निकालानंतरचे सामान्य माणसाचे विचार

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 May, 2019 - 07:56

लोकशाही धोक्यात येऊ शकते का?

मी यंदा मतदान केले नाही. कोणीही त्या योग्यतेचा वाटला नाही. ना उमेदवार ना पक्ष. हे आमच्या ऒफिसमध्ये सर्वांना ठाऊक आहे.

तर परवा निकालानंतर ऑफिसमध्ये चर्चा चालू होती. एकाने चुकीचा मुद्दा उपस्थित करताच मी तो खोडायला गेले. तसे ती व्यक्ती लगेच म्हणाली, तू मतदान केले नाहीस तुला बोलायचा अधिकारच नाही.

मी गालातल्या गालात हसलो. म्हटले तुला बोलायचा अधिकारच नाही. का बरे? मी भारताचा नागरीक आहे तिथेच तो अधिकार मला मिळाला आहे. याऊपर मी टॅक्स भरतो त्यामुळे बोलू शकतोच शकतो. प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार असणे आणि सर्वांच्या मताला समसमान किंमत असणे यालाच लोकशाही म्हणतात ना..

मी मत दिले नाही पण एकच ईच्छा होती की जे यावे ते काठावर याचा त्याचा सपोर्ट घेऊन यावे. सद्यपरीस्थितीत कोणालाही बहुमत देणे याचा अर्थ माकडाला कोलीत देण्य़ासारखेच आहे. ते पाहता आलेल्या निकालाने मी निराशच झालो आहे.

खरे पाहता माझ्यामते भाजपाने विशेष काहीही केले नाही. त्यांनी फक्त कॉंग्रेसची रेघ छोटी दाखवून स्वत:ची मोठी भासवली ईतकेच. याबळावर ते जिंकले. पण आता आम्ही जिंकलो आहोत याचा अर्थ आम्ही जे केले जे वागलो ते लोकांना रुचले असा अर्थ त्यांनी काढणे आणि लोकांनाही तो पटणे स्वाभाविक आहे. सामान्य माणूस आता असाच विचार करणार की खरेच रे, भाजपाने नक्कीच काहीतरी चांगले आणि भरीव केले असणार म्हणूनच ते ईतक्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे आता भाजपाकडून मागचीच टर्म रीपीट होणार किंवा याहीपेक्षा जास्त ते आपली मनमानी करणार हा धोका तयार झाला आहेच पण त्याच सोबत आता त्यांच्या चुका दाखवल्यास मुस्काटदाबी करायचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीही हे चालायचेच, पण आता लोकांची त्याला मान्यता आहे असा या निकालाचा अर्थ काढून ते प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

खरे तर लोकशाहीचा हाच सर्वात मोठा धोका आहे की तुल्यबळ विरोधक नसल्यास वा त्यांचा बीमोड केल्यास एखादा हुकुमशहा सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडून येऊ शकतो. पण एकदा का तुम्ही त्याच्या हुकुमशाहीच्या विळख्यात अडकला की पुन्हा लोकशाही मार्गाने सरकार आणने अवघड होते. परीस्थिती तिथवर जाऊ नये अशी ईच्छा आहे.

निकालानंतर जे मनात उलटसुलट विचार घोंगावत होते ते उलटसुलट चार ओळीत खरडले.
उगाच संतुलित लिहायचा आव आणण्याऐवजी प्रामाणिक लिहिणे उत्तम समजले.
आणखी कोणाला राजकीय शाल न पांघरता वा संतुलितपणाचा बुरखा न घेता प्रामाणिकपणे व्यक्त व्हायचे असल्यास ईथे लिहू शकता.
वाचलेत याबद्दल धन्यवाद.
- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजपला नकारात्मक रंगवले कि भक्त तटस्थ जाम जाम खवळतात रुन्मेश भाऊ.. आम्ही त्याचीच मजा घ्यायला येतो इथे. तुम्ही पण तेच केले ना.. गुड वेन्जोय..

Pages