सेक्स एज्युकेशन/लैंगिक शिक्षण

Submitted by मुक्ता.... on 28 July, 2019 - 13:24

सेक्स एज्युकेशन/लैंगिक शिक्षण

अवांतर वाचन बऱ्याचदा काही तरंग मनात निर्माण करतं. आणि मग मन म्हणतं की या विषयी आता लिहायलाच हवं.

एका गंभीर आणि सहज न बोलल्या जाणाऱ्या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न करतेय. संभाळून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मोकळेपणाने द्या.

आताच काही स्त्री, लहान मुले यांच्यावर रेप करण्याच्या घटनांवर आर्टिकल्स वाचनात आली.
अनेक देशात या घटना आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांनी शासनव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था त्रस्त आहेत. त्यावर ठोस उपाय योजना काय करावी याबद्दल हालचाली सुरू आहेत।
हल्ली पाश्चात्य देशांत करण्यात येणाऱ्या काही कृत्रिम उपाय जसे सेक्स रोबोट्स, सेक्स डॉल या बद्दल वाचनात आले. ते योग्य की अयोग्य हा अर्थात या लेखाचा मुळात तो उद्देश नाहीच आणि मुद्दाही नाही.

स्त्री विषयी आदर रुजवणे हा सर्वांत उत्तम पर्याय आहे. कुठल्याही कृत्रिम उपायांनी या विकृतीवर फारसा फरक पडेल असे वाटत नाही. भारतीय संस्कृती ही स्त्री चा आदर शिकवते. आणि स्त्री चा आदर करणं हे एकदम जमेल का? हे लहानपणापासून रुजवायला हवं मुलांमध्ये आणि मुलींमध्येही. मुळात आज मालिका ,चित्रपट आणि तत्सम मनोरंजनपर सुविधा यांचा परिणाम समाज मनावर होत असतो. शालेय अभ्यासक्रमात आशा किती गोष्टींवर भर आहे ज्यातून मुले आणि मुली यांच्यात परस्पर आदर भाव वाढीस लागेल? सेक्स एज्युकेशन हा विषय आपल्या सिस्टीम मध्ये किती विचारात घेतला जातो? त्याबद्दल किती जण मोकळे आणि समजूतदार भाष्य करतो अथवा करते? घराच्या स्तरावर म्हणजे कौटुंबिक स्तरावर किती प्रमाणात सर्वांनी बसून या विषयावर मुलांशी बोलले जाते? आजकाल सोशल मीडिया ,इंटरनेट,चित्रपटातील उत्तान गाणी या मुळे सहाजिक अगदी 5 ते 6 वर्षाची मुलं याबद्दल जर प्रश्न विचारू लागली तर किती समजूतदार उत्तरं पालक देतात? हा प्रश्न मुलांनी उपस्थित केला ,त्याविषयी काही मनातली शंका विचारली तर त्यांना एकतर डावलले जाते किंवा उगाच त्यावर काही विचित्र शंका घेतल्या जातात.
सेक्स एज्युकेशन हा विषय गँभिर नक्कीच आहे. त्या त्या वयाप्रमाणे मुलांशी योग्य संवाद साधल्यास याविषयी मुले जागरूक राहतील. भिन्न लिंगी व्यक्तीविषयी आकर्षण उत्पन्न होणे सहाजिक आहे. मुळात ते नॉर्मल आहे हे आपण पालक म्हणून किती समजून घेतो? आपल्या मनात त्याविषयी किती पारदर्शकता आहे? आणि आपण मुलांना प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजावून देऊ शकतो का? नाही मला नाही वाटत अजूनही आपण त्या बाबतीत आधुनिक झालो आहोत. आपण मॉल मध्ये फिरतो, पिझ्झा बर्गर खातो म्हणून आपण पुढारलो का?किती मुली मासिक पाळी बद्दल मोकळेपणाने बोलतात? आपल्या भावाला याबद्दल सांगतात?अजूनही नाही. गर्भधारणेची प्रक्रिया ही किती मोकळेपणाने आपल्या 'वयात ' येणाऱ्या मुलांशी आपण बोलत आहोत? किती जण,म्हणजे पुरुष अथवा स्त्री लग्न ठरलेल्या आपल्या जोडीदाराशी आपली सेक्स बद्दल मतं मोकळेपणाने सांगतात? दागिने कपडे यांची खरेदी जितक्या मोकळेपणाने करतोय तितका मोकळेपणा या महत्वाच्या विषयाबद्दल नक्कीच नाही? गर्भनिरोधक या विषयी लग्न झालेल्या स्त्रीमध्येही आणि पुरुषांमध्येही अनभिज्ञता दिसुन येते?
आपल्या शरीराविषयी अज्ञान असणे हे देखील अनेक विकृतींना जन्म देते. त्या मुळे प्रथम लैंगिक समस्या, स्त्री पुरुष समानता यावर योग्य भाष्य केले गेले पाहिजे. ज्ञानपूर्ण संवाद व्हायला हवा. तिथे बऱ्याच अंशी विकृतींना आळा बसेल.

