आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण अनेक उपकरणे किंवा यंत्रणा वापरतो. जेव्हा आपण एखादी यंत्रणा नियमित दीर्घकाळ वापरत असतो तेव्हा तिच्यातील बारकावे आपल्याला अनुभवातून समजू लागतात. तसेच त्यातील काही उणिवा सुद्धा जाणवतात. गेल्या दोन दशकांत आपण संगणक आणि त्याच्याशी संबंधित विविध उपकरणे वापरू लागलो. आपल्यातील बऱ्याच जणांचे संगणकाचे औपचारिक शिक्षण झालेले नव्हते. ऑफिसमध्ये काम करता करता एकमेकांच्या सहकार्याने आपण संगणक हळूहळू शिकत गेलो.
संगणकाव्यतिरिक्तही इतर काही यंत्रांशी आपला कामानिमित्त संबंध येत असतो. आपल्यातील बऱ्याच जणांना त्या यंत्राचे तांत्रिक ज्ञान नसते; आपण त्याचे निव्वळ वापरकर्ते असतो. एखादी यंत्रणा नियमित वापरत असताना आपल्याला त्यात एखादी अडचण वारंवार येत असते. त्यामुळे आपले मुख्य काम अडत नसते पण " यात अमुकतमुक सोय असती तर बरे झाले असते", असे आपल्याला वाटत असते. मग एखादे वेळेस गप्पा मारताना आपण आपल्या सहकाऱ्याला ती अडचण विचारतो. मग तो त्यावर विचार करू लागतो. मग तोही अजून एकदोघांना विचारतो. आता प्रत्येकाचे सामान्यज्ञान आणि तांत्रिक अंग कमीजास्त असते. काही अडचणी अशा असतात की त्याचे उत्तर गुगलून मिळतेच असे नाही. मग अचानक एके दिवशी आपल्यातील एखाद्याला त्यासंदर्भातली एखादी छोटीशी युक्ती सुचते. तो ती यंत्रावर करून पाहतो आणि काय ? ती अडचण चुटकीसरशी सोडवली जाते ! सामान्यांच्या दृष्टीने हा क्षण अगदी 'युरेका' सारखाच असतो. त्यातून झालेला आनंद विलक्षण असतो.
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात असा एखादा प्रसंग आलेला असतो. तेव्हा एखादी छोटी अडचण आपण कुठल्याही तंत्रज्ञांची मदत न घेता युक्तीने सोडवतो. अशा सहज सुचलेल्या किंवा कोणाला आपण सुचविलेल्या युक्त्यांचे अनुभव या धाग्यावर लिहावेत अशी कल्पना आहे. असे अनुभव एकमेकांसाठी रंजक व मार्गदर्शक ठरतील असे वाटते.
क्षणभर यंत्र सोडून द्या. अगदी साध्यासोप्या कृती करताना देखील एखादी युक्ती सुचते, जी पुढे कायम उपयोगी पडते. एक सोपे उदाहरण देतो. आपण कागद चिकटवण्यासाठी सेलोटेप वापरतो. त्याचा हवा तेवढाच तुकडा कापण्यासाठी कात्री वापरणे उत्तमच. पण समजा ती जवळ नसेल तर आपण टाचणीने थोडे टोचे मारून काम निभावून नेऊ शकतो. तसेच टेपचा वापर झाल्यावर पुढच्या वेळेस त्याचे 'टोक' सहज सापडावे म्हणून आपण आताच ते थोडे दुमडून ठेवतो.
तर अशा अनेक छोट्या मोठ्या युक्त्या आपण लिहाव्यात असे आवाहन करतो. माझा एक अनुभव नंतर प्रतिसादात लिहिणार आहे. पण आधी तुमच्याकडून सुरवात होऊद्या.
धन्यवाद!
धागा मस्त आहे. खूप उपयुक्त
धागा मस्त आहे. खूप उपयुक्त माहिती.
कमीत कमी त्यांनी लिंबाच्या सालीवरचा फोकस तर हलवला.>>> + ११
यावरून या धाग्याचे एक निरीक्षण नोंदवतो. बहुतांश युक्त्या स्वयंपाकघराशी निगडित आहेत. हे दखलपात्र आहे. अन्न ही आपली मूलभूत गरज असल्याने आपले आयुष्य त्याभोवती सतत फिरत असते. त्यामुळेच आपण त्याबाबतचा विचार अधिक करतो.
