मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.
1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.
२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.
३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.
(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)
४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.
५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.
६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.
७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.
८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...
९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.
१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही 
-------------------------------------------------
अवांतर निरीक्षणे
अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.
ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...
क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?
ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?
असो,
मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही 
धन्यवाद,
ऋन्मेष
(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)
धागा नक्की कशाबद्दल आहे? '
धागा नक्की कशाबद्दल आहे? ' तान्हाजी' चित्रपटाचा कि शाहरुखबद्दल?
>>>>
तान्हाजी चित्रपटाबद्दल. त्यात काजोलही आहेच की. मग शाहरूख तिचा खूप चांगला मित्र आहे. जरा झाली चर्चा तर बिघडले कुठे
..
मी ऋन्मेषइतकी आन्धळी भक्त नाही शाखाची. पण मला तो रोमॅण्टि़क, खलनायकी आणि सैनिकी भुमिकान्मध्ये आवडतो. त्याचे काही चित्रपट मात्र इग्नोर करते.
>>>>>
मी सुद्धा त्याचे गेल्या काही वर्षातले कैक चित्रपट पाहिले नाहीत. आपण दोघे एकाच बोटीतून प्रवास करत आहोत. फक्त तुम्ही प्रवासी आहात तर मी नावाडी, म्हणून लगेच आंधळा भक्त वगैरे नाही नं बोलायचे
..
मला कुठल्याही हिरोला किव्वा हिरवीणीला म्हातार्या रुपात बघायला नाही आवडत.
>>>>
जर तुम्ही या तारकांच्या बाह्य सौंदर्यावर फिदा असाल तर हे असे होणे स्वाभाविक आहे.
..
सहमत. 'हि न्दुस्थानी ' आवडला होता. पण त्यानन्तर त्याने जी काही रंगरंगोटी सुरु केली. ' अभय' सारख्या चान्गल्या कथेची वाट लावली.
>>>>
कमल हसनबाबत तुमचे माझे विचार जुळले, पण ट्रस्ट मी, बहुतांश जनता आपल्या या विचारांच्या विरोधात असेल, म्हणून तुम्ही आपले विचार बदलणार का? किंवा व्यक्त करायचे बंद करणार का?
...
ऋन्मेष, बॉलिवूड फक्त शाहरुखपुरतीच मर्यादित नाही. इतरही चान्गले कलाकार आहेत की. तुझ बॉलिवूडच ज्ञान वाढव.
>>>>
मला अमिताभही आवडतो, सलमान वा आमीरही आवडतो, अक्षयकुमारची कॉमेडी एंजॉय करतो, आधी छपरी वाटणारा रणवीरसिंगही हल्ली बरेपैकी आवडतो, रणबीर शाहीद वगैरे नेहमीच आवडायचे, गोविंदा, अनिल कपूर, सनी, जॅकी .... खूप मोठी लिस्ट होईल. सध्याच्या फळीतले आयुष्यमान, राजकुमार राव हे सुद्धा आवडतात, म्हणजे एखादाच राहुल रॉय वा आफताब शिवदासानी आवडत नसेल. त्यामुळे मी कोणाला चांगले समजत नाही अश्यातला भाग नाही, शाहरूख या सर्वांपेक्षा जास्त चांगला वाटतो ईतकेच.
आणि बॉलीवूडचे ज्ञान म्हणाल तर एकेकाळी वर्षाला किमान चारपाचशे चित्रपट बघायचो. चित्रपटाचॅनेल सर्फ करायला घ्यायचो आणि दोन दोन सेकंदात चित्रपट कोणता चालू आहे हे ओळखून पुढे जायचो
शाहरूख चराचरात आहे. तो ईथेच
शाहरूख चराचरात आहे. तो ईथेच आहे. तो प्रत्येक धाग्यात आहे. असतोच. आपल्याला अध्येमध्ये साक्षात्कार होतो ईतकेच ! >>
भक्त ॠन्मेष यांचा जयजयकार असो.
>>>>>
जे शाहरूखबाबत फॅक्ट आहे ते मी बोललो ईतकेच. जर त्याने मी त्याचा भक्त होत असेल तर तसे तुम्ही म्हणू शकता. पण त्या आधी हा धागा बघून घ्या !
भक्त आणि चाहते !
