मिरजमध्ये कुठली इंटरनेट सर्व्हिस घ्यावी?

Submitted by बोकलत on 7 December, 2019 - 04:38

मी काही महिने (जास्तीत जास्त 5 ते 6) मिरजमध्ये राहायला जातोय. कंपनीच्या कामासाठी मला एक चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. तर त्या भागात कोणतं कनेक्शन जास्त चांगलं आहे? अनलिमिटेड असेल तर बरं होईल.

Group content visibility: 
Use group defaults

धाग्याचं शीर्षक बदला.

मिरज आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती.

मिरजेतले मायबोलीकर

बोकलत गटग

खड्ड्यातील धक्यांमुळे घड्याळही सैरावर पळतय का? इंपोर्टेड असेल तर त्याला सवय नसेल इथल्या धक्यांची, देशी घड्याळ घ्या.
hmt घ्यायचं. सहा महिन्यात त्यातील hmt अक्षरं गळून काट्यात अडकली पाहिजे म्हणजे ओरिजिनल hmt, नाहीतर डुप्लिकेट समजावं.>>>>> नाही हो. Proud बरीच माणसे बरोबर असतील तर फार गोंधळ घालतात आणी तो घातला गेला. त्यामुळे खूप वेळ लागला असे वाटले.

सांगलीतला गणपती खरच खूप प्रसन्न आहे. मनाला शांत वाटते.

मिरज आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती.
मिरजेतले गायनवादन, वाद्यांचे कारखाने.
मिरजेतली मंगल कार्यालये आणि लोणची.
मिरजकरांच्या सासुरवाड्या, आणि जावई.

टवणे सर इथे सांगली मिरजच्या आसपास बाळूमामाचं मंदिर आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे काय?. सकाळी 5 वाजता जो कोणी मंदिरात जाऊन प्रश्न विचारेल त्याच्या कानात बाळूमामा उत्तर देतो. बऱ्याच जणांना अनुभव आला असं ऐकलंय.

सध्या बाळूमामा मालिका चालू आहे. त्यात नुसता बाळूमामाच काय त्याच्या कुटुंबाचीपण अद्ययावत माहिती मिळेल. ती बघा.

>> इथे सांगली मिरजच्या आसपास बाळूमामाचं मंदिर आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे काय?

बाळूमामा मुख्य देवस्थान हे कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर येथे आहे.
सांगली जवळ लिंगनूर येथे एक बाळूमामा मंदिर आहे असे ऐकलेय पण नक्की माहित नाही.

@ बोकलत, कुरकुरे खा, त्यावर २ जीबी डेटा फ्री मिळेल, मग ईन्टरनेटवर बिर्याणी कुठे चांगली मिळते ते शोधा. हाकानाका.
धाग्याच्या विषयाला धरून प्रतिसाद. Rofl

मिरज पंढरपूर रस्त्यावर जागोजागी चिंचेची झाडं आहेत चिंचेनी भरलेली. तोंडाला पाणी सुटतं त्या रस्त्याने जायचं झालं की. पण कोणी माणूस त्या तोडताना दिसत नाही. मिरजेतली माणसं भुतांना घाबरत असावीत नाहीतर चिंच त्यांना आवडत नसावी.

मिरजमध्ये कुठली इंटरनेट सर्व्हिस घ्यावी? >> मिरजमधलीच घ्या. नसेल आवडत तर हैद्राबादहुन पार्सल पाठवेन.

Rahamtulla पेक्षा त्याच्या समोर असलेले साई व्हिजन चांगलं वाटतं मला. रोट्या मस्त असतात त्यांच्या. मी पहिल्यांदा मिरजेत आलो होतो तेव्हा पुन्हा डोंबिवलीला जाताना rahamtulla ला जेवलो आणि त्रास झाला. सांगलीला बस थांबली तेव्हा परत मिरजेला यावं लागलं त्यानंतर पुन्हा तिथे गेलो नाही. पण 65 आणि लॉलीपॉप मस्त देतो rahamtulla.

>>>मिरजमध्ये कुठली इंटरनेट सर्व्हिस घ्यावी? >> मिरजमधलीच घ्या. नसेल आवडत तर हैद्राबादहुन पार्सल पाठवेन.>>> Happy
नेट नसलं तर बॅंड ( मिरजेतलं ब्रास बॅंड , नेट बॅंडविड्थ नव्हे ) वाजवा .

