तुम्ही कोणते युट्यूब चॅनल्स सबस्क्राइब केले आहेत?

Submitted by वर्षा on 12 April, 2020 - 10:22

यूट्यूब हे म्हटलं तर वेळ वाया घालवणारं नाहीतर योग्य हेतूसाठी वापरलं तर फार उपयुक्त साधन आहे. Happy कित्येकदा मी गूगल करण्याऐवजी सरळ यूट्यूबवरच शोध घेते.
करमणूक म्हणा किंवा नवीन स्कील्स शिकणं म्हणा, यूट्यूब या सगळ्यांचं भांडार आहे.
यूट्यूबवर बरेच छान कॉन्ट्रीब्यूटर्स आहेत. माझे आवडते असे आहेतः

स्कील्स लर्निंग (शिक्षण्/नोकरी/करीयर् इ.)
Traversy Media (टेक्निकल स्कील्स)
Bridging the Gap (बिझनेस अ‍ॅनलिसिस)
Nihongo no mori (जपानी भाषा)

आरोग्य
Rujutadiwekarofficial
Damle Uvach

करमणूक्/पर्यटन इ.
MostlySane
Bharatiya Touring Party
Dhanya Te Foreign
Rang Pandhari

तुम्ही कोणते चॅनल्स सबस्क्राइब केलेत जे तुम्हाला उपयुक्त वाटले आहेत किंवा करमणूकीसाठी आवडतात ते लिहा. शक्यतो लिंकही द्या. तुमचे आवडते यूट्यूबर्स कोण आहेत?
यातून माहित नसलेले अनेक उपयुक्त चॅनल्स कळतील असं वाटतंय. तर सांगा तर मग!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कंटेंट क्रिएटर ऐकले होते.
आता इंस्टा सारख्या सोमिमुळे बहुतेक हे नवीन अ‍ॅवॉर्डस पैदा झाले असावे. ट्रेव्हल व्लॉग करणारे, वेगवेगळ्या जागेची, खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देणारे, फॅशन, मेकप, डान्स ट्युटोरिअयल देणारे त्यांच्यासार्ख्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून असेल.
Dharana तीच ना जी परफेक्टली पार्लरवाल्या बाईची, मेडची, लग्नात वागणार्‍या मावशा, काकू कशा वागतात त्यांची मिमिक्री करते. ती असेल तर भारी आहे एकदम, मी पण करते फॉलो तिला.

Yes तीच dharana durga, फार छान करते ती mimicry. इतकं बारीक सारीक observation करून ते act करणे खरंच कौतुक वाटलं मला. मी नव्यानेच पाहायला सुरु केल आहे आत्ता तिच कन्टेन्ट. तिची आणि अजून एकाची निसा आसिस वाली mimicry पण भारी आहे. ती पण पहा अंजली तुम्ही

अभि नियु बद्दल आत्ताच वाचलं, कोण ते माहिती नव्हतं, कधी बघितलं नाही. अभिराज राज्याध्यक्ष हा मराठी सिरियल्स मध्ये काम करते त्या अनुराधा राज्याध्यक्षचा मुलगा आहे, नियु सून आहे.

@srd पण ती जे act करते नॉर्थ इंडियन बायकांची वेगवेगळ्या type च्या ते फारच spot on आहे. माझ्या स्वतःच्या पाहण्यात अशी नॉर्थ इंडियन character आली आहेंत त्यामुळे मला तर एकदम त्याच बायका समोर उभ्या आहेंत अस वाटत. rjkarishma म्हणून पण एक चॅनेल आहे ती पण अशीच mimicry करते तीच पण चांगल आहे कन्टेन्ट पण तेच तेच वाटते acting जरा त्यापेक्षा dharana ची जास्त realistic वाटते.

अजून एक नुकतच पहाते आहे ते म्हणजे fitshortie नावाचे चॅनेल मी त्याचा एकही विडीओ नाही पाहिलाय पण त्याचे शॉर्ट addict झाल्या सारखी बघते सध्या Lol हा माणूस देशी विदेशी जाऊन, natural environment मध्ये तिथल्या exotic फळांचे ढीग समोर घालून बसतो. त्यातली चार पाच type ची फळ हाताने टरारा फाडतो, खातो आणि त्याचा टेस्ट review देतो. त्याच्या shorts मधली वेगळी वेगळी फळ, त्यांचे रंग, त्यांचे texture हे बघणं फार addictive आहे.

