फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता भाजपकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार उरलेल्या ३ पक्षाच्या समर्थकाना नाही.
सुरुवात त्यांनी केली.
शत्रू युध्दाचे नियम स्वतः पाळत नाही आणि समोरुन मात्र अपेक्षा ठेवणार की त्यांनी नियम पाळत रहावे? असं कसं चालेल?

विकु Lol Lol Lol

>>जर सेना युती तोडत नसताना भाजपनेच निकालानंतर लगेच अजित पवारांसोबत हे प्रकरण केलं असतं तर भाजपचा १०० टक्के दोष असता. <<
उलट तेंव्हा केलं असतं तर ती बोल्ड स्टेप झाली असती आणि जनतेची सहानुभूती सुद्धा मिळाली असती. पण हे ठरले कागदि चाणक्य, बोल्ड स्टेप कशी घेतील. आणि आता झालेली शपथविधीची सर्कस सुद्धा शेवटची धडपड आहे. कागदि चाणक्य या भ्रमात आहेत कि "ऑपरेशन कमळ" हे कलम आपण हवं तिथे लावु शकतो...

राज - भाजपचे या राजकीय खेळीत काहीच नुकसान नाही. नाहीतरी शनिवारी आघाडी सत्तेत आलीच असती. फार फार तर ती १०-१२ दिवसांनी येइल.

त्यांच्या मतदारांपर्यंत हा निर्णय कसा योग्य आहे हे पोहोचवणे आणि ते त्यांच्या गळी उतरवणे सहज शक्य करणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे.

आम्हीच काय ते नैतिक असा संघाच्या मुशीतून आणि कुशीतून आलेल्या भाजपचा दावा होता. इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते सत्तेवर आले आहेत.
तेव्हा भाजपने आता इतरांना असं काही म्हणण्याचा हक्क गमावलाय गमावलाय गमावलाय‌ .

खरं तर कधी नव्हताच. पण तसं चित्र उभं केलं जातं होतं ते फडणवीसांनी स्वत.च टराटरा फाडलंय फाडलंय फाडलंय

>>भाजपचे या राजकीय खेळीत काहीच नुकसान नाही. <<
राजकारणात अशी चिंधीचोर खेळी शॉर्टटर्म नुकसान करत नसेल कदाचित पण लाँगटर्म नुकसान काय असतं ते एकदा पवारसाहेबांना विचारुन बघा...

बाय्दवे, विकुंच्या त्या दुसरा बाबत मला "बहुदा" नाहि खात्रीने तेच म्हणायचं होतं. यु हॅव टु गिव मी दॅट, हॅविग बीन ऑब्झर्व्ड हिम फॉर मेनी इयर्स... Wink

फारेण्ड, खोगीरभरतीमुळे भाजपचं नुकसान झालंय असं इथल्या तमाम भाजपसमर्थकांचं निकालानंतर एकमत होतं.
आता तीच खोगीर भरती फंदफितुरी म्हणून केली, तर भाजपला नुकसान नाही? नक्की?

>>> कमळाबाई स्वत:च्याच कर्माने निर्माण केलेल्या चिखलात रुतत जात आहे; आणि हे येडे त्याला रणनीती समजतायंत. जेवढे जास्त हात-पाय मारत रहातील तेव्हडे आंत खोलवर जात रहाणार आहेत...>>>

फडणवीस प्रत्येक वेळी एक नवीन खालची पातळी गाठत आहेत.

राज - भाजपचे या राजकीय खेळीत काहीच नुकसान नाही. नाहीतरी शनिवारी आघाडी सत्तेत आलीच असती. फार फार तर ती १०-१२ दिवसांनी येइल.

त्यांच्या मतदारांपर्यंत हा निर्णय कसा योग्य आहे हे पोहोचवणे आणि ते त्यांच्या गळी उतरवणे सहज शक्य करणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे.>>>

जोपर्यंत भाजप महाराष्ट्रात फडण२० हटवून मुंडेसाहेबांसारखा जननेता किंवा मोदी-योगी सारखा आक्रमक हिंदुत्ववादी नेता पुढे आणत नाही तोपर्यंत नुकसानच नुकसान आहे.

भाजपचे काहीच नुकसान नाही हे पटत नाही फारेण्ड.
या खेळीत भाजप तारून गेली तर नुकसान कमी असेल , नाही तारली तर जास्त असेल.
यात इतर तिन्ही पक्ष उघडे पडलेत हे मान्य, पण स्वतः भाजपा सुद्धा तेवढीच, किंबहुना बनवु पहात असलेल्या आपल्या प्रतीमेच्या तुलनेत जास्तच उघडी पडली असे वाटते.

