आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण अनेक उपकरणे किंवा यंत्रणा वापरतो. जेव्हा आपण एखादी यंत्रणा नियमित दीर्घकाळ वापरत असतो तेव्हा तिच्यातील बारकावे आपल्याला अनुभवातून समजू लागतात. तसेच त्यातील काही उणिवा सुद्धा जाणवतात. गेल्या दोन दशकांत आपण संगणक आणि त्याच्याशी संबंधित विविध उपकरणे वापरू लागलो. आपल्यातील बऱ्याच जणांचे संगणकाचे औपचारिक शिक्षण झालेले नव्हते. ऑफिसमध्ये काम करता करता एकमेकांच्या सहकार्याने आपण संगणक हळूहळू शिकत गेलो.
संगणकाव्यतिरिक्तही इतर काही यंत्रांशी आपला कामानिमित्त संबंध येत असतो. आपल्यातील बऱ्याच जणांना त्या यंत्राचे तांत्रिक ज्ञान नसते; आपण त्याचे निव्वळ वापरकर्ते असतो. एखादी यंत्रणा नियमित वापरत असताना आपल्याला त्यात एखादी अडचण वारंवार येत असते. त्यामुळे आपले मुख्य काम अडत नसते पण " यात अमुकतमुक सोय असती तर बरे झाले असते", असे आपल्याला वाटत असते. मग एखादे वेळेस गप्पा मारताना आपण आपल्या सहकाऱ्याला ती अडचण विचारतो. मग तो त्यावर विचार करू लागतो. मग तोही अजून एकदोघांना विचारतो. आता प्रत्येकाचे सामान्यज्ञान आणि तांत्रिक अंग कमीजास्त असते. काही अडचणी अशा असतात की त्याचे उत्तर गुगलून मिळतेच असे नाही. मग अचानक एके दिवशी आपल्यातील एखाद्याला त्यासंदर्भातली एखादी छोटीशी युक्ती सुचते. तो ती यंत्रावर करून पाहतो आणि काय ? ती अडचण चुटकीसरशी सोडवली जाते ! सामान्यांच्या दृष्टीने हा क्षण अगदी 'युरेका' सारखाच असतो. त्यातून झालेला आनंद विलक्षण असतो.
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात असा एखादा प्रसंग आलेला असतो. तेव्हा एखादी छोटी अडचण आपण कुठल्याही तंत्रज्ञांची मदत न घेता युक्तीने सोडवतो. अशा सहज सुचलेल्या किंवा कोणाला आपण सुचविलेल्या युक्त्यांचे अनुभव या धाग्यावर लिहावेत अशी कल्पना आहे. असे अनुभव एकमेकांसाठी रंजक व मार्गदर्शक ठरतील असे वाटते.
क्षणभर यंत्र सोडून द्या. अगदी साध्यासोप्या कृती करताना देखील एखादी युक्ती सुचते, जी पुढे कायम उपयोगी पडते. एक सोपे उदाहरण देतो. आपण कागद चिकटवण्यासाठी सेलोटेप वापरतो. त्याचा हवा तेवढाच तुकडा कापण्यासाठी कात्री वापरणे उत्तमच. पण समजा ती जवळ नसेल तर आपण टाचणीने थोडे टोचे मारून काम निभावून नेऊ शकतो. तसेच टेपचा वापर झाल्यावर पुढच्या वेळेस त्याचे 'टोक' सहज सापडावे म्हणून आपण आताच ते थोडे दुमडून ठेवतो.
तर अशा अनेक छोट्या मोठ्या युक्त्या आपण लिहाव्यात असे आवाहन करतो. माझा एक अनुभव नंतर प्रतिसादात लिहिणार आहे. पण आधी तुमच्याकडून सुरवात होऊद्या.
धन्यवाद!
छान कल्पना आहे.
छान कल्पना आहे.
जरा काही आठवले की लिहितो.
कुठलंही सामान बॉक्सपॅक करताना
कुठलंही सामान बॉक्सपॅक करताना त्याबरोबर उठुन दिसेल असं लेबल लावावं..ऐनवेळी वस्तु शोधताना लेबलची खुप मदत होते..
