हे बघा एका कंपनीचे कर्मचाऱ्याना आलेली दिवाळी गिफ्ट चे इमेल. अडीचशे रुपये घ्या आणि दिवाळी एन्जोय करा म्हणतात.
अशी "गिफ्ट" कुणा कुणाला मिळाली आहेत? इथे भडास काढा.
अरे हे असले चिंधी उद्योग करण्यापेक्षा तुम्ही फक्त शुभेच्छा का देत नाही मी म्हणतो? काय मिळते यांना असे कर्मचार्यांचा अपमान करून? हि गिफ्ट नव्हे भिक आहे राव भीक. एका कंपनीने तर चक्क "जंबो पेढा", म्हणजे नेहमीच्या पेढ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा पेढा दिला होता. ते सुद्धा प्रत्येकाची "गिफ्ट" मिळाल्याची सही करून! आणि हि कंपनी बारीकसारीक नव्हे तर भारतातल्या पहिल्या चार कि पाच मोठ्या जायंट आयटी कंपनीपैकी एक आहे बरं का. ह्यांची आर्थिक उलाढाल/रेव्हेन्यू चे आकडे मिलियन आणि अब्ज डॉलर मध्ये असतात.
इतके माजोरडे असतात हे म्यानेजमेंट काही काही कंपन्यांचे. प्रोजेक्ट चालवतात कर्मचाऱ्याच्या जीवावर. त्यांच्या तोंडाला पाने पुसायची. आणि स्वत:ला मातर भरघोस दिवाळी बोनस लाटणार हXमी
वर्षाला नाही मिळाले, वर्षाने
वर्षाला नाही मिळाले, वर्षाने कट केले असे लिहिलंय ना.
फायनान्स मॅनेजर चे नाव वर्षा असेल कदाचित.
बापरे! २१००० चा काय रुल?
बापरे! २१००० चा काय रुल?
आमच्या कंपनीत सांगु नका हं
पगारातून पैसे कट करून वर्ष
पगारातून पैसे कट करून वर्ष दोन वर्षाने मिळणे हे फ्रेशर बाबत केले जाते. पोरं शिकून मधूनच पळून जाऊ नये म्हणून असे करतात. मला हे ठिक वाटते. याला बॉन्ड म्हणू शकतो. बोनसच्यामध्ये हे आणून उगाच बोनस म्हणून धतुरा मिळालेल्यांची टिंगल ऊडवू नका. दोन विषय वेगळे ठेवा.
फ्रेशर बाबत>>>>>>> नाही.
फ्रेशर बाबत>>>>>>> नाही. सरसकट रुल होता. सगळ्यांसाठीच. असोसिएट्स पासुन प्युन पर्यंत.
बोनस म्हणून धतुरा>>>>>>> धतुरा कुणाला मिळाला?
कम्पनी कडुन मिळालेली कोणतीही
कम्पनी कडुन मिळालेली कोणतीही गोष्ट received म्हणून सही करून घ्यायला लोकांना कमीपणा का वाटतो?
वर 2 3 प्रतिसादात मिठाई चे डबे सही करून घ्यायला लागले म्हणून लोकांनी नाराजगी व्यक्त केली आहे.
सही करून घेताना अपमान नाही
सही करून घेताना अपमान नाही वाटतं..पण घेताना दिवाळीच्या शुभेच्छाही देत नाही ..हे जरा खटकतं...आणि घ्यायचे तर घ्या नाहीतर मरा हा mgmt चा अॅटीट्यूड कुठेतरी खटकतो.
आधीच्या कंपनीत GM स्वतः डेस्कवर येऊन मिठाई देऊन छान विश करून अलिगन वैगैरे देऊन जायचा....छान वाटायचं तेव्हा..
कर्मचारीप्रती असलेली भावना महत्वाची....
मागे मला Employee of the month चा अवार्ड मिळालेला...
मी सुट्टीवर होतो तेव्हा.. सुट्टीवरून आल्यावर आलो तेव्हा GM ने कॅबीनमध्ये बोलवलं आणि आणि त्याच्याच एका ड्राॅवरमधून सर्टिफेकट काढायला लावलं आणि घेऊन जा म्हणून सांगितलं...
असू दया तरीही कंपनीचा शतशः मी ॠणी आहे कारण ह्या चार वर्षात माझी सहनशक्ती प्रचंड वाढली आहे...
त्याच्याच एका ड्राॅवरमधून
त्याच्याच एका ड्राॅवरमधून सर्टिफेकट काढायला लावलं आणि घेऊन जा म्हणून सांगितलं>>>> बापरे !