भरत - तेथे मतदारांशी थेट संबंध होता. ज्याला अनेक वर्षे चोर, भ्रष्टाचारी म्हणत होते त्यांनाच मते देण्याची वेळ आली तेव्हा फरक पडला. इथे तितका थेट संबंध नाही. अजित पवार काही भाजपमधे आलेले नाहीत. किंबहुना अजून राष्टवादीचे लोक पुन्हा २०१४ सारखेच करू शकतात. पक्षाच्या नेत्यांनी हे का केले हे प्रश्न अनेकांना पडलेत हे सोशल नेटवरच्या प्रतिक्रियांमधून दिसत आहे. पण हा मतदार सहजी दुसरीकडे जाणारा नाही. त्यात भाजप कडे सोशल नेटवर्क ची यंत्रणा जबरदस्त आहे. त्यातून या लोकांची समजूत काढने त्यांना सहज शक्य आहे.

सध्या एकूणच राजकारणात Anyone but X हा प्रकार खूप आला आहे. तो एक्स कोणीही असू शकतो. भाजप मतदारांच्या बाबतीत इथे शिवसेना आहे.

>>फडणवीस प्रत्येक वेळी एक नवीन खालची पातळी गाठत आहेत<<

तिकडे त्या धाग्यावर उत्तर न देता इकडे परत तीच कॅसेट लावलीयत म्हणून आता इथे परत विचारतो:

खालची पातळी?
काय म्हणे?
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला ती?
मग शिवसेना काय करत होती?
राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी पाठिंबा दिलाय; आता तो त्यांच्या पक्षाला विश्वासात घेऊन दिलाय का नाही त्याच्याशी फडणवीसांचा काय संबंध.... राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत प्रश्न आहे तो
आता तुम्ही रात्री अपरात्री प्रायव्हेट हॉटेलात मिटींगा घेतल्या तर चालतात आणि त्यांनी सकाळी शपथविधी केला तर काय प्रॉब्लेम?
तुमचा तुमच्या आमदारांवर एव्हढा विश्वास नाही? हॉटेलात कोंडून ठेवायची वेळ येते मग मतदारांनी काय त्या आमदारांवर विश्वास ठेवायचा?

असो!

आत्ताच टी वी वर ऐकलं. दोन हजार ते साडेतीन हजार कोटी चा एकूण आकडा आहे. हे धन असे आहे की ते दिल्याने आपले बळ वाढते आणि अधिक धन जोडण्याची संधीही.
जोडोनिया धन गुप्त व्यवहारे चाणाक्ष chaaNakya विचारे वेच करी.

भाजपचे काहीच नुकसान नाही>> बाकीचे केवळ प्रयत्न करीत असताना यांनी अंधारात चोरटा प्रणय केला तरी नुकसान नाही? आणि महिनाभर आधी आयारामांना घेतल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पापक्षालन तेच पाप पुन्हा करुन करणे म्हणजेच पार्टी विथ डिफ्रंस का? असो, असो Proud

यात इतर तिन्ही पक्ष उघडे पडलेत हे मान्य, पण स्वतः भाजपा सुद्धा तेवढीच, किंबहुना बनवु पहात असलेल्या आपल्या प्रतीमेच्या तुलनेत जास्तच उघडी पडली असे वाटते. >>> नक्कीच. पण निवडणुका खेळण्याच्या बाबतीत, सोशल नेटवर्क, पब्लिक सेण्टिमेण्ट वापरायच्या बाबतीत गेली ५-७ वर्षे भाजप ज्या लेव्हल ला आहे त्याच्या जवळपास सुद्धा इतर पक्ष नाहीत ***. किमान काँग्रेस, शिवसेना. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी स्ट्राँग आहे पण त्यांच्याकडेही इतकी सॉफिस्टिकेडेट सिस्टीम नसावी. ते ही मराठा जातीशी संबंधित, ब्रिगेड वगैरेला हाताशी धरून काड्या करत पण आता ते इतके प्रभावी राहिले नाही. फक्त कोल्हापूर मधे यावेळेस उपयोगी पडले असे म्हणता येइल.

*** हा माझा शोध नव्हे. राजदीप सरदेसाई पासून ते इतर अनेक विश्लेषक हेच म्हणत आहेत.

बाकी मुख्यमंत्री भाजपाचा व्हावा की शिवसेनेचा यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांचे इथले चेले हमरीतुमरीवर येतायत ते बघून मजा वाटतेय Wink

आणि महिनाभर आधी आयारामांना घेतल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पापक्षालन तेच पाप पुन्हा करुन करणे म्हणजेच पार्टी विथ डिफ्रंस का? >> तुम्ही पब्लिक इमेज आणि राजकीय नुकसान यात गल्लत करत आहात.

फारेण्ड, भाजपच्या हक्काच्या मतदाराने यंदा सोशल मीडियावरून नोटांचा प्रसार केला होता. मतदानाची घटलेली टक्केवारी आणि नोटांचा वाढलेलं प्रमाण बघा.

राष्ट्रवादीशी कुठल्याही परिस्थितीत युती नाही असं फडणवीस त्रिवार म्हणालेत.
२०१४ मध्ये राष्ट्रवादीने न मागता छुपा पाठिंबा दिला होता. आता तसं काहीही नाही. भाजपने अजित पवारांना कडेवर घेतलंय.

