दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.

बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.

गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.

प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.

(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
1दिगंतराचे प्रवासी.jpg

-----------हरिहर (शाली)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Grey Wagtail (करडा धोबी)
Pune Outskirts
14 Nov 2019 (7:30 am)

पक्षीनिरीक्षण हा मनाला आत्यंतिक आनंद देणारा छंद आहे, मध्यंतरीच्या काळात हाती कॅमेरे आल्यापासून निरीक्षण जरा मागेच पडले आहे. मला कॅमेरा न घेता परत एकदा चालू करायचं आहे पक्षीनिरीक्षण.

पक्षी कुठे बघितला, आसमंत कसा होता, दिवसाच्या कोणत्या प्रहरी बघीतला, ऋतू कोणता होता, पक्ष्याच्या डोक्याचा आणि धडाचा /शरीराचा आकार (हे दोन्ही एकत्रित रित्या फारच कमी पक्ष्यांचे एक्सारखे असते), त्याचा रंग, हालचाल करण्याची पद्धत, आवाज, अशा नोंदी करण्याकरता WHICH IS IT का WHO IS IT असंल काही तरी सुत्रच आहे (मला आठवत नाहीये कोणाला आठवले तर पाठवा)
W म्हणजे व्हेअर
H म्हणजे हॅबिटॅट वगैरे वगैरे

धन्यवाद हर्पेन!
मी सध्या (माहित असेल तर) नाव, (ओळखता आले तर) नर, मादी की पिल्लू, काय करताना दिसला, कोणत्या झाडावर दिसला, आकार, रंग, तारीख, वेळ, (शब्दांमधे) आवाज वगैरे गोष्टीं नोंदऊन ठेवतो आहे. काही गोष्टी समजत नाहीत पण कुठेतरी वाचनात येतील किंवा पाहूनच समजतील. उदा. मी राखी वटवट्याला एका जागेवर बसून अतिशय जलद पंख हलवताना पाहीले आहे. हा प्रकार तो साधारन एक दिड मिनिटांपर्यंत करतो. हा प्रकार मी वेगवेगळ्या ठिकानी सकाळी ११-११:३० या दरम्यान चार पाच वेळा पाहीला. त्याचे कारण शोधूनही सापडले नाही. दोन तिन वेळा वेडा राघूला घशातून कसलीतरी मोठी गोळी अर्धवट बाहेर काढताना पाहीले आहे. ती त्याची जीभ होती की दुसरे काही हे समजले नाही. पण नोंद करतो आहे.

White Throated Kingfisher (पांढऱ्या कंठाचा खंड्या)
Pune outskirts
14 Nov 19 (7:30 am)

पक्षी निरिक्षण हे शास्त्रीय संगीताप्रमाणे आहे; संगीतातल्या रागा प्रमाणेच पक्ष्याचे नावही माहीत नसले तरी त्यामुळे आस्वाद घेताना काहीच अडचण येत नाही.

नोंदी करत रहा, इथे लिहित रहा
वाचायला आवडेल

हर्पेन आपल्या मताशी पूर्णपणे सहमत
शालीदा , हि सगळी माहिती इथे संकलित करता येईल. नाहीतर एक वेगळा धागा काढून त्यावर संकलित करता येईल म्हणजे शोधण्यास बरे पडेल.

नोंदी करत रहा, इथे लिहित रहा>>>>> हो. नक्कीच.

ऋतुराज, वेगळा धागा म्हणजे समजलं नाही. हाच वेगळा धागा काढला आहे ही सर्व माहिती एकत्र करण्यासाठी.

बरोबर शालीदा .ते मी निग आणि इथे दोन्हीकडे लिहीत होतो आणि मला वाटलं मी निग वर लिहितोय. गफलत झाली

Purple rumped Sunbird ♀& ♂
Pune
14 Nov 2019 (8:00 am)

नर व मादी एकत्र फिरताना दिसले.


यहापे आपून सिर्फ रिड ओन्ली मोड मे रहेगा ऐसाईच लगता हय. Proud एक तर एव्हढे वेगवेगले पक्षी इथे मुंबईत दिसणार नाहीत. दिसले तरी मी फोटो काढायला जाणार एव्ह्ढ्यात ते उडणार. सो इथे मी बघ्याच्या भूमिकेत. शाली, तुमच्या चिकाटीला सलाम. बाकी ते पर्पल सनबर्ड्स घरासमोरच्या झाडावर दिसतात. दोन वेगवेगळ्या जातीचे सनबर्ड्स आहेत असं वाटत होतं आजवर. मिस्टर मिसेस आहेत हे आज कळलं. धन्यवाद!!

