फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>राष्ट्रवादीतला एक गट फोडून भाजपा सरकार स्थापन करेल हा अंदाज मी इथेच साधारण पंधरा एक दिवसापूर्वी व्यक्त केला होता तेंव्हा बहुतेकांनी ही शक्यता फेटाळली होती.<<
सापडले Happy

20191123_162052.png20191123_162001.png

नक्की काय सुरु आहे?

मध्येच बातमी देत आहेत, की केवळ १० (की त्याहूनही कमी) आमदार अजित पवार सोबत आहेत.

खरचं की काय?

Atishay uttam batami.
Serva sambandhitanche abhinandan.
Maha la punha AJIT PAWAR Ji DCM mhanun laabhale the khupach uttam.
Jay Maharashtra!

>>Atishay uttam batami.<<

उपरोधिक लिहणे चांगले असते पण शिवसेनेबरोबरच्या आघाडीत पण अजित पवारच उपमुख्यमंत्री झाले असते. तेंव्हा मात्र तुम्हा लोकांचा वेगळा सूर लागला असता Proud

फडणवीस यांची फसवणीस म्हणून कामगिरी:

१. बहुमत नसतानाही घाईघाईने शपथविधी (२०१४)
२. लोकभावना तीव्र विरोधात असतानाही पोलिस संरक्षणात गडबडीने महाराष्ट्र भूषण
३. मराठा मोर्चा/शेतकरी यांची बोळवण
४. कोल्हापूर सांगली महापुर संकटात सरकारकडून शून्य नियोजन (जी मदत केली ती स्वयंसेवी संघटनानी)
५. रात्रीच्या वेळी गडबडीने राष्ट्रपती राजवट
६. रात्रीच्या वेळी गडबडीने सरकार स्थापन

अजून बरेच काही सांगता येईल. हे फक्त ठळक मुद्दे.

>> हे फक्त ठळक मुद्दे.<<

तरीही जनमताचा कौल त्यांच्याच बाजुला आणि आता तर शपथविधी पण झाला त्यांचा... का झाले असावे बरे असे?

>> तरीही जनमताचा कौल त्यांच्याच बाजुला आणि आता तर शपथविधी पण झाला त्यांचा... का झाले असावे बरे असे? <<

भाजपच्या बाजूने पूर्ण बहुमत कधीच मिळालेले नाही. जिकडे तिकडे सरकारे आली आहेत ती ठिगळे बांधून आली आहेत. शपथविधी फसवणूक करून झाला आहे. प्रामाणिकपणे नाही. म्हणून तर रात्री बेरात्री चोरट्यासारखे गोष्टी कराव्या लागल्या. खोटारडेपणा व भामटेगिरी मागच्या पानावरून पुढे सुरु आहे. आश्चर्य वाटत नाही.

गेली पाच वर्षे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार होते. यावेळी भाजपा युती म्हणूनच निवडणूकीला सामोरा गेला आणि त्याच युतीला पूर्ण बहुमत आहे
शपथविधी सकाळी झालेला आहे (अर्थात साखरझोपेत असलेल्यांना ती रात्र वाटू शकते)

<उपरोधिक लिहणे चांगले असते पण शिवसेनेबरोबरच्या आघाडीत पण अजित पवारच उपमुख्यमंत्री झाले असते. तेंव्हा मात्र तुम्हा लोकांचा वेगळा सूर लागला असता >

अजित पवारांबद्दल फडणवीस काय काय बोललेत ते लक्षात घेऊन अजित पवार फडणवीसांचे उपमुख्यमंत्री होणे ही अतिशय चांगली बातमी आहे.
ते काय बोललेत ते तुम्हांला माहीत आहेच. सोयिस्करपणे वि स्मरण झाले असेल, तर लिंक्स दिल्या आहेतच.

राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने भाजपचा मुख्यमंत्री असं चित्र दिसायला लागलंय.