त्याच्याच एका ड्राॅवरमधून
त्याच्याच एका ड्राॅवरमधून सर्टिफेकट काढायला लावलं आणि घेऊन जा म्हणून सांगितलं
>>>>
चांगला अनुभव आणि विषय आहे... तुमच्या कॉमेडीत वापरा
आजकाल भ्रष्टाचार सगळी कडे आहे
आजकाल भ्रष्टाचार सगळी कडे आहे, कंपनीचे गिफ्ट कर्मचार्यांना न देता स्वत:च्या घरी नेणे, नातेवाईकांना देणे असला प्रकार करणारे खुप आहेत. म्हणुन निट हिशोब रहावा अन ज्याची वस्तु त्यालाच मिळावी म्हणुन देखिल सही घेतात बरेच जण, अर्थात त्यातही घोटाळे होत असतीलच म्हणा.
GM कंपनीचा मालक आहे की
GM कंपनीचा मालक आहे की तुमच्यासारखाच एम्प्लॉयी आहे?
Employee आहे हो...पण काही
Employee आहे हो...पण काही वरच्या लोकांना कंपनी त्यांच्या बापाचीच आहे असं वाटायला लागतं..
मग हा एक एम्प्लॉयी दुसऱ्या
मग हा एक एम्प्लॉयी दुसऱ्या एम्प्लॉयी ला वाईट वागवतो असा इश्यू होतो ना? कम्पनी = कम्पनी पॉलिसी जर जागच्या जागी असतील तर कम्पनी मॅनेजमेंट ने आपला अपमान केला असे का समजून घ्यायचे?
कम्पनी पॉलिसी प्रमाणे तुम्हाला मिठाई चा डबा द्यायचे ठरले, सर्वांना मिलालाय हे समजण्यासाठी सही घेऊन पोच घेतली,
आता त्या पुढचा ह्युमन टच तुमच्या GM ने दिला नाही ( दिला असता तर कर्मचाऱ्यांच्या moral वर नक्की पॉझिटिव्ह परिणाम झाला असता) मग त्या साठी कम्पनी ने आमचा अपमान केला असे का समजावे बरे?
हा !! मुळात नुसता मिठाई चा डबा देणे हेच शान के खिलाफ वाटत असेल तर गोष्ट वेगळी.
बोकलत मोड ऑन>>>
बोकलत मोड ऑन>>>
आमच्या कंपनीच्या सिईओने सगळ्या एम्प्लॉयीजना सव्वाशे रुपयांचं गिफ्ट दिलं. लोक संतापले पण मी संतापलो नाही. मी त्या पैशांचं लॉटरी तिकीट काढलं. मग मला एक कोटींची लॉटरी लागली. पण मी तिथेच थांबलो नाही, मी त्या सगळ्या पैशांची पॉवरबॉल तिकिटं काढली. पुढे पॉवरबॉल मध्ये पाचशे मिलियन डॉलर लागल्यावर मी कंपनीच खरेदी केली आणि सर्वांना दिवाळी गिफ्ट म्हणून मर्सिडिज वाटल्या. मॅनेजर लेवलच्या लोकांना लँबॉर्घिन्या दिल्या. नंतर त्या हरामखोर सीईओला पदावरून काढून चहावाल्याच्या कामावर ठेवला. आता तो रोज दुपारी चहा घेऊन येतो तेव्हा त्याला आम्ही सव्वाशे रुपये टिप देतो.
<<<बोकलत मोड ऑफ...
धाग्यातला मजकूर आणि केस मेड
धाग्यातला मजकूर आणि केस मेड अप/फेक आहे पण अजय चव्हाण ह्यांची केस इंटरेस्टिंग आहे.
अजय बॉस असे वागला ह्याचे कारण त्याचा employee of the month ह्या process वर विश्वास नसेल असेही असू शकते.
बर्याच ठिकाणी ही फॉर्मल rotational प्रोसेस असते. बोनस न देता कामाचे recognition म्हणुन दर महिन्याला एका एम्प्लॉईला हे द्यायचे. मग हा प्रकार नुसता formality होतो.
तुमच्याकडे असे नसले तर चांगले आहे आणि तसे असेल तर बॉस च्या अपेक्षा जास्त आहेत आणि त्याच्या लेखी ह्या recognition चे महत्त्व शून्य आहे. It just means that he is more practical than emotional.
ऋन्मेष - ऑफिस स्टाफ ,
ऋन्मेष - ऑफिस स्टाफ , सिक्युरिटी शक्यतो कंपनी चे एम्प्लॉय नसतात. मोस्टली थर्ड पार्टी कन्सल्टन्सी चे असतात.