राहिला प्रश्न गुन्हा करणार्यांचा, त्यांना तर कठोर शासन व्हायलाच हवं. कारण अनेक सुशिक्षित व्यक्ती अगदी पुरेपूर ज्ञान असणाऱ्या व्यक्ती यादेखील जाणीवपूर्वक जेव्हा गुन्हा करतात , रेप करून स्त्री ,पुरुष या पैकी कुणाचेही आयुष्य बरबाद करण्याचा कुणालाही अधिकार नाही. बलात्कार हा स्त्री अथवा पुरुषावर होणं हे विकृतचं आहे. होय पुरुषांवर ही बळजबरी होते. अर्थात 'ऐतराज 'हा अक्षयकुमार अभिनित चित्रपट याचे जळजळीत दर्शन घडवतो. लहान मुलांवर अत्याचार करणार्यांना तर 'कडक ' या शब्दपलीकडे जर काही कठोर असेल ते शासन व्हायला हवे. त्याशिवाय वळण लागणार नाहीयेय.
हा लेख मोठा झालाय, काही मुद्दे राहिलेत असं वाटतं. त्यावर काही विचार आले पुन्हा मनात तर दुसरा लेख सुद्धा लिहीन.

हा विषय मोठा आणि गंभीर आहे. मी अतिशय गांभीर्याने लिहिलाय. यावर विचारमंथन आणि सकारात्मक व्हावे ही इच्छा आहे. हा लेख एक सामाजिक विषय घेऊन लिहिला आहे , याची वाचकांनी नोंद घ्यावी.

'एक जबाबदार व्यक्ती म्हणूनच यावर टिप्पणी करावी. कुठल्याही प्रकारचे विकृत भाष्य करु नये ही विनंती. आपणास काही आवडले नसल्यास ते योग्य भाषेत नमूद करावे.'

आपली विनम्र
रोहिणी बेडेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<भिन्न लिंगी व्यक्तीविषयी आकर्षण उत्पन्न होणे सहाजिक आहे>>>>
फक्त भिन्न लिंगीच का? सेक्स एज्युकेशन मधे सेक्शुआलिटी व जेंडर एज्युकेशन सुद्धा येते. स्त्रीपुरुष समानता, स्त्रियांचा आदर आवश्यकच पण एवड्याने प्रश्न सुटणार नाहीत. सोसायटीत फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच जेंडर नाहीत. नॉन बायनरी लोक असतात. भिन्न भिन्न लैंगिकता आणि विविध लैंगिक जाणिवांचा आदर स्वतः करणे आणि मुलांना करायला शिकवणे म्हणजे ब्रॉड सेक्स एज्युकेशन. त्यांच्या कडुन व त्यांच्या वर लैंगिक पिळवणूक घडु नये म्हणून त्यांनी दक्ष राहावे आणि ignorance ला बळी न पडता समृध्द, उत्कट, सुरक्षित सेक्शुअल लाईफ जगावे यासाठी सेक्स एज्युकेशन.
इन्क्लुजन हाच संस्क्रुतीचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडिअंट. भारतीय, वेस्टर्न वैगेरे फक्त वेगळे वेगळे ब्रँड्स.

लैंगिक शिक्षणामुळे प्रश्न काही अंशी सोडवायाला मदत होईल. समाजाचे नव्याने लैंगिक व्यवस्थापन करणे हे मूळ आव्हान आहे. मंगला सामंत यांनी एका वेगळ्या दृष्टीकोनातून या वर लिहिले आहे निर्भया प्रकरणाच्या वेळी. हे पहा
लोकस्त्ता चतुरंग ५ जाने २०१३
लैंगिकतेचे शमन की दमन?

