देणं - भाग ३

Submitted by jpradnya on 28 March, 2020 - 15:07

देणं - भाग २
https://www.maayboli.com/node/73881
****************************************************************************************************************************************
देणं - भाग ३

“हाय ..” बेडरूम च्या दारा आडून हळूच डोकावणाऱ्या गोंडस छोकऱ्या कडे बघून यश ने हात हलवला आणि बाहेर येण्याचा इशारा केला
आदी लाजून आत पळाला आणि यश ला हसू आवरलं नाही
“ आदी उठला वाटतं. तसा खूप शाय आहे. पटकन कुणाशी बोलत नाही. एक मिनीट हं मी आत जाऊन येते जरा ..”
चेहरा सुषमा ताईंच्या कुशीत लपवूनच आदी त्यांच्या कडेवरून बाहेर आला.
यश ने खिशातून एक छोटीशी चकचकीत गाडी ची की चेन आदी समोर नाचवत त्याला विचारले
“ .. वॉन्ट टु सी ? ..” आदी ने पहिले आणि त्याचे डोळे लकाकले
सुषमा ताईंच्या कडेवारून खाली उतरून तो हळूच यश जवळ आला . अगदी खऱ्या खुरया गाडी सारखीच दिसणारी आणि असणारी की चेन हातात घेऊन हरखून गेला
“ बी एम दाबलू ..” निरखून बघत त्या गाडी ला चांचपायला सुरुवात केली
“ ओह माय गॉड .. ह्याला बरोब्बर कळलं की “ .. यश ला आश्चर्य लपवता आलं नाही
“ गाड्या खूप आवडतात. रस्त्या वरच्या गाड्या पण बरोबर ओळखतो..” सुषमा ताई कौतुकाने म्हणाल्या
त्या गाडी चा दरवाजा आदी ने उघडला आणि तेव्हाच बाहेर औटॉकोप चा आवाज झाला
आदी आणि यश एकमेकांकडे बघून हसायला लागले आणि त्यांच्या हसण्यात सुषमा ताई ही सामील झाल्या
.. हसत हसत त्यांनी दारात थंबकलेल्या दीप्ती कडे बघितलं आणि तिचं एक्स्प्रेश्न बघून त्यांचं हसू विरलं
“ डी डी .. बी एम दाबलू .. “ म्हणत आदी धावत जाऊन दीप्ती ला चिकटला. त्याच्या डोक्यावर हलकेच पापा घेऊन तिने यश ला विचारलं “ व्हॉट आर यू डूइंग हियर ?”
“ अगं तुझा वॉलेट द्यायला आला आहे तो .. त्याला लिफ्ट मध्ये सापडलं ..”
इतक्यात यश जागेवरून उठलाच ..” आय वॉज जस्ट लीविंग ..”
आदी कडे बघून त्याने हात पसरला आणि म्हणाला “ हाऊ अबाऊट आय गेट यू अनादर वन लेटर? अं?“
“ नो थॅंक्स .. ही हॅज लॉटस ऑफ कार्स .. राइट आदी ? “ दीप्ति च्या सूचक नजरेला बघून आदी ने पटकन यश ला की चेन देऊन टाकली
“ ऑफ कोर्स .. हाय फाईव?” आदी त्याला टाळी देणार इतक्यात यश ने हात अजून उंच नेला आणि आदी खिदळला . उडी मारून त्याने यश ला टाळी दिली आणि तो उड्या मारायला लागला
त्याचा बाल सुलभ आनंद बघून सुषमा ताईंना खूप बरं वाटलं पण दीप्ती मात्र फुगलेलीच होती.
“.. ये रे पुन्हा .. आता जेवायलाच ये म्हणजे निवांत बोलूया..” सुषमा ताई मनापासून म्हणाल्या आहेत ही यश ला जाणवलं
“ नक्की येईन मॅडम .. थॅंक्स अ टन फॉर धिस वंडरफुल ईवनिंग ..” असं म्हणत तो बाहेर पडला सुद्धा
शूज घालताना त्याच्या कडे एक टक बघणाऱ्या आदीला डोळा मारायला मात्र तो विसरला नाही
..
