यूट्यूब हे म्हटलं तर वेळ वाया घालवणारं नाहीतर योग्य हेतूसाठी वापरलं तर फार उपयुक्त साधन आहे. कित्येकदा मी गूगल करण्याऐवजी सरळ यूट्यूबवरच शोध घेते.
करमणूक म्हणा किंवा नवीन स्कील्स शिकणं म्हणा, यूट्यूब या सगळ्यांचं भांडार आहे.
यूट्यूबवर बरेच छान कॉन्ट्रीब्यूटर्स आहेत. माझे आवडते असे आहेतः
स्कील्स लर्निंग (शिक्षण्/नोकरी/करीयर् इ.)
Traversy Media (टेक्निकल स्कील्स)
Bridging the Gap (बिझनेस अॅनलिसिस)
Nihongo no mori (जपानी भाषा)
आरोग्य
Rujutadiwekarofficial
Damle Uvach
करमणूक्/पर्यटन इ.
MostlySane
Bharatiya Touring Party
Dhanya Te Foreign
Rang Pandhari
तुम्ही कोणते चॅनल्स सबस्क्राइब केलेत जे तुम्हाला उपयुक्त वाटले आहेत किंवा करमणूकीसाठी आवडतात ते लिहा. शक्यतो लिंकही द्या. तुमचे आवडते यूट्यूबर्स कोण आहेत?
यातून माहित नसलेले अनेक उपयुक्त चॅनल्स कळतील असं वाटतंय. तर सांगा तर मग!
काय जाहिरात येते ईतके कधी
काय जाहिरात येते ईतके कधी बघितले नाही. जास्तीत जास्त स्किप करण्यावर भर असतो. नसेल करता येत तर आवाज बंद करायचा तेव्हड्यापुरता.
उर्मिला निंबाळकरचं म्हणत असाल तर ती चोरीचा आळ घटना अनेक वर्षांपूर्वी घडली होती. आताही तिला मॅकने काहीतरी चुटूरपु्टुर प्रॉडक्ट दिले होते पण तीने ती घटना जाहिरात करायला पद्धतशीर वापरली आणि बवाल केला. लोकांनी आपला व्हिडीओ बघावा म्हणून काहीही करू शकतात.
काय जाहिरात येते ईतके कधी
काय जाहिरात येते ईतके कधी बघितले नाही. जास्तीत जास्त स्किप करण्यावर भर असतो. नसेल करता येत तर आवाज बंद करायचा तेव्हड्यापुरता >>> युट्यूब ॲप स्कीप करता येत नाही.
उर्मिला निंबाळकरचं म्हणत असाल तर ती चोरीचा आळ घटना अनेक वर्षांपूर्वी घडली होती. आताही तिला मॅकने काहीतरी चुटूरपु्टुर प्रॉडक्ट दिले होते पण तीने ती घटना जाहिरात करायला पद्धतशीर वापरली आणि बवाल केला. लोकांनी आपला व्हिडीओ बघावा म्हणून काहीही करू शकतात. >>> तीच ती. मी केवळ तिच्या पोस्टबद्दल वाचलं होत. बाकी तिला चुटूरपुटूर प्राॅडक्टच्या सेल्फ प्रमोशनवर बोळवण करायला लावल्याचे माहीत नव्हते.
सद्ध्या Scammer Payback,
सद्ध्या Scammer Payback, Trilogy media चे व्हिडीओज् बघते आहे. उपयुक्त तर आहेत आणि मजेशीरही.
Scammer ला घाबरवलेले किंवा इरिटेट केलेले व्हिडीओज् भारी आहेत.
https://youtube.com/c
https://youtube.com/c/VillageCookingChannel
केरळी अवलियांचे खादाडी चॅनेल आहे .
वेज नॉनव्हेज पदार्थ बनवतात भरपूर आणि पदार्थ दिसतात ही छान .
विशेष म्हणजे ते सगळे पदार्थ वृध्दआश्रमातील लोकांना देतात .
