शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.


आज निगेटिव्ह १२,००० चं दिवाळ
.
खूप दिवस विचारायचे म्हणत होतो
खूप दिवस विचारायचे म्हणत होतो....
तुम्ही हे प्राॅफीटचे फोटो नक्की का टाकता? त्याने नेमका कोणाचा आणि काय फायदा होतो?
Pidlitind 1500 लेव्हलला
Pidlitind 1500 लेव्हलला सपोर्ट होता ऑप्शन चेनवर. >>>>>
तोडतोय. टिकतो का पाहू या.
आम्हाला pidilitind ची पार्टी तरी द्या.>>>>>
पार्टीला आपण कधीच नाय म्हणत नाय. कदी बी कुटं बी.
अतरंगी मी फक्त माझ्या
अतरंगी मी फक्त माझ्या ट्रॅकिंगसाठी टाकतो. पण हरकत नाही, उद्यापासून नाही टाकणार
आणि आज १२००० चा लॉस झाला असता, तर तोही टाकलाच असता. जस्ट त्यानंतर एकही फोटो टाकला नसता कारण Capital wipe out।
मला हेच टाळायचंय, नशिबावर खेळणं, म्हणून technical and derivatives shikaychet
आगाऊ सल्ला:-
आगाऊ सल्ला:-
खरेच सिरियसली ट्रॅकिंग करायचे असेल तर एक्सेल मधे किंवा पाॅवर पाॅंईट मधे ट्रेड जर्नल बनवा. त्यात प्रत्येक ट्रेडची नोंद करा. ट्रेड करताना झालेल्या चुका लिहून ठेवा. त्याचा जास्त फायदा होईल.
रच्याकने:- कोणतेही ट्रेनिंग न घेता ट्रेड करणे हा निव्वळ जुगार आहे. हेमावैम.
Infy 400/- itka down yeil ?..
Infy 400/- itka down yeil ?.. mi IRCTC upto 800/- buy karen.
ब्लॅककॅट आणि अज्ञातवासी,
ब्लॅककॅट आणि अज्ञातवासी,
धन्यवाद.
ही टार्गेट्स कदाचित रिएलिस्टीक वाटत नाहीत हे बरोबर आहे. पण ज्या प्रकारातून सध्या आपण जात आहोत, त्यातून ह्यातली काही टार्गेट्स लवकरच येतील असे वाटते. आज सेन्सेक्स २८८०० च्या आसपास बंद झाला. मागच्या काही दिवसात मार्केट कोसळले म्हणून बरीच नवीन इन्व्हेस्टमेंट आली, पण लोकांची विकत घेण्याची कॅपॅसिटी लवकरच संपेल असे वाटते कारण मागच्या सहा-सात महिन्यात मार्केट खूप जास्त इन्फ्लेट झाले होते (सेन्सेक्स ४२५००)..... जवळजवळ ३३% करेक्शन झाले आहे. इतरवेळी काही दिवसात हे करेक्शन इथे कदाचित थांबले असते, त्यामुळे मार्केट पुढील काही आठवड्यात अजून करेक्ट होईल असे वाटते (आठवा २००८ चे करेक्शन, जे जवळजवळ ~ ६५ % होते, २१२०६ वरून ७७९७ वर). सध्याच्या परिस्थितीत जगाच्या इकॉनॉमी वर खूप जास्त प्रभाव पडेल असे वाटत आहे.
इन्फोसीस ४०० पर्यंत कदाचित लवकरच येईल.
बाय द वे, खालील दोन प्रकारच्या स्टॅटर्जी दिल्या आहेत (रिलायन्स बाय साठी), त्यातली कुठली चांगली वाटते? मार्केट करेक्शन जर मधेच थांबले तर "या" मध्ये फायदा आहे. "ब" प्रमाणे जास्त करेक्शन झाले तर फायदा आहे.
प्लॅन अ.

प्लॅन ब.
Watchlist for 19.03.2020
Watchlist for 19.03.2020




1. HINDALCO(S)
2. HEROMOTOCO(S)
3. ASIANPAINT(S)
4. CIPLA(S)
मला Cadilahc मस्त वाटत आहे
मला Cadilahc मस्त वाटत आहे शाॅर्ट करायला. बघू चान्स मिळतोय का.
Trade on 19.03.2020
Trade on 19.03.2020


1. Asianpaint short profit Entry 1513.6: Exit: 1488
Reason: Price action on 1min candle/Market sentiments
2. Heromotoco Short Profit(on cost exit) Entry: 1586.35 Exit: 1583.85
Reason: Price action on 1min candle/Market sentiments
BO ऑर्डर्स ब्लॉक होत्या आज
BO ऑर्डर्स ब्लॉक होत्या आज त्यामुळे ट्रेल करायला मिळाला नाही.
मी आज सुट्टीवर....
मी आज सुट्टीवर....
DIVISLAB शॉर्ट केलाय 1762 ला
DIVISLAB शॉर्ट केलाय 1762 ला बघू क्वांटिटी कमी आहे. बघू काय होतंय.
BO ब्लॉक असल्याने गैरसोय होते
BO ब्लॉक असल्याने गैरसोय होते.
BO ऑर्डर म्हणजे काय?
BO ऑर्डर म्हणजे काय?
Divislab Short Profit Entry:
Divislab Short Profit Entry: 1762.05 Exit: 1738.35

