कंपनीची दिवाळी भेट कि कर्मचाऱ्यांचा अपमान?

Submitted by Parichit on 30 October, 2019 - 12:04

हे बघा एका कंपनीचे कर्मचाऱ्याना आलेली दिवाळी गिफ्ट चे इमेल. अडीचशे रुपये घ्या आणि दिवाळी एन्जोय करा म्हणतात.image002.jpg

अशी "गिफ्ट" कुणा कुणाला मिळाली आहेत? इथे भडास काढा.

अरे हे असले चिंधी उद्योग करण्यापेक्षा तुम्ही फक्त शुभेच्छा का देत नाही मी म्हणतो? काय मिळते यांना असे कर्मचार्यांचा अपमान करून? हि गिफ्ट नव्हे भिक आहे राव भीक. एका कंपनीने तर चक्क "जंबो पेढा", म्हणजे नेहमीच्या पेढ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा पेढा दिला होता. ते सुद्धा प्रत्येकाची "गिफ्ट" मिळाल्याची सही करून! आणि हि कंपनी बारीकसारीक नव्हे तर भारतातल्या पहिल्या चार कि पाच मोठ्या जायंट आयटी कंपनीपैकी एक आहे बरं का. ह्यांची आर्थिक उलाढाल/रेव्हेन्यू चे आकडे मिलियन आणि अब्ज डॉलर मध्ये असतात.

इतके माजोरडे असतात हे म्यानेजमेंट काही काही कंपन्यांचे. प्रोजेक्ट चालवतात कर्मचाऱ्याच्या जीवावर. त्यांच्या तोंडाला पाने पुसायची. आणि स्वत:ला मातर भरघोस दिवाळी बोनस लाटणार हXमी Angry

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडक्यात:
कष्टाळू, हुशार, प्रामाणिक लोकांच्या जीवावर मूर्ख, कामचोर, दुष्ट मॅनेजमेंट भरपूर पैसा कमावत असते, लोकांना छळत असते.

मुर्ख मॅनेजमेंट जराही नाही
आमची मॅनेजमेंट लोकशाहीत राहून काम करते.
प्रस्ताव मांडला जातो आणि वोटींगनुसार पास होतो.
अविवाहीत लोकांनाही काही फॅसिलिटी आहेत. जसे की गर्लफ्रेंड अलाऊन्स मिळतो. कॉफीशॉप अन कंदीललाईट डिनरची बिलं मात्र सबमिट करावी लागतात. एकापेक्षा जास्त गफ्रेंड असल्या तरी मेन गर्लफ्रेंडचीच बिलं पास होतात.
मात्र ईथेही महिलांना बॉफ्रेंड अलाऊन्स मिळत नाही. त्यांची बिलंही उलट बॉफ्रेंडच भरत असणार हे गृहीत धरून तुमची तर मज्जा आहे म्हणून चिडवले जाते.

बोनसचा पैसा काही अंत रीक्षातून येत नाही. कंपनीला फायदा झाला तर त्या पैश्याचे बोनस वाटप
आणि कंपनीला फायदा कमावून द्यायला काही एलियन्स अवतार घेत नाहीत. कर्मचारयांनाच काम करावे लागते.
हे लक्षात घेता आमच्याईथे सिंपल रूल आहे. ज्याची गणपतीची सुट्टी कमी त्याला दिवाळीत बोनस जास्त आणि व्हाय से वर्षा

मी एकंदरीत लोकांच्या सूराबद्दल बोलतोय.
>>>>
मानवमामा गल्ली चुकली. हा धागा बोनसचा आहे सूरांची चर्चा करायला सारेगामापा किंवा ईंडियन आयडल नाही.

आयडलवरून आठवले. ज्यांच्या कामाचे तास बिलेबल असतील त्यांनीच बोनसवर हक्क सांगवा. जर आयडल तास जात असतील तर पगार पुर्ण मिळतोय हेच खूप

अपमान नाय तर काय. अपमानच आहे हा कर्मचार्‍यांचा.
आम्हाला दरवर्षी दिवाळी बोनस मिळतो. आणि प्रत्येकी एक किलो मिठाई. जी डायरेक्टरपासुन सबस्टाफ पर्यंत सगळ्यांना सारखीच असते.
ह्या वर्षीही मिठाई आणि बोनस मिळाला.
पण ह्या वर्षी जास्त बिझनेस जास्त टर्नओव्हर अजुन काय काय जास्त म्हणून प्रत्येकाला (डायरेक्टरपासुन सबस्टाफ पर्यंत सगळ्यांना) ५ ग्राम चं सोन्याचं तनिश्कचं नाणंही दिलंय.
आम्हाला १० ग्रामचं नाणं हवं होतं. दिलं पाच ग्रामचं.
हा आमचा अपमान आहे. त्याचा निषेध कसा व्यक्त करावह? आयडीया द्या साठी मी नवा धागा काढणार आहे.

