचा कॉमनसेन्स वापरून काम करता येते.)

>>>> ट्रॅकिन टेक - अरुण प्रभुदेसाई हा टिपिकल मराठी माणूस. खूप मस्त नवीन फोन आणि गॅजेटविषयी माहिती सांगतो. >>>>> असे चानेल शोधताना लक्षात आले की कंपनीकडून रिव्युसाठी दोनचार दिवसांसाठी फोन, gadget मिळाले पाहिजे. तसे न झाल्यास एकच मनुष्य रिव्यू देऊ शकत नाही. मग gadgets_ ndtv उपयोगी वाटते. हल्ली CNBC awaaz tech guru सुद्धाही पाहतो. पण काही माहिती उघड करत नाहीत.

फिल्टरकाॅपी
डाईस मिडिया
प्युडिपाय (साॅरी मी भारतीय असूनही त्याला सब्सक्राईब करते)
मीट अरनाॅल्ड
हीहो किडस्
हेब्बार्स किचन (याचा अजून उल्लेख कसा आला नाही याचं आश्चर्य वाटतं)
प्राजक्ताकोळी मोस्टलीसेन
बीयुनिक
हर्ष बेनिवाल
गोल्डमाईन टेलेफिल्मस्
केयुश दी स्टंट डाॅग
शेर्पा दी हस्की
दी ड्राईव्हिंग डाॅग्स
शिनचॅन-डोरेमाॅनचं कोणतंतरी
डिज्नीचं कोणतंतरी, त्यात बेस्ट आॅफ लक निकी वगेरे चे एपि आहेत
आणखी बरेच आहेत.. एका वर्गमित्राने पण सुरु केलं होतं, पण ते बंद पडलं Proud

दोनच channel Subscribe केलेत. (Notification बंद)
1. Pick up limes
2. CA rachana phadake Ranade

याव्यतिरिक्त खालील चँनेल्स चे विडिओ आपोआप येतात
1. Garden up
2. Simply your space
3. The urban fight
स्वयंपाकाशी संबंधित (आजकाल फक्त थोडे बघते, रेसिपी करायच्या भानगडीत पडत नाही)
1. Madhurasrecipes
2. Hebbar's kitchen
3. Raj shri food
4. Master recipes (शेफ विष्णु मनोहर यांचे चेनल)
5. Cookingshooking
6. Kabita's kitchen
शिवाय बरेच DIY channels, instrumental music, relaxation music , Liziqi चे suggestions येतात त्यातील निवडक पाहते.

सध्या द वायर, लल्लन टॉप, आकाश बॅनर्जी, टेड टॉक, प्रविण मोहन, क्रोशाचे काही, ब्रायन फॉस्टर, आयआयटी कानपूर.
सध्या टिव्ही, पेपर जोडीनं युट्युब न्युज चॅनल्सही फॉलो कराव्या वाटतात.

Kabitas Kitchen, Madhura's recipe आणि अजून एक दोन पाकृचे चॅनेल्स.
बाकी काही सबस्क्राइब केले नाहीत अद्याप.

सबस्क्राइब केलेली चॅनल्स-
Avahan IPH - डॉ. आनंद नाडकर्णी यांचं
रंगपंढरी- अप्रतिम मुलाखती ऐकण्यासाठी
शिवणकला- आपल्या रोजच्या व्यवहारात वापरात येणाऱ्या वस्तू विशेषतः पिशव्या, कव्हर ई. शिवायला शिकवतात.
TEDx talks-
London Business school-
वरील दोन्ही management संबंधित विषयांसाठी ऐकायला/ पहायला आवडतात.
Praveen yoga academy -
Jai yoga academy-
वरील दोन्ही चॅनल्स वर योगासनांचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत. अगदी श्वासोच्छ्वासासकट आसनं दाखवली असल्याने आवडतात.
Jenny McClendon- aerobics
Walk with Leslie Sansone- modified walking
Popsugar fitness- वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ
Body project- वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायाम प्रकारांचे व्हिडिओ

सबस्क्राइब न केलेली चॅनल्स-
बागकामाबद्दलची जसे गच्चीवरील बाग
Our stupid reactions- टाईमपास म्हणून
काही स्वयंपाकासाठी उपयुक्त चॅनल्स जसे Anuradha's channel, kanak's kitchen, hebbar's kitchen
FoodFitness&Fun वेगवेगळ्या डाएट रेसिपी आणि इतर माहिती

मोहिता नामजोशी- कर्ल्सबुक्सएनबाईटस (खाण्यासाठी)
कोहें - कोहें व्हायोलिनिस्ट (जपानी हिंदी शिकायला भारतात)
पवन लोहमोर्द - फॉर जपान ( भारतीय नोकरीसाठी जपानमधे)

वा मस्त चॅनल्स कळवलेत सर्वांनी.
अनघा पुणे तुमची यादी इंटरेस्टींग आहे. Avahan IPH ला मीही सबस्क्राईब करणारे. काही अफाट लोकांच्या मुलाखती ऐकल्यात त्यात.