सपोर्ट (ऑफिस) स्टाफ रेवेन्यु
सपोर्ट (ऑफिस) स्टाफ रेवेन्यु जनरेट करत नसल्याने बोनस करता सहसा पात्र ठरत नसतो. रेवेन्यु जनरेटर्स (आमच्या भाषेत रेन मेकर्स - सेल्स, डिलिवरी इ.) यांच्या सॅलरीचा बोनस हा एक कांपोनंट असतो. शिवाय बोनस हा व्हेरिएबल पे असल्याने तो किती दिला जावा, कुठल्या फॅक्टर्स वर अवलंबुन असावा याच एक वेल डिफाइंड रुलबुक असतं...
भारतात दिवाळीला बोनस देतात त्यात दोन प्रकार आहेत. १. वर म्हटल्या प्रमाणे पर्फॉर्मंस बेस्ड, आणि २. सणासुदिला दिला जाणारा.
पहिल्या प्रकारात केपिआय्ज, फॉर्म्युला वगैरे असल्याने थोड्याफार प्रमाणात ट्रांस्परंसी असते. दुसरा प्रकार गुडविल जेस्चर मध्ये मोडत असल्याने तक्रार करायला जागा नाहि. इथे सुद्धा काहि कंपन्या ख्रिसमस पार्ट्या देतात, काहि देत नाहित...
मग हा एक एम्प्लॉयी दुसऱ्या
मग हा एक एम्प्लॉयी दुसऱ्या एम्प्लॉयी ला वाईट वागवतो असा इश्यू होतो ना? कम्पनी = कम्पनी पॉलिसी जर जागच्या जागी असतील तर कम्पनी मॅनेजमेंट ने आपला अपमान केला असे का समजून घ्यायचे? >>> सिम्बा - ते एखाद्या peer ने केलेल्या अपमानाबद्दल बरोबर आहे. पण जीएम हा त्याच्या ऑर्गनायझेशन्/टीम/डिपार्टमेण्ट मधल्या लोकांकरता कंपनी मॅनेजमेण्टचा प्रतिनिधी असतो. त्याचे वागणे हे कंपनीचे वागणे कोणी समजले तर ते बरोबरच आहे.
Employee of the month ला स्वतःच ड्रॉवर मधून सर्टिफिकेट घे म्हणून सांगणे ही उच्च दर्जाची अॅ***री आहे
डिलबर्ट च्या त्या डोक्यावर शिंगे असल्यासारखी हेअर स्टाइलवाल्या बॉस सारखी.
Employee of the month वगैरे
Employee of the month वगैरे मिळते तेव्हा बहुधा उलटे चित्र असते. मॅनेजमेंट आनंदाने कौतुक करते, पोकळ स्तुती करते keep up the good work म्हणुन पाठीवर थाप मारते कारण it costs nothing. Improved employee satisfaction at zero cost to the company. आणि employee असे recognition मिळाल्यावर पोकळ कौतुक केल्याबद्दल शिव्या देतात.
मी तुमच्या जागी असतो तर दोन पैकी एक काम केले असते.
बॉसला सरळ विचारले असते तुला हे recognition महत्त्वचे का वाटत नाही
किंवा
चहा, कॉफी स्नॅक्स चे डाग पाडून ते घाणेरडे सर्टिफिकेट माझ्या डेस्क वर सगळ्याना येताजाता बघायला ठेवले असते.
GM जे वागला ते डिफेन्ड नाहीच
GM जे वागला ते डिफेन्ड नाहीच करत आहे,
पण GM ने हसून विश केले नाही, परस्पर सह्या करून बॉक्स घ्यायला लावले, ते आम्हाला अपमानास्पद वाटले म्हणून आम्ही ते बोक्सेस अनाथाश्रमास देऊन टाकले हे रॅशनल पटले नाही इतकेच.
GM जे वागला ते डिफेन्ड नाहीच
. डबल प्रतिसाद
भारतात दिवाळीला बोनस देतात
भारतात दिवाळीला बोनस देतात त्यात दोन प्रकार आहेत. १. वर म्हटल्या प्रमाणे पर्फॉर्मंस बेस्ड, आणि २. सणासुदिला दिला जाणारा.>> भारतात payment of bonus act आहे जरा प्लिज वाचणार का?
(No subject)
>>भारतात payment of bonus act
>>भारतात payment of bonus act आहे जरा प्लिज वाचणार का?<<
लंपनशेठ, वाचनाबरोबर कांटेक्स्ट पण जरा बघा. लेखात संदर्भ दिलेली कंपनी जायंट आय्टी कंपनी आहे; माझी पोस्ट सुद्धा त्याच संदर्भात आहे. इथे लिहिणारे/वाचणारे सगळे महिना २१,००० पेक्षा जास्त पगार घेत असतील या माझ्या गृहितकाला छेद जात असेल तर गोष्ट वेगळी. आता तुमचा अनुभव, (जायंट आय्टी कंपनीत दिला जाणारा बोनसच्या बाबतीतला) मी मांडलेल्या दोन मुद्द्यांव्यतिरिक्त असेल तर सांगा. वाचायला आवडेल...