Submitted by भन्नाट भास्कर on 16 July, 2018 - 11:50
https://www.maayboli.com/node/66805
आणि मगच ठरवा मी त्याचा भक्त आहे की चाहता?
मला अमिताभही आवडतो, सलमान वा
मला अमिताभही आवडतो, सलमान वा आमीरही आवडतो, अक्षयकुमारची कॉमेडी एंजॉय करतो, आधी छपरी वाटणारा रणवीरसिंगही हल्ली बरेपैकी आवडतो, रणबीर शाहीद वगैरे नेहमीच आवडायचे, गोविंदा, अनिल कपूर, सनी, जॅकी .... खूप मोठी लिस्ट होईल. सध्याच्या फळीतले आयुष्यमान, राजकुमार राव हे सुद्धा आवडतात, म्हणजे एखादाच राहुल रॉय वा आफताब शिवदासानी आवडत नसेल. त्यामुळे मी कोणाला चांगले समजत नाही अश्यातला भाग नाही, शाहरूख या सर्वांपेक्षा जास्त चांगला वाटतो ईतकेच. >>>
शाभप, भक्त शिरोमणी, महाभक्त श्री श्री श्री १०८ ऋन्मेष यांचा जयजयकार असो.
(धावायच्या) मॅरॅथॉनचा सीझन
(धावायच्या) मॅरॅथॉनचा सीझन संपलेला दिसतोय.
खास ऋन्मेषसाठी
खास ऋन्मेषसाठी

(धावायच्या) मॅरॅथॉनचा सीझन
(धावायच्या) मॅरॅथॉनचा सीझन संपलेला दिसतोय. >>>

हो आता ट्रायथलॉन चा चालू झालाय
पण तरी हे प्रेमच तर आहे जे मला खेचून आणते इकडे.
ऋन्मेष निरुत्तर झाला की (जे त्याच्या बाबतीत फार कमी वेळा होते पण अनेकदा माझ्या काही प्रतिसादांवर/ प्रश्नांच्या बाबतीत त्याला उत्तर सुचले नाही की मग त्याकडे) तो सोयिस्कर दुर्लक्ष करतो आणि मग त्याला त्या प्रतिसादाची आठवण करून दिली की चिडायची शक्यता असते. ज्याच्या सोबत पातळी न सोडता, साफ मनाने, सांसदीय भाषेत, चिडवाचिडवी करायला मजा येईल असे मायबोलीकर फार कमी उरलेत. हा एक त्यातलाच मग त्याला चिडवायला मजा येते मला. त्यालाही मी चिडवलेले आवडते.
ह्या कारणाकरता (अनेकांना) आवडतो ऋन्मेष
आणि हा येडा लोकांनी शाहरुखसकट आवडून घ्यावा म्हणून झटतो.
स्वतः न चिडणारा (उलट इतरांना चिडवणारा) हा, कधी आपण त्याला चिडवू शकतो अशी शक्यता जरी निर्माण झाली तरी मला खूप मज्जा येते.
आणि एक माणूस चिडलाय वाटतं म्हटल्यावर शाहरुख स्टाईल ने कसली लोभस कबूली दिल्ये त्याने.
भक्त म्हटल्यावरही एक माणूस चिडतोय निदान त्याला नक्की गुदगुल्या होत नसणारेत.
तर बोला शा भ प, भक्त शिरोमणी, महाभक्त श्री श्री श्री १०८ ऋन्मेष यांचा जयजयकार असो.
(अजून एक गोष्ट म्हणजे ऋन्मेषला दिवे द्यायला लागत नाहीत)
होय नारे ऋन्मेषा, नाही म्हणजे पॉलिसी बदलली असेल तर सांग नाही उचकवायचो तुला
हर्पेन +९९९९९९९
हर्पेन +९९९९९९९
असे प्रामाणिक शाखा भक्त कुठे उरलेत आता.
वाह हर्पेन किती गोड पोस्ट
वाह हर्पेन किती गोड पोस्ट लिहीलीत माझ्या शानमध्ये
चिडतो तो माणूस, मी त्याला कसा अपवाद असेल. आपण त्यानंतर रिॲक्ट कसे करतो ते महत्वाचे. त्यावर आपले कॅरेक्टर ठरते. आणि पॉलिसी म्हणाल तर ती नाही बदलणार. कारण माझी माबोवावराची आणि जगण्याची पॉलिसी एकच आहे.
