मिरजमध्ये कुठली इंटरनेट सर्व्हिस घ्यावी?

Submitted by बोकलत on 7 December, 2019 - 04:38

मी काही महिने (जास्तीत जास्त 5 ते 6) मिरजमध्ये राहायला जातोय. कंपनीच्या कामासाठी मला एक चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. तर त्या भागात कोणतं कनेक्शन जास्त चांगलं आहे? अनलिमिटेड असेल तर बरं होईल.

Group content visibility: 
Use group defaults

Uhoh

मिरजेत कुठे राहणार आहात? गावात की गावाबाहेर? सांगलीत पण राहू शकता, जरा मोठे शहर आहे मिराजेपेक्षा

अमानवीय धाग्याची सूत्रे मिरज वरून हलणार तर...>>> मी सध्या हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन असतो तिथे Happy
मिरजेत कुठे राहणार आहात? गावात की गावाबाहेर? सांगलीत पण राहू शकता, जरा मोठे शहर आहे मिराजेपेक्षा>>>> सिव्हिल हॉस्पिटलजवळ.

सिव्हिल हॉस्पिटलजवळ
>>>
मी विचारलंय गावातल्या मुलांना, त्यांच्याकडून कळले की सांगतो.
सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर एक अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये सर्वेश नावाचे इंटरनेट कॅफे/झेरॉक्स दुकान आहे. तिथे विचारा , तो बरोबर सांगेल.

Sarvesh Internet Cafe
Lokmanya Colony Rd, Othonial Colony, Miraj, Maharashtra 416410, India
+91 93721 11590
https://maps.app.goo.gl/aoEmwVM2YWPttx47A

बीएसनल किंवा जिओ फायबर असे उत्तर आले आहे

मिरज स्टेशनला गुगलचे फ्री वायफाय आहे.
चांगला ISP मिळेपर्यंत वेळ मिळेल तसे स्टेशनवर जाऊन फ्री वापरू शकाल.

बीएसनल किंवा जिओ फायबर असे उत्तर आले आहे>>>> हो ,बरोबर आहे. आमचे ऑफिस सिव्हिल हॉस्पिटलजवळच आहे. सध्या तरी जिओचीच चलती आहे.

तुम्ही इंटरनेट शिवाय 6 महिने काढू शकत नाही
.
मिरजेत राहण्यास चांगली जागा कोणती.
मिरजेत कोठे चांगले जेवण मिळते.
मिरजेत कोणती ठिकाणे फिरण्या साठी मस्त आहेत.
मिरजेत स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे.

हे सर्व प्रश्न bokalat साहेबांना पडले नाहीत.
पण इंटरनेट कोणते चांगले हा गहन प्रश्न पडला आहे

राजेशभाऊ,
वरीलपैकी एकही प्रश्नाला काही अर्थ नाही. त्यातल्या त्यात जेवणाबाबत म्हणाल तर सांगली मिरज ट्विन सिटीज असूनही मिरजेतील जेवण सांगलीच्या तुलनेत लैच चांगले आहे.

वरच्या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे. "नाही"

बोकलतला उत्तर माहिती असेल म्हणून त्याने इंटरनेटचा प्रश्न विचारला असेल

Enjoy! मिरजेत onsite assignment काय तुमची?>>> मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे Happy सर्वेशकडे जाऊन आलो. त्याने iconnect चं इंटरनेट कनेक्शन सुचवलंय.
Submitted by Rajesh188 on 8 December, 2019 - 20:38>>>तुम्ही उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टींची सोय आधीच करून ठेवली होती फक्त इंटरनेट कनेक्शन बाकी होतं. कंपनीने वर्क फ्रॉम मिरज ऑप्शन दिल्यामुळे चांगलं कनेक्शन ही मूलभूत गरज आहे.

सर्वेशकडे जाऊन आलो. त्याने iconnect चं इंटरनेट कनेक्शन सुचवलंय.
>>>

गूड!

तिथेच जवळ थोडे पुढे (१००मीटर) एक मझाली नावाचे रेस्तॉरंट आहे. (यांना मिरजेत हाटेलं म्हणतात.) नवीनच आहे. बसाप्पा हलवाई म्हणून एक गावातले फेमस हलवायाचे दुकान आहे. त्यांनीच हे सुरू केले आहे. ते त्यातल्या त्यात सँडविच, पास्ता वगैरे खायचे असेल तर बरे आहे. त्याच्या समोर जी गल्ली आहे (मेडिकल कॉलेज फर्स्ट इयर हॉस्टेलच्या मागे) त्यात बसाप्पाचे घर आहे (म्हणजे बसाप्पा कधीच मेला पण त्याच्या कुटूंबाला बसाप्पाच म्हणतात). घरातच एक छोटे आउटलेट आहे त्यांचे, तिथे पेढे आणि खाजा जगात भारी मिळेल.
थोडे अजून पुढे आलात (एक सव्वा किमी) की मिशन हॉस्पिटलच्या जवळ दोन बरी खाण्याची ठिकाणे आहेत.
नॉनवेज आवडत असेल तर रहिमतुल्ला. हे मिशनच्या चौकातून स्टँडकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे.
सांगलीकडे जाणार्‍या रस्त्यावर मिरची नावाचे रेस्तॉरंट आहे. तेही बरे आहे.
बड्याची वगैरे बिर्याणी खायची असेल तर बस स्टँडच्या आसपास, किंवा तिथून दर्ग्याकडे जाणार्‍या रस्त्यावर खोकडी/गाळ्यातली हाटेलं आहेत. स्वच्छतेच्या नावाने बोंब असते, त्याकडे न बघता खायचे.
मी गावात होतो तोवर मिसळ वगैरे मिळणारी हाटेलं आता आहेत का ते माहिती नाही, आणि आता ती चव आवडेल का याचीही खात्री नाही.
तुम्ही राहणार आहात त्या पंढरपूर रस्त्यावर पंढरपूरच्या दिशेने बरेच ढाबे आहेत. तिकडे जायचे टाळा. एक तर रात्री अपघात फार होतात आणि स्वच्छता नावालाही नसते भटारखान्यातून. मेलेले उंदीर वगैरे आम बाब असते.
सांगलीकडे जाताना बरोबर मध्ये विश्रामबाग नावाचा भाग आहे. तिथे वालचंद, विलिंग्डन वगैरे कॉलेजे पुर्वीपासून असल्याने खाण्याची बरी स्थळे आहेत. त्याच्या जरा अलीकडे आता नवीन कमिशनर ऑफिस आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाची इमारत झाली आहे. त्याच्यासमोर बरीच चांगली खाण्याची हाटेलं आहेत. सत्राळकर कॉम्प्लेक्स म्हणून एक बिल्डिंग आहे त्याच्या आसपास.

