"गोकूळाष्टमी स्पेशल"गोपाळकाला by Namrata's CookBook :१६

Submitted by Namokar on 23 August, 2019 - 02:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

gopalkala image 1.jpg

साहित्य Ingredients:

२ वाटी जाड पोहे(नेहमी पोह्यासाठी जे वापरतो ते पोहे)
१ वाटी मुरमुरे/चिरमूरे
१ लाह्या
हिरव्या मिरच्या ३(आवडीप्रमाणे)
डाळे
शेंगादाणे(भाजून)
डाळिंब
१ वाटी घट्ट दही
मीठ
साखर
कोथिंबीर
तेल/तुप
जिरे
हळद
मोहरी (आवडीप्रमाणे)
काकडी,केळी, सफरचंद (आवडीप्रमाणे)
लोणचे (आवडीप्रमाणे)
IMG_20190821_092901.jpg

क्रमवार पाककृती: 

१. पोहे २-३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या(पोहे जास्त भिजवायचे नाहीत फक्त ओले करायचे).
२. एका भांड्यात पोहे , मुरमुरे/चिरमुरे , ज्वारीच्या लाह्या घालून चान एकत्र करुन घ्या
३. आता डाळे , शेंगदाणे (भाजलेले), बारीक चिरलेली मिरची (अर्धी चिरलेली मिरची बाजूला ठेवावी), दही घालून छान मिक्स करा.
४. आता यामध्ये हळद(optional), चवीनुसार मीठ , साखर , डाळिंब घाला
(आपण काकडी, सफरचंद, केळी देखील घालू शकता)
५. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा
६. आता फोडणीसाठी कढईत तेल / तुप घाला ,तेल गरम झाले की जिरे, बारीक चिरलेली मिरची घालून १ मिनीट परतून घ्या
७. तयार फोडणी गोपाळकाला मध्ये घालून छान मिक्स करुन घ्या
गोपाळकला तयार आहे
gopalkala image 2.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये काकडी, सफरचंद, केळी देखील घालू शकता
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/4JI3IVKWy3o

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शॉल्लेड!!
लहानपणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनात खाल्लेला गोपाळकाला कधीच विसरता येत नाही. काही कण मिळाले तरी अमृताची गोडी वाटायची.

आमच्याकडे घरच्या कुटुन केलेल्या पोहे-गुळ लाडु, केळ्याचे पोहे आणि तांदूळ रवा घालून अप्पे, मूगाचा शीरा, घरी कुटलेला सुंठवडा( मला अतिप्रिय) हे सर्वांना प्रसाद म्हणून आणि जेवायला, गरमागरम घावन, शेवग्याची कोरडी भाजी आणि केळफुलाची भाजी, गोड घट्ट दही आणि ताकातले तिखट पोहे अगदी हा मेनु वर्षानुवर्षे बनत आला आहे. रात्री १२ वाजता असे तुडुंब खावून पावसातल्या थंडीत मग भजन म्हणत पहाटे डोळा लागायचा.

आमच्याकडे घरच्या कुटुन केलेल्या पोहे-गुळ लाडु, केळ्याचे पोहे आणि तांदूळ रवा घालून अप्पे, मूगाचा शीरा, घरी कुटलेला सुंठवडा( मला अतिप्रिय) हे सर्वांना प्रसाद म्हणून आणि जेवायला, गरमागरम घावन, शेवग्याची कोरडी भाजी आणि केळफुलाची भाजी, गोड घट्ट दही आणि ताकातले तिखट पोहे अगदी हा मेनु वर्षानुवर्षे बनत आला आहे. > भारीच! देवीका, पाककृती आणि फोटो पण टाका ना सगळ्या मेनू चा .

आमच्याकडे पातळ पोहे+भिजवलेली चनाडाळ+हिरवी मिरची +चवीनूसार साखर मीठ + लोणचे+थोडे दही+असल्यास संत्र्याच्या फोडी असा साधा गोपाळकाला केला जातो. गोकूळाष्टमी व अनंत चतूर्दशीला घरोघरी असा गोपाळकाला प्रसाद म्हणून असतोच.

गोपाळकाला : द बिगिनिंग
आज थोडे करुन बघितले.

शनिवारी हॉस्पिटलमध्ये मोठ्या पातेल्यात गोपाळकाला : द कन्ल्युजन