लोकसत्ता चतुरंग १२ जाने २०१३

लैंगिकतेचे शमन हवेच

हा लेख मोठा झालाय, काही मुद्दे राहिलेत असं वाटतं. >>>>>

सॉरी, लेख एकही नवीन मुद्दा मांडत नाही,
3-4 वाक्यात आधीच माहीत असणारी समस्या,आणि पुढील 2 वाक्यात "असे करावे" " तसे करतो का?" विधानात त्याचे उत्तर असे स्वरून आहे.

लेख एखाद्या वृत्तपत्रासाठी लिहिला होता का? शब्द संख्या मर्यादित ठेवण्याच्या नादात असे होऊ शकते.

असो... सध्यातरी शीर्षक क्लीक बेट ठरणार आहे.

मला स्त्री विषयक चर्चात भाग घेता येत नाही. याचे कारण एक तर बहीण नाही, त्यात लहान असताना मुलींमधे खेळण्याला कमीपणा समजण्यात असेल. मुलंच नाही मुली सुद्धा मुलींच्या खेळात खेळायला आलेल्या मुलांना चिडवत. अजूनही होत असेल. जर असेच चालू राहीले तर दोन्ही जेण्डरला एकमेकांचे प्रश्न समजणार नाहीत. स्त्री जाणिवा येणे लांबची गोष्ट आहे. आमचे पालनपोषण सर्वसाधारण मुलांचे दणके खात खात होते तसे झालेले आहे. बापाने दम दिला पोरी घरी आल्या नाहीत पाहीजेत तर नाहीच.

एकमेकांपासून लांब राहण्याच्या सक्तीतून आकर्षण जास्त वाढते. चोरटेपणाचे आकर्षण हे मोकळीकीपेक्षा जास्त असते. शाळेत लैंगिक शिक्षण देणे ही मलमपट्टी आहे. मुक्त वातावरण असणे हा उपाय असू शकतो.

मात्र सगळे उपाय करूनही बलात्कार थांबणार नाहीत. ते कमी होतील. कारण मनुष्यस्वभावाच्या त-हा. तसेच स्त्री पुरूष जडणघडण देखील.
लैंगिक समानता म्हणजे काय याचा विचार झाला पाहीजे.

मुली मुलांप्रमाणे मेक अप न जरता एका मिनिटात तयार होऊन गबाळ्यासारख्या बाहेर पडू शकतील का ?
बायका सासूची बुराई करण्यासाठी अड्डे जमवणे बंद करतील का ?

किंवा पुरूष मुलींच्या वरील गोष्टी करतील तर ते स्विकारले जाईल का ?

लेखात नवीन असे काहीच नाही. भारतीय संस्कृती ही स्त्री चा आदर शिकवते हे तर घासून गुळगुळीत झालेले वाक्य!

मुली मुलांप्रमाणे मेक अप न जरता एका मिनिटात तयार होऊन गबाळ्यासारख्या बाहेर पडू शकतील का ?>>
कांदामुळा,
मुळात गबाळ्यासारखे कशाला बाहेर पडायचे? जमेल तितके निटनेटके रहावे. त्यात पुन्हा गरज असेल तर /मेकअप करावा असेल वाटत असेल तर खुशाल मेकअप करावा. पुरुषांसाठी मिळतात की मेकअप प्रॉडक्ट्स!
स्त्री विषयक चर्चेत भाग घेण्यासाठी घरात बहिण असायची गरज नाही. एक माणूस म्हणून सहवेदनेने प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करणे एवढे पुरेसे आहे.

कांदामुळा यांनी प्रामाणिकपणे लिहीलेय. माझा त्यांना प्लस १.
मुलं अवघडतात हे खरं आहे. सहवेदना वेगळं आणि चर्चेत भाग घेणे वेगळं.

धागा वाहता आहे का? का??

मुळात लेखनप्रकार निवडताना घोळ झाला आहे का? की मा. अ‍ॅडमिन यांनी वाहता केला आहे??

ओह.

मला वाटते इथे जरा गोंधळ झालाय, लेखिकेचा पहिला प्रतिसाद धाग्यावर कमेंट करणाऱ्यांना नसून जी पहिली पोस्ट आली होती पॉपकॉर्न आणा त्यावर आहे, त्यामुळे वाचणाऱ्यांचा गैरसमज झाला आणि अशा कमेंट्स आल्या.

