निकालानंतरचे सामान्य माणसाचे विचार

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 May, 2019 - 07:56

लोकशाही धोक्यात येऊ शकते का?

मी यंदा मतदान केले नाही. कोणीही त्या योग्यतेचा वाटला नाही. ना उमेदवार ना पक्ष. हे आमच्या ऒफिसमध्ये सर्वांना ठाऊक आहे.

तर परवा निकालानंतर ऑफिसमध्ये चर्चा चालू होती. एकाने चुकीचा मुद्दा उपस्थित करताच मी तो खोडायला गेले. तसे ती व्यक्ती लगेच म्हणाली, तू मतदान केले नाहीस तुला बोलायचा अधिकारच नाही.

मी गालातल्या गालात हसलो. म्हटले तुला बोलायचा अधिकारच नाही. का बरे? मी भारताचा नागरीक आहे तिथेच तो अधिकार मला मिळाला आहे. याऊपर मी टॅक्स भरतो त्यामुळे बोलू शकतोच शकतो. प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार असणे आणि सर्वांच्या मताला समसमान किंमत असणे यालाच लोकशाही म्हणतात ना..

मी मत दिले नाही पण एकच ईच्छा होती की जे यावे ते काठावर याचा त्याचा सपोर्ट घेऊन यावे. सद्यपरीस्थितीत कोणालाही बहुमत देणे याचा अर्थ माकडाला कोलीत देण्य़ासारखेच आहे. ते पाहता आलेल्या निकालाने मी निराशच झालो आहे.

खरे पाहता माझ्यामते भाजपाने विशेष काहीही केले नाही. त्यांनी फक्त कॉंग्रेसची रेघ छोटी दाखवून स्वत:ची मोठी भासवली ईतकेच. याबळावर ते जिंकले. पण आता आम्ही जिंकलो आहोत याचा अर्थ आम्ही जे केले जे वागलो ते लोकांना रुचले असा अर्थ त्यांनी काढणे आणि लोकांनाही तो पटणे स्वाभाविक आहे. सामान्य माणूस आता असाच विचार करणार की खरेच रे, भाजपाने नक्कीच काहीतरी चांगले आणि भरीव केले असणार म्हणूनच ते ईतक्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे आता भाजपाकडून मागचीच टर्म रीपीट होणार किंवा याहीपेक्षा जास्त ते आपली मनमानी करणार हा धोका तयार झाला आहेच पण त्याच सोबत आता त्यांच्या चुका दाखवल्यास मुस्काटदाबी करायचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीही हे चालायचेच, पण आता लोकांची त्याला मान्यता आहे असा या निकालाचा अर्थ काढून ते प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

खरे तर लोकशाहीचा हाच सर्वात मोठा धोका आहे की तुल्यबळ विरोधक नसल्यास वा त्यांचा बीमोड केल्यास एखादा हुकुमशहा सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडून येऊ शकतो. पण एकदा का तुम्ही त्याच्या हुकुमशाहीच्या विळख्यात अडकला की पुन्हा लोकशाही मार्गाने सरकार आणने अवघड होते. परीस्थिती तिथवर जाऊ नये अशी ईच्छा आहे.

निकालानंतर जे मनात उलटसुलट विचार घोंगावत होते ते उलटसुलट चार ओळीत खरडले.
उगाच संतुलित लिहायचा आव आणण्याऐवजी प्रामाणिक लिहिणे उत्तम समजले.
आणखी कोणाला राजकीय शाल न पांघरता वा संतुलितपणाचा बुरखा न घेता प्रामाणिकपणे व्यक्त व्हायचे असल्यास ईथे लिहू शकता.
वाचलेत याबद्दल धन्यवाद.
- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे माझे पहिले मतदान होते आणि मीदेखील मत देणार नव्हतो पण मोदीजी चे भाषण ऐकले आणि पुलवामा मधल्या शाहिद जवानाना वोट समर्पित करायचे ठरवले।
सध्या तरी बीजेपी ला पर्याय नाही।

लेखात केलेली विधाने इतकी हास्यास्पद आहेत, की काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही.
--

खरे तर लोकशाहीचा हाच सर्वात मोठा धोका आहे की तुल्यबळ विरोधक नसल्यास वा त्यांचा बीमोड केल्यास एखादा हुकुमशहा सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडून येऊ शकतो.
<<

विरोधक काही आकाशातून पडत नाहीत त्यांना देखील लोकशाही पद्धतीनेच निवडून यावे लागते. सध्या अस्तित्वात असलेल्या एकाद्या पक्षाला, विरोधीनेते पद मिळेल इतके खासदार देखील जनता निवडून देत नसेल तर त्यात विजयी पक्षाचा काय दोष? खरतर या राजकिय पक्षांना आत्मपरिक्षण करायची गरज आहे !