दहा ग्रॅमचं नाणं दिलं तरी तो अपमानच झाला असता, तुम्ही दहा मागितले तर निदान १२ - १४ ग्रॅमचं तरी द्यायला हवं.

तनिश्क मायबोलीवर नाही. म्हणजे नसेल. म्हणून धागा काढणार नाही.

मानवकाका, आम्ही दहा ग्राम वैगेरे काही मागितलंच नव्हतं. Happy
असंच लिहिलंय. अपमान वाटुन घ्यायला कायतरी निमित्त हवं ना Wink Happy

कोण बच्चा?
बादवे, ते तनिष्क आहे.

तुमचा लेख वाचून लक्षात आलं की आम्हाला तर या वर्षी दिवाळीला काहीच मिळालं नाही. मागच्या वर्षी चॉकलेट चा बॉक्स मिळाला होता, त्या आधी आठवत नाही. पण काही वर्षां पूर्वी काही गिफ्ट मिळाल्याचं आठवतं आहे. या वर्षी काहीच नाही.
दिवाळीला बोनस वगैरे देण्याचं फॅड ज्याने काढलं त्याचा हा दोष आहे. पूर्वी ते सर्व ठीक आहे पण आजकाल लोकांचे पगार लाखोंमध्ये असतात. आणि बोनस किंवा दिवाळी गिफ्ट च्या अपेक्षा त्याहून जास्त. आम्हाला एक वर्षी सुंदर स्लिंग बॅग मिळाली होती तेव्हा लोक क्वॅलिटी आणि रंगावर ताशेरे झाडात होते. दरवर्षी जे मिळेल त्यावर नाराजी व्यक्त करणे हे मी कायम पाहात आले आहे.

काहीच अपेक्षा ठेवली नाही तर अपेक्षाभंग होत नाही. अगदीच काही दिले नाही असे नको त्यामुळे जे मिळाले त्यात समाधान मानणे उत्तम.
आणि वर कुणीतरी लिहिलं आहे ते खरं आहे की या काळात नोकरी टिकून आहे तेच दिवाळी गिफ्ट.

आजकाल लोकांचे पगार लाखोंमध्ये असतात>>>>>. सगळ्यांचेच पगार लाखात नसतात.
आमच्या सबस्टाफचा पगार १५००० आहे. त्याला एक सॅलरी मिळाली बोनस. तर म्हणे मॅडम आता मुलीची फी भरुन मोकळा होतो. बरं वाटलं.

पण जे मिळेल त्यावर नाराजी व्यक्त करणे ह्याच्याशी सहमत. कारण वरचाच मुलगा म्हणे सोन्यापेक्षा कॅशच मिळाली असती तर बरं झालं असतं. Uhoh Lol

नवीन बोनस कायद्यानुसार ज्यांचे वेजेस ( basic+da) 21000 पेक्षा कमी आहे त्यांना सर्वाना बोनस देणे बंधनकारक आहे कम्पनीसाठी. दिवाळीमध्ये बऱ्याच जणांना मिळतो कारण ह्याच कायद्याप्रमाणे आर्थिक वर्ष सम्पल्यानंतर आठ महिन्यात बोनस द्यावा लागतो.

हजारो/लाखो वगैरे रुपये पगार असणारे जे लोक दोन-अडीचशे रुपये बोनस ने सुद्धा खुश होतात किंवा इतरांना खुश होण्याचा सल्ला देतात, ते लोक गुगल पे च्या "बक्षिसाने" सुद्धा असे खुश होत असतील नाय???...

Untitled.jpg

ऑन ए सिरीअस नोट.आमच्याक्डे ऑफिसस्टाफला बोनस नसतो.
का नसतो माहीत नाही. कोणाला काही निय्मांची आयड्या?

असो
मग आम्हीच बाकीचे सारे ५००-१००० आपल्या ऐपतीनुसार्
कॉन्ट्रीब्युशन काढून त्यांना देतो.