“ हा कशाला आणखी आला होता इथे? मला ऑफिस मध्ये छळतो तेवढं पुरलं नाही का त्याला ..”
“ इतका त्रागा कशाला करतेस गं? तुझं वॉलेट द्यायला एवढ्या पावसात बिचारा आला त्याचं काहीच नाही का तुला? साध थॅंक्स पण म्हणाली नाहीस तू त्याला ..” सुषमा ताई आत्ता खरंच वैतागल्या
“ म्हणजे पुन्हा माझं च चुकलं ..सगळा दोष माझाच आहे ..” तरा तरा आत निघून जाणाऱ्या दीप्ती कडे सुषमा ताई , आदी आणि सुरेश हताश होऊन बघत राहिले ..
दीप्ती चा कडवटपणा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. का ते त्यांना कळत होतं आणि तिथेच त्यांचा जीव तळमळत होता.. आदी ला नारळाची वडी भरवता भरवता त्यांना मुलींच्या कॉलेज लाईफ मधला तो प्रसंग आठवला ..

कहो न प्यार है नुकताच रीलीज झाला होता आणि हृतिक रोशन वर भारतातल्या जवळपास ९९% कॉलेज कुमारी दिलो जान स्े फिदा होत्या. कहो न प्यार है ७ व्यानदा बघून स्कूटी वर परतताना सुषमा ताईंची चिडचिड कशी हॅंडल करायची ह्या गहन विषयावर दीप्ती आणि प्रीती चा विचार विनिमय सुरू होता
“ आपण आशु वर ढकलूया .. सांगू या त्याने फोर्स केला “ दीप्ती ने शक्कल लढवली
“ म्हणजे तुला आशु बरोबर पुन्हा मूवी बघायला आई खरंच पाठवणार नाही “
“ काही फरक पडत नाही ... नाहीतरी मला हृतिक च आवडलाय ..पाटणकरांशी ब्रेक अप करून टाकीन म्हणते आहे मी.. तुला काय वाटतं?”
“ नेहमीसारखी वायफळ बडबड झाली का सुरू तुझी? आपल्या प्रॉब्लेम चं काय ?
“ हृतिक सोडून मला सध्या काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये गं ..” असं म्हणत दीप्ती ने चक्क डोळे मिटले आणि पुढे आलेला पॉट होल तिला दिसला नाही. क्षणार्धात स्कूटी चा कंट्रोल दीप्ती च्या हातातून निसटला आणि दीप्ती प्रीती आणि स्कूटी तीन दिशांना फेकल्या गेल्या. प्रीती एका वाळू च्या ढिगाऱ्यावर पडली पण दीप्ती मात्र रस्त्यावरून फरपटत जाऊन एका भिंतीला प्रचंड आपटली.. .
..
हिंदुजा हॉस्पिटल मध्ये ८ तास दीप्ती ची सर्जरी चालली होती. खूप रक्त गेलं होतं आणि तिला बाहेरून रक्त मागवणार इतक्यात माझं रक्त घ्या असा हट्ट प्रीती ने केला. दीप्ती आणि प्रीती दोघीनचा ब्लड ग्रुप एक होता. एकाच कुटुंबात रक्तदाता मिळाला तर केव्हाही उत्तम असल्याने लगेचच प्रीती चं रक्त तपासलं गेलं आणि अपेक्षेप्रमाणेच इट वॉज अ परफेक्ट मॅच!
..
शुद्धीत आल्यावर दीप्ती ला भेटायला प्रीती गेली. पांढऱ्या फटक पडलेल्या दीप्ती चा हात हातात घेऊन ती ढसा ढसा रडायला लागली
मोठ्या कष्टाने दीप्ती ने डोळे उघडले आणि प्रीती ला रडताना बघून ती म्हणाली
“ यार तू देवा कडून अॅक्सिडेंट प्रोटेक्शन प्लान घेऊन आली आहेस बहुतेक .तुला साध खरचटलं पण नाहीये .लकी“
त्या ही परिस्थितीत शाबूत असलेली दीप्ती ची विनोदबुद्धी बघून प्रीती चिडलीच
“ हाऊ डू यू फील नाऊ?”
