दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

NRC मुळे अर्धा भारत अस्वस्थ होईल. अभिजनांना प्रोब्लेम नाही पण भुमिहिन मजुर, भटके- विमुक्त, साधु- नागा साधु बरीच मोठी लोकसंख्या बाधीत होईल.

सरकार ला गरज नसेल .
पासपोर्ट,
रेशन कार्ड
बँक अकाऊंट,
सरकारी नोकरी
अशा प्रकारच्या सर्व गोष्टी साठी तो सर्व्ह नंबर कम्पल्सरी केला जाईल .

आग्या१९९०,
कोंडवाड्यात नवा देशच वसेल.

कागज नही दिखाएंगे वाल्या वरून ग्रोव्हरने यूएस दौरा अनाऊन्स केला आहे. तो अमेरिकन नागरिक आहे की भारतीय नागरिक माहीत नाही पण कोणीही असला तरी अमेरिकेत पेपर दाखवावेच लागतात. तिथे कागज नही दिखाएंगे वाला माज करून चालत नाही. त्याला व्हिसा मिळाला असेल तर tax returns पासून पासपोर्टपर्यंत , सोशल मीडिया अकाउंट सह सर्व डॉक्युमेंट त्याने अमेरिकन सरकारला दिलेच असतील.

भारतात बरं आहे- एकदा का भाजपचं राज्य गेलं की काँग्रेस सगळ्या रोहीनग्यांना पाकिस्तानीना शरण देऊन वोटर कार्ड बनवून देईल. फक्त भाजप आहे तोपर्यंत कागज नही दिखाएंगे. उसके बाद मुल्क पे राज करेंगे.

भारतात बरं आहे- एकदा का भाजपचं राज्य गेलं की काँग्रेस सगळ्या रोहीनग्यांना पाकिस्तानीना शरण देऊन वोटर कार्ड बनवून देईल. >>>> सनव हे कित्येक वर्षापासुन चाललेल आहे. आता भाजपचे सरकार आले आणी त्यांनी घुसखोरांना हाकलणार हे बघीतल्यावर यांची फाटलीय. काँग्रेसने इथल्या मुस्लिमांना कधीच राष्ट्रीय प्रवाहात मुद्दाम येऊ दिले नाही. त्यांची वेगळी ओळख त्यांना कायम जपु दिली गेली. ख्रिश्चन जसे भारतात मिसळले तसे मुस्लिम मिसळु शकले नाहीत याला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसने कधी मुस्लिमांच्या सामाजीक , आर्थिक परीस्थितीला समजून घेतले नाही. उलट ते कसे वेगळे रहातील व त्यांना मतापुरतेच कसे वापरता येईल हे पाहीले. महाराष्ट्रीय मुस्लिम मात्र खरच इथे मिसळले आणी शैक्षणीक दृष्ट्या पण सुधारले गेले हाच एक अपवाद.

सामाजीक सुधारणा करणार्‍या हुसैन व हमीद दलवाईंना तसा वाव मिळालाच नाही. अजूनही मुस्लिम समाज मागेच रहातोय.

हे सगळे लिबरल elitists, अमेरिकेत बसून जेएनयूवर कमेंट करणारे अमेरिकन भारतिय, हाय प्रोफाइल पत्रकार- दुसऱ्या देशात जाताना स्वतःची पूर्ण कुंडली मांडून डॉक्युमेंट रूपाने सबमिट करतात. तिथे कागज नही दिखाएंगे म्हणत नाहीत. भारतात मात्र रोहिंगये, पाकिस्तानी, बांगला देशी मुस्लिम याना ओपन बॉर्डरमधून कधीही येता यावे व मतदान करता यावे हा हट्ट.
या हट्टापायी पुढे भविष्यात देशाचं काही बरेवाईट झालं तरी याना पर्वा नसते कारण लॉबीकडून मिळवलेल्या पैश्याच्या जोरावर किमान एका प्रगत देशात यांनी पूर्ण कुटुंबाची सोय करून ठेवलेली असतेच.

आता कशी आहे तब्येत? गुगल मायक्रोसॉफ़्ट बद्दल आता येईल का बोलता? त्रास होणार असेल तर राहू दे हो.

