देणं सीझन २ - भाग २

Submitted by jpradnya on 7 April, 2020 - 14:36

देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996

आता पुढे..
देणं सीझन २ – भाग २
“गृहकृत्यदक्ष, मन मिळावू आणि गोरीपान बायको हवी आहे? ह्यातली तू नेमकी काय आहेस सांग बरं मला? “ दीप्ती च्या हातातली अंगठी न्याहाळताना सुषमा ताईंना हसू आवरत नव्हते
“आणि बाय द वे एवढे मोठे मोठे शब्द आशूला कसे येतात?”
“कोणत्या तरी मॅटरीमोनियल साईट वर सापडले म्हणाला. अश्याच एकस्पेक्टेशन्स लिहितात म्हणे मुलं तिथे”
“हो ते ही खरंच म्हणा पण अगं त्याच्या घरी विचारलंय का त्याने”
“त्यात काय विचारायचंय..जसं काही त्यांना माहीतच नव्हतं की वी आर गोइंग अराऊंड म्हणून ”
“हो पण आता ही गोष्ट आशु ने पुढे नेली आहे म्हणून विचारत्ये मी. बरं मला सांग तुला कशी वाटतात ती सगळी माणसं “
“चांगली आहेत की. आशु ची आज्जी तर माझी दोस्त आहे. तिला दर वेळेला चॉकलेट जाते मी घेऊन. जाम खूश होते ती”
“चॉकलेट?” ही सुषमाताईंना नवीनच होतं.
“मग काय ! तुमचे ते लाडू बीडू खाऊन कंटाळते ती”
“अगं “त्या” असं म्हणावं दीप्ती”
“ नाs ही! मी तिला ए आज्जी असंच म्हणते आणि ती पण माझा गालगुच्चा घेते “
“ काय सांगतेस काय “
“ हो! आणि मग आम्ही दोघी आशुच्या आईबद्दल सॉल्लीड गॉसिप करतो. पाटणकर काकू जाम बोअर जेवण बनवतात. आज्जीला अजिबात आवडत नाही त्यांचा स्वयंपाक. म्हणून तर आशुला सुद्धा सारखं यायचं असतं आपल्या घरी तुझं जेवण जेवायला.
.. ..
“काका कूल आहेत पण. आशु क्रिकेट बघत नाही ना मग ते माझ्याशीच क्रिकेटच्या गप्पा मारतात. काकू मात्र जरा भावखाऊ आहेत. उगीच प्रीतीच्या लग्नाबद्दल विचारात बसतात, माझ्या कपड्यांवर कोंमेंट्स पास करतात. आशु माझ्या स्कूटी वर मागे बसून आम्ही कॉलेजला जायचो ते त्यांना अजिबात आवडत नाही. आशुला प्रॉब्लेम नाही तर ह्यांना काय असायचाय? तुम्ही पण बसा माझ्या स्कूटी वर...आज्जीच्या ऑपरेशन नंतर काय चमत्कार झाला माहीत नाही पण आता एकदम यारी दोस्तीत असतात माझ्या बरोबर...”
सुषमाताई तिचं बोलणं ऐकताहेत की नाही ही सुद्धा न पाहता दीप्ती ची बडबड सुरूच होती. तिच्या नकळत तिचं “सुख झाले हो साजणी” रूप बघून सुषमाताई हरखून गेल्या. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या ओळखीची असली तरी दीप्तीचा बिनधास्त स्वभाव कोणत्याही टिपिकल “मुलाच्या आई ला” मानवणं अवघडच होतं ह्याची पूर्ण कल्पना सुषमाताईंना होती. त्यांच्या परीने त्यांनी स्वतःचं कर्तव्य बजावत सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग प्रीती आणि दीप्तीला दिलं होतं. पण तिचा मूळचा स्वभावच इतका मोकळा ढांकळा होता की तिला असं कुठल्या चौकटीत बसवणं अशक्य होतं. दोनच वर्षांपूर्वी आशुच्या आज्जी ला मेजर हार्ट अटॅक येऊन गेला होता. त्यावेळी मात्र दीप्तीच्या मनाच्या मोठेपणाची आणि कर्तबगारी ची चुणूक पाटणकर मंडळींना मिळाली. एरवी घरकामात बिलकुल रस नसलेल्या ह्या मुलीने त्या वेळी घरातल्या सदस्या सारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आज्जीना बेडपॅन देण्यापासून त्यांना जेवण भरवण्यापर्यंत त्यांचं सगळं निरपेक्ष पणे केलं. आज्जीचा प्रचंड लळा असलेला आशु पार गळून गेला होता तेव्हा त्याला धीर दीप्तीनेच दिला आणि ती त्याच्या बरोबर कायम उभीही राहिली. त्यानंतर मात्र मिसेस पाटणकरांनी दीप्तीला मनापासून आपलं म्हटलं. आता ही दोघे केव्हा सिग्नल देताहेत आणि आपण पुढची बोलणी करू ह्याच प्रतीक्षेत दीक्षित आणि पाटणकर आई बाबा होते.
