Submitted by बोकलत on 7 December, 2019 - 04:38
मी काही महिने (जास्तीत जास्त 5 ते 6) मिरजमध्ये राहायला जातोय. कंपनीच्या कामासाठी मला एक चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. तर त्या भागात कोणतं कनेक्शन जास्त चांगलं आहे? अनलिमिटेड असेल तर बरं होईल.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आणि ऐवजी किंवा करा.
आणि ऐवजी किंवा करा.
दोन्ही चालतात अशी ठिकाणे थोडकी आहेत.
@टवणे सर, धन्यवाद सर, काही
@टवणे सर, धन्यवाद सर, काही लागलं तर नक्की कळवेन.
@मानव... योग्य मुद्दा केला
@मानव... योग्य मुद्दा
केला बदल
बोकलत, सिव्हिल जवळच/समोरच
बोकलत, सिव्हिल जवळच/समोरच माझे माहेर आहे
टवणे सरांनी झकास माहिती दिलीय
टवणे सरांनी झकास माहिती दिलीय. कधी काळी गेलो तर ( निदान सांगलीच्या गणपतीचे परत दर्शन घ्यायचे आहे .पटवर्धनांचा गणपती) जवळची ठिकाणी परत पाहु. नरसोबा वाडी दोन दा झालीय. खिद्रापूर मात्र पहावे लागेल. बोकलत, सांगलीला गणपतीला जरुर जावा. १ दिवसात होईल बघा.
@अनुश्री, मी त्याच भागात
@अनुश्री, मी त्याच भागात राहतोय

@रश्मी, हो फिरायचा प्लॅन करूनच आलोय.
बोकलत, सांगलीचा गणपती बघणार
बोकलत, सांगलीचा गणपती बघणार आहात तेव्हा तिथून 2 ते 3 किमी जवळच हरिपूर म्हणून गाव / खेडं आहे . तिथे शंकराचं मंदिर खूप प्राचीन आणि देखणं आहे. मंदिराच्या मागे कृष्णा, वारणा नद्यांचा संगम आहे. घाट आहे. जरूर बघा. हरिपूरला जाताना वाटेत बागेतील गणपती आहे. प्रसिद्ध आहे आणि नवसाला पावतो म्हणतात. प्रसन्न आणि शांत वाटतं तिथे. एखाद्या संकष्टीला जमलं तर जावा . सांगलीतून 12 किमी तुंग म्हणून खेडं आहे. तिथलं मारुतीचं मंदिर खूप प्रसिद्ध आणि छान आहे. दर शनिवारी तिथे रात्री महाप्रसाद असतो. बघण्यासारखं आहे. ट्रेकिंग ची आवड असेल तर बाहुबली पण छान आहे . 22 ते 25 किमी आहे . एखाद्या सुट्टीच्या दिवशी रामलिंग ( हातकणंगले जवळ) ला जाऊन या. तिथे गुहेत शंकराची पिंड आहे. बाराही महिने गुहेत पाणी झिरपत असतं. उन्हाळ्यातही आटत नाही. फक्त तिथे जेवणाची सोय नाही. आपला डबा जवळ ठेवावा. वन डे पिकनिक होते.
मी सांगली मिरज फक्त ऐकून आहे,
मी सांगली मिरज फक्त ऐकून आहे, त्या भागात कधीही कोणत्याही कारणाने जायची वेळच आली नाही, पण तरीही वाचून आणि ऐकीव माहितीवरूनच मला त्या ट्वीन गावाचं नेहमीच आकर्षण वाटत आल आहे. आता रश्मी, ननी आणि टवणे सरांच्या पोस्ट्स वाचून 3-4 दिवस नक्की जायचा प्लॅन आहे. तिघांचे छान माहितीसाठी आभार.!
काही डिसेंट हॉटेल्सचे पण रेफरन्सेस मिळतील का?
@अनुश्री, लोकमान्य कॉलनी?
@अनुश्री, लोकमान्य कॉलनी?