कधी वेळे अभावी नाही देता येत रिप्लाय. पोस्ट वाचून पुढे जातो आणि राहते. त्यामुळे लगेच समोरचा निरुत्तर झाला असे गोड गैरसमज कोणाबद्दलही पाळू नयेत. ईथे ठरवले तर कोणीही कधीही निरुत्तर होऊ शकत नाही.
राहिला प्रश्न शाहरूखचा मी भक्त आहे की चाहता तर भक्तांचे जे व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणजे ते आपल्या दैवताचा एकही दुर्गुण मान्य करत नाहीत तर ते माझ्या आणि शाहरूखबाबत आढळत नाही.
मी स्वत:चाही फार मोठा चाहता आहे. मला माझ्या कित्येक गोष्टींचे अपार कौतुक आहे. पण मी स्वत:चा भक्त नाही. मी माझे दुर्गुणही मान्य करतो.
असो, तरीही मला शाहरूखचा भक्त म्हटल्यास हरकत नाही. जोपर्यण्त शाहरूखचा म्हणत आहात
राहिला प्रश्न शाहरूखचा मी
राहिला प्रश्न शाहरूखचा मी भक्त आहे की चाहता तर भक्तांचे जे व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणजे ते आपल्या दैवताचा एकही दुर्गुण मान्य करत नाहीत तर ते माझ्या आणि शाहरूखबाबत आढळत नाही.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 21 February, 2020 - 22:14
>>>
दुर्गुण मान्य न करणे ही अंधभक्ती. ती तुझ्या बाबतीत नाही हे पण मान्य. चाहते अंधानुकरण करतात. तुझे तसेही नाही.
मग तुझ्यासाठी वेगळी श्रेणी चालू करूया का ?
चा (हता)+(भ) क्त = चाक्त
कधी वेळे अभावी नाही देता येत
कधी वेळे अभावी नाही देता येत रिप्लाय. पोस्ट वाचून पुढे जातो आणि राहते.
ऋन्म्या मेल्या
तुझ्यासारखा तरबेज वावदूक हजरजबाबी माणूस जेव्हा असं करतो तेव्हा तो त्यावेळी निरुत्तरच झालेला असतो. ठरवून विचार करकरून तर कोणीही उत्तर देईल. तुला ते कसं शोभेल. तुझी म्हणून काही शान आहे की नाही.
आणि तुझा देव वेगळा असला तरी भक्तच आहेस तू
(No subject)
मी माझे निकष लावता तरी स्वत
मी माझे निकष लावता तरी स्वत:ला शाहरूखचा भक्त नसून चाहता समजतो.
पण ते एक थोडावेळ बाजूला ठेऊया आणि मूळात शिरुया..
मुळात भक्त हा एक चिडवायचा शब्द आहे का?
मायबोलीवर वा जगात ९० टक्के लोकं आस्तिक असतील. म्हणजे कुठल्या ना कुठल्या देवाचे भक्त असतील. कारण देवाचे काही चाहते वगैरे नसतात, देवाचे डायरेक्ट भक्तच असतात. म्हणजे ईतक्या लोकांना भक्त असण्यात काही गैर वाटत नसावे.
आता फरक ईतकाच की काही लोकं दगडाला देव मानतात तर काही लोकं माणसांत देव शोधतात.
यातले काय चूक काय बरोबर? की दोन्ही चूक दोन्ही बरोबर? मला वरच्या चर्चेत सहभागी सर्वांचा दृष्टीकोण जाणून घ्यायला आवडेल..
मुळात भक्त हा एक चिडवायचा
मुळात भक्त हा एक चिडवायचा शब्द आहे का? >>>
काही लोक मी भक्त नाही हे सिद्ध करण्याचा एवढा आटापिटा करतात त्यावरून तो चिडवायचा शब्द असावा असे वाटु लागले आहे.
मानवमामा खरा प्रश्न असा आहे,
मानवमामा खरा प्रश्न असा आहे,
भक्त हा चिडवायचा शब्द का आहे?