“ वेल इट्स अ मिराकल दॅट डेसपाइट हॅविंग युअर ब्लड फॉर लंच, आय फील फाइन ..”
“ आय हेट यू “ म्हणत प्रीती चिडत रडत बाहेर आळी आणि तिची समजूत काढता सुषमा ताईंची पुरेवाट झालेली त्यांना स्पष्ट आठवली.
*******************************************************************************************************************************
“ गॉट अ मिनीट ? “ यश च्या ऑफिस बाहेर उभी राहून दीप्ती ने विचारले
“ इज इट अर्जंट? आय आम इन मिडल ऑफ समथिंग ..” लॅपटॉप वरची नजर न काढता यश म्हणाला
“ येस इट इज.. आपलं इनहाऊस सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी ची टेक-इट ची पेमेंट बाकी आहे. ह्या वीक मधला ५ वा कॉल मी आत्ताच हॅंडल केला आहे. पण माझ्या मते त्यांची अमाऊंट ताबडतोप क्लियर केलेली बरी नाहीतर वी माइट बी लायेबल फॉर पेनॉल्टी. “
“ ठीक आहे. आय विल टेक केअर ऑफ टेक-इट ..”
दीप्ती क्षणभर तिथेच घुटमळलेली बघून त्याने विचारले
“ एनिथिंग एल्स? “
“.. काही नाही ..उम्म ..काल तुला थॅंक्स म्हणता आलं नाही. सो..”
“ सो?” लॅपटॉप बंद करून रोखून दीप्ती कडे बघत यश म्हणाला
“ सो .. नथिंग..” त्याच्या वागण्याचा अर्थ दीप्ती ला उमगला नाही
“ तू आत्ता म्हणू शकतेस ..”
“ काय म्हणू शकते? “ दीप्ती पुरी गोंधळली
“ काहीतरी थॅंक्स म्हणण्याचं म्हणत होतीस न तू? “ हिला आज सोडायचंच नाही असं पवित्रा यशने घेतला होता बहुतेक
आत्ता दीप्ती ची ट्यूब पेटली आणि तिला यश चा गेम कळला
“ ठीक आहे .. थॅंक्स! हॅप्पी?“
“ डू दे नेवर टीच हाऊ टु से थॅंक्स इन युअर जमनाबाई बजाज स्कूल? “
“ नो दे डोन्ट .. अँड इट्स नॉट जमनाबाई बजाज फॉर गॉडस् सेक . इट्स जमना लाल बजाज! “
“ लंच ऑन कमिंग सनडे! अॅट युअर प्लेस ..अॅज युअर थॅंक्स टू मी” दीप्ती च्या उत्तराकडे पूर्ण दुर्लक्ष करत यश म्हणाला
“ क्काय ??!” दीप्ती जवळजवळ किंचाळलीच
“आय होप यू नो कूकिंग ..मला मॅडम न त्रास द्यायचा नाहीये ” ती काही बोलणार इतक्यात “ जाताना दार लाव प्लीज. लोक कधी ही ऑफिस मध्ये घुसतात “ म्हणत यश ने फोन उचलून टेक-इट सॉफ्टवेअर चा नंबर डायल सुद्धा केला होता...
- भाग ३
|| क्रमशः||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
मिल्स ॲंड बून वगैरे टीन एजर्सच्या जुन्या इंग्लिश कादंबऱ्या वाचत असल्याचा भास झाला. संवादांची तीच धाटणी, चटपटीत प्रसंगांची तशीच पेरणी...
पण आवडलं. ताजं अगदी आजचं ( आपल्याइथे) वाटतंय.