>>फडणवीस प्रत्येक वेळी एक नवीन खालची पातळी गाठत आहेत<< >>> चला, फडणवीस खूप वरच्या पातळीवर होते / आहेत हे मान्य केलेत ते बरे झाले. आणि ते वरच्या म्हणजे बाकी सगळे खालच्या पातळीवर होते हे आपोआपच मान्य होते.

मग आता खालच्या पातळीवरच्या कुणाला तरी बरोबर घ्यायचे म्हणजे वरच्यांनाच खाली यावं लागणार ना? कारण खालच्यांची वर जायची कुवतच नाही. Proud

आपल्या स्वार्थ मुळे राज्याचे हित डावलले
जात आहे ह्याची जाणीव .
राज्यातील कोणत्याच पक्षाला नाही हे पुरव्या सहित स्पष्ट झाले आहे.
त्या मुळे पक्षांची तळी किती मर्यादे पर्यंत उचलावी हे जनतेने ठरवावे.
पर्सनल मानापमान साठी राज्याला वेठीस ठरण्यात ह्या पक्षा ना लाज वाटतं नाही

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण ..
मुख्यमंत्री कोण होईल, अडीच की पाच वर्षे ? हे सारे खरे तर तितकेसे महत्वाचे नाही.
जास्त चिंताजनक आहे ती संस्थांची पडझड.
राज्यपालांनी जे वर्तन केले ते खचितच वाईट पायंडा पाडणारे आहे. मध्यरात्री केवळ लेखी पत्राच्या आधाराने शपथ देण्याइतकी आणीबाणी आलेली नव्हती.

{फडणवीस प्रत्येक वेळी एक नवीन खालची पातळी गाठत आहेत}
मी माझा मोड ऑन.
यात फडणवीस वरच्या पातळीला होते असं कुठे म्हटलंय.
ते आधीही खालच्या पातळीलाच होते. आता आणखी खाली गेले..

>>जास्त चिंताजनक आहे ती संस्थांची पडझड.<<
त्याला आता इलाज नाहि. पडझडीचा पाया खुप वर्षांपुर्विच रोवला गेलाय, आणि आता त्यात बदल (घटनादुरुस्तीने) जवळ-जवळ अशक्य. सुप्रिम कोर्टात तरी रामशास्त्री बघायला मिळतील अशी आशा करुया...

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्याशी तडजोड केल्याबद्दल भाजपवर होणारी टीका १००% रास्त आहे. पार्टी विथ अ डिफरन्स वगैरे भक्तांच्या कल्पना. राजकारणी लोक हे राजकारणात जे चालते त्या रेषेच्या थोडे इकडे किंवा थोडे तिकडे असतात इतकाच फरक.

पण अजित पवार भाजपला पाठिंबा देतायत म्हंटल्यावर जर सृष्टीची उलथापालथ होत असेल, तर इतकी वर्षे त्यांना पाठिंबा देणार्‍या शरद पवारांचे, रावा मधल्या बाकी नेत्यांचे काय? काल पर्यंत त्यांना पाठिंबा दिलेल्या काँग्रेसचे काय?

आणि केवळ शेतकर्‍यांबद्दलच्या अतीव करूणेमुळे व त्यांची कणव आल्याने जे तडजोडी करून शिवसेनेबरोबर सुद्धा जायला तयार झाले त्यांच्या आमदारांना भूल पडू नये म्हणून अनेक शेतकर्‍यांचे भले होईल इतका खर्च रोज होणार्‍या हॉटेल्स व राजवाड्यांमधे ठेवायला लागते. तो टोटल खर्च धरला तर किती शेतकर्‍यांच्या उपयोगी आला असता.

भाजपचा पारंपारिक मतदार नाराज झाला तरी काय लॉजिक लावून या लोकांबरोबर जाईल?

>>पण अजित पवार भाजपला पाठिंबा देतायत म्हंटल्यावर जर सृष्टीची उलथापालथ होत असेल,<<
यु आर मिसिंग द पॉइंट. राकाँ च्या पाठिंब्यासकट अजित पवार भाजपाला सामील झाले असते तर कोणालाहि बोलायला जागा रहाणार न्हवती. पण एखाद्या पाकिटमारा सारखी डिजगस्टिंग खेळी खेळुन डाव जिंकल्याचं सोंग आणलं जातंय, यावर आक्षेप आहे...

जनता स्वयं निर्णय घेण्याची क्षमता राखून आहे ह्या वर राजकीय पक्षांना,राजकीय पंडित ना विश्वास नाही हीच त्यांची सर्वात मोठी अंध श्रद्धा आहे .जनता सब जाणती है.
आता काँग्रेस नी नामानिराळे राहून कोणत्याच पक्षाला पाठिंबा देणार नाही.
तुम्ही सत्तेचा जुगार खेळ असे सांगितले असते तर .
धर्म etc विसरून जनता काँग्रेस chya पाठी राहिली असती .

दरोडा घालण्याआधीच वाटपाच्या बैठका घेणारे दरोडेखोर चालतात पण पाकिटमार नको.... असे आहे तर!
असू दे असू दे Rofl

Pages