बदलते वेळी आपण सामानसुमान पॅक
बदलते वेळी आपण सामानसुमान पॅक करतो. उत्साहाने दिसेले ते सामान दिसेल त्या पेटार्यात गच्च बसवतो. कमीत कमी पेट्यांत सामान बसले की झाले असा आपला विचार असल्याने, अगदी छान म्हणजे तीळभरही जागा उरणार नाही असे पॅक करतो. मग नव्या घरात काय होते एवढे सामान चेंगटपणे लावले जाते. वेळखाऊ काम असल्याने दिवस दिवस लागतात. मग सकाळी टूथ्ब्रश न सापडणे, टॉवेल, कंगवा कुठेतरी तळाशी असणे, चहाचे गाळणेच हरवणे असे होउ लागते तेव्हा नित्य/दैनंदिनीचे सामान एका वेगळ्या पिशवीत/पेटित भरुन लेबल तरी लावावे किंवा लक्षात तरी ठेवावे.
हे सगळ्यांना माहीत असेल, तरी
हे सगळ्यांना माहीत असेल, तरी धागा पुढे जाण्यासाठी लिहिते आहे.
सकाळी उठल्यावर लिंबूपाणी पिण्यासाठी, मी अर्ध आणि नवरा अर्ध मिळून, रोज एक लिंबु कापलं जातं. महिनोन्महिने ती ताजी सुगंधी सालं फेकून देताना मला एक दिवस सुचलं की डायनींग टेबलवर जारमध्ये जे पाणी भरून ठेवतो त्यात ही रस काढून टाकलेली सालं आणि थोडी पुदिना पानं टाकली तर दिवसभर डिटॉक्स पाणी पिता येईल. नवीन लिंबू चिरून टाकलं तर पाणी खूप आंबट होतं आणि ते लिंबु वाया जात, त्यापेक्षा ही सालं टाकण्याची युक्ती आम्हाला आवडली आहे. हेच पाणी जिमला जाताना बाटलीत भरून नेलं की मस्त रिफ्रेशिंग फ्लेवर्ड पाणी पिताना छान वाटतं.
कुठेतरी फेमिना किंवा तत्सम
कुठेतरी फेमिना किंवा तत्सम बायकी मासिकात 'हे करून पहा' टाईप सदरात ही टीप वाचली होती.
बाहेरून फूड किंवा पिझ्झा ऑर्डर केला की त्याबरोबर केचपच्या पुड्या येतात. मुलं किंवा आपणही त्या किचकट पुड्या फोडण्यापेक्षा डायनींग टेबलवरची केचप बॉटल पटकन वापरतो. मग त्या पुड्या साठत जातात. मी एकदा डिलीव्हरी बॉयला तो गठ्ठा गोळा करून परत द्यायचा प्रयत्न केला, पण पठ्ठ्याने नकार दिला. तर आता मूळ मुद्दा, या केचपचं करायचं काय?
तर घरातली पितळेची भांडी (जी माझ्याकडे नाहीत), मूर्ती, शो पिसेस, व्हाज या सगळ्याला रात्री हे केचप फासून ठेवायचं आणि सकाळी नेहमीच्या सोप किंवा पितांबरीने घासायच. वस्तू चकाचक स्वच्छ होते. (जीव खाऊन न घासता अगदी साध्या भांड्यासारखी घासायची).
मीरा सालात फार ए व्हायटॅमिन
मीरा सालात फार ए व्हायटॅमिन असते तेव्हा फार साले टाकणे आरोग्याच्या दृष्टीने बरोबर नसेलही.
हां तुम्ही म्हटल्याप्रमाणे किंचीत साल ठिक आहे.
अजुन एक गरोदर स्त्रियांना ए व्हायटॅमिनचा अतिरिक्त डोस टॉक्सिक्स असतो, गर्भामध्ये विकृती येउ शकते - असे वाचल्याचे स्मरते. तेव्हा प्रमाणातच वापर केलेला बरा.
त्यापेक्षा ही सालं टाकण्याची
त्यापेक्षा ही सालं टाकण्याची युक्ती आम्हाला आवडली >>>
आवडेश !
छान कल्पना.
