पावभाजी!!! 14 किलो भाज्यांची

Submitted by ShitalKrishna on 7 November, 2019 - 03:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

बटाटे - 5kg
फ्लॉवर - 2kg
शिमला मिर्च - 1.25kg
टोमॉटो -2.5kg
कांदा - 3kg - (फोडणी मध्ये 1.5kg ची पेस्ट , वरून 1.5kg)
मटार फ्रोझन - 1.5kg
बीट - 0.25kg (खिसुन)
आले लसूण पेस्ट - 2 वाटी
एव्हरेस्ट काश्मिरीलाल - 50gm
एव्हरेस्ट पावभाजी मसाला - 200gm (10gm बाकी)
मीठ - पाऊण ते एक वाटी
कोथिंबीर, लिंबू गरजे नुसार
अमूल बटर - अर्धा किलो(पाव भाजण्यासाठी वेगळे)
तेल - पाऊण लिटर (तुम्ही रोज वापरता ते, rice bran नको)
खडा गरम मसाला - 5-6 तमालपत्र, 10-12 लवंग, 7-8 काळीमिरी, दालचिनी- 2 पेर, जिरं- 2 चमचे. हळद - 4 चमचे

क्रमवार पाककृती: 

पूर्व तयारी :
आदल्या दिवशी बटाटे, टोमॅटो, बीट आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून ठेवणे.
फ्लॉवर निवडून घेणे.
आले लसूण पेस्ट करून घेणे.
मोठी पातेली, मोठं strainer, मोठे डाव जमवून ठेवणे.

