फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप एकट्या भाजपने केलेत. >>

----- फडणविसांनी मदत कुणाची घ्यावी याच्याशी काही देणेघेणे नाही... त्यांनी मदत कोणाकडूनही घेतली तरी माझे, एका भक्ताचे, त्यांच्या कृतीसाठीचे समर्थन जय्यत तयार आहे. आता अजितदादा यांनी समर्थन दिले म्हणजे ते माझ्यासाठी पावन झालेत... उद्या थोरलेपवार साहेब समर्थन देणार असतील तर त्यांना पण डोक्यावर घेण्या घेण्यासाठीचे स्टेटमेंटस तयार आहेत..... तसेच स्टेटमेंटस शिवसेनेसाठी पण तयार केले आहेत.

भरत - अजित पवारांवर निव्वळ आरोप झाले आहेत... ते अजुन कोर्टात कुठे सिद्ध झाले आहेत ? तुम्ही अजित पवारांना त्यांचा गुन्हा सिद्ध होण्या अगोदर फाशी देत आहात...

राष्ट्रवादीच्या आमदारांना दोन टप्प्यात अवैध मतांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. २/३ लोक एकत्र राहू शकणार नाहीत अशा रितीने सुरूवातीला काही आमदारांना अपात्र ठरवून मतदानात भाग घेण्यापासून रोखले जाईल. बाकीच्यांसाठी व्हीप काढला जाईल. त्यातून जे विरोधात मत देतील त्यातल्या काही आमदारांची मतं अवैध ठरवली जातील जेणेकरून २/३ हा आकडा गाठला जाणार नाही.

अगदी सहा वाजता शपथविधी उरकण्याची घाई म्हणजे कालचा गोंधळ बरा होता असे म्हणावे लागेल.>> शपथविधी रात्री झाला, पहाटेच्या अन्धारात झाला अशी वाट्टेल ती विधान का करतायत सगळेच, सकाली ८ वाजता झालाय शपथविधी!

सगळ्याच पक्षानी आपली सत्तेची भुक जनतेपुढे उघड करुन ठेवलीये, जनमताचा घोर अपमान करुन वर जनतेसाठी याव आणी त्याव गप्पा मारायला सगळे मोकळे वर शिवरायान्चे दाखले देताना याना शरम कशी वाटत नाही देव जाणे!

जनतेने भाजपाला जास्त सीटा दिल्या, याचा अर्थ त्यांनीच सत्ता करावी असे काही नाही,
145 कुणीही मिळून जमवावे

<< अगदी सहा वाजता शपथविधी उरकण्याची घाई म्हणजे कालचा गोंधळ बरा होता असे म्हणावे लागेल.>> शपथविधी रात्री झाला, पहाटेच्या अन्धारात झाला अशी वाट्टेल ती विधान का करतायत सगळेच, सकाली ८ वाजता झालाय शपथविधी! >.

------- राज्यात असलेली राष्ट्रपती राजवट हटवणे, आमदारांचे समर्थनाचे कागद पत्र मिळ णे, त्याची तपासाणी, पडताळणी या सर्व प्रक्रिया अगदी जलद वेगाने रात्री मधेच झाल्या. साधे बँकेतून १००० रुपये काढतांना सही पडताळली जाते, येथे ५५ आमदारांचा पाठिंबा आहे हे कळण्या साठी काही तर वेळ लागायला हवा.

शपथविधी उरकण्याची अतोनात घाई कशासाठी होती? जर ४० दिवस थांबले होते तर अजून १२ तास थांबले असते... पुढचा सर्वोच्च न्यायालयाचा हेलपाटा आणि वेळ तर वाचला असता.

मी येणार.. मी येणार... आणि आले दादांना सोबत घेऊनच... काय दमदार प्रवेश. ऑर्थर रोड तुरुंगांत चक्की पिसायला पाठव ण्याची भाषा करणार्‍याला आता सोबत गुण्यागोविंदाने काम करावे. किती मजबुरी....

<<जनतेने भाजपाला जास्त सीटा दिल्या, याचा अर्थ त्यांनीच सत्ता करावी असे काही नाही,
145 कुणीही मिळून जमवावे >>
-------- १४५ जमायलाच हवेत का ?
२० आमदार अपात्र ठरवले गेले.... आणि ३० गैरहजर राहिलेत तरी आकडा १४५ असेल का ?

राज्यपाल पक्षपाती आहेत आणि त्याचा पुरेपुर फायदा भाजपला होत आहे... त्यांचे कृत्य हे वरकरणी बेकायदेशिर दिसत नसले तरी नीतिशास्त्रात (ethics) त्रात बसत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात घिसाड- घाईतला शपथविधी सोहळा असेच वर्णन करावे लागेल.