काही लोकांना एखाद्या राजकीय नेत्याचा भक्त म्हटल्यावर खरेच राग येतो आणि तुम्ही म्हणता तसे ते आपण भक्त नाहीत हे दाखवायला आटापीटा करतात.
का त्यांना भक्त म्हणून घ्यायला कमीपणा वाटावा जर अपवाद वगळता सारेच दगडात नाहीतर माणसांत देव शोधतात
एखाद्याचा भक्त म्हटल्यावर
एखाद्याचा भक्त म्हटल्यावर लोकांचे चिडणे हल्ली ईतके स्वाभाविक झाले आहे की मी जर स्वत:ला शाहरूखचा भक्त नाही चाहता म्हणवत असेल तर हा सुद्धा तसाच चिडला आहे असे लोकांना स्वाभाविकपणे वाटत आहे.
ऋ+1
ऋ+1
ओम शांती ओम पार्ट 2 मध्ये
ओम शांती ओम पार्ट 2 मध्ये तळपदे ऐवजी ऋन्मेष झळकणार आहे.
ऋन्मेष - तू का इतके आढेवेढे
ऋन्मेष - तू का इतके आढेवेढे घेतोयस भक्त म्हणवून घ्यायला. गर्व से कहो भक्त है|
मला डू आयडी डू आयडी खेळायची
.
आपण दोघे एकाच बोटीतून प्रवास
आपण दोघे एकाच बोटीतून प्रवास करत आहोत. >>>>>>>> नाही. हा तुझा गैरसमज आहे.
जर तुम्ही या तारकांच्या बाह्य सौंदर्यावर फिदा असाल तर हे असे होणे स्वाभाविक आहे. >>>>>>>> नुसत बाह्य सौंदर्यच नाही, तर त्यान्च त्या त्या काळातल एकूण वलय, त्यान्ची अदाकारी ह्या गोष्टीन्चाही समावेश असतो. त्यावरुन वाटत की हे कलाकार कधीच म्हातारे होऊ नयेत. त्यात हिरो- हिरवीण दोन्ही आले.
बहुतांश जनता आपल्या या विचारांच्या विरोधात असेल, म्हणून तुम्ही आपले विचार बदलणार का? किंवा व्यक्त करायचे बंद करणार का? >>>>> नाही.
आणि बॉलीवूडचे ज्ञान म्हणाल तर एकेकाळी वर्षाला किमान चारपाचशे चित्रपट बघायचो. चित्रपटाचॅनेल सर्फ करायला घ्यायचो आणि दोन दोन सेकंदात चित्रपट कोणता चालू आहे हे ओळखून पुढे जायचो >>>>>>> अरे देवा! नुसते चित्रपट पाहून ज्ञान वाढत नाही. त्यासाठी हिन्दी आणि इतर भाषेतल्या चित्रपटसृष्टीत काय घडामोडी चालू आहेत हे सुद्दा वाचाव/ ऐकाव.
आता धागा ' मूळ विषयाकडे' वळवू या का?
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...
हि ' कुन्कू, टिकली, आणि टॅटू' मालिकेची नायिका. 'तान्हाजी' मध्ये सुर्याजी मालुसरे ह्यान्ची बायको झाली आहे.
'
' कुन्कू, टिकली, आणि टॅटू' >>
' कुन्कू, टिकली, आणि टॅटू' >>
अरे देवा! असली मालिका आहे!
ओम शांती ओम पार्ट 2 मध्ये
ओम शांती ओम पार्ट 2 मध्ये तळपदे ऐवजी ऋन्मेष झळकणार आहे.
>>>>
पार्ट टू येतोय का खरेच?
बाकी माझी सिरीऑसली ईच्छा आहे एकदा शाहरूखसोबत स्टेज शेअर करायची. आणि त्यावेळी त्याच्याईतकेच ईक्वली चमकायची.