सामो, या माहितीसाठी आभारी आहे
सामो, या माहितीसाठी आभारी आहे. एका लिंबाची (दोन अर्धी) सालं 3-4 लिटर पाण्यात चालतील की जास्त होताहेत. रस काढून झाली की ती पाण्यात नुसती सोडून दिलेली असतात.
आपण सर्वांनी लिहिलेल्या
आपण सर्वांनी लिहिलेल्या युक्त्या छान व उपयुक्त आहेत.
अनेक धन्यवाद.
येउद्यात अजून. छोट्या यंत्रांशी संबंधित पण याव्यात.
मीरा प्रमाण नक्की माहीत नाही
मीरा प्रमाण नक्की माहीत नाही पण पाणी कडू होत नसेल तर चालून जावीत.

_________
अजुन एक काकडी चे काप पाण्यात घालून ठेवले तरी पाणी फार छान आणि थंडगार लागते. मात्र पाणी थंड हवे नाहीतर त्या कापांचे लगेच विघटन सुरू होते
मी एका पॉश हॉटेलमध्ये ही आयडिया पाहीली. लगेच घरी आल्यावर अंमलात आणली पण घरातील पाणी बाहेर रुम-टेम्परेचरला असल्याने काकडी लगेच खराब होत होती
________________
सासूबाई लिंबाची साले सिंकमधील ड्रेनवर टाकायच्या, कचर्याच्या बाद्लीत, तळाशी टाकायच्या. तोही उपाय बरा वाटतो मला.
VitaminA is fat soluble. Don
VitaminA is fat soluble. Don't worry. I think it can't dissolve in water. Vitamin a in lemon? I think only vit c is there.
लिंबाच्या सालामध्ये ए
लिंबाच्या सालामध्ये ए व्हायटीमिन असते.
___________
अजुन एक आई करायची ते म्हणजे दोडक्याच्या शिरांची चटणी. त्या शिरा टकून देण्याऐवजी, त्या भाजून, तीळ, कूट, मिर्ची (किंवा तिखट पूड) वगैरे घालून कोरडी चटणी करत असे.
__________________
नवलकोलाची पाने मी अजिबात टाकून देत नाही, ती चिरुन , नवलकोलच्याच भाजीत घालते. मे बी सर्वचजण ते करत असतील मला मात्र हा शोध परवा परवा लागला.
वापरलेल्या लिंबाचा आमच्या
वापरलेल्या लिंबाचा आमच्या घरातला हा एक उपयोग.
कुकर रोज काही घासणे शक्य होत नाही. म्हणून अन्न शिजतानाच भांड्यांचे बाजूला आम्ही लिंबाची साल टाकतो.
नंतर पाहिल्यास आतून एकदम चकाचक दिसते.
कारल्याच्या भाजीत कुठलं
कारल्याच्या भाजीत कुठलं जिवनसत्व असतं.
साद, लिंबांचा सालीचा वापर
साद, लिंबांचा सालीचा वापर माझी आईपण मोठा (अल्युमिनियम) कूकर साफ करायला करते
तसेच डीटोक्स वाँँटर साठीपण
मी ते हाताची त्वचा tan removal करण्यासाठी वापरते
आई कधीकधी कवली (dentures) साफ करायला साल टाकून ठेवलेल्या पाण्यात ठेवते. बरेचदा dentist सफाई साठी देउनही पांढरी दिसेना, तेव्हा तिने हा शोध लावला
मी रात्री भांडी घासून झाली की लिंबूची साल किंवा छोटी फोड अगदीच ऊरली असेल तर kitchen sink मध्ये फिरवते थोडा बेकिंग सोडा घालून (नेहमी नाही , कधीतरी)
यंत्रा बद्दल लिहायचं तर
यंत्रा बद्दल लिहायचं तर microwave oven मध्ये वाटीत पाणी लिंबूची साल गरम करायची. अन्ना चा वास निघून जातो
मायक्रोवेव्हमध्ये, भात गरम
मायक्रोवेव्हमध्ये, भात गरम करताना, तो कोरडा होउन जातो बरोबर? वरती ताटली ठेउन अर्थात नसेल होत. पण अजुन एक युक्ती म्हणजे, पाण्याचा पेला भरुन ठेवायचा भाताबरोबरच. भात कोरडा होत नाही.