भारतात रहातात आणि ज्यांना बागकाम आवडत त्यांनी, गार्डनिंग माय पॅशन जरुर ट्राय करा. माणुस खरच एकदम मन लावून बागकाम करतो. आणि त्याच्या काही काही एकदम स्वस्त आणि मस्त आहेत. केमिकल्स वापरतो जस कि युरिया पण ते इग्नोअर केल तर खुप उपयोगी आहेत त्याचे व्हिडिओ.
आम्हाला इथे त्यातले सल्ले वापरता येत नाहीत बरेच पण काही जस कि त्यान कोथिंबीरीचा व्हिडिओ टाकला आहे तो, प्लांट कट करून नविन रोप तयार करण्या विषयी व्हिडिओ टाकलाय तो मला उपयोगी पडला.

https://www.youtube.com/channel/UCJ6LtG0jqNUo1Rm_DCX4mvw

बुद्धीबळाच्या आवडीपोटी हा एक चॅनेल सबस्क्राईब केलाय
मराठेत चेसमधील गाजलेल्या डावांची माहिती हे आजवर पाहिले नव्हते कधी.

Rick Steve's Europe
The school of Life
Ted ED
Rangapandhari
Crash course
Learn German with Anja
German with Jenny
Easy German
Learn German
Kursgesagt
NPTEL

माझ्या चॅनेल सबस्र्कीपशन पेक्षा अनसबस्क्रीप्शनविषयी बोललं पाहिजे. काय आहे मुलांना पण माझ्याच लॅपटॉप वर पाहायला मिळालं की त्यांची ढीगभर चॅनेल्स सबस्क्राइप होत राहतात. मग मी एकदा बसून त्यातले जमेल तितके अनसबस्क्राइप करते. असा हा खेळ सुरु राहतो Happy

मी स्वतः बरेचदा काय आवडतं ते सरळ शोधून पाहाते. फार सबस्क्राइप करत नाही. पूर्वी केलेले आहेत. त्यातले बरेच वर आधीच आलेले आहेत.

अप्रतिम हस्ताक्षर आणि लिखाण studytee

फाऊटन पेनची आवड असणार्‍यांना sbrebrown हे नाव माह्ती असणे अवघड आहे.
अप्रतिम पॉलिमर क्ले मॉडेलिंग sandrartes
अप्रतिम लाइन अँड वॉश Peter Sheeler
बुक बाईंडींग आणि DIY नोट्बुक्स Sea Lemon

@जेम्सबाँन्ड
>>मोहिता नामजोशी- कर्ल्सबुक्सएनबाईटस (खाण्यासाठी)
कोहें - कोहें व्हायोलिनिस्ट (जपानी हिंदी शिकायला भारतात)

धन्यवाद.
दोन्ही मस्त वाटले चॅनल्स. कोहेइ न अडखळता हिंदी बोलतो की मस्त.. Happy

हे सगळे चॅनल्स मुळचे मायबोलीकर नसलेल्या माणसांचे आहेत. पण एक मायबोलीकर असा आहे जो मुळचा ज्योतिष अभ्यासक आहे. मायबोलीवर मराठी लिखाणाचा छंद त्याने केला. युट्युब वर व्हिडीओ करायचा म्हणजे भले दहा मिनीटांचा का असेना पण लिहून स्क्रिप्ट तयार करावे लागते. याकामी मराठी लिखाणाचा मायबोलीवर केलेला सराव याला उपयोगी पडला. ज्योतिषविषयाला वाहीलेल्या या चॅनलवर १०० पेक्षा जास्त व्हिडीओ आहेत आणि त्या ही ज्योतिष न समजणार्यांना सुध्दा क्लिष्ट वाटणार नाहीत अश्या भाषेत.

https://www.youtube.com/channel/UCwnsFlx0xanVX7ROW1qiDqw?view_as=subscriber

नाईलाज आहे. विवाह न होणे ही समस्या असल्यामुळे याच विषयावर व्हिडीओ आहेत. उपाय आहेत. शिवाय व्यवसाय वृध्दी, परदेश गमन, प्रसिध्दी योग, मुलांच्या बुध्दीमत्ता वाढीसाठी सुध्दा उपाय तसेच अर्थप्राप्ती वाढावी या साठी उपाय आहेत.

