मिरजमध्ये कुठली इंटरनेट सर्व्हिस घ्यावी?

Submitted by बोकलत on 7 December, 2019 - 04:38

मी काही महिने (जास्तीत जास्त 5 ते 6) मिरजमध्ये राहायला जातोय. कंपनीच्या कामासाठी मला एक चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. तर त्या भागात कोणतं कनेक्शन जास्त चांगलं आहे? अनलिमिटेड असेल तर बरं होईल.

Group content visibility: 
Use group defaults

अखेर(पर्यंत) इंटरनेट सर्विस मिळाली की नाही तिथे मग तुम्हाला? >>> नाही मिळाली शेवटपर्यंत Happy jio Airtel वापरत होतो. मी मुंबईत आलोय खरा पण मन अजूनही मिरजच्या रस्त्यानं धावतंय. सांगली मिरज रोड, काळी खण तलाव, पंढरपूर रोडवरच d Mart, कर्नाटकचा पछाडलेला रस्ता,लक्ष्मी मार्केट,तासगांवचा गणपती आणि हत्ती. वेळ लागेल यातून बाहेर यायला.

नाश्ता करावा तर तो दाभाडे काकूकडेच. पंढरपूर रोडला हॉस्पिटलसमोर लहानच निळ्या रंगाचं दुकान आहे. जबरदस्त चव असते. साउथ इंडियन पदार्थ कितीतरी खाल्ले असतील पण इथे जो सांबार मिळतो त्याची सर कशालाच नाही.

Pages