अरे वा ही टीप मस्त आहे पाणी
अरे वा ही टीप मस्त आहे पाणी भरून ठेवायची.
आणखी एक युक्ती आहे बहुतेक बर्
आणखी एक युक्ती आहे बहुतेक बर्याच जणांना माहीतही असेल. मिक्सर धुताना, सरळ एक थेंब भांड्याचा साबण व पाणि घालून, मिक्सर चालवायचा. खळखळून स्वच्छ होतो.
कॉमन सेन्स्चीच युक्ती आहे. नवीन नसेलही. पण मला आताआता कळली
लिंबाच्या साली खडखडीत वाळवून
लिंबाच्या साली खडखडीत वाळवून उटण्या सारखी पूड करून अंघोळीच्या वेळी वापरता येतात साबणाऐवजी. नंतर डिओ वगैरे ची गरजच पडत नाही. असंच संत्र्यांच्या सालींचंही करता येतं.
या पुडी उटण्यात / शिकेकाईच्या पुडीत मिसळून ते प्रकारही एनहान्स करता येतात.
मावेत भात वगैरे प्रकार कोरडे होऊ नयेत म्हणून सरळ चमचाभर पाणी वर शिंपडून मगच भार इ. गरम करायला ठेवायचा. ती पेलाभर पाण्याची युक्ती मी केलीय आन नंतर भाताचं भांड बाहेर काढतांना तो पेला लवंडला आत. हरे राम ते सगळं स्वच्छ करण्यात लई वेळ गेला. सो तेव्हापासून भाताच्या क्वांटीटीनुसार १/२ चमचे पाणीच शिपडल्या जातं.
>>नंतर भाताचं भांड बाहेर
>>नंतर भाताचं भांड बाहेर काढतांना तो पेला लवंडला आत. >>
हाहाहा
आतापर्यंतच्या प्रतिसादांतून
आतापर्यंतच्या प्रतिसादांतून लिंबू किती बहुगुणी आणि लोकप्रिय आहे हे दिसून आले ! ☺️
लगे राहो
धन्यवाद.
आता माझा एक संगणकाशी संबंधित
आता माझा एक संगणकाशी संबंधित हापिसातील अनुभव.
मला तिथे कार्यशाळा घेताना पॉवर पॉइंट ने सादरीकरण असते. ते करताना प्रोजेक्टर चालू असतो. आता २-३ स्लाइड्स दाखविल्यावर मध्ये काही स्पष्टीकरण द्यायचे असते. तेव्हा सर्वांनी प्रोजेक्शनकडे न बघता माझ्याकडे बघावे ही अपेक्षा असते. आता जोपर्यंत प्रोजेक्टर चालू आहे तोपर्यंत लोकांचे पडद्याकडे लक्ष राहतेच. ते पूर्णपणे वक्त्याशी एकरूप होऊ शकत नाहीत. बरं, मध्येच प्रोजेक्टर बंद करता येत नाही कारण पुन्हा चालू करून स्लाईड दिसायला ५-१० मिनिटे जातात. तो वेळ वाया घालवणे परवडत नाही.
तेव्हा मी यावर तोडगा काय असा विचार करू लागलो. सहज एक शक्कल सुचली. जेव्हा मी समजावून सांगणार असेन तेव्हा मी प्रोजेक्टरच्या तोंडावर एक जाड वही लावून ठेवली. पुन्हा स्लाईड दाखवताना ती वही काढून घ्यायची. मग अशा प्रकारे २ व्याख्याने छान जमली. मी स्वतःवर खूश झालो.
पण….
पुढे काही वेगळेच घडायचे होते !
एका सादरीकरणा दरम्यान मी तशी वही लावली आणि त्यानंतर सुमारे १५मिनिटे स्पष्टीकरण द्यावे लागले. आता मी पुन्हा प्रोजेक्टर कडे वळलो आणि पाहतो तर काय ? ती वही उष्णतेने तापून चक्क वाफा आल्या होत्या. मग लगेच प्रोजेक्टर बंद केला. त्याच्या तोंडाशीही काळा डाग पडला होता.