Submitted by पुरोगामी on 20 November, 2019 - 11:32

हा माझा खालील धाग्यावरील २० नोव्हेंबरचा अंदाज

https://www.maayboli.com/node/72331?page=2

Centre invoked The Government of India (Transaction of Business) Rules 12 to bypass need of Union Cabinet's approval for revocation of President's rule in #Maharashtra. In the Rule 12 PM has special powers. @PTI_News

भयंकर आणीबाणीची परिस्थिती होती की हो.

ह्यांना फ्लोअर वर पाडून वाजपेयीं करावा

Submitted by BLACKCAT on 23 November, 2019 - 17:16 >>>

ती काय १२५८ ची बगदाद मधली खिलाफत आहे फ्लोर वर पाडायला?

अजितदादांनी इडी चौकशी वेळी अचानक राजीनामा दिला तेव्हाही काकांना नंतरच कळले. मग अशा उमेदवारास गटनेता निवडणे हे चुकलेच.
कांग्रेसला धाकधुक होतीच. ती खरी ठरली.
बाकी रात्री बाराला राज्यपाल बोलावतील यावर विश्वास ठेवून, काकांना न सांगता कसे काय गेले?

महाराष्ट्राचे राज्यपाल दिल्लीतील राज्यपालांच्या कॉन्फरन्स ला गैरहजर राहणार अशी काल बातमी होती, कोणालाच तेव्हा शंका आली नव्हती.

अभिनंदन. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला हवे होते मलाही पण सिंचन घोटाळ्यांचे आरोप ज्यांच्यावर केले त्यांच्यासोबत नाही.

मोदी पवार भेट झाली तेव्हा काहीतरी ठरलं असणार, हे सर्व इतकं साधसुधे नाही. वाईट शिवसेनेचे वाटतं, पाच वर्ष सरकारमध्ये राहून त्यांनी शक्यता अशी होऊ शकते हा विचार केला नाही का. चांगलं उपमुख्यमंत्रीपद मिळत होतं, मंत्री पदे अजून मिळाली असती. आता हाती धुपाटणे आलं. त्यांनी पहिल्या दिवसापासून कुऱ्हाडीवर पाय ठेवला हे सगळ्यांना दिसत होतं. ते मात्र हवेत होते.

सरकार पडणार नाही, उलट आता बाकीच्या पक्षातले बरेच फुटतील, एक मोठा गट फुटेल रा कॉंग्रेसमधलाच ऐनवेळी.

संसद कामकाज माहितगार कलसे यांनी मुलाखतीत सांगितले की अजितना गटनेतेपदावरून काढले तरी संसद सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांचा आदेश फिरण्याची शक्यता नाही. संसद आणि न्यायालय दोन्ही एपेक्स संस्था आहेत.
३० नोव्हेंबरला कुणी कुठे मत दिले कसं कळणार? फक्त आकडा कळेल ना?

शिवसेनेबरोबर जाऊन राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळणार अशा बातम्या होत्या. तसे झाले असते तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. परंतु आता त्यांनी ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद मान्य केले आहे.

यापुढे फडणवीसांनी अमक्या तमक्याला तुरुंगात पाठवू, चक्की पिसिंग पिसिंग करवू असं म्हटलं की तो नेता खुश होणार.

जे काही पडद्याआड तीन पक्षांमध्ये घडले ते अजित पवार उघड करतीलच.

इतक्या वेळा तोंडावर पडून सुद्धा ना जनता सुधारत ना माध्यम
अंदाज व्यक्त करण्याची खोड काही जात नाही

विनाशकाले विपरीत बुद्धी - बाकि काहि नाहि. अजित पवार इज ऑन सुसायडल पाथ, अँड हि विल टेक डाउन बीजेपी विथ हिम...

पैशाचं जसं सोंग आणता येत नाहि तशीच परिस्थिती बहुमत सिद्ध करताना उद्भवणार आहे याची क्ल्पना भाजपाच्या चाणक्यांना नाहि? हे चाणक्य आहेत कि शेख चिल्ली?..

Pages