यांच्या बरोबर राहुल गांधी नी जेवण केलंय , त्याच प्रमाणे कमल हसन च्या विक्रम सिनेमात या अवलिया वर तब्बल पाच मिनिटांचा सिन आहे .
१.८५ कोटी सबस्क्राइबर ,
२ वर्षापूर्वीच्या व्हिडिओला १३ कोटी व्ह्यूज आहेत .
कमाई भरपूर करत असतील , पण अन्नदान करतात हे महत्वाचे !!!!!!
नेटफ्लिक्स ईंडिया चॅनलला
नेटफ्लिक्स ईंडिया चॅनलला सब्स्क्राईब केलंय.
शॉर्ट फिल्म छान आहेत इथल्या. Soul-Kadhi
शुभांगी गोखलेचं काम आहे यात. चांगली आहे. एक सॉल्ट म्हणून पण आहे. ती पण चांगली असावी.
https://www.youtube.com/watch?v=5NsH9t-Lr8Q
नवीन Submitted by फुरोगामी on
नवीन Submitted by फुरोगामी on 9 November, 2022 - 22:38 >>>> हेच लिहायला आलेलो
राहुल गांधीवाला विडिओ पाहीलाय मी पण.
मसाले वै. पाट्यावर वाटून. काही पदार्थ पाहताना (आणि स्पेशली खाताना पाहताना) कससं होत.
पण तो पाट्यावर असलेला , त्याचे एक्स्प्रेशन , कॉन्फिडन्स भारी आवडतो.
कमाई भरपूर करत असतील , पण अन्नदान करतात हे महत्वाचे !!!!!! >>>> गुगलबाबानुसार महिना १० लाख.
जो विडिओ रेकॉर्ड करतो त्याने काढलय चॅनेल आनि बाकीचे त्याचे कझन्स आणि काका बहुतेक
Bhat n bhathttps://youtube
Bhat n bhat
https://youtube.com/@BhatnBhat
शेफ संज्योत कीरचं your food
शेफ संज्योत कीरचं your food lab हे चॅनेल मस्त आहे. एकदम सविस्तर दाखवतो पाककृती!
https://youtube.com/@YourFoodLab
https://www.youtube.com/
https://www.youtube.com/@petcollective
शेफ संज्योत कीरचं your food
शेफ संज्योत कीरचं your food lab हे चॅनेल मस्त आहे. एकदम सविस्तर दाखवतो पाककृती!
>>>
माझे पण सध्या हेच रेफरन्स चॅनेल झाले आहे. त्याच्या रेसिपी एकदम ऑथेन्टीक आहेत. रेसिपीत काही लपवालपवी करत नाही. आणि चित्रीकरण तर अतिशय सुंदर. संज्योत मीठ टाकतानाचा शॉट तर मस्त मस्त.
अगदी अगदी!
अगदी अगदी!
मीही संज्योत कीरचं फेसबुक
मीही संज्योत कीरचं फेसबुक पेज लाइक केलंय. पोस्ट्स दिसल्या तर पाहतो.
धिरज कीचन नावाचं आणखी एक चॅनेल /फेसबुक पेज आहे. अगदी तरुण मुलगा आहे. एरवी असलं मराठी मी अजिबात ऐकून घेतलं नसतं, पण त्याच्या तोंडी गोड वाटतं
संज्योत म्हणजे तो नमक नमक डाल
संज्योत म्हणजे तो नमक नमक डाल देते है वाला का
Red soil stories पण मस्त चॅनल
Red soil stories पण मस्त चॅनल आहे. कोकणी कुटुंब आहे. नेत्रसुखद आहे.
शैलपुत्री + १
शैलपुत्री + १
मी देखील याचं चॅनल बद्दल लिहायला या धाग्यावर आलो होतो.
लिझिकी सारखे पण कोकणी चॅनल.
श्रीलंकेचे दोन चानेल आहेत
श्रीलंकेचे दोन चानेल आहेत 'व्हिलेज कुकिंग' आणि 'ट्रॅडिशनल मी' यांची कॉपी वाटते Red soil stories.
