वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीकी ब्लाईंडर्स चे फॅन्स नाहीत का कोणी ईथे?
एका ओळीत पीकी ब्लाईंडर्स बद्दल सांगायचे म्हणजे.. न्यूयॉर्क मध्ये घडणार्‍या ईटालियन गॉडफादरचे तीन पार्ट्स एकसंध करून दाखवले आणि थोडा काळ मागे नेला की झाले पीकी ब्लाईंडर्स.. जुन्या लंडन मध्ये घडणारी आयरिश माफिया फॅमिलीची ही मोठी कथा आहे.
मायकेल कॉर्लिऑन = टॉमी शेल्बी.

Godfather सारखेच ह्यात सुद्धा एकसे एक कसलेले actors आहेत.
Cillian Murphy, Tom Hardy, Adrian Brody.

स्टोरीलाईन आणि कन्सेप्ट मध्ये नावीन्य नसल्याने Must watch आहे असे म्हणणार नाही पण acting आणि एकंदर ड्रामा effect जबरदस्त आहे.

नेटफ्लिक्स.
आधी ऐकला नसल्यास जुन्या आयरिश कम ब्रिटिश अ‍ॅक्सेंटशी जुळवून घ्यायला वेळ लागू शकतो.

हो आहेत! पण (तुला तर माहितच आहे) खरी मजा त्या अ‍ॅक्सेंटमध्येच आहे. (ह्यात तसा ब्रिटिश जास्त आणि आयरिश अ‍ॅक्सेंट कमी आहे जो मला फार आवडतो ऐकायला.. कवितेच्या ओळी वाचल्यासारख्या हार्ड आयरिश अ‍ॅक्सेंट बोलणार्‍याचा टोन सारखा वर खाली वर होत राहतो)

ह्यात पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांच्या दरम्यानचा लंडनमधला काळ दाखवला आहे ज्यात पीकी ब्लाईंडर्स नावाची आता सिविलिअन झालेल्या माजी सैनिकांची माफिया गँग खरोखर अस्तित्वात होती. काही खरी ऐतिहासिक पात्रे ऊदा. विन्स्टन चर्चिल आणि खर्‍या ऐतिहासिक घटना ऊदा. आयरिश क्रातिकारकांची भुमिगत चळवळ/ऊठाव वगैरे येतात त्यामुळे एकंदर ड्रामा खूप रिअल वाटत राहतो.

शुद्ध देशी च्या मराठी वेब सिरीज कायम भरपूर रोमान्स असलेल्या / शरीर प्रदर्शन करणाऱ्या अशाच असतात. तरुणाईला खेचून घेण्यासाठी असे सीन्स टाकतातच टाकतात . सगळे विषय यंग जनरेशन ला खेचून घेणारे . लग्नाआधी प्रेग्नन्ट रहाणे इत्यादी इत्यादी Happy

फॅमिली मॅन बद्दल मला एक शंका आहे. सर्वात शेवटी जेव्हा मूसा ला कळते की त्याची आई दिल्लीत आहे व ती "ऑपरेशन झुल्फिकार" मुळे विषारी गॅस गळती होऊन मरु शकते तेव्हा तो मोहीम डिले करण्याचा निर्णय घेतो... जे साजिद ला पटत नाही व त्यांची मारामारी होते.
त्या आधीच ते केमिकल फॅक्टरीतून सगळे सेट करुन दिल्ली बाहेर निघालेले असतात ना? ते काही परत जात नाहीत थांबवायला.............
मग ती गळती तर चालू होतेच की!
की कसे?

मग ती गळती तर चालू होतेच की! >>> हो, त्याच वळणावर तो सिझन संपवला आहे. एक चूकही किती महागात पडू शकते ते दाखवायला.

मनी हेस्ट च्या दुसर्‍या भागात इन्स्पेकतर राकेल प्रोफेसर सोबत कधि सामील होते ? कि तेहि पूर्विपासून ठरलेले असते ?

आणि ते सगळे देश सोडून कसे बाहेर पडतात ??

मनी हेस्ट च्या दुसर्‍या भागात इन्स्पेकतर राकेल प्रोफेसर सोबत कधि सामील होते ? कि तेहि पूर्विपासून ठरलेले असते ? ? >>> ठरलेले नसते. तिची टीम तिच्यावरच शंका घेते म्हणून ती professor ला सामील होते

नी हेस्ट च्या दुसर्‍या भागात इन्स्पेकतर राकेल प्रोफेसर सोबत कधि सामील होते ? कि तेहि पूर्विपासून ठरलेले असते ? ? >>>ती प्रोफेसर च्या प्रेमात पडते आणि त्याला जॉईन करते.