“ ठीक आहे तर मग. मी आणि बाबा जातो रविवारी पाटणकरांकडे पुढचं ठरवायला ...” सुषमा ताई म्हणाल्या तरी दीप्ती चं लक्ष तिच्या फोन मध्ये येत असलेल्या आशु च्या मेसेज कडे लागलं होतं.
****************************************************************************************************************************************
रविवारी सुषमा ताईनी दारावरची बेल वाजवली आणि दार उघडले गेल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं
कुणी मदतनीस असेल अशी त्यांची अपेक्षा होती पण के एल स्वतःच सामोरे आले
“थॅंक यू फॉर कमिंग. या प्लीज आत या “ अदबीने दार उघडून धरत के एल ने सुषमाताईंना आत घेतले
“तुम्ही बोलावलं नसतं तरी मी आपणहून तुमची अपॉईंटमेंट घेणार होते “
“प्लीज मेक यॉरसेल्फ कॉमफॉरटेबल. तुम्ही आधी काही घेणार का? चहा कॉफी सरबत? “
“नाही नको मी जवळनंच आले आहे पण तुम्ही घ्या ना काहीतरी”
“काही हरकत नाही. दादू sss”
दादू ने पाणी आणून ठेवले आणि तो हलक्या पावलांनी खोलिबाहेर गेला
“तुमच्या बद्दल मी दीप्ती कडून इतके दिवस खूप काही ऐकलं आहे पण आज भेटीचा योग आला”
“हम्म आणि तो ही अश्या प्रकारे यावा हे जरा विचित्रंच आहे नाही ? “
के एल चा चाणाक्ष प्रश्न सुषमाताईंनी अचूक हेरला
“मला पूर्ण कल्पना आहे तुमच्या मनात काय चाललं आहे त्याची. म्हणूनच मी आमची बाजू स्पष्ट मांडायला इथे आलेय. “
“काय वाटतं तुम्हाला मी का नाखूश आहे मुलांच्या ह्या निर्णयावर?”
“आम्ही यशच्या मैत्री आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेतो आहोत आणि आमच्या अडचणी त्याच्यावर लादतो आहे असा ग्रह तुम्ही केलेला असणार..”
“साफ चूक. दीप्तीची नियत मी पूर्ण ओळखून आहे. माझ्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत माझी माणसांची पारख आणि निवड एकदाही चुकलेली नाही. तुम्ही यश कडे फक्त मैत्रीचा आणि जिव्हाळ्याचा हात पुढे केलात. तुमचं कुटुंब अतिशय निःस्पृह आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे. “
हे सुषमा ताईंना अनपेक्षित होतं. त्यांच्या चेहेऱ्यावर आपसूक आश्चर्य पसरले
“ मी इथे तुम्हाला आमच्या बद्दल सांगायला बोलावलं आहे. यशने ह्यातलं काय काय तुम्हाला किंवा दीप्तीला सांगितलं आहे मला माहीत नाही पण माझ्याकडून मला काहीही लपवायचं नाहीये”
... के एल नी पाण्याचा मोठा घोंट घेतला आणि ते स्वतःचीच बोलावे तसं बोलायला लागले
“१ वर्षाचा होता यश जेव्हा माझा मुलगा आणि सून प्लेन क्रॅश मध्ये गेले. अन्त्यसंस्कार करायला सुद्धा डेड बॉडीस मिळाल्या नाहीत.... आय आम प्रेटी शुअर यू नो व्हॉट सिचुएशन आय अॅम टॉकिंग अबाऊट मिसेस दीक्षित”
“ मोअर दॅन यू नो मिस्टर म्हात्रे” सुषमाताईंच्या अंगावर सरसरून काटा आला
“खूप कठीण असतं असं सगळं हॅंडल करायला नाही? आपलं दुःख एकीकडे आणि त्या अजाण पोरांचं दुसरीकडे. कुठलं दुःख जास्त कुणी मोजावं. पण यशला मला घरी ठेवून सांभाळता आलं नाही. आय सेंट हिम अवे जस्ट अॅस अ लिटिल बॉय. माझ्या बिझनेसचं कारण स्वतःला देत मी माझा निर्णय जस्टीफाय करत राहिलो. पण त्यात त्या पोराची मात्र पार वाट लागली. “
के एल नेमके कशाबद्दल बोलताहेत सुषमा ताईंना कळेना.
