Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 December, 2019 - 06:50
फिटेल का हे ऋण माझे
विवंचना आत दाटली
याच काळजीने मीच माझी
वर जागा शोधली
रोप मीच लावले
बघून स्वप्न उद्याचे
काय ठावं , याच जागी
इथेच सुळी चढायचे
रोज रोज तोच सूर्य
तीच आग ओकतो
रोज रोज मीच का पण ?
तेच तेच भोगतो
मीच जर का अन्नदाता
रिक्त का रे चूल माझी ?
घेतला नांगर हाती
हीच का रे भूल माझी ?
ऐकतो सरकारनामे
अभय कर्जांना दिले
फासली पाने पुन्हा ती
भाव तैसेच राहिले
================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<<<
<<<
मीच जर का अन्नदाता
रिक्त का रे चूल माझी ?
घेतला नांगर हाती
हीच का रे भूल माझी ?
>>>
शेतकऱ्यांची व्यथा छान मांडली आहे.
भाऊ ,तु खुप छान लिहितोस. एकदम
भाऊ ,तु खुप छान लिहितोस. एकदम झक्कास.
धन्यवाद साहेब लोक
धन्यवाद साहेब लोक