कीरशिवाय एक मराठी शेफ होता लिमये म्हणून तोही मीठ टाकताना श्टाइलने फेकायचा.
पण एवढे मीठ घातले तर खारट होईल ना?
मी अनु
मी अनु
नमक शमक वाला शेफ हरपाल .
संज्योत च्या रेसिपी मस्तच असतात पण रेकॉर्डिंग भारी असतं .
Subscribe करण्याचे काय फायदे असतात आपल्याला? मी जास्त चॅनल subscribe नाहीं केलेत .
Subscribe करतो चानेल पण
Subscribe करतो चानेल पण नोटिफिकेशन घंटी बंद ठेवतो. उगाच बॅटरी ड्रेन होते.
Subscription यादी चेक करायची, नवीन विडिओ त्यांनी टाकला असेल तर निळा ठिपका येतोच.
>> Subscribe करण्याचे काय
>> Subscribe करण्याचे काय फायदे असतात आपल्याला? >> काहीच नाही. एखादं चॅनल खरंच आवडत असेल तर नवीन व्हिडीओ आले की लगेच बघायला मिळणं ह्यापलिकडे काही फायदा दिसत नाही.
मला जनरली सब्जस्क्राईब केलं एखादं चॅनल की त्याच त्याच कंटेंटचा कंटाळा यायची भिती असते म्हणून मी सब्जस्क्राईब न करता शोधून बघते.
मला जनरली सब्जस्क्राईब केलं
मला जनरली सब्जस्क्राईब केलं एखादं चॅनल की त्याच त्याच कंटेंटचा कंटाळा यायची भिती असते >>>
सेम हिअर. एखादे चॅनेल तुम्ही ३/४ वेळा बघितलं का युट्युब ते सतत तुमच्यासमोर आणते. इतके की ते इरिटेट होते.
कधी कधी एखादे चॅनेल आवडून जाते मग त्यांचे बाकी विडिओ नंतर बघू पण मग नंतर परत ते नाव आठवणार नाही म्हणून मी सबस्क्राईब करते. पण मग काही दिवसांनी त्याची युटिलिटी संपली असेल तर अनसबस्क्राईब करून टाकते.
आणि हो नोटिफिकेशन बंदच ठेवायचे
मी पण आत्ताच बघितले काही
मी पण आत्ताच बघितले काही दिवसापूर्वी red soil stories channel .नुकातःत्यांचा इंटरव्ह्यू बघितला..jj school ची student आहे ती आणि मुंबई मध्ये मालिका चित्रपट यामध्ये आर्ट डायरेक्टर च काम केलंय.. खूप सुंदर सादरीकरण असते...तिने मान्य केलंय की लिझिकी च्याच चॅनल वरून प्रेरणा मिळाली.Konkani ranmanus नावाचे चॅनल आहे .. दोन्ही चॅनल specially तळ कोकण सिंधुदुर्ग इथले सौंदर्य ,संस्कृती दाखवतात ...त्याचे निवेदन , निसर्गा बद्दलची कळकळ अगदी जाणवते
Red soil stories खरंच खूप छान
Red soil stories खरंच खूप छान आहे. रेसिपीज् छान असतातच पण भोवतालचे जग जास्त छान वाटतं. अर्थात लिझिकीची बातच और आहे.
पाच सहा चानेलसच सबस्क्राईब
पाच सहा चानेलसच सबस्क्राईब करून ठेवले आहेत. बाकीचे एका नोटमध्ये लिहून ठेवतो नावं लक्षात राहावी म्हणून.
Dr Bro chanel पाहत आहे गेली तीन वर्षे अधुनमधून. सध्या दहा लाख सबस्क्राईबरस आहेत त्यांचे. भटकंती चे विडिओ टाकतो. पूर्वी फक्त कर्नाटकातले (कन्नड) असायचे. आता कोणकोणते बाहेरचे देश दाखवतो. रशियासुद्धा झाला आहे. दूधसागरचा गोव्याकडूनचा भाग दाखवला आहे एकदा. तोच दूधसागर अर्धा वरचा भाग कर्नाटकात आहे. उत्साही भटकंती वाल्यांना नक्की आवडेल. Subtitles नसली तरी चालतात.
