दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.

बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.

गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.

प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.

(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
1दिगंतराचे प्रवासी.jpg

-----------हरिहर (शाली)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जांभळी पाणकोंबडी
वावे यांनी काढलेले फोटो पाहिले होते पण मला ही पाणकोंबडी दिसली नव्हती. एकदा ओझरते दर्शन झाले होते येरवड्याला. आज शिक्रापुरजवळच्या एका लहान तळ्यात ही बाय दिसली. जोडी होती पण वेगवेगळ्या अन्न शोधत होत्या.
दुर होत्या पण व्यवस्थित पहाता आल्या. यांच्या सोबत ब्लॅक हेडेड आयबिस, स्टिल्ट, लॅपविंग, सॅंडपायपर, हेरॉन, वॅगटेल होते. एक ग्लॉसी आयबीसही दिसली पंख साफ करताना. ही पाणकोंबडी जसजशी फिरत होती तसे शेकाटे तिला जागा करुन देत होते. या पाणकोंबडीच्या आणि कोकारीच्या (water hen) पायात खुपच साम्य आहे.

Western Swamphen (Porphyrio porphyrio)
Pune (Wadi)
7 Dec (12:30 pm)

.

काळ्या डोक्याची शराटी.
या शराटीला पहायची खुप इच्छा होती पण दिसत नव्हती. पाषाण लेक, सलिम अली अभयारण्य, कवडीपाट या सर्व ठिकाणी ही आयबीस या दोन महिन्यात दिसली नव्हती. Red-naped व Glossy खुपदा दिसल्या. आज मात्र एकदम पाच सहा काळ्या डोक्याच्या शराटी दिसल्या. पण माझी चाहूल लागताच उडून दुर गेल्या. उद्या पुन्हा जवळून फोटो मिळतोय का पहावे लागेल. दुर असल्यामुळे फोटोही मिळत नाही व त्यांच्या हालचाली व्यवस्थित पहाता येत नाहीत. काय खात आहेत, कसे खात आहेत वगैरे काही समजत नाही. आज दुरून का होईना, दिसल्या हेच खुप झाले. आता दिसत रहातील.

Black-headed ibis, Oriental white ibis (Threskiornis melanocephalus)
Pune outskirts
7 Dec (12:30 pm)

पारवा
या पक्षाने मला जितका त्रास दिलाय तेवढा मानसांनीही दिला नाही. म्हणून मी याचे एक दोन फोटो काढले असतील कधी तरी तेवढेच आहेत. पुन्हा काढले नाही. यांचा रोमान्स, मग अंडी घालने, पिल्ले, त्या दोन पिल्लांपैकी एकाने दुसऱ्याला मारने हे फार जवळून पाहिलय. एकदा नाही, अनेकदा. एक पिल्लू तर मोठे झाले तरी जाईना. नंतर एक जोडीदार घेऊन आले व गुटर गू सुरू झाले. म्हणजे स्थाईकच झाले चक्क. पक्षी असं करत नाही शक्यतो. पण हाकालपट्टी नाहीच करू शकलो.
आज एक पारवा पाहीला. जोडी होती. मानेवरचा हिरवा रंग तसाच होता पण पंखांवर काळे पट्टे नव्हते. रंगही काळा होता, करडा नाही. हा वेगळा आहे की असं असू शकतं? काही समजेना. फोटो काढले पण तो काळा रंग काही फोटोत येईना. वेगळी जात असावी का? की काही जेनेटीकल प्रॉब्लेम? मग जोडी कशी काय होती?

.

पारव्यांनी आमच्या गॅलरीत २ विणींचे हंगाम उरकलेले आहेत आता तीसर्‍याच्या तयारीला परत रोमान्स सुरुच.भयंकर शिटून ठेवलय हेवेसांन. Sad

>>> सामो त्यामुळे त्वचेचे आजार होतात हे नक्की. श्वासांचेही होत असावेत. दुर ठेवने हे उत्तम.>>>> १००% धन्यवाद हरिहर.

ही दोन पिल्ले सारखी आईच्या (बाबाही असतील. नर मादीतला फरक मला अजून समजला नाही या चक्रवाकमधला) मागे होती. आई त्यांना पाण्यावर मान समांतर ठेवायला शिकवत होती का? की तो एक खेळ होता?

.

राखी बलाक
Grey Heron (Ardea cinerea)
Pune (Shikrapur)
10 Dec (7:00 am)

चक्रवाक
Ruddy Shelduck, Brahmini Duck (Tadorna ferruginea)
Pune (Shikrapur)
9 Dec (7:15 am)

Grey Wagtail
Pune (Wadi)
11 Dec (7:00 am)

Grey Wagtailचा भारी फोटो! इतका जिवंत फोटो आहे की त्याच्याकडे टक लावून पाहिले असता, पटकन मान हलवेल की काय असा भास झाला.

