युक्त्या : सुचलेल्या आणि सुचविलेल्या

Submitted by asp. on 17 September, 2019 - 03:11

आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण अनेक उपकरणे किंवा यंत्रणा वापरतो. जेव्हा आपण एखादी यंत्रणा नियमित दीर्घकाळ वापरत असतो तेव्हा तिच्यातील बारकावे आपल्याला अनुभवातून समजू लागतात. तसेच त्यातील काही उणिवा सुद्धा जाणवतात. गेल्या दोन दशकांत आपण संगणक आणि त्याच्याशी संबंधित विविध उपकरणे वापरू लागलो. आपल्यातील बऱ्याच जणांचे संगणकाचे औपचारिक शिक्षण झालेले नव्हते. ऑफिसमध्ये काम करता करता एकमेकांच्या सहकार्याने आपण संगणक हळूहळू शिकत गेलो.

संगणकाव्यतिरिक्तही इतर काही यंत्रांशी आपला कामानिमित्त संबंध येत असतो. आपल्यातील बऱ्याच जणांना त्या यंत्राचे तांत्रिक ज्ञान नसते; आपण त्याचे निव्वळ वापरकर्ते असतो. एखादी यंत्रणा नियमित वापरत असताना आपल्याला त्यात एखादी अडचण वारंवार येत असते. त्यामुळे आपले मुख्य काम अडत नसते पण " यात अमुकतमुक सोय असती तर बरे झाले असते", असे आपल्याला वाटत असते. मग एखादे वेळेस गप्पा मारताना आपण आपल्या सहकाऱ्याला ती अडचण विचारतो. मग तो त्यावर विचार करू लागतो. मग तोही अजून एकदोघांना विचारतो. आता प्रत्येकाचे सामान्यज्ञान आणि तांत्रिक अंग कमीजास्त असते. काही अडचणी अशा असतात की त्याचे उत्तर गुगलून मिळतेच असे नाही. मग अचानक एके दिवशी आपल्यातील एखाद्याला त्यासंदर्भातली एखादी छोटीशी युक्ती सुचते. तो ती यंत्रावर करून पाहतो आणि काय ? ती अडचण चुटकीसरशी सोडवली जाते ! सामान्यांच्या दृष्टीने हा क्षण अगदी 'युरेका' सारखाच असतो. त्यातून झालेला आनंद विलक्षण असतो.

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात असा एखादा प्रसंग आलेला असतो. तेव्हा एखादी छोटी अडचण आपण कुठल्याही तंत्रज्ञांची मदत न घेता युक्तीने सोडवतो. अशा सहज सुचलेल्या किंवा कोणाला आपण सुचविलेल्या युक्त्यांचे अनुभव या धाग्यावर लिहावेत अशी कल्पना आहे. असे अनुभव एकमेकांसाठी रंजक व मार्गदर्शक ठरतील असे वाटते.

क्षणभर यंत्र सोडून द्या. अगदी साध्यासोप्या कृती करताना देखील एखादी युक्ती सुचते, जी पुढे कायम उपयोगी पडते. एक सोपे उदाहरण देतो. आपण कागद चिकटवण्यासाठी सेलोटेप वापरतो. त्याचा हवा तेवढाच तुकडा कापण्यासाठी कात्री वापरणे उत्तमच. पण समजा ती जवळ नसेल तर आपण टाचणीने थोडे टोचे मारून काम निभावून नेऊ शकतो. तसेच टेपचा वापर झाल्यावर पुढच्या वेळेस त्याचे 'टोक' सहज सापडावे म्हणून आपण आताच ते थोडे दुमडून ठेवतो.
तर अशा अनेक छोट्या मोठ्या युक्त्या आपण लिहाव्यात असे आवाहन करतो. माझा एक अनुभव नंतर प्रतिसादात लिहिणार आहे. पण आधी तुमच्याकडून सुरवात होऊद्या.

धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंप्युटरमध्येच जर प्रोजेक्षणची सुविधा आली तर त्याच्यासाठी बॅटरीही जास्त खर्ची होणार.

अच्छा ! धन्यवाद.
अमर , कम्प्युजेकटर शब्द छान आहे

मी मोटारसायकल चालवताना पन्नासच्या पुढे वेग गेला की क्लच दाबतो व गाडी शंभर दोनशे मीटर संवेगामुळे आरामशीर पुढे जाते. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक किलोमीटर मोटारसायकल चालवली पण क्लच प्लेटला काही झाले नाही. उतारावर तर खूप अंतर कापते. मायलेज खूप मिळतो. पण अचानक थांबता येत नाही. क्लच दाबायची सवय झाल्याने ब्रेक लवकर लागत नाहीत. आजवर सात मोटारसायकल वापरल्या आहेत.

मोटारसायकल चालवताना पन्नासच्या पुढे वेग गेला की क्लच दाबतो >>>>

पण, असा क्लच दाबल्याने प्रदूषण जास्त होते असे वाचले होते.

