प्रकाशचित्रांचा झब्बू 3: आपली माती आपली माणसं

Submitted by संयोजक on 7 September, 2019 - 14:43

मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि तिसरा विषय आहे - "आपली माती आपली माणसं"

आपण रहात कुठेही असू पण आपल्या सगळ्यांच्याच मनात एक गाव रहात असतो. डोंगरदऱ्यांचा गाव, कौलारु घरांचा गाव, खळाळ पाण्याचा गाव अन ऐसपैस माणसांचा गाव.
पारावरच्या गप्पांचा गाव, नदीवरल्या साकवांचा गाव,
मंदीरातल्या भजनाचा गाव अन झाडावरच्या झुल्याचा गाव.
किती आठवणी अन किती रुपे!
साधेपणाचा टेंभा न मिरवणारा साधेपणा गवसण्याची ही एकच जागा. इथली माती आणि इथली माणसे यांचा एक अनोखा दरवळ!
आजच्या झब्बूचा हाच विषय आहे.... गावाकडे चक्कर झालीय ना इतक्यातच? येउंद्या मग फोटू बिगीबिगी Happy

20190908_001237.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा फोटो सर्वच.

धामापूर गावाचं वर्णन सुनीता देशपांडे यांच्या पुस्तकात वाचलेलं, तलाव पण होता त्यात, निरु फोटो बघून ते सर्व आठवलं, मस्त वाटलं एकदम.

एक धामापूर गाव संगमेश्वर तालुक्यात पण आहे, माखजनजवळ, असं ऐकलंय पण गेले नाही कधी.

काय मस्त रुबाबदार प्राणी आहे!! सुरेख!! >>> अगदी अगदी.

कळंब नावांची बरीच गावे दिसतायेत महाराष्ट्रात. एक इथे नेरळ कर्जतच्या मध्ये आहे, एक बीड जवळ आहे मराठवाड्यात.

सगळेच प्रचि मस्त

नीरु मूळगाव कुठे आहे.<<<<
@ अन्जू : Happy तुमच्यापासून जवळच.. बदलापूरहून थोडंस पुढे.
बदलापूर-बोराडपाडा-म्हसा रस्त्यावर.. >>>> मुळगावाच्या रत्यावर असणार्या धाब्यांवर मिळणारा वडापाव, ं मिसळ अन चिकन थाळी आठवली निरू. आता तिकडे जायलाच हवे, खासकरुन वडापाव अन चिकन थाळी सोबत गरमा गरम तांदळाची भाकरी खायला.

गजानन - कणेरी मठ - सिद्धगिरी, कोल्हापूर खुपच छान आहे हा. ईतक्यांदा गेलेय तरी दरवेळी तितकेच छान , प्रसन्न वाटते तीथे गेल्यावर

Pages