@ साद,
पॉवर पॉइंट चा अनुभव मस्त. माझ्याही अशा पहिल्या सादरीकरणाचे वेळीस काहीशी भंबेरी उडाली होती. सध्याच्या ५०+ पुढच्या पिढीचे संगणक शिक्षण असेच एकमेकांचे बघून-ऐकून झाले. त्यामुळे सुरवातीला बऱ्याच गमती होत.
छान धागा आहे.
छान धागा आहे.
<< बहुतांश युक्त्या स्वयंपाकघराशी निगडित आहेत. हे दखलपात्र आहे. अन्न ही आपली मूलभूत गरज असल्याने आपले आयुष्य त्याभोवती सतत फिरत असते. त्यामुळेच आपण त्याबाबतचा विचार अधिक करतो.>> अनुमोदन....
खरेतर तिथे युक्त्यांंची जास्तच गरज असते.
भिंतीवर एखादे पोस्टर लावताना,
भिंतीवर एखादे पोस्टर लावताना, त्यावर बाहेरून सेलोटेप लावण्याऐवजी ,पोस्टरच्या मागच्या बाजूने चारही कोपऱ्यात आणि मध्यभागी सेलोटेपचे छोटे तुकडे रोल करून चिकटवून घ्यावे. नंतर ते पोस्टर भिंतीवर हव्या त्या ठिकाणी चिकटवावे.
यामुळे एकटा माणूसही हे काम पटकन आणि टापटीप करू शकतो. शिवाय , पोस्टर पुन्हा काढायचे झाल्यास फार त्रास नाही व भिंतही जास्त खराब होत नाही.
हे माहित असेल बऱ्याचजणांना. मला हॉस्टेलला असताना रुमीने ही युक्ती सांगितली.
रेल्वे स्टेशनवर नजरेत भरलेली
रेल्वे स्टेशनवर नजरेत भरलेली एक युक्ती आठवली.
२० जणांचा एक चमू लांबच्या पर्यटनास निघाला होता. त्यात १ ज्येष्ठ जोडपे होते. एका प्रवासानंतर गाडी बदलायची असल्याने या सर्वांच्या बॅग्स हमालामार्फत फलाटावर उतरवल्या होत्या. इथे आपले सामान उतरवले गेले आहे ना हे पहायची जबाबदारी प्रत्येकाची होती.
या ज्येष्ठ जोडप्याने त्यांच्या ३ बॅग्सना गडद पिवळ्या रंगांची कव्हर्स घातली होती. हा रंग अगदी बघायला त्रास होईल इतका गडद होता ! पण त्यामुळे आपले सामान पटकन ओळखणे त्यांना खूप सोपे गेले.
ही युक्ती विमानप्रवासात पण खूप उपयोगी पडेल असे वाटते. (पण ती मोजक्या लोकांनाच माहिती हवी ☺️)
सामानाला भल्यामोठ्या राख्या
सामानाला भल्यामोठ्या राख्या किंवा भडक रंगाच्या रिबन्स बांधणं हे पण वर्क होतं वरच्या प्रसंगी.
सामानाला भल्यामोठ्या राख्या
सामानाला भल्यामोठ्या राख्या किंवा भडक रंगाच्या रिबन्स बांधणं हे पण वर्क होतं वरच्या प्रसंगी.>>> माझ्या बायकोन असच केल होत. पुणे एअरपोर्टवर उतरल्यावर आपापली बॆग घेउन बाहेर पडलो व रिक्षात फोन आला. बॆगेचा घोटाळा झाला होता. सेम बॆग दुसर्याची होती तशिच रिबिन बांधली होती. रिबिन च्या शेड व जाडी मधे फक्त थोडा फरक होता. मग ती बदलली.
एक छोटी युक्ती पेनासंबंधित
एक छोटी युक्ती पेनासंबंधित आहे.
पेन्स २ प्रकारची असतात - टोपणवाली आणि खटक्याची. समजा आपण एखाद्या गर्दीच्या कार्यालयात कामासाठी गेलोत. अचानक एक अनोळखी व्यक्ती आपल्याला पेन मागते. आपण ते देतो. दरम्यान आपण आपली रांग, नंबर वगैरे गडबडीत असतो. ती व्यक्ती आपल्या पेनाने काम झाल्यावर अनावधानाने ते स्वतः जवळच ठेवते आणि निघून जाते.
