प्रकाशचित्रांचा झब्बू 3: आपली माती आपली माणसं

Submitted by संयोजक on 7 September, 2019 - 14:43

मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि तिसरा विषय आहे - "आपली माती आपली माणसं"

आपण रहात कुठेही असू पण आपल्या सगळ्यांच्याच मनात एक गाव रहात असतो. डोंगरदऱ्यांचा गाव, कौलारु घरांचा गाव, खळाळ पाण्याचा गाव अन ऐसपैस माणसांचा गाव.
पारावरच्या गप्पांचा गाव, नदीवरल्या साकवांचा गाव,
मंदीरातल्या भजनाचा गाव अन झाडावरच्या झुल्याचा गाव.
किती आठवणी अन किती रुपे!
साधेपणाचा टेंभा न मिरवणारा साधेपणा गवसण्याची ही एकच जागा. इथली माती आणि इथली माणसे यांचा एक अनोखा दरवळ!
आजच्या झब्बूचा हाच विषय आहे.... गावाकडे चक्कर झालीय ना इतक्यातच? येउंद्या मग फोटू बिगीबिगी Happy

20190908_001237.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नदी शेजारी किंवा पाण्याच्या जागेशेजारी जरा उंचावर घरच्यांसाठी भाजी वगैरे लावतात, त्याला परडे लावले असे म्हणतात. परडे शिंपायला पाणी असे उपसतात..

खालच्या फोटोत जिथून पाणी उपसताहेत ती शेताची जागा आहे पण तिथे जिवंत झरा असल्यामुळे थोडीशी खोल कोंड तयार झाली. वरच्या छोट्याश्या जागेत गावच्या वहिनीने भाजी, कांदे वगैरे लावलेत. ते शिंपतानाचा फोटो.

एका बाजूला पाण्यासाठी डब्बा लावतात, दुसऱ्या बाजूला जड दगड लावतात.

पाण्यात डब्बा बुडवताना

हा फोटो पाणी वर ओढताना.

नीट डब्बा बॅलन्स करताना

पाणी ओतताना

याला काय म्हणतात ते विसरले. हे दिसायला सोपे दिसते पण शहरी लोकांना असे शिंपण घालणे जमत नाही Happy

एकच फोटो टाकून प्रोसेस कळली नसती असे वाटले म्हणून चार फोटो द्यावे लागले. एकडाव माफी द्यावी Happy Happy

साधना, या प्रकारे शेतीला पाणी देतात त्याची चर्चा माबोवरच झाली होती बहुतेक. मला वाटते हिरा आणि अजून एकाने हाताने रेखाटलेले चित्र सुध्दा दिले होते. धागा आता आठवत नाही.
विषय छान निवडला आहे. संयोजक मंडळाचे खुप कौतुक वाटते.

मेळघाटातले एक गाव
DSC03762.jpg

आमच्या गावच्या घरासमोरचा रस्ता, ह्या डिसेंबर महिन्यात गावी गेले होते तेव्हा एका संध्याकाळी घेतलाय फोटो.

IMG_20190909_155236.jpg

DSC00431.jpg

कमळगडाच्या वाटेवरचे गाव शिवार

सगळेच फोटो मस्त आहेत!
पण हर्पेनचा हा फोटो सगळ्यात आवडला:
Submitted by हर्पेन on 9 September, 2019 - 14:48
खुप थंडीचे दिवस दिसतायत!

मस्त मस्त फोटो आहेत.

माझ्याकडे काही आहेत कोकणातले, पण मला पोस्ट करता येत नाहीयेत. ती साईझ वगैरे लिमिटेड करून घ्यावी लागेल. नंतर पोस्ट करेन.

धन्यवाद स्वरुप
हो थंडीचे दिवस होते + पहाट होती.

भोपळा,
तयाच वेलू गेला छपरावरी

DSC04045.jpg

आमची आमराई.

आंब्याची बाग.jpg

माझ्या पहिल्या फोटोतील कोल्हा ओळखला का? >>> मला भु भु वाटला, बाब्बो कोल्हा. गावच्या माऊ देता येतात का बघते. मी लांब माऊ, भुभु पासून. देता येत नाहीये. साईझ मॅच होत नाहीये. उद्या बघते.

कुडाळ ची एक हिवाळी सकाळ..
आंघोळीसाठी अंगणातल्या चुलीवर तापवलं जाणारं पाणी..
आणि लाकडाच्या धुराचा वास..

कुडाळच्याच एका तलावात डुंबणार्या म्हशी..

तिच फ्रेम आहे म्हणून अजून एक...

Pages