1. एका कुकरला बटाटे, एका कुकर ला फ्लॉवर शिजवुन घ्या.
2. तोपर्यंत टोमॉटोला अधिक चिन्हात चिरा देऊन घ्या. शिमला मिरची बारीक चिरून घ्या. बिया काढून टाका.
3. बटाटा, फ्लॉवर चा कुकर झाला असेल, उतरवून घ्या.
4. गॅसवर मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात टोमॉटो घाला. पाच मिनिट उकळू द्या. Gas बंद करा.
5. एका बाजूला पातेल्यात शिमला मिरची थोडे पाणी आणि थोडे मीठ घालून वाफवून घ्या.
6. दुसऱ्या पातेल्यात मटार थोडे पाणी आणि मीठ घालून वाफवून घ्या.
7. मटार आणि शिमला मिरची चुकूनही कुकर ला शिजायला लावू नका. एकदम गाळ नाही करायचा.
8. कांदे सोलून त्याची पेस्ट करून घ्या.
9. जाड बुडाच्या पातेल्यात पाऊण लिटर तेल घाला फोडणी साठी. Medium flame वर तेल गरम होऊ द्या, तेल गरम झालं कि खडा मसाला टाका.
10. आता कांद्याची पेस्ट घाला. हळद घाला. चार चमचे मीठ घाला. एकदा हलवून झाकण ठेऊन द्या. Gas flame वाढवा, एकदम high नको.
11. टोमॅटो सोलून घ्या, त्याची पेस्ट करून घ्या.
12. तोपर्यत कांदा पेस्ट अर्धवट शिजली असेल, त्यात आलं लसूण पेस्ट घाला. थोडा परतून घेऊन मग टोमॉटो पेस्ट घाला, एकदा हलवून झाकण ठेवा.
13. बीट खिसुन फोडणीत घाला. झाकण ठेवून द्या.
14. Gas flame medium करून, भाज्या mash करायला घ्या.
15. एका मोठ्या भांड्यात (डबा, पातेलं ज्या मध्ये सगळ्यां भाज्या, फोडणी आणि 2लिटर पाणी बसेल) बटाटे सोलून टाका. एक एका बटाटा सोलून mash करत चला. सगळे बटाटे mash झाले कि मीठ टाकून हलवून घ्या.
16. आता फ्लॉवर strainer ने गाळून घ्या. पाणी बाजूला ठेऊन द्या. हा फ्लॉवर mash करून बटाट्या वर घाला. mash करताना थोडे मीठ घाला.
17. शिमला मिरची गाळून घ्या, mash करा आणि बटाटा फ्लॉवर यावर घाला.
18. आता मटार गाळून घ्या. बटाटा, फ्लॉवर, शिमला मिरची या वर घाला.
19. या सगळ्यां भाज्या, एकत्र हलवून घ्या. मीठ थोडे थोडे घातलेलंच आहे, आता, 50gm पावभाजी मसाला घालून हलवून घ्या.
20. बरं, या सगळ्यांना भाज्या mash करताना, फोडणी मधुन मधून हलवायला विसरू नका.
21. कांदा, टोमॉटो पेस्ट चा कच्चा वास गेला असेल तर मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट घाला. चांगला तेल सुटे पर्यंत परतुंन घ्या. तेल सुटला कि gas बंद करून थोडा मुरू द्या. (ही फोडणी, फोटोतील एका पातेल्यात केली होती, पाऊण पातेलं झाला होता)
22. तोपर्यंत भाज्या गाळलेला पाणी आणि त्यात अजून 1 लिटर पाणी घेऊन उकळायला ठेवा.
23. आता मेन स्टेप... ही फोडणी आपल्याला एकत्र mash केलेल्या भाज्यांवर घालायची आहे. एकदम पातेल्याने ओतायला जाऊ नका (सावधान). एक लहान दांड्याचा पातेलं घ्या.. हळू हळू ही फोडणी भाज्यांवर घाला.
24. सगळी फोडणी घातल्यावर, फोडणी आणि mash केलेल्या भाज्या एकजीव करा. थोडा मीठ घाला. उकळलेला पाणी घाला. पुन्हा सगळा एकजीव करा. एकजीव करताना मोठा डाव किंवा उलथणे घेतलेलं बरं.
25. मिठाची चव घ्या. कमी असेल तर घाला.
26. Thickness पाहून पाणी घाला, शक्यतो भाज्या गाळलेला (1 लिटर) आणि 1 लिटर उकळवलेला पाणी पुरेल.
27. आता हे मिश्रण दोन पातेल्यात समसमान विभागुन, high flame वर उकळी येई पर्यंत ठेवा, मग medium flame करून पाऊण तसा रटरटू द्या. 1 तासाने रटरटल्यावर पावभाजी मिळून येईल आणि थोडं घट्ट होईल म्हणून वरील स्टेप ला पाणी व्यवस्थित (2लिटर) घाला.
28. दोन पातेल्यात प्रत्येकी 250gm बटर घाला.
29. स्वादिष्ट पावभाजी तयार आहे.

IMG20191103211042 (1).jpg

वाढणी/प्रमाण: 
90 लोकं भरपेट, माझा 90लोकांचा अंदाज होता परंतु 60-65 लोकं आले होते, फोटो मधील दुसऱ्या पातेल्यातील फक्त अर्धा लिटर संपली नंतर.
अधिक टिपा: 

1. रंग येण्यासाठी मी एवरेस्ट काश्मिरीलाल वापरला आहे, एव्हरेस्ट तिखलाल वापरला तर तिखट होईल. तसेच मी पावशेर बीट वापरले आहे, अर्धा किलो चालले असते.
2. मी कोथिंबीर पेरली नाही, तुम्ही वापरू शकता.
3. मला मोठे पातेलं मिळाला नाही, तुम्ही एकच मोठे पातेलं वापरू शकता. परंतु दोन पातेली केली हेच चांगला झाला, कारण gas शेगडी वर overload झाला असता, उकळी यायला वेळ लागला असता. 2 पातेलं वापरली तरी मी सगळ्यां भाज्या एकच मोठया डब्यात mash केल्या, मीठ मसाला, फोडणी याच डब्यात घातली, गरम पाणी घातलं. यामुळे दोन पातेल्यात हे रटरटायला ठेवलं तरी चव एकच आली.
4. थोडेथोडे मीठ प्रत्येक भाजी mash करताना, तसेच फोडणीत घालणे.. ही टीप चुकवू नये. पावभाजी मसाला ही दोन टप्प्यात घालावा एकदा फोडणीत आणि एकदा mash केलेल्या भाज्यांवर.
5. भाज्या धुवून ठेवने, फ्लॉवर साफ करून ठेवणे, आलेलसूण पेस्ट करून ठेवणे हा वेळ धरला नाही