<<<<खरे तर लोकशाहीचा हाच सर्वात मोठा धोका आहे की तुल्यबळ विरोधक नसल्यास वा त्यांचा बीमोड केल्यास एखादा हुकुमशहा सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडून येऊ शकतो. पण एकदा का तुम्ही त्याच्या हुकुमशाहीच्या विळख्यात अडकला की पुन्हा लोकशाही मार्गाने सरकार आणने अवघड होते. परीस्थिती तिथवर जाऊ नये अशी ईच्छा आहे.>>>>

पं श्री, जवाहरलाल नेहेरू तब्बल १५ वर्षाहून अधिक काल पंतप्रधान होते, तेंव्हा कुणि काही असे म्हंटले नाही. जेंव्हा इंदिरा गांधींनी आणिबाणि घोषित करून बरीच सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली तो प्रयत्नपण फसला.
तर एव्हढे निराश होऊ नका. आता भारतीय जनता तितकी भोळी भाबडी राहिली नाहीये. अन्यायकारक वर्तन खपवून घेतले जाणार नाही.

भारता सारख्या हजारो जाती ,,भाषा, आणि कित्येक धर्म असलेल्या देशात हुकुमशाही येवूच शकत नाही .
राजसत्ता सैन्या chya शक्ती वर चालते ते सैन्याचा पाठिंबा कसा मिळणार त्यात एकमेकाचे जातीय, धार्मिक,भाषिक दुश्मन आहेत

मी मत दिले नाही पण एकच ईच्छा होती की जे यावे ते काठावर याचा त्याचा सपोर्ट घेऊन यावे. >>

कुठल्याही देशासाठी ही अत्यंत घातक मानसिकता आहे. अशा प्रकारे केवळ अंतर्गत ब्लॅकमेलिंग सपोर्ट करणारे सरकार बनते.

पुलवामा मधल्या शाहिद जवानाना वोट समर्पित करायचे ठरवले।
>>>>

मी सुद्धा पुलवामामधील शहीद जवानांनाच माझे मत समर्पित करायला मोदींना मत न देण्याचा निर्णय घेतला.
त्या एकूणच प्रकरणाबद्दल त्याच्या सत्यासत्यतेबद्दल माझ्या आणि बरेच जनतेच्या मनात आजही संभ्रम आहे. काहींनी बेनेफिट ऑफ डाऊट मोदींना दिला, मी रिस्क घेतली नाही.

सध्या तरी बीजेपी ला पर्याय नाही।
>>>>
याच्याशी मात्र शतप्रतिशत सहमत !
फक्त लवकरात लवकर पर्याय निर्माण होणे या देशातील लोकशाही टिकायच्या दृष्टीने गरजेचे आहे.

एकाद्या पक्षाला, विरोधीनेते पद मिळेल इतके खासदार देखील जनता निवडून देत नसेल तर त्यात विजयी पक्षाचा काय दोष? खरतर या राजकिय पक्षांना आत्मपरिक्षण करायची गरज आहे !

>>>>

नक्कीच. ती आत्मपरीक्षणाची आणि सुधाराची गरज विरोधकांना आहेच. मी कुठे त्यांची तळी उचलून धरली आहे. चिण्ता आहे की या विजयानंतर भाजपा आत्मपरीक्षण न करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांना हा संदेश गेला पाहिजे की केवळ पर्याय नसल्याने आम्ही तुम्हाला निवडले आहे. तुमच्या चुका पोटात घातल्या आहेत. पण म्हणून जनतेला गृहीत धरायची चूक करू नका.

पं श्री, जवाहरलाल नेहेरू तब्बल १५ वर्षाहून अधिक काल पंतप्रधान होते, तेंव्हा......
जेंव्हा इंदिरा गांधींनी आणिबाणि घोषित करून.....

>>>>>>

जाओ पहले उस आदमी की साईण लेके आव...
अहो लेखाच्या शीर्षकात स्पष्ट लिहीले आहे की हे आम आदमीचे विचार आहेत. याचा राजकीय अंगाने का विचार करता?
नेहरूंच्या काळात ना माझा जन्म झालेला ना माझ्या गर्लफ्रेंडचा. मग का उगाच त्या अपेक्षा..