कालनिर्णयच्या पाठीमागे 'हे करून पहा' सदर असे, त्याची आठवण झाली. एकदा तर एका/कीने 'एका काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात कुंकू घाला म्हणजे पाणी लाल दिसेल' हे देखिल सुचवले होते!

खूप वर्षांपूर्वीची युक्ती आहे.
स्कुटर्स मध्ये 'हमारा बजाज' चा जमाना होता. त्याकाळी त्या स्कुटरची हँडलची कुलूपे सामान्य दर्जाची होती. चोरांना सहज उघडता येत. तसेच या गाडीसाठी १० वर्षांपर्यंत ची प्रतीक्षा यादी असायची. त्यामुळे चोऱ्याही बऱ्याच होत.

माझ्या एका ओळखीच्या गराजवाल्यानी त्या स्कुटरला 'स्टँड लॉक' करून दिले होते. त्यासाठी एक लोखंडी पट्टी चासिस ला तर दुसरी स्टँडला वेल्ड केली होती. आता त्या दोन्हीच्या टोकांना भोक पाडले. त्यात चांगले भक्कम कुलूप लावता येई. अवघ्या १० रुपयात त्यांनी हा जुगाड करून दिला होता.

अशा कुलूपबंद गाडीच्या नादी चोर कशाला लागेल !

त्या काळातील दहा रुपये म्हणजे आजचे चार पाचशे झाले. मी सत्त्याऐंशी साली दहा रुपये रोजाने कामाला जात होतो बिगारी कामगार म्हणून.

आपापल्या युक्त्या इथे लिहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. या चर्चेत स्वयंपाकघर, सामान, प्रवास, दैनंदिन आन्हिके, यंत्रे व उपकरणे, वाहने आणि अन्य काही विषयांचा चांगला उहापोह झाला.

अजून नवे काही आठवल्यास जरूर लिहा.

घरात पुरी, पापड किंवा एखादा तळणीचा पदार्थ केल्यावर ते तेल दुसऱ्यांदा गरम केलं की त्यात टॉक्सीक्स निर्माण होतात, तरी महाग तेल वाया जाऊ नये म्हणून काही घरात त्यात दुसऱ्यांदा पदार्थ तळले जातात किंवा ते तेल भाजी/आमटीला वापरलं जातं. हे टाळण्यासाठी नेहमी छोट्या कढईत तळण करायचं म्हणजे उरलेलं तेल कमी असतं आणि वाया गेल्याची हुरहूर कमी. आता याबाबतीत एक कॉन्ट्रोव्हरशील टीप -

मी क्वचितच काही तळते आणि ते तेल एकदाच वापरते. ते उरलेलं तेल फेकून देणं वेस्ट ऑफ फूड वाटतं, मेडला देणं म्हणजे दुष्टपणा वाटतो, त्यातूनच मी ही पद्धत चालू केली की ते वापरलेलं तेल मेटलच्या गाळणीतून गाळून बाटलीत भरून ठेवायचं आणि रोज संध्याकाळी देवासमोर त्याचाच दिवा लावायचा. मला यावरून बरंच काही सुनावलं गेलं, झुठा ऑइल इस्तमाल करना कितना बडा पाप, मी कशी कंजूष हे (माबोवर सुद्धा) सुनावलं गेलं. पण सफोला ऑइल डब्यातून काढून जाळून वाया घालवण्यापेक्षा वापरलेलं तेल reuse करण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. दिवाळीत एखादं तळण केलं तर ते ऑइल 4-5 दिवसांच्या पणत्यांमध्ये संपून जातं.
(हे कदाचित सगळ्यांना पचणार नाही, पण आम्ही पूजाअर्चा rituals यावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे कदाचित आम्हाला चालून जातं. देवाला दिवा लावणं यामध्ये भावनेपेक्षा (मेंटल कंडीनशनिंगमुळे) प्रसन्न वाटतं किंवा छान दिसतं हीच भावना असते. श्रद्धाळू मनाला ही टीप कामाची नाही)

घरात लॉफ्ट, बेडच्या खालचं स्टोरेज, क्वचित वर्षा सहा महिन्यातून उघडलं जाणार कपाट या सगळ्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू तुमच्या लक्षात असतात का? माझ्या नसतात. अशा स्टोरेजची आवराआवर करताना एक्सेल मध्ये लिस्ट करून ठेवायची. मग नुसतं दिवाळी डेकोरेशन, न्यू टेबल मॅट्स, कॅम्पिंग टेंट अस सर्च केलं की हवी ती गोष्ट नक्की कशात भरून ठेवली आहे हे सेकंदात सापडते.

तळून उरलेलं तेल फेकायचं असेल तर ते कसं फेकतात? >>>> जे फेकतात ते सांगू शकतील. मी टाकू शकत नाही, म्हणून हा विचार कधी केला नाही. मी एकदाच सोसायटीच्या होळीत ओतलं होतं. पण लोकांच्या 'झुठा ऑइल' भावना समजून नंतर टाळलं.

हवी ती गोष्ट नक्की कशात भरून ठेवली आहे हे सेकंदात सापडते.>>>> छान टीप आहे..