Reason: Third time price rejection from 1780 strike price. Exit at support
BO ऑर्डर म्हणजे काय?>>>>
BO ऑर्डर म्हणजे काय?>>>> bracket order
HCLTECH 440 ला रेझिस्टन्स आहे
HCLTECH 440 ला रेझिस्टन्स आहे ऑप्शन चेनवर.
Today,
Today,
TATAMOTORS - Sell : 70.55, Buy : 69.45
Reason to exit, taking support at 69.40 level, and likely to rebound.
Now trading : 72.25
INFOSYS - Sell : 524.85,Buy : 519.50
Reason to exit, taking support at 519-520 level, and likely to rebound.
Now trading at 546.15
ITC - Sell : 149.40 Buy : 149
Reason to exit, Not moving anywhere, likely to rebound
Now trading at 153.35
Hope this will fit in thread’s protocol
अर्थात अज्ञातवासी.
अर्थात अज्ञातवासी.
बोकलत, अच्छा bracket order होय.
Heromotoco रेझिस्टन्स @1750
Heromotoco रेझिस्टन्स @1750
हुकली संधी.
हुकली संधी. संधी हुकली म्हणण्यापेक्षा मीच घेतला नाही.
मला तरी १७५० ला रेजिस्टन्स
मला तरी १७५० ला रेजिस्टन्स वाटत नाहीये, आजच्या सिच्युएशनमध्ये. हा प्रत्येक मोठ्या अप मागे एक स्मॉल डाऊन फॉर्म करतोय, अजून अप जाण्यासाठी. सिम्स ट्रॅप....
इट विल गो अप फरदर. शॉर्ट सेलिंग अव्हॉइड करण्याचा सल्ला देईन.
केला शॉर्ट 1745 sl 1753
केला शॉर्ट 1745 sl 1753
स्टॉप लॉस हिट.
स्टॉप लॉस हिट.
बोकलत राग मानू नका.
बोकलत राग मानू नका.
आता असं म्हणणार नाही, की बघा मी बोललो होतो, पण धडधडीत समोर चार्ट असताना, 5 वेळा हे ट्राय आणि टेस्टड असताना रिस्क घेण्याचं प्रयोजन काय...
मला टेकनिकल कळत नाही, पण चार्ट तर स्पष्ट दाखवत होता ना?
@अज्ञातवासी, heromotoco अप
@अज्ञातवासी, heromotoco अप ट्रेंडला होता त्यामुळे शॉर्ट करणं रिस्क होती. पण एकदा त्या स्ट्राईक प्राइझला रिजेक्शन दिलं त्यामुळे दुसऱ्यांदा पण तो तिथून खाली येईल असा अंदाज होता जो खोटा ठरला. Bo ऑर्डर पण आता टाकू शकत होतो म्हणून तो शॉर्ट केला. एकदा की 1730-35 च्या रेंजला गेला की ट्रेलिंग स्टॉप लॉस ऑन कॉस्ट आणून ठेवायचा असा प्लॅन होता. तसेही मी क्वांटीटी कमी ठेवली होती जो लॉस झाला तो टोटल पप्रॉफिटच्या तुलनेत 10-12% आहे. शेवटी काय जो ट्रेड आपल्याला चार नवीन गोष्टी शिकवेल तो आपल्यासाठी प्रॉफिटेबल ट्रेड. भले त्याच्यात चार पैसे गेले तरी चालतील.
1800 च्या आसपास मिळाला तर परत
1800 च्या आसपास मिळाला तर परत शॉर्ट करेन.
शेवटी काय जो ट्रेड आपल्याला
शेवटी काय जो ट्रेड आपल्याला चार नवीन गोष्टी शिकवेल तो आपल्यासाठी प्रॉफिटेबल ट्रेड. भले त्याच्यात चार पैसे गेले तरी चालतील.>>>>> +१
1800 च्या आसपास मिळाला तर परत शॉर्ट करेन.>>>>>
आपल्याला ट्रेंड माहीत असला की असा आत्मविश्वास असतो.
आता ट्रेड सेट अप बद्दल.....
आता ट्रेड सेट अप बद्दल.....
स्ट्राईक प्राईज/ रेझिस्टन्स वर ट्रेड घेताना एका ठराविक किंमतीला न घेता रेंज मधे घ्यावा. त्या रेंज मधे किती रकमेला किती युनिटस घ्यायची हे स्टाॅप लाॅस बघून ठरवावे.
मी आज सेकंड हाफ मधे कॅडीला शाॅर्ट केला. २४५ पासून सुरूवात करून २५४ पर्यंत विकला. २४९.५ की काही तरी सरासरी रक्कम आली. २६० चा स्टाॅप लाॅस होता. २५६ पासून तो परत फिरला.
रच्याकने:- आज weekly expiry होती त्यामुळे मार्केट ऊलटं पालटं होणार होतंच.
Pages