लैंगिक शिक्षण हवे की नको याबद्दल आता कोणतीही शंका राहिलेली नाही. ते हवेच. कशासाठी, कसे, कधी आणि कुणी याबाबत मात्र एकच उत्तर असेल असे नाही. ते स्थळकालानुसार बदलू शकते. उदाहरणार्थ पहिली दुसरीच्या पुस्तकात आई, बाबा, बाॅय फ्रेंड , गर्लफ्रेंड असलेले चित्र मी पाहिलं आहे. पण सगळीकडे हे शक्य नाही.
या शिक्षणामुळे अत्याचार कमी होतील असे वाटत नाही. कारण अत्याचारी त्या बाबतीत जास्तच शिक्षित असत असावेत.

आपणा सर्वांचे प्रतिसाद महत्वाचे आहेत जितका मी निवडलेला विषय महत्वाचा आणि गम्भीर आहे. या लेखासाठी आलेला पहिला प्रतिसाद पॉपकॉर्न आणा आणि खुर्च्या टाका आशा प्रकारचा होता. आपल्या मायबोलीवर हा माझा पहिलाच दीर्घ लेख आहे आणि सुरुवातीलाच मी वेगळा विषय घेतला आहे. मी अशी कॉमेंट लिहीणार्या व्यक्तीचा उल्लेख केला नव्हता. मी त्यावर प्रतिसाद लिहील्या नंतर ती कॉमेंट उडवली गेली होती.आपल्या कॉमेंट्स ना मी सविस्तर प्रतिसाद देईनच

अश्या प्रकारे शिक्षण देऊन लैंगिक अत्याचार कमी होतील ही कवीकल्पना वाटते. मुळात कोणावर कुठल्याही प्रकारे अत्याचार (शाब्दिक/मानसिक/शारीरिक/सामाजिक) करण्याची मानसिकता असणे ही विकृती आहे आणि प्रत्येक मानव काही सत्प्रवृत्तीचा असू शकत नाही. प्रत्येकाच्या बालपणातले (शाळा+मित्रपरिवार) संस्कार आणि प्रत्यक्ष घरातील तसेच शेजारचे जातीनिहाय सामाजिक वातावरण त्याचे इतरांशी असणारे आचरण घडवत असते. खुपच अपवादात्मक स्थितीत वाईट वातावरण लाभलेले असतानाही सत्प्रवृत्त नागरिक बनल्याची उदाहरणे आहेत.

त्यामुळे अश्या लैंगिक शिक्षणाने प्रबोधन होऊन फारफारतर त्या संबधीचे आजार टाळले जातील आणि सर्व ज्ञान पौंगडावस्थेत असतानाच मिळाल्याने कुमारी माता बनण्याचे आणि/ किंवा गर्भपाताचे प्रकार होण्यास आळा बसु शकेल. मात्र बलात्कार / अत्याचार / लैंगिक हिंसाचार रोखण्यास हे शिक्षण पुरेसे नसून सुदृढ़ मन बनवणारे संस्कार आवश्यक ठरतील असे निश्चितपणे म्हणता येईल.

मायबोलीवर झालेल्या काही चर्चांपैकी हे धागे...

मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही...
https://www.maayboli.com/node/62803

लैंगिक शिक्षण : कसं व केव्हा द्यावं | Maayboli
https://www.maayboli.com/node/53208

मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी ...
https://www.maayboli.com/node/65903

मुलगा वयात येतांना
https://www.maayboli.com/node/43577

धागा बलात्कार. बलात्कार का होतात ते पाहण्याआधी बलात्काराची व्याख्या नक्की केली आहे का आपण? शब्दार्थानुसार बोलायचे तर संमती/इच्छा नसताना बळजबरीने ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार.

पण कायदा काय म्हणतो?

१. लग्न झाले असेल तर तो बलात्कार नव्हे. म्हणजे बायकोशी तिची इच्छा नसताना/ती आजारी असताना/तिला व्याधी किंवा वेदना असताना आपला कंड शमवण्यासाठी नवऱ्याने तिच्याशी बळजबरी शरीरसंबंध ठेवायला या देशात कायद्याने परवानगी आहे. बायको बलात्काराची केस करू शकत नाही. आजकाल नवीन कायद्यानुसार फारफार तर घरगुती हिंसाचारची केस करू शकत असेल. पण बलात्कार नाही.