देवाला दिवा लावणं यामध्ये भावनेपेक्षा (मेंटल कंडीनशनिंगमुळे) प्रसन्न वाटतं किंवा छान दिसतं हीच भावना असते.>>>> +१. दिवा लावल्यावर प्रसन्न वाटतं खरे.कदचित कातरवेळीच्या परिणामावरचा उतारा असेलही.

मीरा.>>उरलेल्या तेलाचा दिवा लावण्यासाठी वापर मला तरी चांगला वाटतोय.. कारण ते तेल परत कशाच्याच वापरण्या लायक राहात नाही.. पण आईला कसं समजवायचं? Lol

भाजी आणि आमटीत या तेलाचा वापर अजिबात नको.. चव पार बिघडते..
Sad

गेट/बिजागऱ्या/शिवण मशीन ला पण वापरता येईल गाळून.
थोडक्यात पण महत्वाचे हे एक अमूल्य पुस्तक आहे.गावी जाताना वाल्या टीप, कपाट, कपडे, मध्ये मध्ये फेस पॅक च्या टिप्स.
अगदी मनोरंजन म्हणून आणि उपयोग म्हणून दोन्ही उपयोगाने वाचण्या सारखे.
असंच एक हल्लीच्या काळात आवडतं म्हणजे स्वयंपाक घरातील विज्ञान.

मैत्रिणीचे पाहुन ही युक्ती सुरु केली व फार उपयोगी आली :
तळण संपले की गॅस बंद करायचा व त्यात मस्त भरपुर फोडणी करुन घ्यायची. तेल गरमच असते त्यामुळे छान तडतडते. व गार झाली की काचेच्या बरणीत भरुन फ्रीजमधे ठेवायची. कोशिंबीरीला हवी तेव्हा वापरायची.

अगदी मनोरंजन म्हणून आणि उपयोग म्हणून दोन्ही उपयोगाने वाचण्या सारखे.>>>

यावरून लहानपणी वाचलेल्या 'ज्ञानसागरातील शिंपले' या मस्त पुस्तकाची आठवण झाली.

देवाला दिवा लावणं यामध्ये भावनेपेक्षा (मेंटल कंडीनशनिंगमुळे) प्रसन्न वाटतं किंवा छान दिसतं हीच भावना असते. >>>>अगदी अगदी माझ्या सारख्या मताचे कोणी भेटले याचा खूप आनंद झालाय,फक्त प्रसन्न वाटतं या एकाच कारणामुळे मी महिन्याचे 30ही दिवस दिवा लावते,
आता तुम्ही जी वेस्ट तेल वापरायची युक्ती सांगितली तर माझे असे म्हणणे आहे ते तेल गरम होऊन त्यातून टॉक्सिक गॅस वगैरे निघतात का?कारण त्याने खूप त्रास नक्की होणार नाही पण तरीही विचारलेले बरे,
हरे राम,एकही युक्ती स्वतः न सुचवता मी फक्त प्रश्न विचारतेय Sad

कोशिंबीरीला हवी तेव्हा वापरायची. >>>>

बरोबर, पण ती गारच वापरली पाहिजे. पुन्हा गरम नाही करायची.

@ आदू

यानिमित्ताने थोडी आरोग्यविषयक भर:

उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
ही रसायने कर्करोगकारक आहेत.

Dr कुमार,प्रतिसादासाठी खूप धन्यवाद, पण मला असे विचारायचे होते की त्या तेलाचा दिवा लावला तरी तेल गरम होणारच न?की कमी प्रमाणात असल्यामुळे जास्त नुकसान नाही होणार?

त्या तेलाचा दिवा लावला तरी तेल गरम होणारच न?>>>

ते तेल खाण्यासाठी नको.
गरम होऊनचे वायू वगैरेंनी आपल्याला त्रास नाही.

मांडीवरच्या यंत्राच्या ( Happy ) पिशवीला खूप कप्पे असतात. त्यात योजना नसेल तर एखादी गोष्ट शोधण्यासाठी सगळे कप्पे उसकावे लागतात. माझ्या बाबतीत तर प्रत्येक गोष्ट सगळीकडे पाहिल्यावर शेवटच्या कप्यातच सापडायची. जेंव्हापासून मी कुठली गोष्ट कुठे हे डोक्यात ठेवलय व तस केलय तेंव्हापासून माझा त्रास प्रचंड कमी झालाय. (थोडक्यात ५ एस मधल तत्व).
भ्रमणध्वनीतील दिनदर्षिका, गजर आणि नोटस चा व्यवहार सुकर करण्यासाठी फार उपयोग होतो. मीखूपच वापर करतो. मला सेक्रेटरी लागत नाही. Happy

व्यवस्थापन शास्त्रातील बर्‍याच गोष्टी आपल्याला घरी सुद्धा अडचणी सोडवण्यासाठी वापरता येतात. उदा. एकंदरीतच ५ एस सगळीकडे खूप उपयोगी पडत. तसेच RCA -root cause analysis, Why -Why, CAPA- Corrective and preventive action.

Pages