कंपनीची दिवाळी भेट कि कर्मचाऱ्यांचा अपमान?

Submitted by Parichit on 30 October, 2019 - 12:04

हे बघा एका कंपनीचे कर्मचाऱ्याना आलेली दिवाळी गिफ्ट चे इमेल. अडीचशे रुपये घ्या आणि दिवाळी एन्जोय करा म्हणतात.image002.jpg

अशी "गिफ्ट" कुणा कुणाला मिळाली आहेत? इथे भडास काढा.

अरे हे असले चिंधी उद्योग करण्यापेक्षा तुम्ही फक्त शुभेच्छा का देत नाही मी म्हणतो? काय मिळते यांना असे कर्मचार्यांचा अपमान करून? हि गिफ्ट नव्हे भिक आहे राव भीक. एका कंपनीने तर चक्क "जंबो पेढा", म्हणजे नेहमीच्या पेढ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा पेढा दिला होता. ते सुद्धा प्रत्येकाची "गिफ्ट" मिळाल्याची सही करून! आणि हि कंपनी बारीकसारीक नव्हे तर भारतातल्या पहिल्या चार कि पाच मोठ्या जायंट आयटी कंपनीपैकी एक आहे बरं का. ह्यांची आर्थिक उलाढाल/रेव्हेन्यू चे आकडे मिलियन आणि अब्ज डॉलर मध्ये असतात.

इतके माजोरडे असतात हे म्यानेजमेंट काही काही कंपन्यांचे. प्रोजेक्ट चालवतात कर्मचाऱ्याच्या जीवावर. त्यांच्या तोंडाला पाने पुसायची. आणि स्वत:ला मातर भरघोस दिवाळी बोनस लाटणार हXमी Angry

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा
आमची आधीची कंपनी ख्रिसमसला आम्हाला $२५ चे 'टार्गेट' दुकानाचे गिफ्ट कार्ड देत असे. मी दर वर्षी माझ्या बस ड्रायव्हरला दे कुठे बसस्टॉपवर दररोज भेटणार्‍या 'जॅनिटर' मैत्रिणीला दे - असे करत असे.

सध्याच्या परिस्थितीत जॉब टिकलेत, हीच दिवाळी भेट!
नाहीतर बऱ्याच लोकांना दिवाळीत मातम करण्याची वेळ आलीये मंदीमुळे...
आम्हालाही दिवाळी बोनस मिळालेला नाही, पण तरीही मी माझ्या मॅनेजमेंटचे आभार मानतो, एकही माणूस अजून न काढल्याने!

किती रुपयाची गिफ्ट दिली असती तर तुम्हाला आनंद झाला असता?
एक टोकन म्हणून कंपनीने गिफ्ट दिली आहे. आवडत नसेल तर नम्रपणे नकार द्या.

<<< स्वत:ला मातर भरघोस दिवाळी बोनस लाटणार हXमी >>>
बोनस हा कंपनीच्या इच्छेवर अवलंबून असतो. It is not a matter of right. बोनस आवडत नसेल तर दुसर्‍या कंपनीत जाऊ शकता जिथे भरपूर पगार + बोनस, भरपूर सुट्ट्या, कमीत कमी काम, छान वर्क-लाइफ बॅलन्स मिळेल.

@सामो: योग्य केलेत तुम्ही. मला तर हे अडीचशे रुपये ह्या इमेल च्या प्रिंट सोबत भिकाऱ्याला देऊन त्याचा फोटो काढून तो इमेल पाठवणाऱ्या व्यक्तीला पाठवायची इच्छा झाली होती. पण साला आम्हाला जोब जाण्याची भीती वाटते म्हणून असले काही करता येत नाही.

@अज्ञातवासी मान्य आहे मंदी आहे. काही जबरदस्ती नाही गिफ्ट देण्याची. केवळ शुभेच्छा पण खूप किमती असतात असल्या गिफ्ट पेक्षा.