का तुम्ही गुगल वर बहिष्कार घातला का? शोधा की.
बाकी सगळ्या बातम्या आणि अफवा पोचतात तर ही कशी नाही पोचली?

हे ढोंगी निधर्मी आणि पुरोगामी विचारजंत मोदींना हटविण्यासाठी संडासात (पाकिस्तानात) जातात तेव्हा प्रवेश परवाना व तिथे वास्तव्य करण्याचा परवाना मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दाखवत असतील ना. का तिथे जाऊन सांगतात की पाहिजे तर कोंडवाड्यात टाका, पण एकही कागदपत्र दाखवणार नाही.

कदाचित आपली माणसे म्हणून संडास यांना विना कागदपत्रे संडासात येऊन देत असेल व यांची शाही सरबराई करत असेल.

<आता भाजपचे सरकार आले आणी त्यांनी घुसखोरांना हाकलणार हे बघीतल्यावर यांची फाटलीय. >

रश्मी यांना ही बातमी दिसली नसेल किंवा विसरली असेल. मायबोलीवरही अनेकदा ही माहिती डकवली गेली आहे.
UPA government had deported 82,728 Bangladeshi foreigners between 2005-2013, while the count was only 1,822 in the last four years of the Modi government.

भारतातील अभिजनवर्ग हा प्रत्येक समस्येवर त्याच्या अँगलने बघतो सर्वसमावेशक विचार त्याला कधीच जमला नाही.आपले बालीश विचार त्याच अँगलने मांडणे हे त्याचे खास वैशिष्ट्य.
हातावर पोट घेउन फिरणारा भटका विमुक्त समाज, भुमीहिन शेतीमजुरी करणारे, बिल्डिंगा तयार करताना लागणारे लेबर जे शहरोशहरी फिरत असतात , नागा साधु ह्या लोकांकडे डाँक्युमेंटस असण्याची सुतराम शक्यता नसते . अभिजनवर्गाला वाटते आपले डाँक्युमेंटस फायलीत आहेत तसेच भटके लोक आपल्या झोळीत डाँक्युमेंटस घेउन फिरत असतील, आपल्या पोरांच्या डिलेव्हर्या मोठाल्या हाँस्पिटलात झाल्यात सर्व नोंदी बिंदी करुन तशाच ह्या दारिद्रयरेषेखालील लोकांच्या पोरांच्या झाल्या असतील खरतर ग्रामिण अतीदुर्गम भागात अजुनही डिलेव्हर्या सुईनी करतात कसली नोंद नाही कि काही नाही..

मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडित न्हवतो, परंतु इथली चर्चा वाचून माझी कोणत्यातरी राजकीय पक्षात प्रवेश घ्यायची इच्छा झाली आहे. तर मी कोणत्या पक्षात जावे यासाठी मायबोलीकरांनी मला मार्गदर्शन करावे. राजकीय प्रवेश कसा घ्यावा, तसेच कुठला पक्ष जास्त फॅसिलिटी देतो, मागे एकदा ऐकलं होत की प्रचाराला गेल्यावर बिर्याणी आणि पाचशे रुपये मिळतात. निवडणुकीत हॉटेलमध्ये फ्री जेवण देतात.

कागज नहीं दिखायेंगे

पंधरा लाखच काय पण पंधरा हजार रुपये खात्यात जमा होणार असे नुसते जाहीर करा.

सात पिढ्यांची सगळी कागदपत्रे हजर होतील मग महंमदच्या बापाचे नाव रामलाल असले तरी चालेल

प्रचाराला गेल्यावर बिर्याणी आणि पाचशे रुपये मिळतात.

हो.

बैठकीच्या शेवटी सतरंज्या पण उचललायला लावतात आणि हेच काम कायम निवडणुक दर निवडणुकीत आयुष्यभर करवून घेतले जाते.

बाकी तुमचे तीर्थरूप उच्चपदस्थ असतील तरच पद मिळेल अन्यथा ...

People in Delhi know who is doing what. >>
एकदम बरोबर. दिल्ली बाहेरच्या लोकांनाच आप वाईट आणि नालायक वाटते. दिल्लीत जबरदस्त पाठिंबा आहे 'आप'ला.

