निकालाची रणधुमाळी संपली आहे आणि भाजपने निर्विवादपणे कॉँग्रेस आणि अन्य पक्षांना भुईसपाट केले आहे. २०१४ पाठोपाठ २०१९ मध्येही भाजप असा काही दणका देईल असे मुळीच वाटले नव्हते.
भाजप कॉग्रेसपेक्षा जास्त सीट्स घेणार यात शंका नव्हती, पण इतक्या मोठ्या फरकाने धूळधाण उडेल याची मुळीच शक्यता वाटत नव्हती.
याला कारणे अनेक होती, त्या नोटबंदी, राफेल घोटाळा, निवडणूकीआधी भ्रष्ट्राचारी नेत्यांच्या नावाने केलेली आगपाखड पण पाच वर्षांत त्यांच्याविरुद्ध काहीही न करणे, मंत्रीपदी असूनही बेताल बोलणे, खुद्द मोदींचे अनेक हास्यास्पद दावे, घटक पक्षांशी चाललेली हाणामारी, पार अफझालखान वगैरे ऐकून घेऊनही शिवसेनेच्या गळ्यात गळा घालणे, पुलवामा संदर्भात अनेक उलट सुलट दावे या सगळ्याचा परिपाक अंतिमत भाजपला महागात पडेल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही.
जनतेने सर्व मुद्दे निकालात काढत मोदींच्या ओंजळीत भरभरून दान टाकले. यावर आज अनेक तज्ज्ञ लोकांची मते वाचली असता असे जाणवत आहे की समर्थ पर्यायी पक्ष नसणे हे भाजपच्या विजयात फार मोठे योगदान ठरले.
कॉंग्रेसपक्षाची गोंधळाची स्थिती, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या वक्तव्यात आणि राजकीय समजात बरीच चांगली प्रगती घडवून आणली पण अजूनही अनुभवी मोदींसमोर त्यांची डाळ शिजली नाही. अद्याप राहूल गांधी यांना मोठी मजल मारावी लागणार आहे, बरेच काही शिकावे लागणार आहे, प्रियंका गांधी म्हणलं तर आहेत म्हणलं तर नाहीत अशा दोलायमान स्थितीत आणि एकूणच धरसोड राजकारण यामुळे भाजपचे फावले असे म्हणायला हरकत नसावी.
आणि आता विजय मिळताच भाजप नेत्यांनी आणि समर्थकांनी विजयोन्मादात डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली आहे की कॉँग्रेसमुक्त भारत म्हणून. आणि एकेकाळचा मी कट्टर भाजप समर्थक असूनही ही बाब अतिशय चिंतेची वाटत आहे.
सत्ताधारी पक्ष कुठलाही असु दे त्यांना कायम धारेवर धरणारा आणि चाकोरीत रहायला भाग पाडणारा समर्थ विरोधी पक्ष असणे हे निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे. गेली पाच वर्षे निष्प्रभ विरोधी पक्ष म्हणून कॉँग्रेसने काहीही केले नाही याचीच फळे त्यांना २०१९ ला मिळाली आहेत. मोदी नकोत तर दुसरे कोण हा प्रश्न मतदारांना पडला हेच कॉंग्रेसचे दारूण अपयश आहे. आणि हे अपयश कायम रहावे ही भाजपची इच्छा असणार हे उघड आहे.
सरकारला नुसते प्रश्न विचारणे किंवा भाषणात त्यांचे दावे फोल असल्याचे सांगणे इतक्याने सत्ताधारी पक्ष नमत नाही हे आता पाच वर्षात उघड झाले आहे. आता त्यामुळे कॉँग्रेसला तळागाळापासून बांधणी करत येत, नव्या दमाच्या तरुण पिढीला संधी देत आणि ज्या राज्यात मतदारांनी पसंती दिली आहे चांगले भरीव काम करून दाखवणे गरजेचे आहे.
सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने देखील कॉँग्रेसचे भवितव्य टिकून राहणे आवश्यक आहे. जेव्हा केव्हा कुठल्या देशात एखाद्याच पक्षाला अनिर्बंध सत्ता मिळते तेव्हा त्याची परिणीती कशात होते याचा इतिहास साक्ष आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला एक जरब असावी यासाठी एक समर्थ पर्याय म्हणून कॉंग्रेस असणे ही तमाम भारतीय लोकांची गरज आहे. काही लोकांना हे पटणार नाही कदाचित कारण जोवर बहुमत आपल्या बाजूने असते किंवा आपण बहुमताच्या बाजूने असतो तेव्हा सगळे गोड गोड छान छान वाटते, त्याचा जेव्हा बडगा बसायची वेळ येते तेव्हा उशीर झालेला असतो आणि मग अरुण्यरुदन करून काहीही उपयोग नसतो.