“यश वॉज अ सीवीअर ड्रग अॅडिक्ट. त्याला एक वर्ष रीहॅब मध्ये राहावं लागलं तेव्हा त्याची अॅडिक्शन बंद झाली”
के एल चा मुद्दा हळूहळू सुषमा ताईंच्या लक्षात यायला लागला होता.
“ व्हाईल इन लंडन अँड अबरॉड ही हॅस हॅड मल्टिपल अफेअर्स अँड रिलेशनशिप्स. अँड दे वेअर नॉट नेसेसरिली प्लॅटोनिक..”
सुषमाताईंच्या चेहऱ्या वरचे भाव आता पूर्ण बदलले होते. एक ठाम अजेंडा घेऊन त्या म्हात्रे हाऊस मध्ये आल्या होत्या. पण यशचा हा भूतकाळ त्यांच्या पांढरपेशी पापभीरू पिंडाला मानवण्यासारखा नव्हता
“लेट मी बी मोअर ऑनेस्ट विथ यू मिसेस दीक्षित. आय वॉज वन्स मिडलक्लास. प्लीज बी अशोअर्ड दॅट आय हॅव ट्रीमेंडस रेस्पेक्ट फॉर द व्हरचूस अँड वॅल्यूज ऑफ द मिडलक्लास. बट यश वॉज बोर्न विथ अ गोल्डन स्पून इन हिज माऊथ. अँड आय अॅडमिट दॅट आय फेल्ड टु इनकलकेट दोज ब्यूटीफूल वॅल्यूज इन हिम ड्यूरिंग हिज फॉरमेटिव इयर्स. “
एक वयोवृद्ध, गर्भश्रीमंत आणि प्रचंड यशस्वी उद्योगपति आपल्या अपयशाची गाथा काहीही हातचं न राखता सुषमा ताईं पुढे वाचताना पाहून त्यांच्या काळजाचं पाणी होत होतं.
“यश खरंच वाईट मुलगा नाहीये. खूप सेनसिटिव, काइंड हारटेड आणि केयरिंग आहे. पण त्याला कधी कुठल्या बंधनात राहायची सवय नाहीये. बाप होणं ह्यातली स्वतःबद्दलची जबाबदारी त्याला कळली आहे की नाही ह्याची मला खात्री नाहीये. एखादं नातं टिकवून धरायला लागणारी सॅकरीफायसेस तो करू शकेल का आणि केलीच तर तो स्वतः सुखी राहील का ह्याची मला शाश्वती देता येत नाहीये.
“मला खात्री आहे दीप्तीच्या बद्दल तुम्हाला अशी शाश्वती आहे कारण तसे तुमचे संस्कार आहेत. तुम्ही सगळ्यांनी आधीच खूप काही झेललं आहे आणि झेलता आहात. यशने पूर्वी प्रमाणेच धरसोड केली तर त्याच्या मुळे तुमच्या आयुष्यात अजून वादळं येऊ नयेत एवढंच माझी म्हणणं आहे”
“ ऑफिस मध्ये कोणत्याच बाबतीत त्यांचं पटत नाही. सुखाचा संसार करतील असं आपण कसं मानू शकतो.. आता ह्या वयात अजून काय काय बघायला लागणारे अशी भीती वाटते मला ...सांगा मी कसा हो म्हणू यांच्या लग्नाला? सांगा ना ?”
त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर सुषमाताईंकडे नक्कीच नव्हतं ...

|| क्रमशः ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users