२. संमतीनेच पण काहीतरी हेतू बाळगून संबंध ठेवले असतील आणि तो हेतू नंतर पूर्ण झाला नाही तरी तो नंतर बलात्काराचा गुन्हा ठरतो. त्यानुसार लग्नाचे वचन/नोकरीत बढतीचे वचन वगैरे वचने देऊन सम्बन्ध आले असतील व पुढे ते वचन पाळले गेले नाही तर भविष्यात कधीही कितीही वर्षांनी ती बलात्काराची केस होऊ शकते.

३. संमतीने संबंध ठेवले असतील पण ती मुलगी/स्त्री जर तिच्या घरच्यांना तसे करताना सापडली तर ते घरचे त्या पुरुषाविरोधात तिला बलात्कारची केस करण्यास भाग पाडतात. अशा काही केसेस मध्ये तरुण होरपळून गेलेले उदाहरणे ऐकली आहेत.

ज्या देशात बलात्काराच्या व्याख्येची कायद्यानेच क्रूर थट्टा केलेली आहे तिथे तुम्ही आम्ही पामर चर्चा करून काय साधणार?

तेंव्हा मला वाटतंय जेंव्हा तुम्ही धाग्यात बलात्कार म्हणता तेंव्हा वरील प्रकारचे बलात्कार जमेत धरत नाही. हि एक गोष्ट.

आता समजून चालू कि आपणास फक्त लग्नबाह्य व संमती नसताना केलेले बलात्कारच चर्चेत' घ्यायचे आहेत. तर असे "बलात्कार" केवळ लैंगिक शिक्षणाने बंद होण्याचे कारणच काय? कारण असे बलात्कार म्हणजे सामाजिक असमतोलाचे निर्देशक आहे. समाजातल्या वाढत्या लैंगिक भुकेचा तो निर्देशांक आहे. हे आपण कधीच समजून घेणार नाही आहोत का? एकीकडे स्त्रियांना भोगवादी आणि मालकी हक्काची वस्तू म्हणून मान्यता देणारी पुरुषप्रधान संस्कृती (ही संस्कृती स्त्री चा आदर कधी शिकवते?) आणि दुसरीकडे बोटाच्या टोकावर आलेले पोर्न व्हिडिओज ह्या दोन्हीत समाज भरडला जात आहे. लैंगिक भूक वाढते आहे पण शमन होत नाही. बेडकाने साप धरून ठेवावे तसे भारतात पुरुष बायकांना जखडून ठेवतात. लैंगिक भूक शमवण्यासाठी पुरुषांना जशी मोकळीक आहे तशी किती स्त्रियांना आहे?

"बलात्काराच्या" बहुतांश घटनेत केवळ समाजात बदनामी होईल म्हणून त्या स्त्रीने/मुलीने जीवाच्या आकांताने शरीर संबंधाना विरोध केलेला असतो हे सत्य आपण नाकारणार असू तर कृपया बंद करा हा भंपकपणा. शिसारी येते अक्षरशः व्याक थू!

प्राण्यांच्यात का होत नाहीत बलात्कार? जे नैसर्गिक संबंध आहेत व जे निसर्गात प्राणिमात्रांत सहज घडून येते, त्यालाच प्रतिबंध करणारी विकृत व्यवस्था माणसाने निर्माण केली. कुटुंबव्यवस्थेच्या नावाखाली स्त्री वर मालकी हक्क सांगितला. त्यालाच लग्न वगैरे गोंडस नाव दिले. आणि त्याच्या विरोधात जे घडते त्याला बलात्कार म्हणायचे. वा रे वा नीच दांभिकता.

प्रामाणिकपणे जर खरेच बळात्कार व्हायला नको असतील ना तर फेकून द्यायला हवी कुटुंब व्यवस्था, फेकून द्यायला हवी मालकी हक्काची भावना, फेकून द्यायला हवी जमीनची मालकी आणि आपल्या पोरांच्या वर असलेली मालकी. करू द्या सर्वाना मुक्त व्यवहार. जगू द्या मोकळे जीवन.

जगातल्या सगळ्या जमिनी आपणा सर्वांच्या, सगळे पुरुष आपले सर्वांचे, सगळ्या स्त्रिया आपल्या सर्वांच्या, सगळी मुले आपली सर्वांची. मग राहील का कोण "उपाशी"? मग होतील का बलात्कार?

बाई गं...
कसे लिहवते हे सगळे..
आज काल सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर मांडायची फॅशन आली आहे, मागे ते एक कोण होते?? सॅनिटरी नॅपकिन घेऊन फोटो काढा आणि इकडे डकवा म्हणत होते,
आता बायकाच अशा गोष्टी उघड लिहू लागल्या तर पुरुषांना चहाटळपणा करायला चेव येणारच ना!