जाऊद्या उदयभाऊ... पत्ते शरद पवारांच्या हातात आहेत म्हणताय.. मग कशाला एव्हढा त्रास करून घेताय. काका पवार तुमच्या मनासारखं करतील...

शिवसेना भाजप चे सरकार आला असता तर अजित पवार कडून सिंचन चे 70000 कोटी आणि राज्य सहकारी चे 25000 कोटी काढायची संधी हुकली हे फार वाईट झाला. विनोद सोडला तर सध्या राष्ट्रवादी चे आमदार अजित पवार बरोबर जाण्यात स्वार्थ आहे की राष्ट्रवादी मध्ये राहण्यात ह्याचा काय निर्णय घेतात यावरून ठरेल सरकार पडणार की नाही. सध्या तरी 10 वर्षांचा विचार केला तर भाजप बराबर जाणे फायद्याचे आहे असा त्यांना वाटू शकते. स्थिर सरकार, भ्रष्टाचाराच्या केस मागे , सत्तेत 5 वर्षे राहायची संधी असे बरेच फायदे आहेत. बाकी जनतेची स्मरणशक्ती कमी असल्याने पुढील निवडणुकी पर्यंत परिस्थिती बदलली असेल.

<< बाकी जनतेची स्मरणशक्ती कमी असल्याने पुढील निवडणुकी पर्यंत परिस्थिती बदलली असेल. >>

------ रक्षामंत्री / गृहमंत्री किंवा त्यापेक्षाही " मोट्ठी " राष्ट्रिय स्तरावर जबाबदारी असे आमिष केंद्रात मिळत असेल तर काकाश्री नाही म्हणतील का? अगदी काही दिवसांपुर्वीच मोदी यांना भेटले होते.
पुढील निवडणूकीत बालकोट#२ तारेल... आणि काशी मथुरेचा प्रश्न आहेच.

एकदा म्हणताय पत्ते शरद पवारांच्या हातात आहेत लगेच खाली म्हणताय ते आमिषाला बळी पडतील म्हणजे पत्ते आमिष दाखवणाऱ्याच्या हातात आहेत.... काय म्हणायचय काय?
का भाजपाला विरोध करण्याच्या नादात नेहमीप्रमाणे गोंधळ झालाय तुमचा?
Lol

आता पवार ( मोठी पाती ) सारखे का गरबा / झिम्मा खेळतायत ते काही कळत नाही. का नुसताच संशयाचा धूर सोडायचाय ते ही कळत नाही. झोका घेता घेता कधी उद्धव कडे जातात तर कधी मोदींकडे.

<< का नुसताच संशयाचा धूर सोडायचाय ते ही कळत नाही. झोका घेता घेता कधी उद्धव कडे जातात तर कधी मोदींकडे. >>
------- सहमत. मस्त झोका घेत आहेत... आणि झुलवत आहे. अगदी मोक्याच्या जागेवर आहेत. त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि त्यांनी कुठलाही पर्याय स्विकारला तरी अचंबित व्हायला नको...

महाराष्ट्राचे भले करण्याची त्यांना शेवटची संधी आहे. Happy

<< का भाजपाला विरोध करण्याच्या नादात नेहमीप्रमाणे गोंधळ झालाय तुमचा? >>
---- गोंधळ माझा उडालेला नाही... होय पण काकाश्री यांचे मनोमन कौतुक आहे, त्यांचे राजकारण आवडत नाही... ४१ वर्षांपुर्वीच्या पाठित खंजिराच्या घटनेचा उल्लेख किमान २-३ वेळा केला आहे, आज नाही २०१९ च्या आधी)

ऑर्थर रोड तुरुंगात अजित पवारांची रवानगी करणारे फडणाविस यांना आता त्याच अजित पवारांचा हात हातात घेत, हसतमुखाने पाच वर्षे काढावी लागतील... यामुळे भक्त सांप्रदायाची झालेली अडचण आणि गोंधळ समजतो.... माझी सहानुभूती आहे.

फडणविसांसाठी चक्की पिसणे = उप मुख्यमंत्री पदी विराजमान करणे असेही असेल... ते आज जनतेला कळाले.

असंगाशी संग केला म्हणून काळजी करण्याचे कारण नाही... जनतेची स्मृती दिर्घकाळ रहात नाही. आणि भाजपाकडे बालाकोट#२ सारख्या देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या एकसे बढकर एक अशा आयडिया आहेत.

मी येणार.... मी येणार... मी येणार.... मी आलो अजितदादांच्या मदतीने.

भाजपाकडे बालाकोट#२ सारख्या देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या एकसे बढकर एक अशा आयडिया आहेत.

