देणं - भाग ४

Submitted by jpradnya on 29 March, 2020 - 02:29

देणं भाग ३ :-
https://www.maayboli.com/node/73894

देणं भाग ४ :-
पावसाळा असून आज आकाश चक्क निरभ्र होतं. उन्हात सुषमाताईंचं अंगण न्हाऊन निघालं होतं. कडेने लावलेली कर्दळी, गुलाब, ऑर्किड, मोगऱ्याची रोपं, एकाबाजूला उभा असलेला पारिजातक थंडगार वाऱ्यावर मस्त झुलत होते. ह्या रोपांच्या मध्ये केलेला लॉन चा छोटासा तुकडा मात्र दवा मुळे ओला झाला होता. खालचा मजला असल्यामुळे मुंबईत देखील सुषमाताईंना बगीच्या ची हौस भागवता आली. मुली हाताशी आल्यानंतर त्यांनी दर रविवार सकाळ बागेसाठी राखून ठेवलेली असायची. रविवार सकाळ चं जेवण मुली बघायच्या. सुरेश सुद्धा त्यांचा पेपर आणि ३ कप चहा लॉन मध्येच घ्यायचे. बागेत राबणाऱ्या सुषमा ताईंकडे पेपर आडून हळूच बघत राहायचे. .आज सुद्धा सुषमा ताईंनी त्यांची व्हील चेअर दीप्ती च्या मदतीने अंगणात आणून ठेवली होती. आदी चं सकाळचं दूध ही रविवारी अंगणात झालं होतं. सुषमा ताईंबरोबर बागेत त्याची लुडबूड चालली होती आणि स्वयंपाक घरात दीप्ती ची खुडबूड.
आज ब्रंच ला काय करावं असा विचार करताना तिला यश शी झालेलं बोलणं आठवलं.
“ हा माणूस खरंच येणार नाही ना? “ दीप्ती क्षणभर चरकली
“छ्या तो कशाला येईल इकडे .. ही मस्ट बी जोकिंग .. ही बेटर बी जोकिंग “ असं म्हणत दीप्तीने यश चा विचार मनातून झटकला आणि भाज्या काढायला ती फ्रीज उघडणार इतक्यात बाहेर गाडी चा आवाज झाला.
“ बी एम दाबलू .. यीप्पी “ म्हणत आदी धावत गाडी कडे पळाला आणि त्याला आवरायला सुषमाताई त्याच्या मागे धावल्या. गाडीतून उतरलेल्या यश ला बघून त्यांना धक्काच बसला.
“ हेय चॅंप” म्हणत यश ने आदी ला चटकन कडेवर घेतले आणि जोरदार हाय फाईव लगावला
“अरे यश तू? आज इथे कसा काय? “ भांबावलेल्या सुषमा ताईंनी हातावरची माती झटकत विचारलं
“ मला दीप्ती नी जेवायला बोलावलंय.. तुम्हाला बोलली नाही का ती? “ यश ने आश्चर्याचा आव आणला
“न् नाही.. म्हणजे तसं काही बोलणं झालं नाही आमचं.. तू ये ना आत बस .. मी सुरेश ना घेऊन आत येते”
“ प्लीज डोन्ट माइंड बट मे आय गेट हिम इन?” सुषमाताई विचारात पडल्या पण त्या काही बोलायच्या आत यश बाबांची व्हीलचेअर घेऊन घरात आला सुद्धा आणि आदी त्याच्या मागे मागे
बोलण्याचा आवाज ऐकून भाजी चिरता चिरता दीप्ती तशीच बाहेर आली आणि तिचा विश्वासच बसेना.
“ तू खरंच आलास? तू वेडा आहेस का? “ हातातली सुरी त्याच्या दिशेने करून दीप्ती जवळजवळ किंचाळलीच
“ ओह माय ! आय surrender ! प्लीज डोन्ट हर्ट मी “ असं म्हणत हॅंड्स अप चा आविर्भाव करत यश हसत उभा राहिला
“बस रे तू यश .. कुणी येणार असलं तर सांगावं दीप्ती.. काहीतरी तयारी करता येते ”म्हणत सुषमाताई स्वयंपाकघरात शिरल्या आणि त्यांनी तिला ही आत ओढलं
“ मी त्याला बोलावलं नाहीये आई ..तो स्वतःहूनच आलाय ..व्हॉट अ लीच.. आत्ता घराबाहेर काढते त्याला “
“ स्टॉप इट दीप्ती. आलेल्या पाहुण्यांशी आपल्या घरी असं वागत नाहीत. जा ताबडतोप आवरून घे आणि मला मदत करायला ये. “ कधीही न चढणाऱ्या आवाज चढवून सुषमाताईंनी दीप्तीला चांगलंच झापलं