मिरजेतले शेवटचे दिवस. थोड्या दिवसांसाठी आलोय बोलता बोलता तब्बल साडेतीन वर्षे काढली इथे. खूप आठवण येईल या शहराची.

मिरज पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत बकाल शहर आहे.

सध्यातरी तिथे अगदी मेन रोड सुद्धा नीट नाहीत त्यामुळे तिथे धूळ प्रचंड आहे.

त्याच रस्त्यावर १० फुफुस स्पेशालिस्ट राहत असल्याने तसे तुम्हाला बरे उपचार मिळतील. पण शहरात राहू नका नाहीतर लॉन्ग टर्म फुफुसे खराब करून घ्याल.

मिरजेपेक्षा सांगली च्या विश्रामबाग, कलेक्टर ऑफिस नवे परिसराच्या आसपास राहा. म्हणजे निदान दर महिन्याला काहीतरी सनसनाटी गुन्हेगारी बातमी मिळून बोअर होणार नाही. परवाच अगदी मस्त फिल्मी स्टाईल दरोडा टाकून रिलायन्स ज्वेल्स नावाचे मोठे दागिन्यांचे दुकान लुटले. तेही सांगलीच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर. तिथून सांगली जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय हाकेच्या अंतरावर आहे.

थरारक पाठलाग करून खून, जाता जाता एन्काऊंटर, सहज केलेले हाफ मर्डर, कालचा मोस्ट वॉन्टेड गुंड आज तुमच्या घरी सन्मानाने मत मागायला येणार, जवळ जवळ नॉन एक्सिस्टन्ट महानगरपालिका असे काही मायनर इश्श्यू सोडल्यास
सांगली मिरज हा खरेच निसर्ग समृद्ध शांत परिसर आहे. इथल्या भाजीपाल्याची क्वालिटी अप्रतिम आहे.

तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण हे सगळं मी मिरजेत यायच्या आधी घडत होतं. मी राहायला आल्यापासून सगळे खुश होते. जगावं तर बोकलतसारखं असे म्हणायचे सगळे. आता निघताना पण सगळे दुःखी आहेत. मला तिथली लोकं बोलत होती इथेच थांबा परत मुंबईत जाऊ नका गेलेत आम्ही दरोडा टाकू, हाल्फ मर्डरी करू. तुम्ही वर जे गुन्हे लिहिलेत ते सगळे मी इकडे मुंबईत येणार आहे म्हणून घडलेत. मी आता सगळ्यांना समजाऊन सांगितलं आहे. यापुढे असलं काही घडणार नाही.

निघालो. लव्ह यू मिरज सांगली.

<< जगावं तर बोकलतसारखं असे म्हणायचे सगळे. >>

------- हे आवडलं... मिरज सांगलीला तुम्ही बोकलत स्टाईल जगणे शिकविले.

काल निघताना घाई गडबड झाली. व्यवस्थित निरोप घेता आला नाही सगळ्यांचा. पण मस्त शांत शहर आहे. सगळी माणसं छान भेटली. पुन्हा जाईन तेव्हा दोन दिवस हाताशी ठेऊनच जाईन.

अखेर(पर्यंत) इंटरनेट सर्विस मिळाली की नाही तिथे मग तुम्हाला? Lol

वरच्या रॉय यांच्या पोस्टशी काही अंशी सहमत आहे. कोसांमि भागात दोनच प्रकारचे लोक भेटतात. एकतर हृदयात बसणारे, नाहीतर थेट डोक्यात जाणारे Proud Light 1

सांगली मधील पै प्रकाश येथील शेव-उप्पीट हे आजवर खाल्लेल्या पैकीं सर्वात बेस्ट! मी साधारण 1992 साली गेलो होतो. दुपारी एका साधारण हॉटेलात गावठी चिकन हाणले होते आणि रात्री सत्ते पे सत्ता (सिनेमा गृहाचे) नाव आठवत नाही. विश्रामबागेत राहिलो होतो. दिवसभर बाईकवरून भटकंती. किर्लोस्कर वाडी पर्यंत जाऊन आलो होतो. पुन्हा नंतर त्या भागात जाणे झाले नाही

Pages