यामुळे चांगलीच निराशा झाली पण पर्यायी मार्ग तर शोधायचा होताच. मग मित्रांशी बोललो. एकाने लगेच युक्ती सांगितली. जेव्हा श्रोत्यांचे लक्ष स्लाइड्कडून वक्त्याकडे वळवायचे आहे तेव्हा संगणकाच्या की बोर्ड वरील B अक्षर फक्त दाबायचे ! B चा अर्थ Blank. त्याने प्रोजेक्टर चालू राहतो पण पडद्यावर काहीच दिसत नाही.
आता पुन्हा आपल्याला स्लाईड कडे वळायचे असेल तेव्हा B चेच बटन पुन्हा दाबायचे - प्रोजेक्शन चालू !
…. हे समजल्यानंतरचा आनंद अवर्णनीय होता ! तसेच आपल्या चुकांमधूनच आपण शिकत जातो हेही पटले.
"थोडक्यात पण महत्वाचे" नावाचं
"थोडक्यात पण महत्वाचे" नावाचं एक पुस्तक माझ्या लहानपणी (ऐंशीच्या दशकात) आमच्या घरी होतं, त्यात अशा बर्याच सुचना विषयवार दिलेल्या होत्या. इच्छुकांनी ते मिळवुन वाचावे.
वाह साद यांचा प्रतिसाद आवडला.
वाह साद यांचा प्रतिसाद आवडला.
साद यांचा प्रतिसाद आवडला. >>
साद यांचा प्रतिसाद आवडला. >>>> कमीत कमी त्यांनी लिंबाच्या सालीवरचा फोकस तर हलवला.
नाही तर धाग्याचं नाव बदलून ' लिंबाच्या सालीचे विविध उपयोग' असं काही तरी करावं लागलं असतं.
साद, तुमची टीप छान आहे. दुसरं सजेशन असं की ज्या स्लाईड नन्तर ब्रेक / स्पष्टीकरणासाठी गॅप आहे त्या स्लाईड पुढची स्लाईड blank किंवा कम्पनी लोगो वगैरे असलेली ठेवायची.
ज्यांच्याकडे पेट्स आहेत
ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्यांनी कितीही झटकलं तरी आपल्या कपड्यांवर बारीक फर चिकटून राहतेच. वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतल्यावर शेवटच्या रिंझला ( साबण सोडून अजून एक दोन स्लॉट्स असतात त्यातल्या शेवटच्या ट्रेमध्ये व्हिनेगर टाकलं तर ती fine fur पटकन निघून जाते. मग महिन्यातुन एकदा फिल्टर साफ केला की फरचा छोटा पुंजका, आपल्या कपड्याचे बारीक धागे, बायकांच्या ड्रेसवरचे निखळलेले छोटेसे बिड्स, अर्धवट तुटलेली बटन्स आणि कधी कधी खिशात चुकून राहून गेलेलं नाणं सुद्धा या फिल्टर मध्ये मिळतं. त्यामुळे हा फिल्टर नियमाने साफ करणं महत्वाचं असतं.
चला लावा monthly reminder
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
व्यत्यय, छान सूचना.
मीरा,
आहे त्या स्लाईड पुढची स्लाईड blank किंवा कम्पनी लोगो वगैरे असलेली ठेवायची.>>>
मी blank चा प्रयोग आधी केला होता. ,पण त्यात प्रोजेक्शन चालू राहिल्याने बघणाऱ्याच्या डोळ्यापुढे सतत प्रकाश राहतोच. त्यामुळे तिकडे एक नजर जात राहते. अजून एक. दर ३ स्लाईडमागे तो blank चा उद्योग वाढतो.
साद, मस्त प्रतिसाद! मीरा,
साद, मस्त प्रतिसाद!
मीरा,
13:35
13:35
आणखी एक युक्ती आहे बहुतेक बर्याच जणांना माहीतही असेल. मिक्सर धुताना, सरळ एक थेंब भांड्याचा साबण व पाणि घालून, मिक्सर चालवायचा. खळखळून स्वच्छ होतो.>>>>हे नीट समजले नाही,साबण कुठे टाकायचा?
Pages