प्रकाशचित्रांचा झब्बू 3: आपली माती आपली माणसं

Submitted by संयोजक on 7 September, 2019 - 14:43

मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि तिसरा विषय आहे - "आपली माती आपली माणसं"

आपण रहात कुठेही असू पण आपल्या सगळ्यांच्याच मनात एक गाव रहात असतो. डोंगरदऱ्यांचा गाव, कौलारु घरांचा गाव, खळाळ पाण्याचा गाव अन ऐसपैस माणसांचा गाव.
पारावरच्या गप्पांचा गाव, नदीवरल्या साकवांचा गाव,
मंदीरातल्या भजनाचा गाव अन झाडावरच्या झुल्याचा गाव.
किती आठवणी अन किती रुपे!
साधेपणाचा टेंभा न मिरवणारा साधेपणा गवसण्याची ही एकच जागा. इथली माती आणि इथली माणसे यांचा एक अनोखा दरवळ!
आजच्या झब्बूचा हाच विषय आहे.... गावाकडे चक्कर झालीय ना इतक्यातच? येउंद्या मग फोटू बिगीबिगी Happy

20190908_001237.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेंगुर्ला जेट्टी....
गावातली बरीच माणसं इथे संध्याकाळी फिरायला येतात..

वेंगुर्ला बंदरावर उजव्या हाताला एक टेकडी आहे.. तिथली सायंकाळ...

ह्याच प्रतिसादात तिचाच अजून एक प्रचि...

देवबागचा सूर्यास्त.... ०१

देवबागचा सूर्यास्त...०२

ह्या वरच्या प्रचि मधे क्रिकेटचा डाव रंगलाय.. Zoom to See..

IMG_20160910_155507.jpg

हळदीचे शेत, आमच्या गावातले
मु पो सुकळी, जिल्हा हिंगोली

सर्वच फोटो मस्त आहेत. पण तो पतंग उडवत आहे त्या मुलाचा फोटो पाहून खुपच नॉस्टॅलजिक व्हायला झाले.

तसे सगळेच फोटो खुप छान आहेत… पण स्पेशल मेन्शन…
कुडाळ ची एक हिवाळी सकाळ.., तोंडवली: आणि धामापूरचे देवळाचे खांब!

निरु यांचा सूर्यास्त सुंदर. पाणी पण केशरी.
खांब पण सुंदर
स्वरुप यांची पहाट कसली पिवळीधमक आलीये... मस्त.
हर्पेन यांचा गुरं चरायला सोडुन मस्तपैकी दगडांवर बसलेल्या माणसे व कुत्रे टकमक बघतानाचा फोटो मस्त.

>>स्वरुप यांची पहाट कसली पिवळीधमक आलीये
थोडे एडिटिंग आहे त्या फोटोत

कवडीपाटचा अजुन एक: नौकानयन

20170116_195101.jpg

डावीकडे माझे मोठे दिर आंबे भरताना, बाकीचे आमच्याकडचे मदतनीस काका.

IMG-20170517-WA0049_0.jpg

Pages