पावभाजी!!! 14 किलो भाज्यांची

Submitted by ShitalKrishna on 7 November, 2019 - 03:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

बटाटे - 5kg
फ्लॉवर - 2kg
शिमला मिर्च - 1.25kg
टोमॉटो -2.5kg
कांदा - 3kg - (फोडणी मध्ये 1.5kg ची पेस्ट , वरून 1.5kg)
मटार फ्रोझन - 1.5kg
बीट - 0.25kg (खिसुन)
आले लसूण पेस्ट - 2 वाटी
एव्हरेस्ट काश्मिरीलाल - 50gm
एव्हरेस्ट पावभाजी मसाला - 200gm (10gm बाकी)
मीठ - पाऊण ते एक वाटी
कोथिंबीर, लिंबू गरजे नुसार
अमूल बटर - अर्धा किलो(पाव भाजण्यासाठी वेगळे)
तेल - पाऊण लिटर (तुम्ही रोज वापरता ते, rice bran नको)
खडा गरम मसाला - 5-6 तमालपत्र, 10-12 लवंग, 7-8 काळीमिरी, दालचिनी- 2 पेर, जिरं- 2 चमचे. हळद - 4 चमचे

क्रमवार पाककृती: 

पूर्व तयारी :
आदल्या दिवशी बटाटे, टोमॅटो, बीट आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून ठेवणे.
फ्लॉवर निवडून घेणे.
आले लसूण पेस्ट करून घेणे.
मोठी पातेली, मोठं strainer, मोठे डाव जमवून ठेवणे.

1. एका कुकरला बटाटे, एका कुकर ला फ्लॉवर शिजवुन घ्या.
2. तोपर्यंत टोमॉटोला अधिक चिन्हात चिरा देऊन घ्या. शिमला मिरची बारीक चिरून घ्या. बिया काढून टाका.
3. बटाटा, फ्लॉवर चा कुकर झाला असेल, उतरवून घ्या.
4. गॅसवर मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात टोमॉटो घाला. पाच मिनिट उकळू द्या. Gas बंद करा.
5. एका बाजूला पातेल्यात शिमला मिरची थोडे पाणी आणि थोडे मीठ घालून वाफवून घ्या.
6. दुसऱ्या पातेल्यात मटार थोडे पाणी आणि मीठ घालून वाफवून घ्या.
7. मटार आणि शिमला मिरची चुकूनही कुकर ला शिजायला लावू नका. एकदम गाळ नाही करायचा.
8. कांदे सोलून त्याची पेस्ट करून घ्या.
9. जाड बुडाच्या पातेल्यात पाऊण लिटर तेल घाला फोडणी साठी. Medium flame वर तेल गरम होऊ द्या, तेल गरम झालं कि खडा मसाला टाका.
10. आता कांद्याची पेस्ट घाला. हळद घाला. चार चमचे मीठ घाला. एकदा हलवून झाकण ठेऊन द्या. Gas flame वाढवा, एकदम high नको.
11. टोमॅटो सोलून घ्या, त्याची पेस्ट करून घ्या.
12. तोपर्यत कांदा पेस्ट अर्धवट शिजली असेल, त्यात आलं लसूण पेस्ट घाला. थोडा परतून घेऊन मग टोमॉटो पेस्ट घाला, एकदा हलवून झाकण ठेवा.
13. बीट खिसुन फोडणीत घाला. झाकण ठेवून द्या.
14. Gas flame medium करून, भाज्या mash करायला घ्या.
15. एका मोठ्या भांड्यात (डबा, पातेलं ज्या मध्ये सगळ्यां भाज्या, फोडणी आणि 2लिटर पाणी बसेल) बटाटे सोलून टाका. एक एका बटाटा सोलून mash करत चला. सगळे बटाटे mash झाले कि मीठ टाकून हलवून घ्या.
16. आता फ्लॉवर strainer ने गाळून घ्या. पाणी बाजूला ठेऊन द्या. हा फ्लॉवर mash करून बटाट्या वर घाला. mash करताना थोडे मीठ घाला.
17. शिमला मिरची गाळून घ्या, mash करा आणि बटाटा फ्लॉवर यावर घाला.
18. आता मटार गाळून घ्या. बटाटा, फ्लॉवर, शिमला मिरची या वर घाला.
19. या सगळ्यां भाज्या, एकत्र हलवून घ्या. मीठ थोडे थोडे घातलेलंच आहे, आता, 50gm पावभाजी मसाला घालून हलवून घ्या.
20. बरं, या सगळ्यांना भाज्या mash करताना, फोडणी मधुन मधून हलवायला विसरू नका.
21. कांदा, टोमॉटो पेस्ट चा कच्चा वास गेला असेल तर मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट घाला. चांगला तेल सुटे पर्यंत परतुंन घ्या. तेल सुटला कि gas बंद करून थोडा मुरू द्या. (ही फोडणी, फोटोतील एका पातेल्यात केली होती, पाऊण पातेलं झाला होता)
22. तोपर्यंत भाज्या गाळलेला पाणी आणि त्यात अजून 1 लिटर पाणी घेऊन उकळायला ठेवा.
23. आता मेन स्टेप... ही फोडणी आपल्याला एकत्र mash केलेल्या भाज्यांवर घालायची आहे. एकदम पातेल्याने ओतायला जाऊ नका (सावधान). एक लहान दांड्याचा पातेलं घ्या.. हळू हळू ही फोडणी भाज्यांवर घाला.
24. सगळी फोडणी घातल्यावर, फोडणी आणि mash केलेल्या भाज्या एकजीव करा. थोडा मीठ घाला. उकळलेला पाणी घाला. पुन्हा सगळा एकजीव करा. एकजीव करताना मोठा डाव किंवा उलथणे घेतलेलं बरं.
25. मिठाची चव घ्या. कमी असेल तर घाला.
26. Thickness पाहून पाणी घाला, शक्यतो भाज्या गाळलेला (1 लिटर) आणि 1 लिटर उकळवलेला पाणी पुरेल.
27. आता हे मिश्रण दोन पातेल्यात समसमान विभागुन, high flame वर उकळी येई पर्यंत ठेवा, मग medium flame करून पाऊण तसा रटरटू द्या. 1 तासाने रटरटल्यावर पावभाजी मिळून येईल आणि थोडं घट्ट होईल म्हणून वरील स्टेप ला पाणी व्यवस्थित (2लिटर) घाला.
28. दोन पातेल्यात प्रत्येकी 250gm बटर घाला.
29. स्वादिष्ट पावभाजी तयार आहे.