माझ्या स्वतःच्या पाहण्यात अशी नॉर्थ इंडियन character आली आहेंत त्यामुळे मला तर एकदम त्याच बायका समोर उभ्या आहेंत अस वाटत. >>>>>>>>>>>>>> अगदीच. माझी पार्लरवाली पण नॉर्थची आहे and I can totally relate to her Lol

मिमिक्री वरून आठवलं. कुशा कपिला चॅनल ला बरच आधी सबस्क्राईब केलय. ती अमेझिंग आहे. आई, आजी, टेलर, पार्लर वाली, पार्टीत नेहमी लेट होणारी, बेस्ट फ्रेंड, चिकटणारी मैत्रिण वगैरे रील्स धमाल आहेत तिच्या. बेहेन्स्प्लेनींग नावाची मुव्ही रेव्ह्यु प्रोग्राम असायचा तिचा स्रुष्टी सोबत. तो मिस्स करते. मस्त करायच्या.
एक्स नवरा पण केंटेंट क्रियेट करतो, पण हिची सर त्याला नाही. तिला मोठ्या मोठ्या शोज मधे होस्टींग ला ही बोलावतात.

आजकाल कंटेंट क्रियेटर्स जोडपी असतात. जसे ते पुजा-रेजा ईन्डो पाक जोडी, रोहित-कनूप्रिया वगैरे. मिळून पैसे कमावतात. पुढे भांडण वगैरे झालं तर कस्काय करत असतिल Wink
पुजा ने तर बाळा च्या व्हिडीओज करून खूप पैसे कमावलेत, तिचं बाळ इतकं गोजिरवाणं आहे की मी पण त्याला बघायलाच ते चॅनल बघते Happy

ह्यातले अवॉर्ड मिळालेले, अय्यो श्रद्धा सोडून कोणीच मला माहिती नाही.

जोडी म्हटलं की मला जुनी रॉकी मयूर ची आठवते, फिरणे आणि खाणे.

जोडीने विडिओ करणार्‍यांमधे मला कनु-रोहित , आदु-मयु पण आवडतात. पूजा पेक्षा रेजा आवडतो आणि त्याचे आई बाबा.

संकेत भोसले चे इन्स्टा फॉलो करते. त्यात तो स्वतःच वीग लाऊन गफ्रे बनतो मग काहीही पाश्कळ कारण करून ती दोष द्यायला & रडायला लागते. ते धमाल आहे. अगदी काही सेकंदाचेच रील आहेत.
पण आता जरा रीपीटेटीव्ह व्हायला लागलेत.

>>अभिराज राज्याध्यक्ष हा मराठी सिरियल्स मध्ये काम करते त्या अनुराधा राज्याध्यक्षचा मुलगा आहे, नियु सून आहे.
ओह हे माहित नव्हतं अन्जूताई.
कुशा कपिलाने सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला गेलेल्या टीपीकल आंटीचा व्हिडीओ मस्तच होता. Happy

भडीपा
ठगेश - रोस्ट चॅनेल
योगी बाबा प्रोडक्शन - (हिंदी, सौथ , भोजपुरी फिल्म रोस्ट चॅनेल )
झल्लू भाई - (हिंदी, सौथ , भोजपुरी फिल्म रोस्ट चॅनेल )
हंटर - (हिंदी, सौथ , भोजपुरी फिल्म रोस्ट चॅनेल )
ओन्ली देसी - (हिंदी, सौथ , भोजपुरी फिल्म रोस्ट चॅनेल )
स्ले पॉईंट
सचिन शिरसाट
द स्क्रीन पट्टी

ओन्ली देसी भारी आहे.

नवीन Submitted by mi_anu on 16 March, 2024 - 07:05
अंकित चे एकसेन्ट भारी आहेत , त्याचा जपान ट्रॅव्हल ब्लॉग छान होता. गाणी पण गातो.