माहितीचा स्रोत: 
youtube, वहिनी, मित्रपरिवार, मायबोली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका मोठ्या भांड्यात (डबा, पातेलं ज्या मध्ये सगळ्यां भाज्या, फोडणी आणि 2लिटर पाणी बसेल) बटाटे सोलून टाका. एक एका बटाटा सोलून smash करत चला. सगळे बटाटे smash झाले कि मीठ टाकून हलवून घ्या. >>>>>
मी पावभाजी करताना , कच्चे बटाटे सोलून बारिक काचर्या करून , कुकरच्या भांड्यात टाकते , थोड पाणी घालून , कूकरला ४-५ शिट्या काढते .
नंतर घोटायला सोपं जातं .
चवीत काय फरक पडतो किन्वा बाकी काही pros and cons जाणकार सांगतील . Happy

जसं सामीची बिर्यानी रेसिपी वाचून नेहमी बिर्यानी करायची हुक्की येते तसं आता ही डिटेल रेसीपी वाचून पावभाजी करावीशी वाटते. Happy

छान, आता खरच मोठया प्रमाणात कधी पावभाजी करायची झाल्यास टेन्शन न घेता हा धागा फॉलो केला जाईल. तुमचा प्रोग्रॅम successful झाल्याबद्दल अभिनंदन...

कांदा वाटून घातलेल्या चवीची जरा भिती वाटतेय. बीटाची चव पण जरा विचित्र लागेल का असंही वाटतंय पण संदर्भासाठी ठेवायला मस्त.

बटाटे वेगळे उकडावेत ह्या लेखिकेच्या टिप ला अनुमोदन. थोड्या भाज्या आणिक आणून ह्याच बरोबर तवा पुलाव करता येइल. जनरली पावभाजी बरोबर काय सर्व्ह करावे असा प्रश्न येतो. कांदा कोथिंबीर वरून शिवरतात तीच थोडी जास्त बारीक कापून दह्यात घालून पुलावाबरोबर रायता होईल.
मी हे सर्व १५ ग्राम च्या प्रमाणात करते.

सर्व ठिकाणी स्मॅश चे मॅश करा. एम ए एस एच अ‍ॅज इन द सीरीअल.

मी सिमला मिर्ची बारीक चौकोन कापून फोडणीतच घालते बटाट्या बरोबर. हिरवे डायमंड चौकोन छान दिसतात. बीट नो नो.

मस्त लिहिलय डीटेल मधे. मीठ आणि मसाला भाज्या मॅश करताना घालत जायची आयडीया आवडली.
बाकी त्या धाग्यावरची पाभा ची चर्चा वाचुन गेल्या रवीवारी मी पण घरी पाभा करुन घेतली.
( तसही पाभा करायला कोणतही कारण पुरतं आम्हाला. Happy Happy )
कांदा वाटून घातलेल्या चवीची जरा भिती वाटतेय.>> +१११ ...कडवट होतो कच्चा कांदा वाटला की आणि मग भाजी सुद्धा.
मी गेले अनेक वर्ष कांदा न घालताच पाभा करते. आणि तशीच मस्त लागते. जास्त प्रमाणात करायचे असेल तर काम खुप कमी होतं कांदा वगळल्यास.(मिक्सर वर फिरवणार असु तरी कांदा साली काढुन तुकडे करणे खुप रडवणारे असते)
आणि आजकाल असे म्हणता येइइल की पैशाची सुद्धा बचत ( कांदा - ७० रुपये किलो झालाय Wink )