हाहा! तुम्ही त्याबद्दल पोस्ट करायला तयार नाही यातच कळतंय कोणाच्या गैरसोयीची बातमी आहे Biggrin
बाकी काँग्रेसने डिपोर्ट केले म्हणताय ते लोक कोण होते? मुस्लिम की मायनोरिटीज? आणि आता काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे? सर्व धर्मियांना डिपोर्ट करा? कोणालाच डिपोर्ट करू नका? कागज नाही दिखाएंगे? रोहिंगये लोकांबद्दल काय भूमिका आहे?

@पगारे- भटक्या विमुक्त साधू लोकांकडे पेपर नसले तरी त्यांना काही त्रास होणार नाही. सर्व मायनोरिटीजना संरक्षण आहे त्यात हिंदू, ट्रायबल, बौद्ध सर्व आहेत.

महमंद, रामलाल यासारख्या व्हाँटस्अप फाँरवर्डमध्येच अभिजनवर्ग गुंतलाय त्याला खर्या समस्येची जाणच नाही.
द्या बघु नागा साधुंना १५ लाख कुठली कागदपत्र आणतायत बघुया आणी कुठल्या बँकेत टाकतात हेही बघुया.आपल्या पाकीटात atm असत नागा साधुंच काय?

गूगल च नाव उगीच घेतलंय त्याला काही अर्थ,शेंडा, बूड नाहीये. microsoft च्या माणसाबद्दल काय बोलायचं! आपल्याकडे देशहित न बघण्याची सोकॉल्ड बुद्धिनिष्ठांची (?) मोठीच परंपरा आहे. hopefully असे अमेरिकन भारतात आले की त्यांची नीट कसून तपासणी करायची प्रोसेस असेल.

पगारे- भटक्या विमुक्त साधू लोकांकडे पेपर नसले तरी त्यांना काही त्रास होणार नाही. सर्व मायनोरिटीजना संरक्षण आहे त्यात हिंदू, ट्रायबल, बौद्ध सर्व आहेत.)))))) Nrc आणी caa मध्ये फरक आहे.

<सर्व मायनोरिटीजना संरक्षण आहे त्यात हिंदू, ट्रायबल, बौद्ध सर्व आहेत.>
म्हणजे त्यांच्याकडे कागदपत्र नसले तर त्यांनी सांगायचं की आम्ही पाकिस्तान / बांग्लादेश / अफगाणमधून आलेले तिथले छळलेले अल्पसंख्य आहोत.
असंच ना?

काँग्रेसने लोक डिपोर्ट केले (तुम्हीच लिहिलंय) तेव्हा काय पेपर बघून केले? तेव्हा कसं भारतीय साधूंना वगळलं? तसंच आताही होईल, काळजी नसावी.
आणि कोंग्रेसची नेमकी भूमिका काय आहे हा प्रश्न वर विचारलाय. त्याचं उत्तर द्याल का?

ओके. माझ्या प्रश्नाचं उत्तर न दिलेलं उत्तर मिळालं.

सी ए ए , एन आर सी बद्दल यथावकाश सविस्तर लिहीन.
तूर्तास रश्मींना ती आकडे वारी पोचली का त्याची वाट पाहतोय.

भरत, धन्यवाद.

काँग्रेसने लोक डिपोर्ट केले (तुम्हीच लिहिलंय) तेव्हा काय पेपर बघून केले? तेव्हा कसं भारतीय साधूंना वगळलं? तसंच आताही होईल, काळजी नसावी.>>>>>>> +११११

आधी त्या काश्मिरी पंडितांना आणी इतर भारतीयांना आप आपल्या राज्यात सुखाने जगता यावे हीच ईच्छा, मग ते कोणत्याही जाती-धर्माचे का असेनात.

आणि कोंग्रेसची नेमकी भूमिका काय आहे.

कसली बोडक्याची काँग्रेस ची भूमिका.
ठाम आणि योग्य भूमिका घेणार एक तरी नेता काँग्रेस मध्ये आहे का?

Pages