मीरा, मला हॉटेल्स माहीत नाहीत
मीरा, मला हॉटेल्स माहीत नाहीत कारण तिथे राहीलो नाही. पण एका मुंजीनिमीत्त नरसोबा वाडीला गेल्याने पुण्याला परत येतांना सांगलीत वळलो होतो. गणपती चे दर्शन व चहा घेऊन लगेच निघालो. एक होऊ शकते, कोल्हापूरला किंवा सातार्याला राहुन ही ट्रिप करता येईल. किंवा सांगली मध्यवर्ती ठेवावे लागेल. नर्सोबा वाडी ते सांगली साधारण ३ तासाचे अंतर आहे. त्यामुळे सकाळी जर सांगलीला पोहोचले तर तिथे राहुन सगळीकडे जाता येईल. आम्ही वाडीहुन दुपारी १२ ते १ च्या दरम्यान निघुन सांगलीत दुपारी ३ पर्यंत पोहोचलो होतो.
मीरा, हॉटेल पै प्रकाशला राहू
मीरा, हॉटेल पै प्रकाशला राहू शकता. ते विश्रामबागला असल्याने कुठेही जायला मध्यवर्ती पडतं.
http://www.hotelpaiprakash.com/
छान माहिती दिलीत ननि.
छान माहिती दिलीत ननि.
@मीरा, मी सुरवातीला आलो तेव्हा पूर्वा पार्क हॉटेलमध्ये होतो. मिरजच्या गांधी चौकाजवळ आहे.स्टाफ चांगला आहे तिथला. पण तुम्हाला विश्रामबाग, सांगली सोयीचं राहील असं वाटतंय.
वर्षभरापूर्वी सांगलीला आणि
वर्षभरापूर्वी सांगलीला आणि नरसोबावाडीला गेलो होतो पण धावती भेट होती.
बोकलत आहेत तो पर्यंत एकदा सांगली, औदुंबर, कोल्हापूर फिरून यायचा आणि त्यांचीही भेट घ्यायचा विचार माझ्याही डोक्यात येत आहे. देवस्थळांचे धार्मिक दृष्ट्या आकर्षण नाही पण स्थापत्य, कोरीव काम, परिसर पाहण्यासारखे असतील तर भेट द्यायला आवडेल.
हो नक्की या. यायच्या आधी एक
हो नक्की या. यायच्या आधी एक दिवस सांगा. मस्त मटण वड्यांचा बेत बनवतो
बोकलत आहेत तो पर्यंत एकदा
बोकलत आहेत तो पर्यंत एकदा सांगली, औदुंबर, कोल्हापूर फिरून यायचा आणि त्यांचीही भेट घ्यायचा विचार माझ्याही डोक्यात येत आहे. >>>
मानव, मला सांगा आपण दोघे मिळून सोबतच जाऊयात इथून!
फक्त एक काळी बाहुली, बिबे ,मिरच्या वैगेरे ठेवू सोबत काय त्यांना भुते वश आहेत बरीच!

कृष्णा आधी माझ्या घरी या एकदा
कृष्णा आधी माझ्या घरी या एकदा तरी. जेव्हा केव्हा भेटू म्हटलं तुम्ही पुण्याच्या गाडीत असता.
कृष्णा आधी माझ्या घरी या एकदा
कृष्णा आधी माझ्या घरी या एकदा तरी. जेव्हा केव्हा भेटू म्हटलं तुम्ही पुण्याच्या गाडीत असता.>>
येत्या रविवारी?
सगळ्यांचे आभार. गुगल करत
सगळ्यांचे आभार. गुगल करत होतेच, पण नेहमीचे ब्रँड्स आणि स्टार हॉटेल्स नसतील तर रेकमंडेड हॉटेल मध्ये रहाणं सोयीस्कर असतं. नाही तर मग चेक इन नंतर पश्चाताप आणि मनस्ताप होण्याचा (कोकणात) अनुभव घेतला आहे. साधं रहाण्याच ठिकाण चालतं पण स्वच्छ असावं एवढी किमान अपेक्षा.
तुम्ही सांगितलेली ठिकाणं शोधून एका ठिकाणी बुकिंग करते. परत एकदा आभार.
सगळ्यांचे आभार. गुगल करत
सगळ्यांचे आभार. गुगल करत होतेच, पण नेहमीचे ब्रँड्स आणि स्टार हॉटेल्स नसतील तर रेकमंडेड हॉटेल मध्ये रहाणं सोयीस्कर असतं. नाही तर मग चेक इन नंतर पश्चाताप आणि मनस्ताप होण्याचा (कोकणात) अनुभव घेतला आहे. साधं रहाण्याच ठिकाण चालतं पण स्वच्छ असावं एवढी किमान अपेक्षा.
तुम्ही सांगितलेली ठिकाणं शोधून एका ठिकाणी बुकिंग करते. परत एकदा आभार.