विशाल भारद्वाजच्या चित्रपटात एक संवाद आहे. हमेशा संतुलन बने रहना जरुरी है, आग के लिये पानी का डर बना रहना चाहीये
त्याप्रमाणे सत्ताधीश भाजपला आणखी उन्मत्त न होऊ देता त्यांना सतत टांगती तलवार डोक्यावर ठेवणे हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे आणि यासाठी कॉंग्रेसला आमुलाग्र बदल घडवून आणावा लागणार आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून चालणार नाही. ही पाच वर्षे त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडून काही चांगले भरीव अपेक्षीत असलेल्या जनतेसाठी कसोटीची आहेत.
तोवर अशी आशा आणि प्रार्थना करुया की भाजप सरकार या विजयाचा आपल्याला हवा तो अर्थ काढून मतदारांना गृहीत धरणार नाही. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो योग्य ठरवेल आणि देशाच्या भल्यासाठी काम करेल.
काहीही आवश्यकता नाही विरोधी
काहीही आवश्यकता नाही विरोधी पक्षांची... मी तर म्हणतो संसदेचीसुद्धा काय आवश्यकता आहे. क्याबिनेट चीही नाही... संविधानाचीही नाही... आता जनता मोदी मोदी करते आहे ना. मग होऊन्देत त्यांच्याच मनाणे... कशाला अमुक पाहिजे तमुक पाहिजेची फुटकळ युजलेस काळजी करावी अशुभाऊ.. गेली पाच वर्षे सांगून (आणि सगळे व्यवस्थित कळून सुद्धा) लोकांना शष्प फरक पडत नसेल तर हवेतच कशाला विरोधी पक्ष ?
किती ती चिंता, वा वा
किती ती चिंता, वा वा
हा लेख म्हणजे लबाड लांडगं ढोंग करतंय असा आहे.
लोकांना कळतंय. मी तरी अजिबात
लोकांना कळतंय. मी तरी अजिबात म्हणत नाही की मोदींना भुलून जनता त्यांच्या मागे गेली आहे ते. पण हे सिद्ध झाले आहे नुसती टिका करून काहीही होणार नाही, आणखी पाच वर्षे जर भाजप विरोधकांनी नुसतीच टिका करण्यात घालवली तर पुढची टर्मसुद्धा भाजप खेचेल.
त्यांना टिकेने काहीही फरक पडत नाही उलट जितकी जास्त टिका तितकी त्यांना हवी आहे का काय असे चित्र आहे. निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात जी काही बालिश विधाने पंतप्रधान पदावरचा माणूस करत होता ती धक्कादायक होती. आणि आता असे वाटत आहे की ती दिशाभूल करायला मुद्दाम केली असावीत.
फिल्मी - आपण एकमेकांना
फिल्मी - आपण एकमेकांना वैयक्तिक ओळखत नाही त्यामुळे जर नसेल येत बोलता तर सक्ती नाही. उगाच पुन्हा तेच ते भोंगळ आरोप करू नका, हे त्यावेळी का नाही लिहीलं, त्यावेळी का नाही बोलला. मला आज लिहावं वाटलं म्हणून लिहील. विषय संपला.
तुम्हाला नसेल पटलं, तुमची मर्जी. पण उगा पसर्नल येऊ नका. ही शेवटची नम्र आणि जाहीर विनंती
लोकशाही आपल्या देशाकरता योग्य
.
कॉंग्रेस मुक्त वगैरे काही
कॉंग्रेस मुक्त वगैरे काही नाही ही सरळ सरळ फक्त द्विपक्षीय निवडणूक पद्धतीकडे वाटचाल आहे. कॉंग्रेसला आणि देशाला अजून त्याची सवय नाही इतकेच.
काही वर्षात, फार फार तर अजून तीन चार निवडणुका, मोजणी च्या शेवटाच्या फेरीपर्यंत सत्तेवर कोण येणार ते सांगता येणार नाही असे चित्र असेल. तीस चाळीस जागांच्या फरकाने दोघांपैकी एक पक्ष सत्तेवर येईल. रिजनल पार्टी लोकसभेच्या निवडणुका लढवणार नाही. Swing states असतील.. It's all good. Mark my words.