मेनका माहेर प्रकाशनने मेनका
मेनका माहेर प्रकाशनने मेनका क्लासिक्स menaka classics नावाचं चॅनेल सुरू केलं आहे. मेनका माहेर व त्यांच्या इतर प्रकाशनाच्या दिवाळी अंकांतील निवडक कथांचं अभिवाचन त्यात आहे. अगदी १९७० किंवा १९९० च्या दशकातील कथा आहेत. जितकं ऐकलं ते अभिवाचन आवडलं. अजून नवनवीन कथा टाकत राहतील असं दिसतंय.
Dhananjay pawar dp हे चॅनल एक
Dhananjay pawar dp हे चॅनल एक जबरदस्त आहे .
या धनंजय चे फर्निचर विक्रीचे कोल्हापूर बाजूला मोठ्ठे शोरुम आहे .
तो आणि त्याचा पार्टनर सर्जेराव पवार व्हिडिओ बनवून धमाल उडवितात . खास करून सर्जेराव पवार चा कोल्हापुरी ग्रामीण ठसका हसून हसून डोळ्यात पाणी काढल्याशिवाय राहत नाही ....
https://youtu.be/1luAvDBKi8U
कुणाचे लफडे कुणाशी चालू आहे
कुणाचे लफडे कुणाशी चालू आहे ही माहिती देणारे व्हिडीओज सबक्राईब न करता मला दिसतात. आभारी आहे ए आय चा.
सबस्क्राइब नाही केलेले. पण
-----
सर्जेराव पवार सोसायटी फर्निचर
सर्जेराव पवार सोसायटी फर्निचर पाहिला एक. भराभर दाखवलं आहे.
दीपक रेगे - ओडिओ पॉडकास्ट टाकायला हवेत. विडिओ नाही.
दीपक रेगे - ओडिओ पॉडकास्ट
दीपक रेगे - ओडिओ पॉडकास्ट टाकायला हवेत. विडिओ नाही.>>
???
काहीतरी चूक झाली वाटत.
डिलीट करतो.
चूक झाली वाटत.
चूक झाली वाटत.
नाही हो. फक्त बोलणंच आहे तर दीपक रेगे यांनी त्यांचे पॉडकास्ट करावेत असं मला म्हणायचं आहे.
https://www.youtube.com/
https://www.youtube.com/@LifeinWetland
थोडेसे लिझिकीसारखे वाटणारे पण खूपच जिवंत आणि आपल्या मातीतले व्हिडीओज आहेत. केरळची नितांतसुंदर पार्श्वभूमी आहे. यातल्या काकू वेगवेगळे पदार्थ अगदी निगुतीने करत राहतात. खेड्यातली जीवनशैली दाखवली आहे. संथ, शांत जीवन पहायला छान वाटतं.
https://youtu.be/lbc3cFgB7fk
https://youtu.be/lbc3cFgB7fk
आर जे पुरब हा धमाल प्रँक करतोय लिफ्ट मागणाऱ्या लोकांचे .
७ लाख सबस्क्राईबर आणि एका एका व्हिडिओ ला २० लाखाच्या आसपास व्यूव्हज !
एक व्हिडिओ पहिला की सलग पाच दहा तरी पाहणाराच...
मराठी ऑडिओ बुक्सकरता ही दोन
मराठी ऑडिओ बुक्सकरता ही दोन चॅनेल्स सापडली. या चॅनेलसची लिंक का देता येत नाहीये देव जाणे.
मी यावरच्या एकेका व्हिडिओची लिंक देते त्यावरून चॅनेल मिळेल.