स्वप्ना_राज, एवढे वेगळे पक्षी मुंबईत दिसणार नाहीत हा तुझा गैरसमज आहे. Happy हे वर टाकलेले पक्षी खूप बेसिक आहेत तसं म्हटलं तर. मी पार्ल्यात राहते. पार्ल्यातच इतकी व्हरायटी दिसते अगं. बोरिवली नॅशनल पार्क, भांडूप पंपिंग स्टेशन इथेही खूप पक्षी दिसतात.

पार्ल्यात कॉपरस्मिथ बार्बेट (तांबट), मॅगपाय रॉबिन (दयाळ), कोकिळ (नर-मादी), टेलरबर्ड (शिंपी), शिक्रा, स्केली ब्रेस्टेड मुनिया (ठिपक्यांची मनोली), अनेक फ्लायकॅचर्स, इंडियन पॅराडाईस फ्लायकॅचर (नर-मादी), हॉर्नबिल (धनेश) वगैरे दिसतात. फक्त ते दिसण्यासाठी ती नजर, थोडाफार अभ्यास, वेळ हवा. कारण पक्षीनिरीक्षणासाठी खूप पेशन्स लागतो.

स्वप्ना_राज, एवढे वेगळे पक्षी मुंबईत दिसणार नाहीत हा तुझा गैरसमज आहे. >>> +१ ती नजर कमवायला लागते ह्याला प्रचंड अनुमोदन

नजर कमवायला लागते हे खरे आहे पण मुळात एकदा इच्छा निर्माण झाले की पक्षी दिसायला सुरवात होते. तिन महिन्यापुर्वीपर्यंत मी फुलांचे फोटो काढत होतो तेंव्हा हे वरील पक्षी मला दिसत नव्हते. बर्ड वॉचिंग सुरु केल्यावर हे सगळे अचानक कसे आले समोर? तर ते होतेच फक्त माझे यांच्याकडे कधी लक्षच गेले नव्हते. आता ज्यांचे नावही कधी ऐकले नव्हते असे पक्षी घराच्या आजुबाजूला दिसायला लागले आहेत. स्ट्रॉबेरी फिंच सारखा कुणी लालभडक पक्षी असतो हे मला माहितही नव्हते, तिच फिंच आता नेहमी दिसायला लागली आहे. कुणीतरी म्हटले आहे की पक्षी नाही अशी जागाच नाही फक्त आपण पहायला हवे.

मुनिया, सिल्व्हरबिल, बुलबूल, सुगरण या सारख्या पक्ष्यांनी आता बऱ्याच सवयी बदलल्या आहेत. मानवी वस्तीमध्ये हे पक्षी आता सहज घरटे करताना दिसतात. जंगल मैनासारखे पक्षीही अगदी आरामात सोसायट्यांमधे दिसायला लागले आहेत.

Blue Rock thrush ♂(निळा कस्तूर)
Pune
15 Nov 2019 (9:00 am)

हा निळा कस्तूर आठ दिवसांपुर्वी सोसायटीच्या एका बाल्कनीत दिसला. त्यानंतर तो रोजच दिसायला लागला. नंतर नंतर त्याचा रंग बदलला आहे असे मला वाटले. कदाचीत हा plumage मधून जात असावा असे वाटले. पण आज सकाळी दोन कस्तूर दिसले आणि समजले तो रंग बदलत नसून अगोदर दिसलेली फिमेल होती व नंतर दिसलेला मेल होता. फिमेल गडद तपकीरी व अंगावर खवले असलेली आहे. मेल किंचीत निळसर आहे. हा निळा रंग अजून गडद होईल असा अंदाज आहे. हा नेहमी सहावा मजला रेफ्युज एरीया म्हणून मोकळा आहे तेथे बसलेला असतो.

यहापे आपून सिर्फ रिड ओन्ली मोड मे रहेगा ऐसाईच लगता हय दिसले तरी मी फोटो काढायला जाणार एव्ह्ढ्यात ते उडणार. सो इथे मी बघ्याच्या भूमिकेत. शाली, तुमच्या चिकाटीला सलाम.
स्वप्नाच्या ह्या वाक्यांना मम.. +11111

यहापे आपून सिर्फ रिड ओन्ली मोड मे रहेगा ऐसाईच लगता हय दिसले तरी मी फोटो काढायला जाणार एव्ह्ढ्यात ते उडणार. सो इथे मी बघ्याच्या भूमिकेत. शाली, तुमच्या चिकाटीला सलाम.