पूर्वी दोनच पक्ष होते की,
पूर्वी दोनच पक्ष होते की, नंतर फुटून फुटून अनेक पक्ष झाले आहेत आता...
काँग्रेसमुक्त भारताचं नाही
काँग्रेसमुक्त भारताचं नाही माहित पण येत्या काही वर्षात काँग्रेसयुक्त भाजप नक्की दिसेल. महाराष्ट्रापुरते बोलायचं झालं तर विखे, मोहिते, दरेकर, पाचपुते असे बरेच घोटाळेबाज नेते भाजपने पावन करून घेतलेत. जे आधी विरोधीपक्षनेते होते तेच आता मंत्री होतील. सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच नाण्याचा बाजू आहेत. या सर्व प्रमुख नेत्यांचे वैयक्तिक सम्बन्ध अत्यंत उत्तम आहेत आणि राहतील, तस नसतं तर आज आघाडीचे बरेच लोक आर्थररोड जेल मध्ये असते. मागच्या वेळी त्यांनी हि आश्वासनं दिली देखील होती पण यावेळी त्यावर एक शब्द नाही कारण यांनीही पाच वर्षात तेच केलय .
या निवडणुकीच्या काळात एवढा भयानक दुष्काळ पडला त्याच काही अपवाद वगळता फार वार्तांकन कुठंच झालं नाही. ग्रामीण भागातील इथं कोणी आहे का माहीत नाही पण खरोखर भयाण परिस्थिती आहे. मला बरेच मुलं स्पर्धापरीक्षा तयारीच्या संदर्भात भेटत असतात त्यावेळी त्यांच्या त्यांच्या भागातील गोष्टी ऐकल्या तर खरोखर जीव तुटतो पण आपण काहीही करू शकत नाही. सिस्टीम म्हणून जी आहे ती २०१४ पूर्वी जी आहे तीच अजूनही आहे आणि नंतरही राहणार. इथं मी मनोरंजनाच्या हेतूने येत असतो पण लोक जे त्यांच्या त्यांच्या पक्षाचं एवढं समर्थन करताना आक्रमक होतात ते पाहता हीच तळमळ त्या पक्षाच्या नेत्यांना आहे का हा प्रश्नच आहे. लोक विनाकारण भांडत आहेत .तत्वाचं राजकारण हे केवळ नावापुरतं असतंय बाकी सारं मिळूनमिसळून चालतंय . इथली बहुतेक मंडळी माझ्या पेक्षा बरीच वयस्कर असल्याने यावर जास्त काही बोलणं पण योग्य नाही .
इथून पुढच्या निवडणुका पुरेसं आणि स्वच्छ हवा-पाणी , पर्यावरण , प्रदूषण, हवामान बदल आणि या सर्वांचा भारतावरचा परिणाम-त्यावरचे उपाय यावर होतील हि भोळी अपेक्षा
गेली पाच वर्षे सांगून (आणि
गेली पाच वर्षे सांगून (आणि सगळे व्यवस्थित कळून सुद्धा) लोकांना शष्प फरक पडत नसेल तर हवेतच कशाला विरोधी पक्ष ?
नवीन Submitted by हेला on 24 May, 2019 - 17:02
अगदी बरोबर! गान्धीजीन्च्या सल्ल्या प्रमाणे विसर्जित करुन टाका बघू ती कॉंग्रेस.
गेल्या दोन दिवसातला अत्यंत
गेल्या दोन दिवसातला अत्यंत उमदा आणि संतुलित लेख.
आता जी विश्लेषणे होतील त्याला पश्चातबुद्धी असेच म्हटले जाईल. ईव्हीएम बदलले गेल्याचा संशय आहे. याबाबत काही वाहीन्यांनीही संशय व्यक्त केला आहे. मात्र आपल्या कायदेशीर चौकटीत राहून इतकेच करता येते. कारण प्रशासनाने ताबडतोब कारवाई करणे शक्य होते.
संशय आहे फक्त. खात्री नाही.
बाकी, या निवडणुकीच्या निकालांचे कुठल्याही प्रकारे विश्लेषण होऊ शकत नाही हेच विश्लेषण पटते. काँग्रेसने इतर पक्षांशी आघाडी केली असती तर ही वेळ आली नसती हे ही सत्य आहे.