मीरा, पै प्रकाश चांगलेच आहे
मीरा, पै प्रकाश चांगलेच आहे पण आता नवीन ही झालीत . ग्रेट मराठा खूप छान आहे. सिझन फोर पण आहे. सगळी विश्रामबाग ला आहेत .
रश्मी , नरसोबा वाडी ते सांगली तीन तासांच अंतर नाहीये. पाऊण तास खूप झाला. 22 किमी अंतर आहे.
@ मीरा जयसिंगपूर चालेल का?
@ मीरा जयसिंगपूर चालेल का?
सांगली आणि कोल्हापूरच्या मध्ये आहे म्हणजे दोन्हीकडे जायला -यायला convenient आहे ..सांगली 20 मिनिटे, कोल्हापूर एक तास..
जयसिंगपूरात Suncity आणि शांभवी हाॅटेल चांगली आहेत..
त्यातल्या त्यात शांभवी ऐ वन आहे. . सनसिटी पण ठीक आहे आणि मुळात सनसिटी बसस्टॅण्डला लागूनच आहे आणि बाजार वैगैरे खुप जवळ आहे .. शांभवी स्टॅण्डपासून 5 min walkable आहे..
जयसिंगपूरातून तुम्हाला नरसोबाची वाडी, खिद्रापूर ( अर्धा पाऊण तास) ही ठिकाणे जवळ आहेत अजून तुम्ही ईंटरेस्टेड असाल (फार विशेष नाहीत) तर बाहुबली (जहाज जैन मंदीर) आणि कुंथगिरी (जैन मंदीर)
इकडेही जाऊन येऊ शकता.. छान हिरवळ आणि डोंगराळ भागाची मजा अनुभवता येईल..
औदुंबर हे भिलवडी स्टेशन जवळ
औदुंबर हे भिलवडी स्टेशन जवळ आणि एका बाजूला चितळे डेअरी ,दुसऱ्या बाजूला पेट्रोल, डिझेल टाक्या.
तिथून आठ किमी तासगाव. त्यातले गणपती मंदीर दुसऱ्या एका पटवर्धनांचे. सर्वोत्तम. लाकडी रथ. हत्ती आता देवळात नसतो. राजवाड्यात असतो. हे पाहून तासगाव - मिरज १६ किमी . वाटेत कवठे एकंडचे जुने शंकराचे देऊळ.
@अनुश्री, लोकमान्य कॉलनी? >>
@अनुश्री, लोकमान्य कॉलनी? >> नाही ओथोनियेल कॉलनी. लोकमान्यच्या शेजारचीच. चौगुले हॉ. आणि मागची बाजू.
ओथोनियेल कॉलनी. लोकमान्यच्या
ओथोनियेल कॉलनी. लोकमान्यच्या शेजारचीच. चौगुले हॉ. आणि मागची बाजू.
>>>
नाना पोंक्षेच्या घराच्या मागे
हो बरोबर.
हो बरोबर.
ननि, ते लक्षात नाही आले.
ननि, ते लक्षात नाही आले. एकतर निघायला उशीर झाला होता, रस्ता पण खडबडीत होता त्यामुळे खदडम खदडम करत एकदाचे पोहोचलो बसने सांगलीत. त्यामुळे अडिच- तीन तास लागले की काय असे वाटले होते.
खड्ड्यातील धक्यांमुळे घड्याळ
खड्ड्यातील धक्यांमुळे घड्याळही सैरावर पळतय का? इंपोर्टेड असेल तर त्याला सवय नसेल इथल्या धक्यांची, देशी घड्याळ घ्या.
hmt घ्यायचं. सहा महिन्यात त्यातील hmt अक्षरं गळून काट्यात अडकली पाहिजे म्हणजे ओरिजिनल hmt, नाहीतर डुप्लिकेट समजावं.
मिरजेत गेल्यावर नवे आयडी काढा
मिरजेत गेल्यावर नवे आयडी काढा. मी मिरजेचा वगैरे आयडी घ्या.
बोकलत या आयडी मागच्या
बोकलत या आयडी मागच्या व्यक्तीला लोक (कसे काय) ओळखतात का? कुणी त्यांना माहेरचा पत्ता दिलाय तर कुणी भेटायची इच्छा व्यक्त केलीय म्हणून विचारले. मला का बरे कोण भ्तेत नसावे?
तुमच्या नावामागचा अ निखळून
तुमच्या नावामागचा अ निखळून पडला असावा.
Pages