अशा प्रकारे माझी काही खटक्याची पेन्स गेली. मग मी शहाणा झालो. आता मी ठरवून टोपणवाले पेन बाळगतो. कोणी गर्दीत मागितले तर ते उघडून त्याला फक्त लेखणीचा भाग देऊन टोपण माझ्याकडेच ठेवतो ! त्या माणसाचे काम झाले की तो ते बिनटोपणाचे पेन न विसरता आपल्यालाच देतो
गर्दी असली तरी अगदी शोधत येतो.
वरच्या प्रतिसादावरून कायप्पा
वरच्या प्रतिसादावरून कायप्पा वर आलेला एक विनोद आठवला......
आजकाल लोकं अती संशयी झाली आहेत, लिहायला पेन मागितले तर टोपण स्वतः जवळ काढून ठेवतात.
अशी बिनाटोपणांची ४-५ पेन माझ्याकडे जमली आहेत.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
आता युक्त्यांच्या विषयांची विविधता वाढत आहे .
सेम बॆग दुसर्याची होती तशिच रिबिन बांधली होती.
>>>
अगदी ! म्हणून ती कव्हरची कल्पना भारी वाटते.
तो ते बिनटोपणाचे पेन न विसरता आपल्यालाच देतो>
गर्दी असली तरी अगदी शोधत येतो.
>>>
पटले, सही ☺️
आदू, मिक्सरमध्ये थेंबभर साबण
आदू, मिक्सरमध्ये थेंबभर साबण व पा णी घालून, मिक्सर ऑन करायचा.
बँकवाले आपल्यापेक्षा जास्त
बँकवाले आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. चक्क दोरीला पेन बांधुन ठेवतात.
तो ते बिनटोपणाचे पेन न विसरता
तो ते बिनटोपणाचे पेन न विसरता आपल्यालाच देतो> बॉल पेन असेल तर कोणीही घेउन जाईल
टोपण न लावता खिशात ठेवल तर गळणार पाहिजे
पॉवर पॉइंट चा अनुभव मस्त. >>>+ १००००
मी बॅंकेत गेलो की स्लिप
मी बॅंकेत गेलो की स्लिप भरण्यापुरताच पेन वापरून हळूच बॅगेत ठेवून देतो. बरेच लोक नजरेने पेन शोधत येतात पण खिशाला पेन नसल्याने दुसरीकडे जातात. बरेच पेन गमावल्यानंतर ही आयडिया करतो आहे. कुठेही बाहेर पडताना वीसेक रुपयांची चिल्लर एक, दोन पाच रुपयांची नाणी आवर्जून पॅंटच्या मागच्या खिशात टाकतो. सुट्या पैशांवाचून काम अडत नाही.
पेन, पैसे, पिशवी, पुस्तक शक्यतो उसने देऊ नये असे वाचले आहे. समोरच्याला विसर पडतो असे कारण दिलं होतं.
गाडीत पेट्रोल भरताना सकाळची
गाडीत पेट्रोल भरताना सकाळची सातच्या आतली वेळ निवडावी. डेन्सिटी जास्त असल्याने पेट्रोल जास्त मिळते असे वाचले आहे व अवलंब पण करतोय.
रोज ऑफिसला जाता येता तासा
रोज ऑफिसला जाता येता तासा-दीडतासाचा ऑफिस बसमधून प्रवास आहे.
एखादा मूव्ही आरामात बघून होतो पण इतका वेळ मोबाईल हातात धरुन मानेला ताण देत बसण्यापेक्षा आता मी एक छोटी सेल्फी स्टीक फोल्ड करुन नेतो.... त्याला फोन अडकवतो आणि ती सेल्फी स्टीक पुढच्या सीटच्या पाठीमागे असणाऱ्या हॅंडल मध्ये अडकवतो आणि आरामात 'ताठ मानेने' पिक्चर बघतो
सीटला हॅंडल नसणाऱ्या बसवाल्यांनी काचेवर चिकटवता येणारे vaccume वाले मोबाईल होल्डर पण वापरुन बघायला हरकत नाही !
>>ती पेलाभर पाण्याची युक्ती
>>ती पेलाभर पाण्याची युक्ती मी केलीय आन नंतर भाताचं भांड बाहेर काढतांना तो पेला लवंडला आत. हरे राम ते सगळं स्वच्छ करण्यात लई वेळ गेला.
मावे बाउल्सनाच एक साईडट्यूब फिटींग दिले तर? पाणी भरुन ठेवायला?
डिझाईनचे पेटंट घ्यावे का?