IMG20191103211042 (1).jpg

वाढणी/प्रमाण: 
90 लोकं भरपेट, माझा 90लोकांचा अंदाज होता परंतु 60-65 लोकं आले होते, फोटो मधील दुसऱ्या पातेल्यातील फक्त अर्धा लिटर संपली नंतर.
अधिक टिपा: 

1. रंग येण्यासाठी मी एवरेस्ट काश्मिरीलाल वापरला आहे, एव्हरेस्ट तिखलाल वापरला तर तिखट होईल. तसेच मी पावशेर बीट वापरले आहे, अर्धा किलो चालले असते.
2. मी कोथिंबीर पेरली नाही, तुम्ही वापरू शकता.
3. मला मोठे पातेलं मिळाला नाही, तुम्ही एकच मोठे पातेलं वापरू शकता. परंतु दोन पातेली केली हेच चांगला झाला, कारण gas शेगडी वर overload झाला असता, उकळी यायला वेळ लागला असता. 2 पातेलं वापरली तरी मी सगळ्यां भाज्या एकच मोठया डब्यात mash केल्या, मीठ मसाला, फोडणी याच डब्यात घातली, गरम पाणी घातलं. यामुळे दोन पातेल्यात हे रटरटायला ठेवलं तरी चव एकच आली.
4. थोडेथोडे मीठ प्रत्येक भाजी mash करताना, तसेच फोडणीत घालणे.. ही टीप चुकवू नये. पावभाजी मसाला ही दोन टप्प्यात घालावा एकदा फोडणीत आणि एकदा mash केलेल्या भाज्यांवर.
5. भाज्या धुवून ठेवने, फ्लॉवर साफ करून ठेवणे, आलेलसूण पेस्ट करून ठेवणे हा वेळ धरला नाही

माहितीचा स्रोत: 
youtube, वहिनी, मित्रपरिवार, मायबोली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच शीतल. पावभाजी यम्मी दिसतेय . मी हेबर्स किचन ची रेसिपी फॉलो करते. आता तुमच्या टिप्स हि वापरेन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पावभाजी केल्याशिवाय आता रहावणार नाही.

11 लोकांच्या पावभाजी साठी खालील गोष्टींचे प्रमाण किती लागेल ?
Aloo
Simla mirch
Couliflower
Beans
Tomato puree
Onion
Ginger
Garlic
Amul butter
Amul pav bhaji masala

रिया, वरचं प्रमाण ९० लोकांसाठी पुरेल असं आहे. त्यावरून ११ लोकांसाठीच प्रमाण काढता येईल.

Pages