युक्त्या : सुचलेल्या आणि सुचविलेल्या

Submitted by asp. on 17 September, 2019 - 03:11

आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण अनेक उपकरणे किंवा यंत्रणा वापरतो. जेव्हा आपण एखादी यंत्रणा नियमित दीर्घकाळ वापरत असतो तेव्हा तिच्यातील बारकावे आपल्याला अनुभवातून समजू लागतात. तसेच त्यातील काही उणिवा सुद्धा जाणवतात. गेल्या दोन दशकांत आपण संगणक आणि त्याच्याशी संबंधित विविध उपकरणे वापरू लागलो. आपल्यातील बऱ्याच जणांचे संगणकाचे औपचारिक शिक्षण झालेले नव्हते. ऑफिसमध्ये काम करता करता एकमेकांच्या सहकार्याने आपण संगणक हळूहळू शिकत गेलो.

संगणकाव्यतिरिक्तही इतर काही यंत्रांशी आपला कामानिमित्त संबंध येत असतो. आपल्यातील बऱ्याच जणांना त्या यंत्राचे तांत्रिक ज्ञान नसते; आपण त्याचे निव्वळ वापरकर्ते असतो. एखादी यंत्रणा नियमित वापरत असताना आपल्याला त्यात एखादी अडचण वारंवार येत असते. त्यामुळे आपले मुख्य काम अडत नसते पण " यात अमुकतमुक सोय असती तर बरे झाले असते", असे आपल्याला वाटत असते. मग एखादे वेळेस गप्पा मारताना आपण आपल्या सहकाऱ्याला ती अडचण विचारतो. मग तो त्यावर विचार करू लागतो. मग तोही अजून एकदोघांना विचारतो. आता प्रत्येकाचे सामान्यज्ञान आणि तांत्रिक अंग कमीजास्त असते. काही अडचणी अशा असतात की त्याचे उत्तर गुगलून मिळतेच असे नाही. मग अचानक एके दिवशी आपल्यातील एखाद्याला त्यासंदर्भातली एखादी छोटीशी युक्ती सुचते. तो ती यंत्रावर करून पाहतो आणि काय ? ती अडचण चुटकीसरशी सोडवली जाते ! सामान्यांच्या दृष्टीने हा क्षण अगदी 'युरेका' सारखाच असतो. त्यातून झालेला आनंद विलक्षण असतो.

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात असा एखादा प्रसंग आलेला असतो. तेव्हा एखादी छोटी अडचण आपण कुठल्याही तंत्रज्ञांची मदत न घेता युक्तीने सोडवतो. अशा सहज सुचलेल्या किंवा कोणाला आपण सुचविलेल्या युक्त्यांचे अनुभव या धाग्यावर लिहावेत अशी कल्पना आहे. असे अनुभव एकमेकांसाठी रंजक व मार्गदर्शक ठरतील असे वाटते.

क्षणभर यंत्र सोडून द्या. अगदी साध्यासोप्या कृती करताना देखील एखादी युक्ती सुचते, जी पुढे कायम उपयोगी पडते. एक सोपे उदाहरण देतो. आपण कागद चिकटवण्यासाठी सेलोटेप वापरतो. त्याचा हवा तेवढाच तुकडा कापण्यासाठी कात्री वापरणे उत्तमच. पण समजा ती जवळ नसेल तर आपण टाचणीने थोडे टोचे मारून काम निभावून नेऊ शकतो. तसेच टेपचा वापर झाल्यावर पुढच्या वेळेस त्याचे 'टोक' सहज सापडावे म्हणून आपण आताच ते थोडे दुमडून ठेवतो.
तर अशा अनेक छोट्या मोठ्या युक्त्या आपण लिहाव्यात असे आवाहन करतो. माझा एक अनुभव नंतर प्रतिसादात लिहिणार आहे. पण आधी तुमच्याकडून सुरवात होऊद्या.

धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कदाचित सगळ्यांना पचणार नाही, पण आम्ही पूजाअर्चा rituals यावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे कदाचित आम्हाला चालून जातं. देवाला दिवा लावणं यामध्ये भावनेपेक्षा (मेंटल कंडीनशनिंगमुळे) प्रसन्न वाटतं किंवा छान दिसतं हीच भावना असते. श्रद्धाळू मनाला ही टीप कामाची नाही)
नवीन Submitted by मीरा.. on 19 September, 2019 - 23:40
>>> मीरा जी मी शनिशिंगणापूर येथे एकदाच गेलो होतो तेव्हा तेल गटारींमधून वाहत जाताना पाहून खूप वाईट वाटले होते.