मॉडर्न लव्ह चे ३ एपिसोड पाहिले. तिसरा सर्वात आवडला. Anne Hathaway चं काम पहिल्यांदाच इतकं आवडलं.
पहिला एपिसोड पण छान आहे. दुसरा देव पटेलचा फारसा नाही आवडला. आता बाकीचे पाहिणार आहे. Another winner in Prime's cap!

Modern love आवडली काही भाग अफाट सुंदर आहेत. पहिला तिसरा सहावा आणि सातवा खूप आवडले.

नेट फिल्कस वर वाॅकिंग डेड चा तिसरा सिजन चालू आहे जबरदस्त आहेत एक एक ऐपिसोड बघणार्याला खिळवून ठेवतात. असलेल्या भीती दायक वातावरणात होणारी नात्यातील घालमेल, विरोध, प्रेम, आपुलकी अशी वेवगवेगळ पदरे दिग्दर्शकाने लिलया हातळली आहेत .हळूहळू बघता बघता आपण सुद्धा त्यातीलच एक कधी होऊन जातो कळत नाही ....फक्त एकच कापाकापी बघण्याच धाडस ठेवाव लागेल

नेट फिल्कस वर वाॅकिंग डेड चा तिसरा सिजन बघणं चालू आहे. झोंबी मुळे गावंगाव इन्फेक्टेड होतात .त्यातून जे वाचले त्यांचा जगण्याचा संघर्ष चालू होत अशी एकंदरीत कथा आहे .जबरदस्त आहेत एक एक ऐपिसोड बघणार्याला खिळवून ठेवतात... आजूबाजूला असलेल्या भीती दायक वातावरणात होणारी नात्यातील घालमेल, विरोध, प्रेम, आपुलकी अशी वेवगवेगळ पदरे दिग्दर्शकाने लिलया हातळली आहेत .हळूहळू बघता बघता आपण सुद्धा त्यातीलच एक कधी होऊन जातो कळत नाही ....फक्त एकच कापाकापी बघण्याच धाडस ठेवाव लागेल

Family man , बघून संपवली. आवडली.
साजिद सगळ्यात जास्त आवडला.

Perfect वळणावर संपवली.
श्रीकांत आणि JK खुश आहेत. झोया हतबल , मिलिंदने आशा सोडली , मूसा आणि साजिद ...... .
खरं काय झालय याची कल्पना कोणालाही नाही.

पिकी ब्लाइंडर्सचे दोन सिजन संपवले. जबरदस्त सिरीज आहे. पहिल्या महायुद्धानंतरच लंडन मस्त उभं केलंय. थरारक, वेगवान! रेसिंग, पब, माफिया फॅमिलीज आणि वंशपरंपरागत दुष्मनी. मालमसाला खच्चून भरलाय.
मर्फी मला कधीच आवडत नव्हता, (बॅटमॅन मुळे असेल) पण यात मर्फी त्याच्या जागी फिट बसतोय. सॅम निलही बऱ्याच दिवसांनी मला एका भारी भूमिकेत दिसला.
दुसऱ्या सीजनची हायलाईट म्हणजे टॉम हार्डी. जबरदस्त ज्यू रंगवलाय!!!!

फॅमिली मॅन मस्तच आहे. सगळ्यांची कामे मस्त!
श्रीकांत व त्याची टीम किती खरी वाटते!
आणि परफेक्ट वळणावर संपविली तर आहेच! पुढे काय होईल याची उत्सुकता ठेवून!

झी५ ची भ्रम बघितली.
कल्की, भुमिका चावला, संजय सूरी, एजाज खान आहेत.
अनावश्यक सेक्स सीन्स आहेत.
ठीकठाक भयकथा. काही सीनमधे खरंच भिती वाटली.
शेवट मला जरा कायपण वाटला. Happy

झी ५ भारताबाहेर बघता येईल का ?अल्ट बालाजी आणि झी ५ एकत्र झाल्यात का? अल्ट बालाजी च्या अँप वर झी ५ चा लोगो दिसतोय पण सिरीज नाहीयेत.

पिकी ब्लाइंडर्स >>> याबद्दल गेल्या रविवारी लोकसत्ता पुरवणीत मोठा रिव्ह्यू टाइप लेख आला होता. मला टॉम हार्डीसाठी बघाविशी वाटतेय.

bbc & hbo यांची his dark materials हि फँटसी सिरीज आलीय जी अर्थात हॉटस्टार वर उपलब्ध आहे. बिग बजेट सिरीज आहे गॉट सारखी .

disney ने स्टारवॉर्स निगडित the mandalorian हि अजून एक अशीच भव्य सिरीज आणलीय जी अर्थातच भारतात अजून उपलब्ध नसून टॉरेन्टवरच मिळेल.

जुन्या तगड्या वेब्सिरीज संपल्याने जी पोकळी आली होती ती ह्या नक्कीच भरून काढतील

Pages