कुठल्याही देशासाठी ही अत्यंत घातक मानसिकता आहे. अशा प्रकारे केवळ अंतर्गत ब्लॅकमेलिंग सपोर्ट करणारे सरकार बनते.
>>>>>

ते सुद्धा असतेच म्हणा, पण सध्याचे सेल्फ मार्केटींग आणि विरोधकांचे अपप्रचारावर आधारीत राजकारण असे झालेय की लोकं एकेका राजकारणी पक्षाचे कट्टर समर्थक बनू लागले आहेत. व्हॉटसपवर आपण पाहतो की सरकारच्या चुकांचेही समर्थन करणारया पोस्ट फिरतात. जनतेचा सरकारवर अंकुश उरला नाहीये जो लोकशाहीत गरजेचा असतो. अश्यावेळी प्रबळ विरोधी पक्ष आणि सत्तेत सोबत असलेले घटकपक्ष यांचा अंकुश तरी हवा असे वाटते. हे देशाच्या भल्यासाठीच वाटते.

बालिश लेख!
>>>>
एकदम मान्य. लेख बालिश झालाय. डोक्यातील भुनभुन कागदावर उतरवणे गरजेचे वाटल्याने पटापट कीबोर्ड बडवला.
पण हळूहळू प्रतिसादांत सुस्पष्टता येत जाईल अशी अपेक्षा. त्यातील मुद्द्यांवर नक्की चिंतन करा. चुकत असल्यास आग्रहाने खोडा.

भारता सारख्या हजारो जाती ,,भाषा, आणि कित्येक धर्म असलेल्या देशात हुकुमशाही येवूच शकत नाही .
>>>>

हिंदूराष्ट्र झाले तर शक्य आहे का?

लेखातील भावनेशी सहमत. खासकरून
> पण एकच ईच्छा होती की जे यावे ते काठावर याचा त्याचा सपोर्ट घेऊन यावे. सद्यपरीस्थितीत कोणालाही बहुमत देणे याचा अर्थ माकडाला कोलीत देण्य़ासारखेच आहे. ते पाहता आलेल्या निकालाने मी निराशच झालो आहे. > याच्याशी.

हो इतके बहुमत असू नये याच्याशी सहमत. असे झाल्यामुळे इतर अपक्ष किंवा अन्य पक्षीयांच्या मदतीची गरज राहात नाही आणि घोडेबाजार टळतो हा तात्कालिक फायदा. भक्कमता येते हा दुसरा फायदा. पण वरवंटा आणि रोड रोलर फिरवून सारे सपाट करण्याची संधी आणि शक्यताही वाढते. तुघ्लकी निर्णय दामटता येतात. एकंदरीतच दामटून नेण्याची प्रवृत्ती वाढू शकते.

हो इतके बहुमत असू नये याच्याशी सहमत. असे झाल्यामुळे इतर अपक्ष किंवा अन्य पक्षीयांच्या मदतीची गरज राहात नाही आणि घोडेबाजार टळतो हा तात्कालिक फायदा. भक्कमता येते हा दुसरा फायदा. पण वरवंटा आणि रोड रोलर फिरवून सारे सपाट करण्याची संधी आणि शक्यताही वाढते. तुघ्लकी निर्णय दामटता येतात. एकंदरीतच दामटून नेण्याची प्रवृत्ती वाढू शकते.

निकालानंतरचे सामान्य माणसाचे विचार>>>>>
निफाडच्या राष्ट्रवादीच्या सभेत एका तरुणाने भाजप सरकार सत्तेतून बाहेर जाईपर्यंत शर्ट न घालण्याचा निर्धार/पण केला होता . तो सध्या काय करतोय ? (त्याच्या समस्येचा आदर करून)
https://abpmajha.abplive.in/videos/nashik-nifad-youth-grievience-letter-...

माझा लेखकाला अपमानित करण्याचा हेतू नाही हे आधी स्पष्ट करतो.

या धाग्याचं शीर्षक चुकीचे आहे. सरसकटीकरण टाळण्यासाठी त्यातील सामान्य या शब्दाच्या आधी "एका" हा शद्ब टाकणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच सामान्य माणसांचे विचार लेखात लिहिलेल्या विचारांपेक्षा संपूर्णपणे भिन्न आहेत व बहुसंख्य सामान्य लोकांनी मतदानही केलंय.

