प्रकाशचित्रांचा झब्बू 3: आपली माती आपली माणसं

Submitted by संयोजक on 7 September, 2019 - 14:43

मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि तिसरा विषय आहे - "आपली माती आपली माणसं"

आपण रहात कुठेही असू पण आपल्या सगळ्यांच्याच मनात एक गाव रहात असतो. डोंगरदऱ्यांचा गाव, कौलारु घरांचा गाव, खळाळ पाण्याचा गाव अन ऐसपैस माणसांचा गाव.
पारावरच्या गप्पांचा गाव, नदीवरल्या साकवांचा गाव,
मंदीरातल्या भजनाचा गाव अन झाडावरच्या झुल्याचा गाव.
किती आठवणी अन किती रुपे!
साधेपणाचा टेंभा न मिरवणारा साधेपणा गवसण्याची ही एकच जागा. इथली माती आणि इथली माणसे यांचा एक अनोखा दरवळ!
आजच्या झब्बूचा हाच विषय आहे.... गावाकडे चक्कर झालीय ना इतक्यातच? येउंद्या मग फोटू बिगीबिगी Happy

20190908_001237.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो गजानन. पेंटिंग वाटतं अगदी. हिरवाई आणि निळाई जाम क्युट, पांढरे ढग आणि मातीची पायवाट यामुळे अजून खुलून दिसतेय हिरवाई आणि निळाई.

नीरु फोटो भारी मस्तच. मूळगाव कुठे आहे.

प्राचीन आजोळ घर छान आहे. माहेरी कोकणात माडीचं घर आहे असं. चिरेबंदी लाल चुटुक.

Niru, the photograph of Dhamapur lake is awesome....... Calling it heaven is an understatement.......

All the clicks are amazing...... My feelings are same as Sunidhi...... Even more intense as I never belonged to any village. No connection ftom any side to experience it. ...... countryside life was/is my dream.

सर्व नवे फोटो मस्त. धामापूर तलाव एकदम बेस्ट. एकदम थायलेंड इंडोनेशिया टाइप वाटतो आहे. डोळे निवले एकदम

नितळ निळाई आकाशाची (गजानन) अन क्षितिजाची लाली (निरू) नंतर
दवात भरल्या वाटेवरची किरणांची रांगोळी

हे जीवन सुंदर आहे.

DSC09120.JPG

सगळे फोटो सुंदर आहेत....

धामापूर तळ्याकाठी तासन्तास आरामात जातील इतकी सुंदर भौगोलिक रचना आहे...

मस्त फोटो सगळेच .

अंजू फणश्याच वर्णन वाचून नाडणात पोचले.

vt220 , तुमचं गाव पडेल ? मस्तच वाटलं वाचून .

आपण सगळ्यानी कधी तरी एकदम गेलं पाहिजे गावाला

>>>नीरु मूळगाव कुठे आहे.<<<<
@ अन्जू : Happy तुमच्यापासून जवळच.. बदलापूरहून थोडंस पुढे.
बदलापूर-बोराडपाडा-म्हसा रस्त्यावर..

@ मीरा.. आणि अमा : धामापूर ही अतिशय सुंदर जागा आहे.
भोवताली छोटेखानी जंगल आणि मधे तलाव. काठावर देवस्थान.
काठावरच्या पायर्यांवर बसून तलावात पाय बुडवले की मासे येऊन तळपायाला गुदगुल्या करतात.
हे खरं तर माझ्या मित्राचं आजोळ. त्यामुळे हल्ली बर्याच वेळा त्याच्याबरोबर जाणं होतं..

अजून एक गोष्ट म्हणजे मलाही गांव नाही. शहरातंच वाढलो. त्यामुळे मग असे फोटो आसुसून काढतो आणि जे मिळालंच नाही त्याची तहान फोटो पाहून भागवतो..
ती भागत नाहीच, पण निदान....

हो नक्कीच!!
पावसाळ्यातलं शिवार - >>> खुप सुंदर!! हे माळशेज घाट क्रॉस करून पुढे गेल्यावर एक धरण लागतं तिथला आहे का?
किरणांची रांगोळी मंत्रमुग्ध करणारी आहे.

निरु, मस्त फोटो!

IMG_2870.JPG

ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, पाषाण

हे बघा. या मूर्ती आहेत. विक्रेतीच्या चेहर्‍यावरचे भाव, तिची नजर, ग्राहक महिलेची बसकन, उजव्या मुठीत मळलेली तंबाखू धरून संभाषणात सहभागी झालेला तो बाप्या. त्यांच्या कपड्यांची रंगसंगती, अलंकार यांच्यात साकारलेले बारकावे बघताना या नुकत्याच निर्जिव मूर्ती वाटत नाहीत तर त्यांच्यात एक जिवंत आणि रंजक असा संवाद (पक्षी खरेदी दरम्यानची निवड, किमतीवरून घासाघिस) चालू आहे याची झटक्यात कल्पना येते आणि ओठावर मिश्किल हसू पसरल्याशिवाय राहात नाही. हे प्रदर्शन प्रत्यक्ष पाहताना तिथून हलू वाटत नाही. (सिद्धगिरी, कोल्हापूर)

(स्वरुपाच्या फोटोवर झब्बू!)
CB575EDC-239D-43BB-8F1D-B721F3BCDB2E.jpg

तो खुशीत असलेल्या विद्यार्थ्यांचा फोटो इतका सुरेख आलेला आहे!! परत परत पहावासा वाटतो.

हेमाताई, आपण एक फणसे नाडण पडेल gtg करूया आणि सर्वांना बोलाऊया. माझाच कधी योग येतोय कोकणात जायचा काय माहिती, मे 2012 ला गेलेले, त्यानंतर नाही. माहेर, सासर कोकणात असून जाणं होत नाही.

निरु मस्तच, बघायला हवं मुळगाव, मध्ये म्हसा इथे जत्रेला भाऊ जाऊन आला.

बाकी फोटो सर्व बघते निवांतपणे.

मगाशी मोबाईलवर होते, त्यात मजा नाही येत फोटो बघायला छोट्या स्क्रीनवर. आता desktop वरून भारी वाटतं.

काय एकेक फोटो सुरेख, अवर्णनीय.

हेमाताई मलाही तुमचे फोटो बघून फणसे आठवतं. हे वरचे शेत आणि त्यापलीकडे गर्द वृक्ष, कसले भारी वाटतंय. मदतनीस कसले खुश आहेत, ह्या राबणाऱ्या सर्व हाताना सलाम.

सिद्धगिरी कोल्हापूर तसेच सोमेश्वरवडी पाषाण, जायला हवं एकदा.

FB_IMG_1568428141851.jpg

आंजर्ले

Pages