मिरज घाट साधारण ४-५ किमी दूर आहे. सुंदर बांधलेला घाट आहे. पोहायला आवडत असेल तर पाण्याचा अंदाज घेउन उतरू शकता. तिथे भेळ गाड्या, खाण्याचे स्टॉल वगैरे काही नाही. फक्त घाट, थोडी वस्ती! आणि स्मशान. तुम्हाला आवडेल Happy (अजून एक मिनी स्मशान तुम्ही राहणार तिथूनच जवळ अर्ध्या-एक किमीवर आहे पंढरपूर रस्त्यावर ओढ्याकाठी. तिथे नाक दाबून जायला लागते कारण मेलेली ढोरं टाकतात).

अजून २०-५०किमीच्या अंतरात जायचे असेल तरः
दंडोबा (पंढरपूर रस्त्या, साधारण २२किमी) - एखाद्या रविवारी सकाळी कार/बाईक घेऊन जा, पायथ्याशी लावा व ५/६ किमीची ही टेकडी रमतगमत चढा. (https://www.maayboli.com/node/16567)
नरसोबाची वाडी (मिरज घाटाच्या पुढे पूल ओलांडून अजून १०किमी साधारण): दत्तात्रेय देऊळ, सुंदर घाट, पंचगंगा-कृष्णेचा संगम. नदीपलीकडे माबोच्या प्रसिद्ध ब्लॅककॅट यांचे कुरुंदवाड हे गाव. नरसोबावाडी/कुरुंदवाड इथे खव्याचे अत्युत्तम पदार्थ मिळतात. कवठाची बर्फी मिळते मस्त. बासुंदी इथल्यापेक्षा चांगली अजून कुठेही मिळत नाही.
कुरुंदवाडहून १५किमीवर खिद्रापूर नावाचे खेडेगाव आहे तिथे एक प्राचीन हेमाडपंथी देऊळ आहे. त्याची तारीफ खंडहर म्हणून कागलकर अधून मधून करत असतात. पाहण्याची चीज आहे.
कोल्हापूर तासा-दीड तासावर आहेच.
औदुंबर नावाचे अजून एक कृष्णाकाठचे दत्त देऊळ आहे. श्रिनिवास कुलकर्णींनी डोह या पुस्तकात ते अजरामर केले आहे. तिथेही जाऊ शकता (दीड तास जाईल). तिथून पुढे बहे बोरगाव नावाचे अजून एक नदीवरचे देवस्थान आहे. एक जुने शंकराचे देऊळ व एक जुना चिंचोळा दगडी पूल आहे.
किर्लोस्करवाडी जवळ ताकारी नावाचे एक गाव आहे, तिथे पॅसिंजरने उतरून सागरेश्वर नावाच्या टेकडीवजा अभयारण्यास भेट देऊ शकता. ताकारी स्टेशनला उतरलात की थेट टेकडीच्या माथ्याच्या दिशेने चढत जायचे, रस्त्याने गेलात तर मला वाटते ८-१० किमीचा रस्ता अभयारण्याच्या गेटापर्यंत जायलाच लागेल.

हो.

मिरजेत onsite म्हणजे गंमत वाटली एकदम! जर हरकत नसेल तर कोणत्या कंपनीसाठी onsite आला आहात, काय काम आहे सांगाल का? अशीच उत्सुकता. जर confidential काही असेल तर राहुद्या

सध्या अच्छे दिन आले असल्याने सगळ्या फौँड्र्या बंद आहेत तिथल्या. बोकलतांना जादूटोणा करायला बोलाविले गेले असेल, आणि काय? Wink

हे सर्व प्रश्न bokalat साहेबांना पडले नाहीत.
पण इंटरनेट कोणते चांगले हा गहन प्रश्न पडला आहे >> सोपं आहे.. इंटरनेट असलं की या सगळ्या गोष्टी गुगल करता येतात Happy

टण्या.. चांगली माहिती...

Submitted by टवणे सर on 9 December, 2019 - 17:19>>> बायको मिरज सिव्हिलमध्ये जॉब करते. अर्ज दिलाय मुंबईत बदलीसाठी. 2-4 महिन्यात होईल. माझी मुलगी आहे लहान. तिला पाळणाघरात ठेवलं असतं तर हाल झाले असते तिचे. म्हणून कंपनीला विनंती केली काही महिने मिरजवरून काम करेन म्हणून. मी सध्या Siemens teamcenter वर काम करतोय.

ओके.. कधी काही मदत लागली तर कळवा, जमेल ते करेन. मी आता मिरजेत राहात नाही पण धागे अजून चिवट आहेत.

Pages