कारण बऱ्याच सामान्य माणसांचे विचार लेखात लिहिलेल्या विचारांपेक्षा संपूर्णपणे भिन्न आहेत>>>> हे सुद्धा सरसकटीकरणच आहे हो.
लेखक आनि लेखनाप्रमाणेच आजुबाजुला बर्याच लोकांचे विचार आहेत खरं असेच.

लेखक आनि लेखनाप्रमाणेच आजुबाजुला बर्याच लोकांचे विचार आहेत खरं असेच.

नवीन Submitted by अंकु on 27 May, 2019 - 11:23 >>>

मग तशा प्रकारे शीर्षक बदला.

हे तुम्ही किंवा मी ठरवणारे कोण ??? तो लेखकाचा अधिकार आहे.

नवीन Submitted by अंकु on 27 May, 2019 - 11:39 >>

तेव्हढ किमान ज्ञान सगळ्याना आहे. मी ते लेखकासाठीच लिहिले होते.

नवीन Submitted by अंकु on 27 May, 2019 - 11:54
>>
सूचनेबद्धल धन्यवाद, पुढच्या वेळी असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला कि नावासकट लिहीन (जरी फक्त धागालेखक शीर्षक बदलू शकतो हे सर्वांना माहीत असले तरीही)

तोपर्यंत मतभिन्नता म्हणजे सरसकटीकरण कसे हे तुम्ही समजावून सांगा.

तोपर्यंत मतभिन्नता म्हणजे सरसकटीकरण कसे हे तुम्ही समजावून सांगा.>>>>>चला म्हणजे किमान शीर्षक बदल करावा ह्याच्या पुढे गाडी गेली तर.
तुमची मतभिन्न्ता म्हणजे शीर्षकबदलाची गरज असे का ?? ते सांगा मग आधी ???
वर आमचे वेगळे मत म्हणजे सरसकटीकरण कसे असा प्रश्न ???

वरील लेखातील वक्तव्ये "एका" व्यक्तीच्या मनातील आहेत. माझे मत भिन्न आहे. तिसर्या व्यक्तीची मते धागालेखक व माझ्या मतान्पेक्षा भिन्न असतील.

त्यामुळे या धाग्याच्या शीर्षकात "एका सामान्य माणसाचे विचार " असा बदल मी "लेखकाला" सुचवला.

आपण जेव्हा "सामान्य माणुस" असे म्हणतो, तेव्हा त्यात सरसकटीकरण अभिप्रेत असते. उदा. " यावर सामान्य माणसाचे मत काय हे कुणीच ध्यानात घेत नाहीय" " महागाई वाढलीय सामान्य माणसाने आता जगायचे कसे" असे शब्द्प्रयोग व्रुत्तपत्रे करत असतात.

सामान्य माणूस कोण व त्याचे विचार काय असावेत हे बहुधा धागाकर्त्यानेच ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेले विचारच खरे, नि इतरांनी मांडलेले चुकीचे असे धरण्यात आले आहे.
तेंव्हा <<<शब्दाच्या आधी "एका" हा शद्ब टाकणे गरजेचे आहे.>>> या ऐवजीखरे तर फक्त "ऋन्मेऽऽष" चे विचार असे लिहायची गरज आहे. म्हणजे फक्त " बरोबर आहे", " उत्तम विचार" , " वा, वा, अगदी खरे" असेच प्रतिसाद येतील.

लोकहो भाण्डू नका शीर्षकावरून
मी धागा केवळ माझ्या विचारांसाठी नाही तर सर्वच सामान्य लोकांना आपले विचार ईथे मांडता यावे यासाठी उघडला होता.
होते काय तर बहुतांशवेळा राजकीय धाग्यांवर अमुकतमुक पक्षाचे समर्थकच आपसात वाद घालत राहतात. अश्यात तुम्ही तुमचे प्रामाणिक मत मांडले तरी मग लगेच ज्या पक्षाची बाजू घेतली त्या पक्षाचा ठपा लावला जातो. ते टाळायला कुठल्याही पक्षाच झेंडा हाती घेण्यास उत्सुक नसणारया सामान्य लोकांना आपले निकालानंतरचे प्रामाणिक विचार मांडता यावेत यासाठी हा धागा उघडला होता. हा काही राजकीय लेख नाही, माझी ती पात्रताही नाही, बस्स सामान्य माणूस या नात्याने जे वाटले ते बोललो. ते कोणाच्या विरोधात असले तरी ती ओकलेली गरळ नाही हे ज्यांना समजते त्यांनीच धाग्याचा लाभ घ्या.

Pages