ऋन्मेष - तू का इतके आढेवेढे
ऋन्मेष - तू का इतके आढेवेढे घेतोयस भक्त म्हणवून घ्यायला. गर्व से कहो भक्त है|
>>>>>
कारण तो जसा बॉलीवूडचा सुपर्रस्टार आहे तसा मी स्वत:ला माझ्या क्षेत्रातील सुपर्रस्टार समजतो. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे, त्याच्याबद्दल नितांत आदर आहे, पण भक्त म्हणवून घेतल्याने माझा ईगो हर्ट होतो. याच कारणासाठी मी देवही मानत नाही. मी काही स्वत:च्या मेहनतीवर मिळवले आणि कोणी म्हटले देवाच्या कृपेने तरी माझा ईगो हर्ट होतो. मी लगेच समोरच्या व्यक्तीला तिथल्या तिथे उडवून लावतो, की देव बिव काही नाही. माझ्याशी जे काही चांगले वाईट घडते त्याचे श्रेय वा दोष माझे स्वत:चेच..
आपण दोघे एकाच बोटीतून प्रवास
आपण दोघे एकाच बोटीतून प्रवास करत आहोत. >>>>>>>> नाही. हा तुझा गैरसमज आहे.
>>>>>>
शक्य आहे.

त्याचप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे अनुमान बांधले ते देखील तुमचा गैरसमज असणे शक्य आहे
पण आपल्या दोघांनाही शाहरूखचे काही चित्रपट आवडतात तर काही नाही हे आपल्या चर्चेतून समोर आलेले फॅक्ट आहे
...
नुसत बाह्य सौंदर्यच नाही, तर त्यान्च त्या त्या काळातल एकूण वलय, त्यान्ची अदाकारी ह्या गोष्टीन्चाही समावेश असतो. त्यावरुन वाटत की हे कलाकार कधीच म्हातारे होऊ नयेत. त्यात हिरो- हिरवीण दोन्ही आले.
>>>>>>
मी यालाच बाह्य सौण्दर्य म्हणतो
......
अरे देवा! नुसते चित्रपट पाहून ज्ञान वाढत नाही. त्यासाठी हिन्दी आणि इतर भाषेतल्या चित्रपटसृष्टीत काय घडामोडी चालू आहेत हे सुद्दा वाचाव/ ऐकाव.
>>>>>>>
वाचनाने केवळ माहितीचा साठा वाढतो. बुद्धी ऊपजत असते. तीच नसेल तर कितीही माहिती मिळवा तिचे पृथक्करण कसे करायचे हे समजत नाही. चित्रपट आणि कलाकारांबद्द्ल मत व्यक्त करायला मला चित्रपट बघणे पुरते असे मला वाटते.
....
आता धागा ' मूळ विषयाकडे' वळवू या का? हि ' कुन्कू, टिकली, आणि टॅटू' मालिकेची नायिका. 'तान्हाजी' मध्ये सुर्याजी मालुसरे ह्यान्ची बायको झाली आहे.
>>>>>>
चालेल विषयावर बोलूया,
मलाही मानव यांच्याप्रमाणे कुन्कू, टिकली, आणि टॅटू' मालिकेबद्दल सेम प्रश्न पडलाय.
हर्पेन यांनी पार पाककृती चा
हर्पेन यांनी पार पाककृती चा धागा करून टाकलाय..
इगो हर्ट वगैरे बापरे, मी तुझा
इगो हर्ट वगैरे बापरे, मी तुझा इगो हर्ट केला असेल तर दिलगीर आहे
देव तुझं भलं करो ऋन्मेष
@च्रप्स, जाने दो यार,
@च्रप्स, जाने दो यार,
चित्रपट तिकडे भरपूर कमावून बसलाय, धागामालकाला धागे तर कमावू द्या. खुप दिवसांनी तानाजी × उदयभानू सारखे हातघाईवर आलेत मालक.
आता माझे थोडे उकसावणे,
तुमचा अभिषेक × ऋ या प्रवासाला खालील कथा रिलेट होते का?
https://www.maayboli.com/node/73424
ताजे ता.क.:माझ्या उकसावण्याचा उद्देश केवळ आणि केवळ सुस्तावलेल्या कल्पनाशक्तीचा धक्का मारणे आहे.
देव तुझं भलं करो ऋन्मेष
देव तुझं भलं करो ऋन्मेष

अजून तो देव जन्माला यायचाय जो माझे भले करेन..
आणि या जन्मात तरी मी त्याला जन्माला घालणार नाही
पाफा, आधीच लोकांना त्या कथेचा
पाफा, आधीच लोकांना त्या कथेचा अर्थ कळत नाहीये. वर तुम्ही आणखी कोडी घाला.
(No subject)
Pages