कथा सृष्टी : टारफुला -शंकर पाटील | कादंबरीवाचन | भाग पहिला (अध्याय 1) - https://www.youtube.com/watch?v=0o_ub2iA-Xs
#Sharad Adhav / गोष्टी वेल्हाळ !! : 1.#तालादेस चा नरभक्षक# -#जिम कॉर्बेट# (भाग एक) अनुवाद :#शरद आढाव# - https://www.youtube.com/watch?v=2Hi_ZmGgP0M
जॅबी कोए आणि अचारा कर्क चा
जॅबी कोए आणि अचारा कर्क चा चॅनल काही वर्षांपूर्वी सबस्क्राईब केला होता.ते बॉलिवूड मुव्ही रिएक्शन्स करतात.अचारा आणि सिंटेल खूप हुशार आहेत आणि रिएक्शन्स बघायला मजा येते.
तर आता वाढत्या लोकप्रियतेनुसार त्यांनी सिनेदेसी चॅनल काढला (किंवा जुनेच नाव बदलले) आणि परत नव्या पब्लिक ला घेऊन आधी पाहिलेल्याच पिक्चर्स च्या रिएक्शन्स परत करायला लागले.एकंदर सध्या वाढत्या लोकप्रियतेच्या तापल्या तव्यावर भरपूर नव्या लोकांच्या पोळ्या भाजणे चालू आहे.
बरेच विदेशी लोक सध्या बॉलिवूड किंवा साऊथ पिक्चर च्या रिएक्शन टाकतात.त्यातले काही उगीच बघायचे म्हणून बघतात, त्यांना काहीही कल्चरली किंवा सबटायटल वाचूनही कळत नसते.अवर स्टुपीड रिएक्शन वाले जरा लाऊड आहेत, पण त्यांचा भारतीय डायरेक्टरस आणि कलाकारांबद्दलचा अभ्यास चांगला आहे.
>>बरेच विदेशी लोक सध्या
>>बरेच विदेशी लोक सध्या बॉलिवूड किंवा साऊथ पिक्चर च्या रिएक्शन टाकतात.त्यातले काही उगीच बघायचे म्हणून बघतात,
बरेच विदेशी लोक सध्या बॉलिवूड
बरेच विदेशी लोक सध्या बॉलिवूड किंवा साऊथ पिक्चर च्या रिएक्शन टाकतात.त्यातले काही उगीच बघायचे म्हणून बघतात, त्यांना काहीही कल्चरली किंवा सबटायटल वाचूनही कळत नसते.>> अगदी. जॅबी कोए तर मख्खा सारखाच बघत असतो.
रणवीर अलाहाबादीया ची TRS talks आणि beer& biceps ही चॅनेल्स आहेत. मुलाखती असतात. बऱ्याच प्रसिद्ध व्यक्ती येऊन गेल्यात. अगदी एस. जयशंकर पण येऊन गेले आहेत. तरूण पोरगं चांगले प्रश्र्न विचारतं, त्याचं कौतुक वाटतं.
जॅबी प्रत्येक सिन ला 'हे
जॅबी प्रत्येक सिन ला 'हे म्हणजे त्या टर्मिनेटर/इंडिपेंडन्स डे/टॉप गन सारखं' असे डायलॉग मारत असतो.त्याला बऱ्याच गोष्टी पडद्यावर पाहून इंटरप्रिटेशन करता येत नाही.सिन मध्ये बराच सुचकपणा असला तर त्याला काहीच कळत नाही, अजिबात सूचकपणा नसला तर तो 'दर्शकांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला नाही' म्हणून नावं ठेवतो.
साऊथ ची लोकप्रियता जास्त म्हणून सध्या सगळे साऊथ चित्रपटाच्या रिएक्शन च्या मागे लागले आहेत.भारताची लोकसंख्या हे खूप मोठं व्ह्यूअर मार्केट आहे व्ह्यू वाढवायला.
त्यातून incredible India,
त्यातून incredible India, Indian history facts सारखे विषय असतील तर विचारायलाच नको. आता प्रजासत्ताक दिन येतोय. त्याचे व्हिडिओ येतील. मग त्यावरून २०२३ वि २०२४ सारखे व्हिडिओज ....
छान धागा.
छान धागा.