स्वरूप, मोबाईल फोन होल्डर
स्वरूप, मोबाईल फोन होल्डर म्हणून सेल्फी स्टिक वापरण्याची आयडिया एक नंबर. खरचच गरज ही शोधाची जननी असते
आता मला आयपॅड साठी असंच काही सुचवा असं म्हणणार होते, पण नेटफ्लिक्स किंवा प्राईमवरच्या बऱ्याच सिरीज किंवा मुव्हीज पहाताना शेजारच्या किंवा मागच्याने त्यात डोकं घातलं तर? हल्ली स्क्रीनवर जे काही दिसतं ते कलिग्जबरोबर पहाताना ओकवॉर्ड होईल.
ते डोळ्याला लावून बघायचं एक
ते डोळ्याला लावून बघायचं एक आलं आहे की.
.
वरच्या काही प्रतिसदांवरून दोन आयडियेच्या कल्पना सुचल्यात.
१. मिक्सरमध्ये थेंबभर साबण व पा णी घालून, मिक्सर ऑन करायचा. >>
साबणापेक्षा त्यात लिंबू पिळले तर कसे ? तसेही आपण लिंबूप्रेमी आहोतच !
२. त्या पेन बाबत असे: अशा ठिकाणी जाताना आपण पेन न्यायचेच नाही आणि नेहमी दुसऱ्याकडेच मागायचे !
☺️☺️
अमर,
अमर,
पेट्रोलच्या बाबतीत मी पण जमेल तेव्हा आणि विशेषतः मोटारीसाठी सकाळी ७ वाजता भरतो. पंपावर रांग कमी हा पण एक फायदा.
स्वरूप,
ताठ मानेने बघणे आवडले !
नको लिंबू नको साद. मग लस्सी,
नको लिंबू नको साद. मग लस्सी, मिल्कशेक कसे करणार मिक्सरमध्ये? आंबटपणा राहीला तर!
पुर्वी टंगस्टन फिल्यामेंटचे
पुर्वी टंगस्टन फिल्यामेंटचे बल्ब यायचे. बल्ब उडाला व तारेचे अनेक तुकडे न होता एका बाजूने निसटली असेल तर सावकाश पणे हलवून जोडायचो आणि चालेल तितके दिवस वापरायचो.
बाहेर जाताना नेहमी
बाहेर जाताना नेहमी वर्तमानपत्र विकत घेतो. कुठेही जमिनीवर बसायची वेळ आली की पेपर अंथरुन खुर्ची तयार करतो.
बाहेर जाताना नेहमी
बाहेर जाताना नेहमी वर्तमानपत्र >>
हे प्रवासात मी नेहमीच ठेवतो आणि जवळ एक फडके पण.
त्यांचे गरजेनुसार वेगळे उपयोग होतात.
पुर्वी टंगस्टन फिल्यामेंटचे
पुर्वी टंगस्टन फिल्यामेंटचे बल्ब यायचे. बल्ब उडाला व तारेचे अनेक तुकडे न होता एका बाजूने निसटली असेल तर सावकाश पणे हलवून जोडायचो आणि चालेल तितके दिवस वापरायचो. >> हो हे मी पण बरेचदा केले आहे.
आंघोळीनंतर दाढी केली तर एकदम
आंघोळीनंतर दाढी केली तर एकदम स्मूथ होते. तसेच रोज रोज न करता तीन चार दिवसांनी केली तरी स्मूथ होते.
अमर सहमत.
अमर सहमत.
मी पण रोज न करता एक आड एक दिवस करतो. रोज केली तर त्वचा खरवडल्यासारखे वाटते.
>>तसेही आपण लिंबूप्रेमी आहोतच
>>तसेही आपण लिंबूप्रेमी आहोतच !<< अशी ही बनवाबनवी फार पाहिल्याचा परिणाम का ?
पॉवर पॉइंटच्या प्रतिसदांवरून
पॉवर पॉइंटच्या प्रतिसादावरून एक कल्पना स्फुरली.
सध्या अशा सादरीकरणा साठी कम्प्युटरला प्रोजेक्टर जोडावा लागतो.
भविष्यात असे एखादे उपकरण निघेल का, ज्यात कम्प्युटर मध्येच प्रोजेक्शनची सोय असेल ?
बहुतेक प्रोजेक्टर फार गरम होत
बहुतेक प्रोजेक्टर फार गरम होत असल्याने तसं काम्प्युजेक्टर बनला नसावा. पण बनू शकेल मेमरी कार्ड टाकून, पेन ड्राईव्ह जोडून रिमोट ने स्लाईड/
व्हिडीओ दाखवता येईल असे.
Pages