५ एस :- In Japanese, the five S's are Seiri, Seiton, Seiso, Seiketsu, and Shitsuke. In English, the five S's are translated as Sort, Set in Order, Shine, Standardize, and Sustain.
घरासाठी जर का हे वापरायच असेल तर त्याचा अर्थ असा होइल.
१. घरातल्या वस्तूंची वर्गवारी करा. (नेहमी लागणार्‍या, कधी कधी लागणार्‍या, कधीच न लागणार्‍या, कचरा/अडगळ वगैरे.
२. नको असलेल्या फेकून द्या, बाकिच्या प्रत्येक वस्तूसाठी वापराप्रमाणे योग्य जागा ठरवा व तिथेच ठेवायचा नियम पाळा.
३. स्वच्छता ठेवा
४. वरील तीन गोष्टींसाठी नियमन करा (कधी करायच्या वगैरे)
५. वरील चार गोष्टींचे कसोशीने पालन होते आहे की नाही याकडे लक्ष द्या.

विक्रमसिंह,
5 S आवडले, एकदम कडक ! धन्यवाद.

. तळणी चे तेल पायाच्या भेगा असल्यास त्यात जिरवता येईल. तसेच दाराच्या बिजागिरयांना लावणे.

Six Sigma - 5S tool हे कॉर्पोरेट मध्ये कंपल्सरी सर्टिफिकेशन आहे म्हणून शिकले, पण विक्रमसिंहांनी लिहिल्याप्रमाणे त्याच घरी सुद्धा खूप उपयोग होतो. एकदा 5S सिस्टम समजून घेतली की ती आपल्यात भिनते आणि रोजचं आयुष्य इतकं सुव्यवस्थित होतं. ते माझ्या मते फार आदर्श टूल आहे.

अमर ९९,

तुमचा वाहनांचा अनुभव दांडगा असल्याने विचारतो.
आपण पेट्रोल भरताना जर २००/३०० अशा शतकी रुपयांचे भरले, तर पंपवाल्यांचे आपल्याला गंडवायचे सेटिंग असते; प्रत्यक्ष पेट्रोल मिटर पेक्षा कमी मिळते, असे कोणीतरी पसरवले आहे.
हे खरे असते का?

काही लोक २३५/ १७० अशा रुपयांचे भरताना दिसतात.

मी तरी पाच दहा रुपयांना गंडा बसल्याचा विचार करीत नाही. मी सोडून सगळ्यांनी प्रामाणिकपणे वागले पाहिजे अशी मानसिकता असणाऱ्या आपल्या देशात मी या गोष्टींचा विचार करून डोके शिणवून घेत नाही. आवळा देऊन कोहळा मिळवता कसं येईल ही मानसिकता आपल्याकडे फार आहे. कालच टॅक्सी ला बटन बसवून मीटर मध्ये फसवणूक करणारांना दम देणारा मनसे नेते नांदगावकर यांचा व्हिडिओ पाहिला. लुटायची मानसिकता चहुकडे पसरली आहे कुठे कुठे ठिगळ लावणार? बऱ्याचदा प्रामाणिक सेवा देणारांवरही शंका घेतली जाते. मुळात टॅंकर मध्ये तेल कमी भरण्यापासून ते नाफ्ता भेसळीच्या अनेक सुरस/ खऱ्या कहाण्या कानावर येतच असतात.

बऱ्याचदा प्रामाणिक सेवा देणारांवरही शंका घेतली जाते. >>
+७८६

WA च्या धुमाकूळा नंतर तर खरे की खोटे याचा संभ्रम वाढला आहे.

सुनिधी,तुमची फोडणीची आयडीया छानेय.>>> +१.

फार पूर्वी,लोकरंगमधे मोहसिना मुकादम की अजून कोणीतरी यांनी लिहिल्याचे आठवते की पट्टीचा आचारी, तळण करायचे असल्यास त्यात वाटीभर वापरलेले तेल घालतो.वापरलेले तेल मिसळल्याने तेल लवकर तापते.

घराचे लॅच कुलूपवाले दार ओढून जाताना अनवधानाने किल्ली विसरते. असे होऊच नये म्हणून सुधारित लॅच कुलूप निघाले आहे.
त्यात आपण दार ओढले की फक्त 'लागते' पण लॉक होत नाही
आता त्याच्या भोकात किल्ली घालून फिरवल्यावरच कुलूप लागते. घराच्या आतल्या खोल्यांना अशी कुलूपे असतातच. पण मुख्य दरवाजालाही असे काढले आहे.