जरा भेट द्या तुम्हालाही ज्योतिष विषयात आवड असेल तर. तिटकारा असेल तर मात्र कोपरापासून नमस्कार.

ओन्ली देसी - भरो मांग मेरी भरो .....
Beyounick
मोस्टली सेन
योगि बाबा
मधुरा रेसिपी
मोदी चॅनल
शिटी आयडियास ट्रेन.डिन्ग
कॅप्टन निक
हे आवडते...

फिल्टरकाॅपी
डाईस मिडिया
अभिषेक उपमन्यू--- हा जब्बरदस्त स्टॅन्ड अप कॉमिक आहे

विनोदी -
BBC Comedy Greats: अत्यंत खुसखुशीत असा 'british humour' अनुभवण्यासाठी उत्तम चॅनेल
Studio C: अमेरिकन शैलीमधली 'hilarious' अशा skits साठी
Last Week Tonight: राजकीय, आंतरराष्ट्रीय, आर्थिक, सामाजिक घडामोडींचे उपहासात्मक विश्लेषण

संगीत व करमणूक:
Saregama Marathi आणि Saregama Classical: असंख्य मराठी भावगीते,नाट्यगीते,रागदारीवर आधारित संगीत व सिनेगीतांचे उत्तम collection
Gaane Sune Unsune: अगदी हेमंत कुमार पासून सुखविंदर सिंग पर्यंतची असंख्य हिंदी सिनेगीते
Anand Bhate आणि Rahul Deshpande यांची offical चॅनेल्स: फार काही सांगायची गरज नाही
Smrutigandha: अनेक जुने व दुर्मिळ गाण्यांचे videos, रेडिओ व दूरदर्शन वरील जुन्या कार्यक्रमांच्या क्लिप्स, तसेच पुल देशपांडेची दुर्मिळ भाषणे
Omleto: उत्तम अशा short films

माहितीपर -
Think Bank: गिरीश कुबेर, अच्युत गोडबोले, डॉ. आनंद नाडकर्णी सारख्या अनेक मान्यवरांच्या चालू घडामोडींविषयी घेतलेल्या मुलाखती
Business Casual: इतिहासातील अनेक उद्योग व त्यांच्या रंजक कहाण्या
Tedx आणि TED Talks: जगातील उत्तम अशी व्याख्याने, भाषणे आणि त्याचबरोबर अनेक वैज्ञानिक, मानसिक, आर्थिक व तांत्रिक संकल्पनांचे सोप्या भाषेत कथन
Bill Gates: अनेक पुस्तकांची शिफारस व चालू घडामोडींवर भाष्य

दोन्ही मस्त वाटले चॅनल्स. कोहेइ न अडखळता हिंदी बोलतो की मस्त.. Happy
हो वर्षाजी, तो भारतात तसेच भारतीय खाण्याच्या काही वस्तु जपानमधे नेवुन तिथल्या लोकांना खावु घालुन धमाल उडवतो (जसं की कुरकुरे, हाजमोलाच्या गोळ्या Happy )

आय एम बुध्द!
आज पाच वाजता थेट पल्लवी, रेणूका, दूर्गा जसराज व सचदेव अंताक्षरीच्या निवेदिका (?) गप्पा मारणार आहेत

मिरॅकल्स सरस्वती चॅनेलवर कवितेचे पान परत सुरु झालंय. आजच 2रा एपी इंदिरा संत यांच्या शेला कवितासंग्रहावर आलाय. काव्यरसिकांनी नक्की ऐका..

मी सबस्क्राईब वगैरे केलेलं नाहिये पण https://www.youtube.com/channel/UCHPKIXAkP3VuBLgmYe9dHPg ह्या चॅनेलवरचे व्हिडिओज मला फार आवडतात. मी चुकून ह्या पेजवर गेले आणि मग भक्त झाले Happy

https://youtu.be/nqphTcYsfjM
Nomadic indian !!!!!