स्वप्नाच्या ह्या वाक्यांना +१

आज वेड्या राघूंनी अगदी शाळा भरवली होती. किमान साठ ते सत्तर असावेत. या अगोदर इतक्या संख्येने यांना एकत्र पाहिले नाही.
15 Nov (5:45 pm)

अप्रतिम प्र. चि.
तुमच्या चिकाटीला माझाही सलाम.
Google Account असेल तर Google drive किंवा hotmail account असेल तर one drive आहे की . Portable Hard Disk ही चालेल.

मला नेहमी दिसणारा रॉबिन आजही दिसला. पण आज त्याची जरा वेगळीच लगबग सुरु असल्याचे स्पष्ट जाणवले. मी त्याला आज प्रथमच अंघोळ करताना पाहीले. नंतर तो खालील भिंतीवर नेहमीपेक्षा जास्त वेळ पंख व पिसे साफ करत बसला. साफसफाई मनासारखी झाल्यावर स्टेजवर एंट्री घ्यावी तसे झुडपाच्या सगळ्यात उंच टोकावर बसुन त्याने इतक्या सुरेख पोझ द्यायला सुरवात केली की बस्. पंख साफ केल्यावर व त्याने वेगवेगळ्या कोनात पोझ द्यायला लागल्यावर तो एकदम सुंदर व चमकदार दिसायला लागला. काही सेकंदातच एक फिमेल तेथे आली व त्याच्या भोवती बागडायला लागली. आता याचा अर्थ मी लावला तोच आहे का मला माहित नाही पण मला वाटते रॉबिनने व्यवस्थित प्रसाधन करुन मग प्रियाराधनाला सुरवात केली. नेहमी तो जसा दिसायचा त्या पेक्षा तो प्रचंड सुंदर दिसायला लागला. या बदलासाठी फक्त काही मिनिटे लागली. तो अचानक चमकदार कसा दिसायला लागला तेही मला समजले नाही. काही वेळ त्या काडीच्या रँपवर पोझेस देऊन झाल्यावर तो व फिमेल एकत्र उडून गेले. भारी वाटले हे सर्व पाहून.
Indian Robin (Male)
Pune
16 Nov 2019 (8:10 am)
पंख साफ करताना रॉबिन

.

नट्टापट्टा झाल्यावर स्टेजवर एन्ट्री. हा वर दिसणाराच रॉबिन आहे. फक्त एक मिनिटात हे रुप होते त्याचे.

मी जागा बदलली नाही. तो स्वतःभोवती फिरुन शरीराचे सर्व रंग ठळकपणे दाखवत होता.

शेपटी एखादा झेंडा मिरवावा तशी एकदम उभी होती.

तोंडाने गानेही सुरु होते.

त्याचा हा नाच दिड मिनिटापर्यंत सुरु होता. तेवढ्या वेळात दोन फिमेल तेथे हजर झाल्या.

तेथेच बाजूच्या कंपाऊंडवर तपकीरी पाठीची गांधारी दिसली. तिचे नेहमीचेच काम सुरु होते. शिकारीवर लक्ष. लाँग टेल श्राईकपेक्षा हा जरा जास्त लाजरा असावा किंवा आमच्या सोसायटीतल्या गांधारी मला ओळखतात त्यामुळे घाबरत नसाव्यात.

Bay-backed Shrike
Pune
16 Nov 2019 (8:30 am)

कसले भारी फोटो आलेत...मस्त मस्त मस्त.... मला एका पक्ष्याची माहिती हवी आहे....माझ्या बाल्कनीत गोकर्ण च्या वेलीवर घरटे केले आहे याने.... चिमनीपेक्षा लहान आहे , छोटी चोच, राखी तपकिरी रंगाचा आहे. आवाज खूप मधुर आहे...कोणी सांगू शकेल का कोणता आहे?

चंडोलची जोडी सोसायटीच्या मागे असलेल्या टेकडीवर फिरताना दिसली. गवताळ भागात जमिनिवर गवताच्या बीया टिपत होते. या अगोदर सासवडला पाहीले होते. तेंव्हाही जोडीच होती. हा जमिनीवर वावरणारा पक्षी आहे. आकार चिमणीएवढा किंवा किंचीत लहान.

Ashy-crowned Sparrow (डोंबारी, चंडोल, माळचिमणी, भुरुळका चिमणी)
Pune outskirts
16 Nov 2019 (8:30 am)

Male

Female

याची ओळख पटली नाही. झाडांच्या उंच शेंड्यावर बसत होता. हा कुठलातरी bunting आहे हे नक्की. कोणता ते समजले की येथे नाव लिहिल.

फोटो घेणं अवघड आहे ..चपळ आहे हा पक्षी खूपच...पटपट इकडेतिकडे उडतो आणि पळून जातो... काल उलटा लटकला होता बाल्कनी मधल्या रॉड वरती

Pages