@उपाशी बोका : अहो घरोघरी कामवाल्या मावशी येतात. सोसायटीत कचरा गोळा करणारे असतात. त्यांना सुद्धा दोन अडीचशे रुपये देतो आपण दिवाळी गिफ्ट म्हणून. तुम्ही एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असाल तर तुमच्या सीइओला दोनशे रुपये द्या गिफ्ट म्हणून आणि प्रतिक्रिया बघा.

म्हणूनच विचारल की किती रुपयाची गिफ्ट दिली असती तर तुम्हाला आनंद झाला असता? हजार, दोन हजार, पाच हजार, पंचवीस हजार, एक लाख वगैरे?

किती रुपयाची गिफ्ट दिली असती तर तुम्हाला आनंद झाला असता?
>>> किती पगार दिल्यावर आनंद होतो? काय सोयी दिल्यावर कर्मचारी खुश राहतात? किती ओवर टाईम द्यावा कि देऊ नये? याची उत्तरे ज्याला माहित नाहीत त्याने कंपनी चालवू नये. आमच्या कंपनीत कुणीही या गिफ्ट बाबत खुश नाही इतकेच सांगतो.

व्हेरी गुड. बोनस आवडत नसेल तर दुसर्‍या कंपनीत जाऊ शकता जिथे भरपूर पगार + बोनस, भरपूर सुट्ट्या, कमीत कमी काम, छान वर्क-लाइफ बॅलन्स मिळेल. शुभेच्छा.

बोनस तर लांबची गोष्ट!
लोकांना मंदी मुळे बेरोजगारी आणि जॉब लॉसला बळी पडावे लागते आहे. (माझ्या एका मैत्रीणीचा दोन महिने पगार झाला नाही. तिने नोकरी सोडली.) अनेक कंपन्यांकडे प्रोजेक्ट्स नाहीयेत.

पण बाकी, ज्यांच्या कडून काम करून घेतात त्यांना योग्य मोबदला देत नाहीत कंपन्या; हा मुद्दा अगदी बरोबर आहे. हे सर्वजणच अनुभवत असणार.

@परिचित- तुमचा धागा तुम्ही पुन्हा वाचल्यास एक गोष्ट सरळ कळतेय, की प्रॉब्लेम कमी बोनस हाच आहे.
कारण तुमचा राग मॅनेजमेंटला भरपूर बोनस मिळाला, आणि तुम्हाला नाही हा आहे.
तुम्हाला बोनस जरी दिला नसता आणि फक्त शुभेच्छा दिल्या असत्या, तरी आम्हाला बोनस नाही, आणि मॅनेजमेंट हरामी बोनस लाटतेय हा धागा आलाच असता.
ऑटोमोबाईल सेक्टरमधील बिग जाइन्ट्स वर अवलंबून असणारे vendor, चाकण, नाशिक या परिसरात असणारे, त्यांच्या वर्कर्स/एम्प्लॉईज २-३ महिन्यापासून पगार झाला नव्हता. दिवाळीत कसातरी या महिन्याचा पगार मिळाला म्हणून अक्षरशः देवाचे आभार मानतायेत. बऱ्याच कंपन्या बंद पडल्या आहेत, ते बेरोजगार वणवण फिरतायेत!
If you want a big fat bonus, beware you will be next big fat goat for company!!

परिचित - तुम्ही इथे साधा कंपनीचे नाव द्यायला पण घाबरता आहात मग हा धागा उघडण्याचा काय मतलब. निदान कंपनीचे नाव तरी द्या ...

हे तुमच्या कंपनीचे बोनस गिफ्ट नाही त्यामूळे तुमचा त्रागा irrelevant आहे.
मला तर नुसती चर्चा घडवून आणण्यासाठी हा काही तरी मेड अप प्रकार वाटतो आहे.
We have transferred >> Lol
Salary or bonus amounts are credited not transferred.
पुन्हा for Diwali gift नाही as Diwali gift. Lol

वडगाव बुद्रुक मधल्या जिलब्या मारुतीच्या बोळातील मोजून सवा दोन लाखाचा टर्नओव्हर असलेली कंपनी सुद्धा असले बोगस बोनस पत्रक बनवणार नाही

त्यावर Rs. 250 नंबर कमी की जास्त कसा सांगणार? 100 रुपये पगार असणार्‍यासाठी चांगला आहे की.