इकडे आदी ने आपला गाड्यांचा चा खजिना यश समोर रिकामा केला होता आणि त्यांच्या मजेत गप्पा चालल्या होत्या. कबूल केल्या प्रमाणे यश ने आदी साठी खास ओरिजिनल बीएमडब्ल्यू चं मॉडेल गिफ्ट आणलं होतं. एक दीप्ती आणि सुषमा ताई सोडून कुणाशी विशेष न खेळणारा आदी यश बरोबर मात्र एकदम comfortable होता हे सुषमा ताईंच्या लक्षात आलं होतं. आणि त्या चिमुरड्याच्या आनंदासाठी साठी एका अनोळखी माणसाला जेऊ घालायला त्यांची काहीही हरकत नव्हती.
...
टोमॅटो सार, व्हेज पुलाव आणि पनीर फ्राय असा साधासा मेनू पाहून यश प्रचंड खूश झाला.
त्याने येताना आणलेली वाईन सारखी दिसणारी बाटली अदबीने सुषमाताईंच्या समोर धरली
“ इट्स ओन्ली Appy Fizz “ सुषमाताईंचा प्रश्नार्थक चेहरा बघताच यश ने क्लियर केलं
“ अँड माय हंबल गिफ्ट टु द हॉस्टेस्” असं म्हणत ऊंची चॉकलेट चा बॉक्स दीप्ती च्या हातात दिला.
सुषमा ताईंच्या तंबी नंतर दीप्ती ने यश च्या कुठल्याच वागण्यावर रिएक्शन दिली नव्हती. ती अगदी यांत्रिक पणे हातातली कामे उरकत होती. यशचं हे असं तिच्या कुटुंबाशी एकदम सलगीत येणं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. किंबहुना त्याच्या ह्या सलगीचा नेमका काय उद्देश असावा ह्याच विचारात ती गढली होती. हसत खेळत हलक्या फुलक्या वातावरणात जेवण छान पार पडले. आता मात्र आदी जांभया द्यायला लागला होता.
“ आदी ला झोपवतेस नेहमीप्रमाणेच की आज खेळू दे त्याला जरा ? “
“ नाही नको. आत्ता झोपला नाही तर संध्याकाळी चिडचिड करेल आणि उद्या पासून प्रीस्कूल आहे. चला आदोबा यू अँड मी इन्साइड ..”
“ नाईईई “
“ हो sss चल यश ला बाय म्हण. तू उठेपर्यंत तो जाईल ना ..” दीप्ती यश कडे सूचकपणे पाहत म्हणाली
“ नको न जाऊ ..” आदी अगदी रडवेला झाला होता
“ आपण पटकन पटकन पुन्हा भेटू ओके चॅंप? आणि आपलं सीक्रेट कोणाला सांगू नकोस बरं का?”
“ खिखिखी यश माला त्याच्या बी एम दाबलू मधून फिलायला नेनाले आणि त्याचा डॉग्गी शी पण मी खेलनाले ” ...आदि ने सीक्रेट जगजाहीर करून टाकलं
“ आय सी ..” आदी ला आत नेत दीप्तीने यश कडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला
...
“शी शुअर हेट्स मी” सुषमा ताईंनी पुढे केलेला कॉफी चा कप घेता घेता यश हताश होऊन पुटपुटला
“हेट इज अ वेरी स्ट्रॉंग वर्ड यश“ बाबांना आत सेट्टल करून स्वतःची कॉफी घेत सुषमा ताई खुर्ची वर बसल्या
“ दीप्ती कुणाला हेट करू शकेल असं निदान मला तरी वाटत नाही .. असो सो टेल मी अबाऊट यॉरसेल्फ. तुझ्या घरी कोणकोण असतात? Ba नंतर तू काय केलंस? “
एरवी टाळत असलेल्या ह्या प्रश्नानची उत्तरे द्यावीत असं का कुणास ठाऊक यश ला मनापासून वाटलं.
“ba नंतर मी लंडन बिझनेस स्कूल मधून मास्टर्स केलं. २-३ वर्ष ई अँड वाय न्यूयॉर्क मध्ये, पीडब्ल्यूसी हाँगकाँग मध्ये अशा कंपनीस् मध्ये जॉब एक्सपिरियंस घेऊन काही महिन्यांपूर्वी मुंबई ला परत आलो. घरी मी आणि शरलॉक.. माझा लॅब्राडोर. तसे माझे आजोबा राहतात जवळच म्हात्रे हाऊस मध्ये. के एल म्हात्रे. यू नो हिम राइट? “
“ हो तर . दीप्ती ला त्यांच्या बद्दल खूप आदर आहे. ही इज हर मेनटोर अँड हॅज टेकन हर अन्डर हिज विंग्ज ट्रूली “
“ या ...मला जाणवलं ते ..के एल इज ऑल्सो वेरी मच फॉण्ड ऑफ दीप्ती”
त्याचं ते सख्या आजोबांना “के एल “ असं संबोधणं सुषमाताईंना जरा खटकलंच. पण त्या काही बोलल्या नाहीत.
“ आणि तुझे पेरेंट्स ? ते कुठे असतात ? “ त्यांनी अगदी सहज पुढे विचारलं
“..” यश नं शांतपणे आपली कॉफी संपवली
“ मी एक वर्षा चा असताना माझे आई बाबा प्लेन क्रॅश मध्ये गेले.. “
सुषमा ताईंच्या हातातला कप गळून पडला आणि काचेचे तुकडे सगळीकडे विखुरले गेले ..

|| क्रमशः ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users