आणि त्याचे रिव्हिजिट एक्स्ट्रा पण मस्त(त्याने मैने प्यार किया मध्ये त्या बाईच्या पोर्टेट चं केलेलं निरीक्षण आठवलं का Happy )

Dr.Mike म्हणून एक चॅनल आहे, त्यात हा डॉक्टर माईक विविध मत असणाऱ्या मेडिकल फील्ड मधल्या लोकांशी संवाद साधत असतो. ह्यात काहीकाही विवादास्पद मत मांडणारे असतात, तेव्हा चांगली स्पिरीटेड डिबेट सुद्धा होते. आणि वेगवेगळ्या मेडिकल टिव्ही शोज वर रियाशन इत्यादी हलकेफुलके कंटेंट पण असते.

अलीकडे डॉक्टर कुमार म्हणून मानसोपचार तज्ञ, जे स्वतः सुद्धा युट्यूबर आहेत, माईकच्या चॅनल वर गेलेले. तिथे आयुर्वेदावर उत्तम चर्चा झाली. डॉक्टर कुमार जरी आयुर्वेदाबाबत positive असले तरी ते स्वतः अलोपथिक डॉक्टर आहेत, त्यामुळे आयुर्वेदाची बाजू मांडताना सुद्धा त्यातल्या त्रुटी समजून घेऊनच मांडत होते. डॉ. माईकने चांगले प्रश्न विचारले आहेत. ऐकण्यासारखी चर्चा.
https://youtu.be/zt6i6vVgiO4?si=krvn8A14AEt3ZE9v

मी सब्स्क्राईब नाही केलयं कोणतही चॅनेल पण केवळ मनोरंजनासाठी मला काही तरूण मंडळींचे रील्स आवडतात -
टीन एजर्स मध्ये , राज ग्रोव्हर चे रील्स् मस्त असतात एक्दम रोजचे घरातले , गल्लीतले प्रसंग , त्याची आई आणि बाबा पण असतात , कधी कधी बहिणही . कुठेही ओव्हरअ‍ॅक्टीन्ग नाही , फालतुगिरी नाही .
पायल आणि टीना जेना या बहिणींचे पण काही व्हीडीओ छान आहेत .
आता एक निकशिन्दे की यशशिन्दे म्हणून एक आहे आणि त्याची आई . त्यातलेही काही काही अगदीच रिलेटेबल असतात .
घरात टीनेजर असल्यामुळे त्याच्याशी रिलेट करून शेअर करताना गंमत येते .
पूजा -रेजा चं चॅनेल आवडतं त्याचे आई-बाबा जास्त धमाल आहे आणि मुलगा केवळं गोड आहे .

एक pior family आहे , २ लहान मुली आहे फ्रॅन्की आणि स्टीवी . काय फर्डा ईन्ग्लिश बोलतात , शब्द संपदा , वाक्चातुर्य वाखाणण्यासारखं , अगदी एखादं वर्शाच्या असल्यापाशूनचे व्हिडिओ आहेत .

काय सांगावं?
अघोर विद्या, यंत्र तंत्र मंत्र, काली दुनिया, जारण मारण सिखिये असे बरेच चॅनल्स सबस्क्राईब केले आहेत.
अदृष्य होण्याचा फॉर्म्युला, मोहिनी विद्या, अप्सरा साधना, चंडालिका वशीकरण असे मंत्र शिकत आहे.

Visa2explore हरीष बाली यांच ट्रॅव्हल चॅनल. सोपी भाषा. अनवट जागा दाखवणे आणी कुठलाही स्टंट न करता चित्रविचित्र कपडे न घालता सुंदर प्रेझेंटेशन असत.

स्वानंदी सरदेसाई नावाच्या मुलीचं चॅनेल पाहते आहे सध्या अधून मधून. कोकणात राहणारी पुण्यात शिकणारी मुलगी आहे. छान गाते, पेन्टिंग करते. कधी कोकणातली ठिकाण दाखवते तर कधी पुण्यातल्या काही कलाकारांची ओळख घडवते. छान वाटत. आजोळ कोकणातले असल्यामुळे, आणि लहानपणी ती सगळी मज्जा अनुभवली असल्यामुळे,छान वाटत बघायला

स्वानंदीचं बघते मी अधूनमधून.