Indian Robin
Pune (Devrai)
12 Dec (5:30 pm)

राखी धनेश, धनचिडी
याची आज जोडी फिरताना दिसली. खुपच दुर असल्याने फोटो स्पष्ट मिळाले नाहीत. दोघेही उडताना दिसले तेंव्हा मला पाणकावळे आहेत असे वाटले. पण उडण्याची पद्धत जरा वेगळी असल्याने झुम करुन पाहीले. या धनेशला संस्कृतमधे मातृनिंदक का म्हणत असावेत?
Indian Grey Hornbill (Bucerotidae)
Pune (Devrai)
13 Dec (8:10 am)

कधी नव्हे तो आज शिक्रा अगदी बाल्कनीसमोरच्या विजेच्या खांबावर येवून विसावला होता. फक्त दहा फुटांवर होता. अगदी कॅमेऱ्याच्या लेन्समधेच पहात होता. प्रथमच त्याचा आवाज ऐकला. खरे तर त्याचा आवाज ऐकूनच बाल्कनीत आलो. हा आवाज नेहमी ऐकत असुनही पक्षी कधी दिसला नव्हता. बाहेर येवून पाहीले तर या शिक्रा या आवाजाचा मालक आहे हे समजले. फक्त हा शिक्राच नाही तर वेडा राघू, खंड्या, होला, बटेर, तुतवार, रॉबीन, बॅबलर या पक्षांनी देवराईतला वावर कमी करुन माझ्या बाल्कनीसमोरील भागात सुरु केला आहे. कदाचीत येथे असलेले पाणी हे कारण असेल. त्यांच्या स्थानिक म्हणजे अगदी घरातल्या घरातील स्थलांतरामुळे त्यांना बसायला जागा मात्र ठराविकच आहेत. आठ दिवसांपुर्वीच पावसाळ्यामुळे माजलेली झाडे वगैरे सर्व व्यवस्थित साळले गेले आहेत त्यामुळे एकाच जागेवर प्रत्येक वेळी वेगळाच पक्षी दिसतो. म्हणजे या पाच सहा दिवसांमधील फोटोंमधे पक्षी वेगवेगळे असले तरी प्रत्येक फोटोत विजेच्या पेटीचा हुक मात्र तोच आहे. त्याच हुकवर शिंजिर, मग बैरागी, मग रॉबिन तर कधी बुलबुल दिसतात. साळूंक्या मात्र विजेचा खांब सोडत नाहीत. आज सुर्योदयाच्या अगोदरच शिक्राने हजेरी लावली पण कमी प्रकाशामुळे फारसे निरिक्षण करता आहे नाही.

Shikra
Pune (Devrai)
13 Dec (7:45 am)

धन्यवाद सामो!

हा कोलाज जरा गम्मत म्हणून देतो आहे. पंधरा मिनिटात हे तिघे एकाच हुकवर आळीपाळीने येवून बसले. जणूकाही लहान मुले बागेमध्ये आळीपाळीने एखाद्या खेळण्यावर बसतात तशी लगबग वाटली मला या तिघांची. तासभर अगोदर येथे प्रिनिया आणि सिल्व्हरबिल बसून गेले होते. ते फोटो सापडले नाहीत. Wink

हा भारद्वाज मला नेहमीच आळशी वाटतो. त्याला पाहिले की मलाही कंटाळा येतो. खरे तर हा देखना व रुबाबदार पक्षी आहे पण सदैव कुणाची तरी चोरी केल्यासारखा वावरतो. विश्रांती घेतना नेहमी रुसलेला मुलं जसे हात पाय पसरून बसते तसे माठे नारंगी पंख गाळून बसतो. त्यामुळे दुरून त्याचा आकारही मोठा दिसतो. जमीनीला समांतर व खुप खालून उडत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडात दिसेनासा होता. प्रियाराधन करताना मात्र हा खुप सुरेख पिसारा फुलवतो. हा सकाळी सकाळी दिसला तरी आळसावल्यासारखाच बसला होता. सकाळी इतर पक्ष्यांमध्ये जो चपळपणा, लगबग दिसते ती याच्यात अजिबात दिसत नव्हती. सांधा भांगही पाडलेला नव्हता. Lol

भारद्वाज,सोनकावळा, कुक्कुटकुंभा, कुंभारकावळा, सुलक्षणी, नपिता, चमारकुकडी, कुंभार्‍या. ( 'त्याचे डोळे न पीताच लाल असतात' म्हणून त्याला नपीता हे नाव पडल्याचे वावेंनी सांगितल्याचे आठवते आहे. Wink )
Greater Coucal, Crow Pheasant (Centropus sinensis)
Pune (Devrai)
14 Dec (7:45 am)

Red vented Bulbul (लालबुड्या बुलबुल, फेसा, कुंचीवाला बुलबुल)
Pune Devrai
Dec 2019 (4:30 pm)

धन्यवाद आऊटडोअर्स
संपादनाची वेळ संपण्याअगोदर पाहिले अन्यथा नाव बदलता आले नसते.
__/\__

Pages