स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक जोडप्याला रमासमोर रोमँटिक होताना दाखवतात. हे सगळे खूप चीड आणणारे आहे.>>>> हो, जिथे तिथे रमा कशी पोहोचते . गोपिकाबाई आणि नानासाहेब पेशवे जेव्हा सात पावलं चालत असतात तो प्रसंग खुप आवडला. आणि वाटलं इतक्या तरल प्रसंगी ही रमा काय करतेय तिथेच?

हो रामचंद्र खूपच छान आहे.मला पण आवडतो.ही दुसरी गंगाही छान आहे.
खरोखर माबो नसती तर कुठे केले असते हे हितगुज. Happy
मागे कोणीतरी लिहिल्याप्रमाणे आनंदीबाईंचा आत्मा लेखकाला माफ करणार नाहीच,पण रमाबाई, लक्ष्मीबाई आणि गोपिकाबाईंचा आत्मा पण माफ नाही करणार लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना. कारण या मालिकेत दाखवले की
गोपिकाबाईंनी साखरपुडा टाळण्यासाठी आपणच रमेला दिलेले दागिने दासीकरवी चोरण्याची योजना केली होती. लक्ष्मीबाईंंनी रमेला जळता कापूर हातात ठेवायला सांगितला.त्यांना मत्सरी दाखवत होते. आठवा:शाही हाराचा प्रसंग.पेशव्यांच्या स्त्रियांना बदनाम करताहेत हे लोक.
भामिनीकाकू म्हणजे family drama दाखवण्यासाठी नसलेली काकू तयार केली आहे की काय Wink
असो,मी खूपच बोलते आहे. आता आवरते.

आनंदी बाई किती छान आहे दिसायला !
ही रमा मात्र डोक्यात जाते..आगाव, भोचक कार्टी!

मि वाच्लय त्या नुसार रमा आणि आनंदी बाई यान्च्या वयात फार फरक नव्हता, पण यात मात्र माधव रावान पेक्शा ही आनंदी बाई मोठ्या दाखवल्या आहेत.

मुळात या सिरीयलचे जे नायक नायिका रमा- माधव ... तेच गंडलेले घेतले आहेत !
माधव तर किती पौगंडावस्थेत असणार्‍या निबर पोरां प्रमाणे दिसतो! अतिशय सामान्य चेहेरा.

आणि रमा बद्दल तर बोलायलाच नको. गोडवा जरा म्हणून नाही तिच्यात. सदा आपले जिवणी फाकून काहीतरी चरचरीत बोलायचे!
आणि विश्वास चे लग्न झालेले होते किंवा कसे ते कळलेच नाही. विश्वास सुद्धा अगदी पोरसवदा घ्यायला हवा होता....जेमतेम विशीत होता तो पानिपता वर गेला तेव्हा! हे तर त्याच्या आधीचं कथानक!

जुनं सूनध्यान परत दाखवत आहेत का. आत्ता सृष्टी पगारे आणि तिची बहीण यांची निवड झाली तो भाग दाखवत आहेत. यात सृष्टी खरंच गोड वाटते.

गोपिकाबाई आणि नानासाहेब पेशवे जेव्हा सात पावलं चालत असतात तो प्रसंग खुप आवडला. आणि वाटलं इतक्या तरल प्रसंगी ही रमा काय करतेय तिथेच? --- अगदी, मला पण तेच वाटलं. चटकन निघून जावं तर ठोंबी तिथेच उभी

रमाला मोठ्ठी केल तर या सगळ्याना पण अजुन मोठ म्हणजे एजेड दाखवाव लागेल ना? त्याला तयारी असेल का सगल्या कलाकारान्ची?

जुनं सूनध्यान परत दाखवत आहेत का. आत्ता सृष्टी पगारे आणि तिची बहीण यांची निवड झाली तो भाग दाखवत आहेत. यात सृष्टी खरंच गोड वाटते.>>>>ती तशी गोड आहे, पण सिरीयल मध्ये तिला जी acting करायला लावलीये त्याने ती अल्लड न वाटता आगाउच वाटते.

त्या लक्ष्मीबाई असं काय करत होत्या, पोटात बाळ नको, मांडीवर द्या वगैरे. भावी पेशवीणबाई एवढ्या मूर्ख असतील का. रमेला चोरून ऐकायची पण सवय आहे, किती भोचकपणा, दाराला कान लावून ऐकणं म्हणजे कहरच. रमा पेशव्यांची सून असल्याचा रुबाब दाखवते त्या शिपायाला, तेही कशासाठी तर चोरून ऐकण्यासाठी Uhoh पुढच्या भागात सावित्रीबाईचा चांगला पाणउतारा करणार गोपिकाबाई. आता तरी सावित्रीबाई गराड्याला परत गेल्या पाहिजेत. रमेचे काका-काकू परत आले वाटते, तेही बरंच फुटेज खातील आता.