मला सुकीर्त जी चं ही आवडतं.

तसेच नेदरलँड हे जीवन सुंदर आहे, इंडिया आणि मी (बारा वर्षे अमेरिकेत राहून आता वाकड मध्ये सेटल झालेली youtuber) , जर्मनीतली काही, स्वीडनहुन एक आहे. असं बरंच बघते मी, रेग्युलर नाही, अधूनमधून. सबस्क्राईब नाही करत कोणाला, लहान vlogs आवडतात.

2012 मध्ये जेव्हा youtube वगैरे परिचित नव्हतं, तेव्हा नवऱ्याने कोकणातली एक सकाळ, लगबग, गप्पा, फणस चिरणे आणि भाजी करणं. आमचा आजूबाजूचा परिसर, वाडातर ब्रिज, गावचा समुद्र असे अनेक व्हिडीओ केलेले, आम्ही पोखरबाव, कुणकेश्वर फिरलो तेही. त्याला म्हटलं youtube वर मजा म्हणून पोस्ट कर, फक्त आपल्या नातेवाईकांना access दे हवं तर पण तो नाही म्हणतो. मजा येते बघताना. नंतर एकटा गेलेला तेव्हा आंबे काढणी वगैरेचेही केलेत.

हो मी पण subscribe नाही करत बघते अधून मधून, कोकणी रानमाणूस, etc. असे काय काय बघते मधून च, रेग्युलर नाही करत follow

मी स्वानंदीचे २,३ व्लॉग्ज पाहिले आज. छान वाटतायत. त्यातला साधेपणा आणि खरेपणा बघायला आवडतो आहे. बहुतेक सब्स्क्राईबही करेन.

गुणाची बयो वाटते स्वानंदी Happy गुरांच बाळंतपण, सडा सारवण, पेन्टिंग, भटकन्ति सगळं तितक्याचं आवडीने करते. कौतुक वाटत त्याच.

एक रील बघितलं, त्यात स्वानंदीने सांगितलं की तिच्या पणजोबांनी 100 वर्षांपूर्वी गावात मारुतीचं देऊळ बांधून तिथे पहिली शाळा सुरू केली. त्याच देवळात ती मारुती जन्मोत्सवानिमित्य सुरेल गात होती. गावातले सगळे मिळून आरतीही म्हणत होते. छान आहे ते.

सध्या मी vlogsमधून जर्मनीची सफर करतेय. रुपाली लिखितकर म्हणून आहे एक, ती आणि तिचा नवरा पूर्ण जर्मनीची सफर करणार आहेत, मला बापडीला काय घरी बसून जर्मन फिरायला मिळणार असेल तेही मराठी भाषेतून, तर चालेल.

आत्ता Duisburg आणि तिथलं टायगर अँड टरटल मॅजिक माऊंटन बघतेय. भारी आहे ते.

Visa2explore हरीष बाली - पूर्वी पाहात होतो. आता कंटाळवाणा झाला आहे. पर्यटनाचे ब्लॉग असेच होतात. खाण्यावर उगाचच वेळ काढतो आणि स्तुती.
पण ब्लॉगरचे वय महत्त्वाचे. Dr bro, gawarchi sheng., rakshita tulu talks
रेल्वे/बसने स्वस्तात पर्यटन - gharche jevan,
स्वतःच्या वाहनाने प्रवास अनुभव - विजय लठ्ठे (नवा चानेल आहे)
स्वानंदी सरदेसाई - इतर करतात तर मी का नाही असे वाटतात. कारण उशिरा प्रवेश केला आहे.
खाने में क्या है - बोअरिंग होत आहे. आता सोनाली कुलकर्णीला बरोबर घेतले आहे.
Anvi pallavi anshuman vichare - लहान मुलीवर ब्लॉग करत आहेत. ती खूप हसवते आणि रडवतेही. मराठी मालवणी इंग्लीश.

Pages