हलके फुलके मनोरंजन साठी
Bhadipa
सुलेखा t. , मित्र म्हणे, व्हायफळ असच काही बघते... बहुतांशी स्वयंपाक करताना multitasking
Trump cha काळात
Trevor Noah, SNL , etc कॉमेडी शो बघायचे नियमितपणे.
MIT चा ek channel आहे, त्यात btc वराची अख्खा कोर्स आहे. अप्रतिम .. तो खूप उपयोगी वाटलेला
बाकी टेक चॅनल पण गरजे प्रमाणे बघायचे.
सध्या
पुस्तक दर्पण, कुणा एकाची भ्रमण गाथा पुस्तक वाचन हे चॅनल्स बघते/ऐकते.
हे विदेशी आपल्याला शेंड्या
हे विदेशी आपल्याला शेंड्या लावून व्ह्यूज वाढवून पैसे कमवत आहेत
अर्थात देशीही शेंड्या लावण्यात कमी नाहीत.
इंडियन बॅकपॅकर चॅनल याला
इंडियन बॅकपॅकर चॅनल याला सबस्क्राइब केला आहे
भारत ते ऑस्ट्रेलिया रोड ट्रीप चालु आहे.
मित्रांनो, मी आणि माझ्या
मित्रांनो, मी आणि माझ्या बायकोने मिळून "Mountain Couple" नावाने YouTube चॅनेल सुरु केले आहे, त्यावर कॅनडा मधील विविध विडिओ आणि माहिती शेयर करतोय. तुम्हाला चॅनेल वरील विडिओ आणि माहिती नक्की आवडेल. एकदा चॅनेलला अवश्य भेट द्या आणि चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा.
www.youtube.com/@mountaincouple
@मध्यलोक - बघते नक्की.
@मध्यलोक - बघते नक्की.
नॅशनल क्रिएटर अॅवॉर्ड सोहळा
नॅशनल क्रिएटर्स अॅवॉर्ड सोहळा बघितला का?
अॅवॉर्ड जिंकलेल्यांच्यात रणवीर, कबिता, कामीया जानी, अभि-नियू, अय्यो श्रद्धा इ. ओळखीचे यूट्यूबर्स दिसले. बाकीचे माहिती करुन घ्यायला हवेत.
सेलिब्रिटी क्रिएटर अॅवॉर्ड अमन गुप्ताला मिळाले. ही कॅटेगरी काय आहे नक्की. सेलिब्रिटी क्रिएटर म्हणजे काय ?
कबीता, कीर्ती, tech plus
कबीता, कीर्ती, tech plus gadgets ही आणखी काही नावे.
उर्मिला निंबाळकर ला nomination होतं.
मोदीजी प्रत्येकाला एक दोन मिश्किल वाक्ये बोलत होते.
तुटक तुटक पाहिला मी.. Reels मध्ये
गौरव चौधरीचं नाव उगाचच वाटलं.
गौरव चौधरीचं नाव उगाचच वाटलं. कीर्ती हिस्टरीचा एक विडिओ पाहिला. कामिया जानीपेक्षाही दुसरे चांगले यूट्यूबरस आहेत. ती महागडी टुअर करते.
नावे https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2012637 इथे आहेत. मराठी लेखही मिळेल.
मी हे अवार्ड पहिल्यांदा ऐकतेय
मी हे अवार्ड पहिल्यांदा ऐकतेय
कबिता, अय्यो श्रद्धा ला मिळालं हे छान झालं.बाकी नावं फार ओळखीची नाहीत.शोधते.
हे पहिल्यांदाच दिलेत. शॉर्ट्स
हे पहिल्यांदाच दिलेत. शॉर्ट्स बघितले. बारावीला अरि असं काहीतरी नांव आहे ... छान बोलला.
India to Bharat ( पर्यटन,
India to Bharat ( पर्यटन, हिंदी) पाहतो हल्ली.
Dharana durga अस एक चॅनेल आहे
Dharana durga अस एक चॅनेल आहे मिमिक्री करते ती मुलगी. नवीनच चॅनेल असावं. इतकी परफेक्ट मिमि क्री करते. Facial expression सकट सगळं एकदम भारी मिमिक करते.
Pages