वडगाव बुद्रुक मधल्या जिलब्या मारुतीच्या बोळातील मोजून सवा दोन लाखाचा टर्नओव्हर असलेली कंपनी सुद्धा असले बोगस बोनस पत्रक बनवणार नाही
त्यावर Rs. 250 नंबर कमी की जास्त कसा सांगणार? 100 रुपये पगार असणार्‍यासाठी चांगला आहे की.
नवीन Submitted by हायझेनबर्ग - एक... on 30 October, 2019 -

:— परिचित यांचा पगार शंभर रुपये आहे ?

अहो मॅनेजमेंट जे पैसे कमवते ते आपल्यावर लुटायला नाही. तो त्यांच्या त्यांच्यातच राहतो. आपल्याला पगार मिळ तो ती सब्स्क्रिप्शन आहे आपल्या वेळ स्किल व मेहनतीची. उपर जो भी मिला लेनेका चुप बैठनेका. हा सल्ला नाही कोणाला. विचार शेअर करते आहे.

आमच्याकडे द्सृयाला एक मिठाईचे पाकीट मिळते ते ही मी कँटिनवाल्याला दिले त्याने बहिणीला दिले खुश होते सर्व दोन दिवस. ते अडीचशे रुपये पाकिटात घालून देवघरात ठेवावे. अडीनडी संकटात कामी येइल कंपनीची लक्ष्मी.

बोनस हा बोनस आहे तो अधिकार नाही. एखादी प्रथा पडली की त्याचे कर्मकांड, पुढे अधिकार व्हायला लागतात.

जीवनात प्रगती करायची असेल तर बोनस, आरेस्यू, ऑप्शन हे अधिकार आहेत समजून मागा. हे अधिकार नाही, चूप बसायचं असलं म.म. लॉजिक ठेवलंत तर मग बसा तिकडेच. नाही दिलं तर नोकरी बदला.

सगळं मानण्यावर शेवटी... आंम्हाला तर कुठल्याच दिवाळीला कधी बोनस मिळत नाहि पण आमची दिवाळी चांगलीच जाते.. गिफ्ट, गोडधोड दिलं जातं मात्र आंम्हाला.

हे तुमच्या कंपनीचे बोनस गिफ्ट नाही त्यामूळे तुमचा त्रागा irrelevant आहे.
मला तर नुसती चर्चा घडवून आणण्यासाठी हा काही तरी मेड अप प्रकार वाटतो आहे.
We have transferred >> Lol
Salary or bonus amounts are credited not transferred.
पुन्हा for Diwali gift नाही as Diwali gift. Lol

वडगाव बुद्रुक मधल्या जिलब्या मारुतीच्या बोळातील मोजून सवा दोन लाखाचा टर्नओव्हर असलेली कंपनी सुद्धा असले बोगस बोनस पत्रक बनवणार नाही

त्यावर Rs. 250 नंबर कमी की जास्त कसा सांगणार? 100 रुपये पगार असणार्‍यासाठी चांगला आहे की.

नवीन Submitted by हायझेनबर्ग - एक... on 31 October, 2019 - 04:00 >>> Lol

आम्हाला तर एक रुपया देखिल दिवाळी बोनस मिळत नाही, एप्रिलमध्ये मिळतो तो ही परफॉर्मन्स रेटींगनुसार , पण त्याचे वाईट कधीच वाटले नाही की दु:ख झाले

दिवाळी बोनस ही संकल्पना कधीच इतिहासजमा झालेली आहे. आता लोक कामावर घेताना जी ऑफर देतात त्यात सिटीसी म्हणजे माणसाची कॉस्ट टू कंपनी लिहिलेली असते, त्यापेक्षा एकही रुपया जास्तीचा मिळत नाही. काही प्रायव्हेट फर्म्समध्ये अजूनही दिवाळीला बोनस म्हणून पैसे देण्याची प्रथा शिल्लक असली तरच, बाकी सर्वत्र सिटीसीमध्येच सगळे असते.