बीट त्यांनी १४ किलो भाज्यांना पाव किलो म्हणजे अगदी कमी घेतलेय, रंगापुरते असावे. बाकी रेसिपी आणि मोठ्या प्रमाणावर करण्याच्य टिप्स छान.
मी कांदा आणि विदाउट कांदा दोन्ही करते, कंटाळा/मूड वर अवलंबून. घातलाच तर बारीक चिरून घालते. पेस्ट नाही वापरली कधी. खडा मसाला पण नव्हते वापरत. आता अशी करून पहावी असे वाटत आहे.

मस्त लिहिली आहे रेसिपी. माझी यापेक्षा थोडी वेगळी आहे, तुमची मेथड वापरुन बघायला पाहिजे. भावाने रक्षाबंधन गिफ्टसोबत एक दोरीवाला चॉपर पाठवलाय तो इतका हँडी आहे की तो वापरुन पटापट पाभा करुन होते हल्ली.

हॅट्स ऑफ. Happy
मस्त झाली पावभाजी. आणि हिंमतपण खूप आहे.
आता काही दिवस इथे पावभाजी वाचून वाचून मलापण करावीशी वाटायला लागली आहे. Happy

आधीची चर्चा आणि ही रेसिपी वाचून पावभाजी करावीच लागेल असं दिसतंय Happy
मी एकदाच तेलात पावभाजी करून पाहिली होती आणि ती चव आम्हाला आवडला नव्हती. तुमची रेसिपी पण तेलातली दिसतेय आणि नंतर बटर. चव कशी लागते?
गुड जाॅब पुन्हा एकदा.

टोमॉटोला अधिक चिन्हात चिरा देऊन घ्या>> Happy
ही आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत ते फार बरं केलं आहे.

सगळ्यांना खुप खुप धन्यवाद!
@मेधावि, मी नेहमीच कांदा वाटून घालते, फक्त व्यवस्थित शिजला पाहिजे. तसेच बीटाचे, ते फक्त रंगा पुरता घातला आहे, तेही खिसुन आणि टोमॉटो पेस्ट टाकतानाच घातला आहे. बीट शिजला कि उग्र नाही लागत.
अर्थात ज्याचा त्याचा आवडीने करावी पाककृती. मी फक्त जे केला, लोकांनां आवडलं, success झाला ते लिहला आहे.
एकीने मला शिमला मिरची ही वाटून घालायला सांगितली होती.. आता बोला.. ज्याची त्याची पद्धत..

<<कडवट होतो कच्चा कांदा वाटला की आणि मग भाजी सुद्धा.>> पेस्ट करून ठेवायची नाही.. केली कि लगेच घालायची आणि शिजवायची मेहनत घ्यायची अगदी तेल सुटेपर्यंत.

वेगळा धागा काढुन डीटेल रेस्पी लिहिलीत ते बरं झालं.
भाजीचा रंग छान आलाय.>>>११११११
रंगासाठी बिटाची आईडिया चांगली आहे, मी लाल सुक्या मिरच्या आणि लसूण एकत्र उकळते थोड्या पाण्यात आणि त्याचं वाटण करून ठेवते. लागेल तेवढं पावभाजी त घालायचं (सुरवातीला बटर वर कांदा परतताना) आणि फ्रीजरमधे उरलेलं वाटण ठेउन देते.