पर्यटन करणाऱ्या लोकांना आवडणारे हे YouTube च्यानल
दिपांशु हा अवलिया hitchhiking करून कित्तेक देश फिरला आहे .
कुठल्याही देशात कोणत्याही गाडी वाल्याला लिफ्ट मागून जमेल तितका प्रवास करत राहतो !
आणि आपण आपल्याच राज्यात लुटण्याच्या घटना मुळे लिफ्ट मागायला भित असतो !
त्यामुळे त्या त्या देशातील लोकांशी चांगल्या प्रकारे कनेक्ट होता येते असे त्याचे म्हणणे .

जगात couchsurfing द्वारे कनेक्टेड हजारो जन कमी खर्चात जगभरात फिरत असतात
या व्हिडिओ मध्ये समद नावाचा इराणी व्यक्ती ने तब्बल तीन दिवस स्वतःचे काम धन्दे सोडून dipanshu चे hosting केले .
चीन , रशिया , मंगोलिया , चेचेन्या , इराण वगैरे मधील व्हिडिओ पाहण्या सारखे आहेत !!!

Carryminati
BeYouNick
Mostly Sane
Thugesh
Lakshya Chaudhary
SlayyPoint
Filmi Indian
Sushant Ghadge (Entertainment)

Brat tv

Kuldeep M Pai (Music Related)
Sooryagayathri (Music Related)
Agam Aggarwal
Maithili thakur
Saregama Music
Mahesh kale

Liziqi
Jonna jinton
Traditional me
Village Foods

Ok tested
Filter copy
Dice Media

Punekar sneha
Japanese art related channel https://youtu.be/CcwtVFxuHnQ
Doodland
Kalakar Supriya

Bhat'n'bhat
Hebbars kitchen

Gajalincho Konkan
JeevanKadamVlogs
Aapli aaji
Enas art
Yashraj Mukhate
Miniature food farm
Kokanchi mansa sadhi bholi

छान यादी आहे सर्वांची.
मी कविताप्रेमी असल्याने कवितेचे पान, सलील कुलकर्णी, संदिप खरे, स्पृहा जोशी यांचे यू ट्यूब चॅनेल्स subscribe केलेले आहेत.
रंगपंढरी मध्ये खूप सुंदर मुलाखती पहायला मिळतात, त्यामुळे ते आहे.
आनंद नाडकर्णींचे काहीही चुकवत नाही मी.. आव्हान, प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे....खूप शिकण्यासारखे असते त्यातून.
मुलगा स्वयम ने सुबोध दादाच्या गोष्टी subscribe केलेले आहे.

डॉ अनघा कुलकर्णी यांचा चॅनेल आवडला. आयुर्वेदीक उपायांसाठी
https://www.youtube.com/c/happyandhealthylifeathome/about
आणि ही एक ओल्गा नावाची बहुतेकरशियन डान्सर आहे. ती बॉलिवूड डान्स इतके सुरेख करते.
https://www.youtube.com/watch?v=aJVNcy6jo24

च्यानेल

जो रोगन एक्सपिरियन्स
सोच बाय मोहक मंगल
वाईस्क्रॅक
टेड एड्युकेशनल
सेक्युलर टॉक विथ काईल कझिंस्की
एआयबी- आशा मरत नाही ना Sad
हाऊ इट शुड हॅव्ह एंडेड
स्क्रीन रँट - पिच मिटिंग्ज साठी.
फिलॉसॉफी ट्यूब- ऑलिव्हर थोर्न
आनंद नाडकर्णी
थिंक बँक
बीबीसी मराठी
द प्रिंट
लास्ट विक टूनाईट आणि ट्रॅव्हर नोहा डेली शो.
कनन गिल आणि ओन्ली देसी

हा धागाच मस्त आहे. अफाट माहीती आहे यात.
__________
आनंद नाडकर्णी यांचा चॅनल माहीत नव्हता. सुचविल्याबद्दल धन्यवाद कॉमी.

वर कोणी अगोदर लिहिलंय का माहित नाही. नील दिग्रास टायसन यांचा स्टार टॉक. अवकाश- भौतिकी आणि इतर विज्ञान विषयांवर खुप छान कार्यक्रम असतात. आणि चक नाईस बरोबर कॉमेडी हि खूप. त्यांचा पॉडकास्ट सुद्धा आहे.

Pages