आधी आम्हाला वर्षातून दोन वेळा बोनस मिळायचा.
नाही.. नाही...इतकीही आमची कंपनी उदार दिलाची नाहीये..
प्रत्येक महिन्यातून काही रक्काम सॅलरीमधून वजा व्हायची आणि तीच रक्कम एकसाथ सहा - सहा महिन्याला अशी मिळायची....पण जर एका कर्मचार्याने बोनस मिळायच्या महिनाआधी जरी पेपर टाकला तर त्याला तो बोनस मिळत नसत..मग एकदा ऑडीट झालं आणि कंपनीचे बांबू लागले...झक मारून लुबाडलेले पैसे द्यावे लागले..अगदी सहा महिन्यापूर्वी ज्यांनी जाॅब सोडला त्यांनाही कापलेले पैसे परत मिळाले..

मग बोनसच बंद झाला..ह्या दिवाळीत 200 ग्रॅमचा मिठाईचा डबा मिळाला...तो ही तुम्ही जाऊन घ्यायचा..मजदूरीसारखी कागदावर सही करायची आणि घेऊन यायचा.

आमच्या टीमने हे असले डबे घरी न नेता अनाथआश्रमात दिले...

पण आमच्या कंपनीकडून अपेक्षाच नाही कुणाला...सब के सब बस दिन काट रहे है....कंपनीच नाव नाही सांगणार पण आमच्या क्षेत्रातली टाॅप 3 कंपनी आहे....नाम बडे दर्शन खोटे..

आमच्या पूर्वीच्या कंपनीचा बॉस म्हातारा झाला होता, पण त्याचा डांबिसपणा काही गेला न्हवता.दिवाळी आली कि तो बोनस वाटायला बिल्डिंगच्या टेरेसवर जायचा. त्याच्याकडे दहा रुपयांच्या नोटांनी भरलेले पोते असायचे. टेरेसच्या कठड्यावर उभा राहून तो पैसे फेकायचा. ते पैसे गोळा करायला सगळे एम्प्लॉई खाली जमलेले असायचे. पैसे वरून पडायला लागले कि सगळ्यांची एकच झुंबड उडायची. अनेकांना दुखापत व्हायची पण दिवाळी सण आहे म्हणून सगळे दुखापत विसरून पैसे गोळा करायचे. हे सगळं होत असताना सोबतीला डीजे लावला जायचा आणि याचं लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं. दुसऱ्या दिवशी सगळ्या कंपनीला ते लाईव्ह रेकॉर्डिंग दाखवलं जायचं आणि सगळे त्याचा आनंद घ्यायचे.

अजय चव्हाण, मी मध्यंतरी एका कंपनीत इंटरव्यु दिलेले. तिथे फायनल इंटरव्यु मधे मला अशी स्कीम सांगितली. माझ्याच ठरलेल्या सीटीसी मधुन काही अमाउंट, मला वाटतं १५%, प्रत्येक पगारातुन कट होणार आणी ती डायरेक्ट नोकरी सोडतानाच मिळणार Uhoh सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरीयेड कंम्प्लिट केला असेल तरच मिळणार. ५ महिन्यात कोण सोडुन जात असेल तर ते प्रत्येक पगारातुन कापुन गेलेले पैसे मिळणार नाहीत.
मी ऑब्जेक्शन घेतलं तर म्हणे एफ्डी आहे असं समजा. बिनव्याजाची एफ्डी Lol

सस्मित आमच्याइथे पण अगोदर असच होतं... अन काहिजण मध्येच सोडुन जायचे तेव्हा बॉस मुद्दाम त्यांना थोडी अडवणुक करायचा पण पैसे मात्र सगळ्यांचे दिले .. आता त्यांचा मुलगा पाहतो बिजनेस तर हे सगळं त्याने बंद केलं.. Happy

मानव, कोण वर्षा?तुमचे पैसे तिला का मिळाले? ☺️☺️☺️
(पीजे मारणे ही अत्यंत व्यसनी सवय असते)
आमच्या आधीच्या कंपनीत कराची स्वीटस चा मोठा बॉक्स मिळायचा.आता हाऊसकिपिंग आणि आम्हाला अन्युअल गिफ्ट म्हणून सॅक मिळतात.त्या घेऊन जाताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो.टीशर्ट च्या बाबत मात्र कोणाला गळे आवडत नाहीत कोणाला बाहीची फॅशन सूट होत नाही कोणाला रंग आवडत नाही.एका वर्षी मागे 'वी डिड ईट' असं लिहिलेला टीशर्ट मिळालाय होता, त्यावर जरा वाईट जोक्स झाले. पण 'गिफ्ट' या स्वरूपात मिळालेलं काहीही आनंद देतंच.

Pages