दिवाळीला प्रथा म्हणून काही कंपन्या अजूनही मिठाई, ड्राय फ्रुट्स वगैरे देतात, बस. हे डब्बे देताना वरिष्ठांना थोडे मोठे डब्बे व कनिष्ठाना लहान हा भेदभाव केला जातो. बाकी दिवाळीचा बोनस मॅनेजमेंटला व इतरांना काही नाही हे कुठे ऐकले नाही. परफॉर्मन्स पे देताना मात्र मॅनेजमेंट व त्यांची लाडकी बाळे लोणी खाऊन बाकी उरलेले ताक इतरांना मिळत असते.

साधना अगदी अगदी झाले. हसरी रडकी भावली.

मला वाट्ते बोनस ही प्रथा कामगार वर्ग म्हणजे जो युनियनाइज्ड आहे. व लेबर जे शॉप फ्लोअर वर काम करतात त्यांच्या भल्यासाठी मुख्यता आहे/ होता पूर्वी. ब्लू कॉलर वर्करस. माझा मामा टेल्कोत होता तो बोनस बोनस करत असे तसेच इथे बेस्ट च्या कर्मचार्‍यांना बोनस मिळाला वगिअरे वाचनात येते.
व्हाइट कॉलर, आयटी, प्रोग्रामर इंटलेक्चुअल लेबर करणार्‍यांना आधीच इतके सवलती व सुखे असतात की अजून बोनस काय हवा आहे? असे मॅ नेजमेंट विचारू शकते. आमच्याइथे पण पर्फॉरमन्स रेटिन्ग नंतर काही एक मिळतो दसर्‍याला मिठाई बाकी काय नाय. फुकट चहा कॉफी हवी तितकी आहे.

मी टोपीमिथुन जॉइन केली तेंव्हा मला डिसेंबरला २ग्राम सोने मिळालेले, तेंव्हा आम्ही सहाशे माणसं होतो. ५००० माणसे झालो तेंव्हा चांदी मिळाली १०० ग्राम आणि मी सोडताना ६०००० माणसं होतो तेंव्हा काहीच देत नव्हती कंपनी. प्रत्येक प्रोजेक्टचं स्वतःच वेलफेअर बजेट असतं, आम्ही मॅनेजर मिळून ते बजेट एकत्र करून पार्टी द्यायचो टीमला. कधी आमच्या खिशातुन पैसे घालुन काही तरी छोट्याश्या गिफ्ट्स आणायचो. आपल्याला जमेल तसा आपण आनंद वाटायचा.

२००८ - ०९ मध्ये मार्केट स्लो होतं, नोकर्‍या जातील की काय अशी अवस्था होती. त्यावर्षी कंपनीने सगळ्या लोकांना पगारवाढ दिली नाही. निदान १००० रु महिना पगारवाढ मिळाली, काही जणांना, काहींना ३००० रु. सीईओने ह्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाहीरपणे आणि त्यावर्षी मॅनेजर आणि वरच्या ग्रेडला पगारवाढ मिळाली नाही. पुढच्यावर्षी मार्केट उचलल्यावर सगळ्यांना पगारवाढ दिली गेली.

सध्या सगळेच घाईत का असतात ? तलवारीला धार काढून तय्यार. असू शकतं एकाद्या वर्षी कमी बजेट. मॅनेजमेंट ने स्वतःला जास्ती घेतलेत असा तुमचा अंदाज आहे की खात्री? खात्री असेल तर तुम्ही समविचारी सहकारी ह्या २५० रूचं खाऊ घेऊन या नि हापिसात वाटा किंवा एकाद्या सामाजिक संस्थेला कंपनीच्या नावाने दान द्या. मेसेज योग्य ठिकाणी पोहोचेल. इथे पोस्ट करून काय फायदा, अनलेस तुमच्या कंपनीची मॅनेजमेंट टिमदेखील इथेच पडीक असते.