घराच्या आतल्या खोल्यांना अशी कुलूपे असतातच. >>>> मागच्याच वर्षी बेडरूमचे लॉक लागल्याने मी आत अडकले होते.दाराखालून चावी दिली,पण उघडले नाही.नशीब बाकीचे बाहेर होते.चावीवाल्याला बोलावून कुलूप फोडले.

छान आहे हा धागा.

>> Six Sigma - 5S tool हे कॉर्पोरेट मध्ये कंपल्सरी सर्टिफिकेशन आहे म्हणून शिकले, पण विक्रमसिंहांनी लिहिल्याप्रमाणे त्याच घरी सुद्धा खूप उपयोग होतो. एकदा 5S सिस्टम समजून घेतली की ती आपल्यात भिनते आणि रोजचं आयुष्य इतकं सुव्यवस्थित होतं. ते माझ्या मते फार आदर्श टूल आहे.
मीरा , पूर्ण सहमत. ६ सिग्मा चा आयुश्यात पण उपयोग होतो हे अगदी खरं.

>> मिक्सर धुताना, सरळ एक थेंब भांड्याचा साबण व पाणि घालून, मिक्सर चालवायचा. खळखळून स्वच्छ होतो.
सामो, मी हँड मिक्सी धुताना करते असं. कारण हँड मिक्सी घासायला टाकता येत नाही. चुकुन धुताना उलटा झाला तर मशीन मधे पाणी जाऊ शकतं. मग मी सरळ एका उभ्या भांड्यात लिक्विड सोप आणि गरम पाणी घेऊन पुन्हा हँड मिक्सी फिरवते. मग सा ध्या पाण्याने परत. एकदम स्वच्छ होतो. नाही झाला तर पुन्हा हीच प्रोसेस. बहुतेकदा लोणी काढायला वापरला जात असल्यामुळे गरम पाणी + सोप वर्क्स.

सुनिधी आई पण सेम फोडणी करून ठेवते फ्रिज मध्ये उरलेल्या तळणीच्या तेलाची , आणि मग कोशिंबिर किंवा खिचडी ला वरून वापरते. पुन्हा गरम न करता.

देवकी ,
अरेरे ! बाका प्रसंग होता तर !

घराचे लॅच कुलूपवाले दार ओढून जाताना अनवधानाने किल्ली विसरते. असे होऊच नये म्हणून सुधारित लॅच कुलूप निघाले आहे.>>> credit card वापरून दार उघडता येते. ...https://www.wikihow.com/Unlock-a-Door

सोनाली
स्प्रिंगलॉकस ना ते जमते आहे, अन्य काहींना नाही अशी माहिती तिथे आहे.
धन्यवाद

दही लावून ओव्हनमध्ये ठेवायचं ओव्हन बंद मात्र. ओव्हन सहसा, गॅसशेगडीखाली असल्याने, किंचीत गरम असल्याने, दही छान लागते.
तेच मूग/मटकी कडधान्यांचे मोड येण्याकरता, ओव्हनमध्ये ओलसर कपड्यात अथवा पेपर टॉवेल ओलसर करुन त्यात झाकून ठेवायचे. गुडुप अंधारात, ओलसर , ऊबदार, वातावरणात कसले पट्टकन मोड येतात.

स्वयंपाकातल्या युक्त्यांसाठी वेगळा धागा( वेगळे धागे) आहेत.
दह्यावरही धागे आहेत.
इथे वेगळ्या क्षेत्रातल्या युक्त्या वाचायला मिळतील तर बरे होईल.
आणि स्वयंपाकाच्या युक्त्या त्या त्या धाग्यावर हे त्या पाच एस ला अनुसरूनही होईल.

मला एक शंका आहे.
वायर्ड इंटरनेट सेवेत जेव्हा व्यत्यय येतो तेव्हा आपण जर मोडेम बंद करून पुन्हा चालू केले तर बरेचदा सेवा पुन्हा चालू होते.
ही निव्वळ युक्ती आहे की यामागे काही शास्त्र आहे ?

ही निव्वळ युक्ती आहे की यामागे काही शास्त्र आहे ?>> बजाज चेतक नाहीका तिरकी केली की पटक्कनी इस्टा र्ट होते तसेच आहे.

रुचिरा पुस्तक पहिली आवृत्ती पासून पुढे पुस्तकाच्या शेवटी अश्या युक्त्या दिलेल्या आहेत. युक्त्या त्याच आहेत आता मायबोलीकरांची नवी पिढी आल्यानी. तेच तेच किचन सायन्स परत लिहीत आहेत.

Pages