मला पण टिप्स मिळाल्या कि कांदा नाही घातला तरी चालेल, थोडी हरभरा डाळ भिजवून शिजवून वाटून घालणे,
इथेच VB यांनी सांगितले कि काबुली चणा आणि नारळ दूध घालणे,
अजून एकीनं शिमला मिरची वाटून घालणे सांगितलं.
परंतु मला एवढ्या मोठ्या प्रमाणात करायची होती, कोणतीही रिस्क नव्हती घ्यायची म्हणून मी मला जमते तशीच केली.
शिवाय इथे आपण मोठ्या प्रमाणात करतोय आणि नेहमी कमी प्रमाणात असते so, काही बदल अवश्य असतात rather सुटसुटीत असतात जसे कि.. बटाटे अक्खे शिजवून घेणे, नेहमी करताना मी पण, बटाट्याच्या चकत्या आणि सगळ्यां भाज्या एकत्र थोडा मीठ घालून शिजवून घेते. परंतु इथे एवढे सगळे कच्चे बटाटे साल काढण्याने सोलून मग चकत्या करणे... त्या पेक्षा शिजवून मग सोलने बरं पडत.
कांदा मी 60rs नि आणला होता, आता 80rs ने आहे. परंतु रिस्क नव्हती घ्यायची म्हणून, टिप्स मिळाली टाकला नाही तरी चालतो.. तरी टाकला.

@अमा, <<बटाटे वेगळे उकडावेत ह्या लेखिकेच्या टिप ला अनुमोदन. >> लेखिका नाही हो मी, फक्त अनुभव मांडून ठेवला आहे.. शितल म्हणालेला आवडेल.
Smash च mash केला आहे.

@chioo, <<मस्त झाली पावभाजी. आणि हिंमतपण खूप आहे.>> धन्यवाद.

@वेका, <<तुमची रेसिपी पण तेलातली दिसतेय आणि नंतर बटर>> बटर ची फोडणी तेही एवढ्या प्रमाणात, खुप धूर होतो हो.

@Filmy, @धनुडी धन्यवाद

घरी पावभाजी करायची असेल तर नवऱ्याला फक्त आलू मटार टमाटर आणि कांदा एवढीच आवडते. मी आपली मला हवा म्हणून थोडा फ्लॉवर घालते, सिमला मिरची मला आवडत नाही त्यात. परत आमच्याकडे खडी पण नाही करायची, पूर्ण बसलेली पण नाही करायची. अर्धी बोबडी, त्यामुळे मी अर्धी भाजी मिक्सरवर बारीक करते, अर्धी तशीच ठेवते. सगळं भाजीच्या कुकरमध्ये तेलावर शिजवते आणि बटर पावभाजी सर्व करताना वर घालते. मोठे दीर आले तरी त्यांना अशीच आवडते.

पावभाजी बाहेरून आणलेली कशीशी चालते, घरी म्हणजे अशीच करावी लागते Wink , रंग वगैरेशी काही देणं घेणं नसतं . करते मी अशी फक्त आमच्यासाठी, चांगली लागते. पण फक्त कोणाला बोलावलं तर सरळ बाहेरून मागवते.

तेल आणि बटर दोन्ही घालावे. बटर जळत नाही. >>> ही टीप मस्त आहे, करून बघेन असं.

काल केली पावभाजी.
शीतल , धन्यवाद. एकदम detailed दिल्याबद्दल.
90 लोकं भरपेट, माझा 90लोकांचा अंदाज होता >>>> म्हणून मी हे 100 plates चं प्रमाण धरलं आणि त्या हिशोबाने 15 जणांसाठी केली. आम्ही 5 जणं दोन वेळेला आणि 5 जणांसाठी डबा पाठवला.
मी फक्त एक गाजर आणि मूठभर फरसबी बारीक चिरून टाकली extra. मस्त झाली.
त्यातही 4 plates without मटार. ती बाजूला काढून मग मटार टाकले.
आमचे 2 ज्येना असल्याने पट्टीच्या खाणार्या 12 लोकांसाठी ते प्रमाण योग्य होईल.
Thank you !

ही without मटार
IMG_20210117_110204.jpg

Pages