बॉसची नजर चुकवून मी मोबाईलमध्ये विडिओ गेम खेळत बसलो होतो, इतक्यात मोबाईलमध्ये मेसेज वाजला. पाहतोय तर पगाराच्या डबल बोनस आला होता. मला गहिवरून आलं. मी तसाच पळत गेलो आणि बॉसचे पाय पकडून माफी मागितली, बॉस म्हणाला माहित आहे तू दिवसभर मोबाईलवर चॅटिंग, गेम खेळत असतोस. कंपनी खुर्चीवर बसल्याचा पगार देते तुला. पण तू या कंपनीचा एक सच्चा एम्प्लॉई आहेस. कंपनी बंद पडायला आली असतानासुद्धा तू भविष्याचा विचार न करता नेटाने खुर्चीवर बसून टाईमपास करत राहिलास. आम्हाला तुझ्यासारख्या अनेक एम्प्लॉईची गरज आहे. यावेळी बोनस जरा कमी दिलाय पुढच्यावेळी अजून जास्त देऊ. हे ऐकून मी भावनाविवश होऊन रडायला लागलो. बॉसने मला आधार देत उठवलं आणि माझ्या खुर्चीपर्यंत मला सोडायला आला, सगळे कलिग्स माझ्याकडे कौतुकाने बघत टाळ्या वाजवत होते, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

दिवाळीला प्रथा म्हणून काही कंपन्या अजूनही मिठाई, ड्राय फ्रुट्स वगैरे देतात, बस. हे डब्बे देताना वरिष्ठांना थोडे मोठे डब्बे व कनिष्ठाना लहान हा भेदभाव केला जातो. बाकी दिवाळीचा बोनस मॅनेजमेंटला व इतरांना काही नाही हे कुठे ऐकले नाही. >>>>>>

आमच्या इथे सरसकट सगळ्यांना अर्धा किलो काजू कतली चे बॉक्सेस दिले जातात. दिवाळीत खूप प्रोग्रॅम्स असतात. लकी ड्रॉ, रांगोळी स्पर्धा, ट्रॅडिशनल ड्रेस, म्यूजिकल हौजी. लक्ष्मी पूजा. खूप धम्माल येते.

भांडवल शही नष्ट करा .
आणि कष्ट करण्याचे राज्य आणा.
सर्व खासगी उद्योग ताब्यात घेवून ते सरकारनी स्वतः चालवावे .

आमच्याकडे फक्त विवाहीत लोकांना बोनस दिला जातो.. कारण त्यांना संसाराचा गाडा खेचायचा असतो. बॅचलर लोकांना मिठाईचे डब्बे आणि ऊंची मद्याच्या बाटल्या देऊन खुश केले जाते.
त्यातही विवाहीत पुरुषांना जास्त आणि महिला कर्मचारयांना कमी दिला जातो. यामागे असे लॉजिक असते की कमावणारया महिलेचा नवराही छान कमावत असेल आणि त्यालाही त्यच्या कंपनीने बोनस दिला असेल.
तरी नशीब कोणाला किती मुले आणि ती मराठी मिडियममध्ये जातात की ईंग्लिश माधमात यावर नाही ठरवत.

>>>> यामागे असे लॉजिक असते की कमावणारया महिलेचा नवराही छान कमावत असेल आणि त्यालाही त्यच्या कंपनीने बोनस दिला असेल.>>> व्हॉट द फ!! नवर्‍यांच्या बायका देखील त्याच्यापेक्षा जास्त कमावणार्‍या नसू शकातत का? आजकाल तसाच नॉर्म बनू पहातोय Happy
मग पुरुषांना व स्त्रियांना समान बोनस द्यायलबोहवा की नको?

आमच्याकडे फक्त विवाहीत लोकांना बोनस दिला जातो.. कारण त्यांना संसाराचा गाडा खेचायचा असतो.

अती शिक्षित तेवढे अती मूर्ख अधिकारी तुमच्या कंपनी मध्ये काम करत आहेत.
ज्याचे लग्न झाले नाही त्या व्यक्तीच्या मागे आई,वडील,बहीण असते ना .
की फक्त नवरा,बायको म्हणजे कुटुंब असते का .
तुमचे manajment
मूर्ख लोकांनी भरले आहे

Pages