हा.ब. बरोबर बोलतोय तुम्ही पण
हा.ब. बरोबर बोलताय तुम्ही पण कुठेतरी पोटाचा विचार करावा लागतो..
म्हणून शांत बसावे लागते...
तसही त्या मानसन्मानामुळे माझं घर चालणार नाही पण महिन्याला मिळणार्या पगारावर चालेलं....मला पगार महत्वाचा वाटला..
आणि ठीक आहे.. हे ही दिवस जातील...मी चांगलं काम करतो ना बस..मला समाधान मिळत ना बसं...माझा GM चुकीचा वागला म्हणून मी चुकीचा वागलो तर त्याच्यात माझ्यात काय फरक राहणार आहे?
कधी कधी सोडून द्यायच्या ह्या गोष्टी...नाहीतर एका अपमानामुळे महाभारत घडलं..हे माहीत असेलच तुम्हाला..
@ सिम्बा डब्बे आम्ही
@ सिम्बा डब्बे आम्ही स्वखुशीने दिले आहेत..
GM ने हसून दिले नाहीत म्हणून नाही .
दोन्ही वेगवेगळे किस्से आहेत...
राजशेठ 21000 च्या लिमिटमध्ये
राजशेठ 21000 च्या लिमिटमध्ये बेसिक प्लस डी ए आहे फक्त. इथल्या जायंट आयटी कंपन्या रादर बऱ्याच मोठ्या कम्पन्या बेसिक कमीच ठेवतात. आणि इतर allowances hra etc बक्कळ असतो. गेल्या काही वर्षांत हाय कोर्टाची जजमेंट बघायला मिळतील ज्यात कोर्टाने ह्यावर ताशेरे ओढलेत, पी एफ चे काँट्रिब्युशन असो अजून काही असो हे बेसीक शी रिलेटेड आहे म्हणून हा घाट. जायंट आयटी कम्पन्या मध्ये ह्या कारणावरून पी एफ आणि इतर ऑफिसेस चा ससेमिरा लागला आहे मागच्या दोन तीन वर्षां पासून कामगारांच्या पगाराचा पॅटर्न बघायला.
जायंट आयटी कम्पन्यांचे
जायंट आयटी कम्पन्यांचे employment pattern त्यांचे बॉण्ड लिहून घेणे, ट्रेनी म्हणून फ्रेशर घेणे आणि सहा महिन्यांत हकालपट्टी, अगदी वेल
experienced engineer la apprentice म्हणून घेणे, दोन महिन्यांच्या पगारावर retrenchment करणे हे सगळे अगदी दोन्ही बाजूने (co and employee) बघितलं आहे.
सपोर्ट (ऑफिस) स्टाफ रेवेन्यु जनरेट करत नसल्याने बोनस करता सहसा पात्र ठरत नसतो. >> अत्यन्त चूक. हे कम्पनीचे कामगार असतील तर झकत द्यावा लागेल बोनस.
इथे लिहिणारे/वाचणारे सगळे
इथे लिहिणारे/वाचणारे सगळे महिना २१,००० पेक्षा जास्त पगार घेत असतील या माझ्या गृहितकाला छेद जात असेल तर गोष्ट वेगळी. >> बेसिक 21000 बऱ्याच जणांचा नसेल.
बोनस बद्दल माहिती:-https:/
बोनस बद्दल माहिती:-
https://youtu.be/p76Fyuo6XIg
उच्चपदस्थ कामगारांच्या
उच्चपदस्थ कामगारांच्या appointment letter मध्ये अजून एक आढळणारी गोष्ट म्हणजे non compete clause ज्यानुसार त्या कामगाराला आधीची कम्पनी सोडली की इतर ठिकाणी (त्याच क्षेत्रातील) 2/3 वर्षे काम करता येणार नाही. हे असलं काही कायद्याच्या पुढं न टिकणार आहे पण बऱ्याच जणांना हे कायद्याच्या विरोधात आहे हे माहित नसतं.
अजून एक गैरसमज म्हणजे आयटी इंजिनिअर जे managerial / supervisory capacity मध्ये आहेत त्यांना कामगार कायद्याचं संरक्षण मिळणार नाही पण इतर सर्वांना ते आहे. जायंट आयटी मध्ये सगळेच काही सुपर्वयजरी कपॅसिटी मध्ये नसतात. हे अवांतर आहे पण वरच्या बऱ्याच पोस्ट वाचून किती पिळवणूक चालू आहे ते समजत आहे.
Pages