नवीन Submitted by उदय on 25 November, 2019 - 10:37 >>

एव्हढं छातीठोकपणे दोनदोनदा सांगताय म्हणजे, पुलवामा सारख्या दहशत्वादी हल्ल्यात, किंवा नक्षलवादी हल्ल्यांमध्ये तुमच्यासारख्या लोकांनी फंडींग नक्कीच केले असावे असा मला दाट संशय येउ लागलाय... शेवटी परदेशात बसुन सुरक्षित राहुन या सर्व गोष्टींना तुम्ही सहज मदत करु शकता.

राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारस शपथ दिली. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर ‘अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र आता विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध कऱण्यासाठी पुरेसे संख्याबळ पाठीशी असण्यासंदर्भात भाजपालाच साशंकता असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच भाजपाने हलचाली सुरु केल्या आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी अपक्ष आमदारांचा पाठिंबा भाजपाला असणे अत्यावश्यक असल्याने भाजपाने या समर्थक आमदारांना शनिवारीच गुजरात हलवले आहे.

चार दिन तो गुजारो गुजरात मे

न्यायालयात सेना, राकाँ चे वकील म्हणताहेत फ्लोर टेस्ट लगेच घ्या.
सॉकिसिटर जनरल आणि भाजपचे वकील कोर्टाने फ्लोर टेस्ट बद्दल आदेश देण्याला विरोध करताहेत.

अजित पवारांनी दिलेलं पत्र म्हणजे ५४ आमदारांच्या सह्यांची यादी आहे. त्यात भाजपला पाठिंबा असं कुठेही म्हटलेलं नाही. - सेनेचे वकील.

IMG-20191125-WA0009.jpg

मुकुल रोहटगी (भाजपचे वकील) म्हणतात एका याचिकेसाठी यांच्याबाजूने तीन तीन वकील यह बहुत नाइन्साफी है. Lol

अजित पवारना विधि. पक्षनेतापदावरून काढल्याच्या राज्यपालांना दिलेल्या पत्रावर १२ आ मदारांच्या सह्या नाहीत.

अजित पवार ला ३६ तरी आमदार आणावे लागतील. त्याकरता भाजप मंत्रीपदे,महामंडळे, संस्थाने, जिल्हा परिषदा असे सोडून द्यायला तयार होईल. अर्थात भाजप चे आमदार याला कितपत तयार होतील हे पण पाहावे लागेल. त्यानंतर शेवटी शेवटी युती तोडून पुन्हा इडी तर्फे केस चा निकाल लावून अजित पवार भ्रष्ट आहे असे आरोप करता येतील.

दुसऱ्या बाजूला शरद पवार सगळ्या आमदारांना महिनाभरापूर्वी त्याच्यामुळे निवडून आलेत याची आठवण करून देत असेल. भाजप च्या पुढील प्लॅन ची भीती घालण्यात कितपत यशस्वी होणार यावर बराच काही ठरेल. भाजप आणि अजित पवार मध्ये सत्ता दोन भागात तर शिवसेना, शरद पवार आणि काँग्रेस यात सत्ता ३ भागात गेल्याने फायद्याची पदे कमी मिळणार आहेत. तेंव्हा हि एक तारेवरची कसरत ठरणार आहे.

या सगळ्यात काय होईल हे पाहणे मजेशीर असेल.

मुकुल रोहटगी - कोर्टाला विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करायचा आणि फ्लोर टेस्टचा आदेश द्यायचा अधिकार नाही.

महाविकास आघाडीने राज्यपालांना १६२ आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं आहे.
म्हणजे भाजप फ्लोअर टेस्टला बहुमत सिद्ध करू शकले नाही तर विधानसभा बरखास्त करता येणार नाही, महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली जाईल.

महाविकास आघाडीने राज्यपालांना १६२ आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं आहे.>>

पण राज्यपाल तर फोटोत कुठेही दिसले नाहीत.

आज शरद पवारांनी कराडला पत्रकार परिषद घेऊन "आम्ही शिवसेनेकडे अडीच वर्ष्यासाठी मुख्यमंत्री पद मागितले होते, मात्र ते द्यायला शिवसेनेनी नकार दिल्यामुळे अजीत पवारांनी पक्षातून बंड केले" असे विधान केले आहे. या आधी ह्या मागणी बद्दल पवारांनी एक चकार शब्द काढला नव्हता .

कालपर्यंत 'अजीत पवारांनी बंड का केले, हे मला माहित नाही' असे म्हणणारे शरद पवार आज वरिल विधान करत आहेत. मला वाटते सेनेच्या वाघाचा, पोपट करायचा चंगच बांधलेला दिसतोय ह्या काका-पुतण्यांनी.

Pages