फिटेल का हे ऋण माझे

Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 December, 2019 - 06:50

फिटेल का हे ऋण माझे

विवंचना आत दाटली

याच काळजीने मीच माझी

वर जागा शोधली

रोप मीच लावले

बघून स्वप्न उद्याचे

काय ठावं , याच जागी

इथेच सुळी चढायचे

रोज रोज तोच सूर्य

तीच आग ओकतो

रोज रोज मीच का पण ?

तेच तेच भोगतो

मीच जर का अन्नदाता

रिक्त का रे चूल माझी ?

घेतला नांगर हाती

हीच का रे भूल माझी ?

ऐकतो सरकारनामे

अभय कर्जांना दिले

फासली पाने पुन्हा ती

भाव तैसेच राहिले

================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<<<
मीच जर का अन्नदाता
रिक्त का रे चूल माझी ?
घेतला नांगर हाती
हीच का रे भूल माझी ?
>>>

शेतकऱ्यांची व्यथा छान मांडली आहे.