लक्ष्मीबाईंना दिवस गेले आहेत असे दाखवत आहेत का? पण विश्वासराव पेशवे यांचा फक्त साखरपुडा झाला होता (लग्न नव्हे) असे वाचले आहे.
नक्की कोणी सांगू शकेल का ह्याबाबत?

पण विश्वासराव पेशवे यांचा फक्त साखरपुडा झाला होता (लग्न नव्हे) असे वाचले आहे.>>>> मलाही हाच प्रश्न पडला आहे.

सिरीअलवाल्यांनी लावल असेल हो लग्न! Wink Lol

रच्याकने पानिपत या पुस्तकात विश्वासरावांचे वय लढाईच्यावेळी फक्त १८-१९ वर्ष होत. सिरीअलमधे माधवराव २०-२१ चे वाटतात..

म्हणजे रमाबाई काही एवढ्या लवकर मोठ्या होत नाहीत आणि रमेचे आई बाबा काही गराड्याला जात नाहीत.
शेवटी विरेन प्रधानचीच बायको काम करत आहे,म्हणजे प्रत्यक्षात सावित्रीबाई शनिवारवाड्यात आल्या नसल्या तरी मालिकेतील सावित्रीबाई शेवटपर्यंत रमेसोबतच राहणार.

हो राधिका जिच्याशी साखरपुडा होतो. ती दुसऱ्या जातीची असल्यामुळे गोपिकाबाई विरोध करतात असं दाखवून भरपुर मालमसाला घालता येईल.

धन्यवाद सनव. पोटातून बाळ बाहेर येते हा धक्का सहन न झाल्याने लक्ष्मीबाई आत्महत्या करतात असेही दाखवू शकतात Proud

पोटातून बाळ बाहेर येते हा धक्का सहन न झाल्याने लक्ष्मीबाई आत्महत्या करतात असेही दाखवू शकतात >> Rofl Rofl विरेन प्रधान मनात आणेल तर नक्कीच दाखवेल असे.

स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तर हा सगळा गरोदरपणाचा बनाव नसेल ना लक्ष्मीबाईंचा? पण त्या काळच्या प्रथा आणि सोंवळे ओंवळे पाहाता गरोदरपणाचा बनाव करणे सोपे नव्हते असणार.

इथे मायबोलीवरच मी वाचले आहे की नानासाहेब दुसऱ्या जातीच्या मुलीशी विश्वासचे लग्न ठरवतात व त्याला गोपिकाबाईंचा विरोध असतो.

निव्वळ फालतुपणा दाखवत आहेत आता. कायतर जोतिष्याने भविष्यवाणी केली.
मुल जगलं तर लक्ष्मीबाई सवाष्ण जाणार. आणि नाही झाल तर विधवा होणार. Uhoh
डोक्यावर पडलेत का सगळे? दाखवाच म्हणुन कैच्याकै दाखवत सुटायच. Angry

>>डोक्यावर पडलेत का सगळे? दाखवाच म्हणुन कैच्याकै दाखवत सुटायच<< अगदी अगदी... मालिकेचे नाव बदलुन चार दिवस गोपिकेचे चार दिवस पेशव्यांच्या इतर सुनांचे असं ठेवा आता... तेवढं च उरलं आहे. संतापात शापवाणी उच्चारणारी पेशवे-कालीन इमोजी!!!!!!

ही सिरीयल सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली वाट्टेल तो इतिहास दाखवतायत म्हणून बंद करायला हवी आहे हे माझं प्रामाणिक मत आहे.
रमा आली की डोक्यातच जाते. गोपिकाबाई ना राग येतो तिचा म्हणून आवडतात मला त्या।☺

गोपिकाबाई ना राग येतो तिचा म्हणून आवडतात मला त्या।☺....++++++1111111+++++
विरेन प्रधानच्या आधीच्या राधा प्रेम रंगी रंगलीमध्ये पण असच काहीस होत,राधाच्या पत्रिकेत दोष असतो ती जर लग्नानंतर एका वर्षाच्या आत प्रेग्नंट राहिली नाही तर तिच्या जीवाला धोका असतो,या एका प्लॉटवर त्याने दीड वर्ष ती मालिका चालवली.
हीच आयडिया चक्क पेशवाईत घुसडून आता किती एपिसोड्स घालवेल ते पाहायच,तसही 31मार्चपर्यंत शूटिंग बंद आहेत,म्हणजे आता पुढचे काही दिवस लक्ष्मीबाई.
लक्ष्मीबाई पेशव्यांच्या माहेरचे कोणी नातेवाईक नाहीत का,त्यांनी यावर प्रकाश टाकला असता.

Pages