लेखात सांगितलेल्या एकूण एक गोष्टी आपल्याकडे पूर्वीपासून होत आहेत पण सूचक, मृदू स्वरूपात , त्या समजून न घेता त्या सोडून द्यायच्या आणि आधुनिकता म्हणून त्या दुसऱ्या भडक ,दिखाऊ आवरणात जवळ करायच्या असे आजकाल चालले आहे.

पूर्वी लहान असताना मुले- मुली अगदी मैदानी खेळ सुद्धा एकत्र खेळत, त्यात त्यांना एकमेकांची ओळख होई, मुलगी कमी आहे अशी कधी जाणीवच होत नसे
मुलीस ऋतुप्राप्ती झाली की घरगुती समारंभ केला जाई, त्या निमित्ताने जवळच्या आज्या, मावश्या, काकू भेटत त्यांचे अनुभव सांगत, त्यातली एखादी जवळची बाई पुढे काय करावे काय करू नये ते सांगे, या गोष्टी का वर्गात बसून इतर 50 मुला मुलींसमोर बोलतात??
नहाण आल्या पासून मुलगी मोठी झाली समजली जाई, परकरपोलका सोडून लुगडे नसू लागे ,आपसूकच तिचे मुलांमध्ये मिसळणे कमी होई, मुले देखील ही मोठी झाली या भावनेने तिच्याकडे पहात, मग त्यांच्यात काही वावगे होण्याची शक्यता आपोआप संपून जायची.

पण आता पाळी आली तरी, गोळ्या घेऊन इतर साधने वापरून काही झालेच नाही असे दाखवायची शर्यत असते, 9वी 10वी च्या महत्वाच्या वर्षा च्या आसपास पाळी येते, पुढे 2+3 कमीतकमी 5 6 वर्षे तरी मुलांचा /पुरुषांचा सहवास घडतो आणि मग घोळ व्हायला सुरुवात होते.

आता नहाण आले म्हणून समारंभ केला तर तुम्ही मागासलेले, बाई ला आराम मिळावा म्हणून बाजूला बसवणे मागासलेले पण पाळी आली हो, म्हणत पॅड घेऊन फोटो काढलेत की पुढारलेले, पाळीच्या दिवसात सुट्टी मागणे म्हणजे आपला हक्क मागणे. असे काहीतरी विचित्र समज होऊन बसले आहेत.

आणि हे लैंगिक शिक्षण वगैरे कुठे देणार म्हणे?? शाळेत??
आमच्या पिढीला कोणी दिले होते कसले शिक्षण?? झाले ना आमचे संसार सुखाचे? व्यवस्थित मुले होऊन त्यांना मोठे केले, आता त्यांची लग्ने होतील थोड्या दिवसात, त्यांना ही नाही लागले लैंगिक शिक्षण वगैरे.

खरे शिक्षण घरी होते, आई वडील, आजोबा, आजी एकमेकांशी कसे वागतात ते मुलांच्या मनावर घट्ट कोरले जाते.
घरातले संस्कार स्त्रियांशी कसे वागावे, बोलावे ते शिकवतात.
साधारण ब्राह्मण कुटुंबात स्त्री पुरुष समानता दिसते, स्त्रियांच्या विरुद्ध असणाऱ्या किती गुन्ह्यात गुन्हेगार भिडे, बापट, नेने, लेले दिसतात पहा?

आपल्या संस्कृतीत स्त्रियांना मान देतात, तिची देवी म्हणून पूजा करतात, ती संस्कृती जिकडे पाळली जाते तिकडे मुले स्त्रियांकडे नजर वाकडी करून पहायची हिम्मत करत नाहीत.

पण आज झालंय काय, घरात संस्कृती पाळणे बायकांना मागासलेले वाटू लागले, त्यामुळे त्या झटक्यात मॉडर्न झाल्या, घरात मिळणारे बाळकडू थांबल्यावर मुलांना चळायला कितीसा वेळ लागतो? मुलांच्या वागण्याचा त्रास होऊ लागल्यावर आता त्यांना लैंगिक शिक्षण द्या, स्त्री पण तुमच्या सारखीच आहे वगैरे सांगायच्या मलमपट्ट्या सुरू झाल्या , पण हे सगळे वर वर चे आहे. उलट कोवळ्या वयात जास्त उघडपणे गोष्टी कळल्याने अजून जास्त कुतूहल चाळवेल

आपणच पदर खोचून परत एकदा कुटुंब व्यवस्था बळकट करायला हवी, ती झाली की आपोआप गोष्टी रुळावर येतील.
या पद्धतीने लगेच परिणाम दिसणार नाही, वेळ लागेल पण होणारा परिणाम जास्त खोलवर असेल.

सेक्स एज्युकेशन म्हणजे काय?
एक तर ही नैसर्गिक भावना आहे ती दाबता येणार नाही पण तिला योग्य वळण देता येवू शकेल .
पुनरुत्पादन करणे हा मूळ हेतू असल्या मुळे निसर्ग नी ही भावना तरुण वयात जास्त निर्माण झाली पाहिजे अशी व्यवस्था केली आहे .
नीती ,अनिती,संबंध,गैर संबंध हे मानव निर्मिती कल्पना आहेत .
MC Kasi येते ,गर्भ कसा तयार होतो ,हे सर्व योग्य वयात मुलांना शिकवलच जाते .
त्या मुळे त्या विषयी तरुण,तरुणी ना सर्व शास्त्रीय माहिती असते .
Rape आणि ह्या माहितीचा काही संबंध नाही .
सेक्स एज्युकेशन rape chya घटना कमी करू शकणार नाहीत .
गुन्हा करण्याची प्रवृत्ती काही लोकात उपजतच असते (स्त्री ,पुरुष दोन्ही मध्ये) आणि असेच लोक गुन्हा करतात ,.
मुलांना तरुण वयात मैदानी खेळ,आणि बाकी activity मध्ये गुंतवून ठेवले आणि त्यांची ध्येय काय आहेत ह्याची जाणीव त्यांना करून दिली तर सेक्स चा विचार करण्या साठी वेळ सुद्धा मिळणार नाही .
मैदानी खेळात इंटरेस्ट असणारे आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असणारे rape सारखे गुन्हे करत नाहीत असं माज मत आहे .
सशक्त शरीर मध्येच सशक्त मन असते .

मला वाटते गरज सेक्स एज्युकेशन आणि संवेदनशील असायची आहे, आई वाडीलानी आपल्या मुलाला सुद्धा आपल्या वागण्यामुळे कोणत्या हि मुलंमुली स अस्वस्थ बईचैन किंवा असुरुक्षित अपमानास्पद शरमिंदा lewed gestures comments मुले वाटणार नाही याचे सतत भान ठेवावे हे सांगण्याची गरज आहे, बाकी लेंगैक भावना या आदिम काळापासून जिवंत राहण्यासाठी निसर्गतः आहेत त्या वाईट नाहीत कोणत्याही प्रकारे अश्लील किंवा ज्यामुळे कुणाला अपराधी वाटावे अश्या नाहीत फक्त त्याचे जबाबदारीने नियंत्रण करण्याची कला शिकवणे भाग आहे, कारण आजची मुले उद्याचे नागरिक आहेत, त्यांना मीडिया जे सहजपणे दाखवतो ते सुपरफिशियल किंवा कधी कधी अतिरंजित गोष्टी आहेत हे स्पष्ट सांगणे आवश्यक आहे, कारण अनेक मानसिक शरारिक समस्या आणि आत्महत्या आणि खून हत्या या मागे अनेकदा सेक्स किंवा लैंगिक भावना या नीट हाताळता आल्यामुळे हिंसक पणा संशय गिल्ट आणि सामाजिक दबाव ही करणे असतात.... मला तर एखद्या मुलीकर्ता किंवा मुलं करता प्रेम म्हणून जीव देणे ,धमक्या देणे, शिर कापून इंस्टाग्राम वर टाकणे हा सर्व प्रकार हास्यास्पद
अरे एक मुलगी किंवा मुलगी नाही म्हणाली तर जग काही ओ स पडले नाही, दुसरा शोधा, पण जीव का द्यावा मला वाटते हे होण्याचे कारण म्हणजे मालिका तीवी शोज आणि फिल्म्स , यामुळे बुद्धी वापरणे बंद होते जीव जातो किंवा अपंग होतो आणि पिक्चर मधला हिरो मात्र फिल्मफेअर अवॉर्ड घेतो असा हा माट्रिक्स , जे सहज सुचले ते लिहिले