काँग्रेस विरोधक म्हणून हवा
काँग्रेस विरोधक म्हणून हवा असे मीही म्हणतेय पण विरोधक फक्त काँग्रेस का? अजून कोणी त्याची जागा का घेऊ शकत नाही? काँग्रेस नाही तर माया ममता लालू हेच लोक का शिल्लक राहतात?
काँग्रेस नाही तर माया ममता
काँग्रेस नाही तर माया ममता लालू हेच लोक का शिल्लक राहतात? >>> भाजपच्या अनेक अपात्र नेत्यांपेक्षा चांगले आहेत ते.
हाब - तसे झाले तर उत्तमच होईल
हाब - तसे झाले तर उत्तमच होईल. कडबोळी सरकार पेक्षा हे परवडले. असेही स्थानिक घटक पक्षांच्या नाकदुऱ्या काढताना सत्ताधारी पक्षाचे काय हाल होतात हे वाजपेयी सरकारच्या वेळी पाहिले. त्यामुळे सावळागोंधळ कमी होईल अशी आशा आहे.
इथून पुढच्या निवडणुका पुरेसं आणि स्वच्छ हवा-पाणी , पर्यावरण , प्रदूषण, हवामान बदल आणि या सर्वांचा भारतावरचा परिणाम-त्यावरचे उपाय यावर होतील हि भोळी अपेक्षा
आमेन, सुंदर प्रतिसाद. हा मुद्दा खरेच सर्वांनीच दुर्लक्षीत केला.
धन्यवाद किरण - व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेऊन लेखावर बोलल्याबद्दल. आजकाल हा गुण दुर्मिळ होत चालला आहे.
काँग्रेस नाही तर माया ममता लालू हेच लोक का शिल्लक राहतात?
हे सगळे त्यांच्या त्यांच्या राज्यापुरते प्रभावी आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून सध्या भाजप आणि कॉँग्रेसच आहे. तांत्रिकदृष्ट्या तृणमुल, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी आणि बहुजन समाज हे राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवतात पण त्यांचे बुड त्यांच्या त्याच्या राज्यात स्थीर नाही त्यामुळे सध्या तरी गणती करणे चुक ठरेल.
मुळात धाग्याच्या शीर्षकात्त व
..
काँग्रेस नाही तर माया ममता
काँग्रेस नाही तर माया ममता लालू हेच लोक का शिल्लक राहतात? >>> भाजपच्या अनेक अपात्र नेत्यांपेक्षा चांगले आहेत ते.>>>
मायावती, ममता आणि लालू यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे, जो राहुल गांधींकडे नाही (अजून तरी), पण बहुतेक करून या रीजनल पार्टी आहेत (उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार) त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व असलेला सध्यातरी काँग्रेस हा एकच पक्ष आहे. मी मागे एका ठिकाणी म्हटल्या प्रमाणे नवीन पटनाईक हेही एक चांगला पर्याय आहेत पण परत त्यांच्या पक्षाचे अस्तित्व ओडिशापुरतेच आहे. या रीजनल पक्षांनी आपापल्या राज्यापुरतेच मर्यादित न राहता बाहेरही विस्तार करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित पुढे फरक पडू शकेल.
व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेऊन >
व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेऊन >>> माझ्या लक्षातही नव्हते. आत्ता शोधून पाहीले.
त्यात माझी चूक नव्हती
लोकमत न्यूज १८ चा अँकर कोण
लोकमत न्यूज १८ चा अँकर कोण आहे ? माझ्या लक्षात नाव नाही. आत्ता लाईव्ह बघत होतो. खूप चांगली चर्चा चालू आहे.
आप आणि वंचित आघाडीच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या राजू वाघमारेंना पूर्ण उघडे पाडले. जागावाटपाचा घोळ काँग्रेस कसा घालते हे लक्षात येते. राजू वाघमारे योग्य उत्तरे देण्याऐवजी आरडा ओरडा करत आहेत.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=WOw5mSFAs1c
राजु शेत्ती मुलाखत
काँग्रेस शिवाय दुसरा विरोधी
काँग्रेस शिवाय दुसरा विरोधी पक्ष, जो या देशाच्या मातीशी, मुळांशी, प्रश्णांशी अधिक घट्ट जोडलेला आहे तोच पक्ष खरे तर विरोधी पक्ष असावा. '
असा कुठला पक्ष आहे????
त्यात माझी चूक नव्हती
हरकत नाही, मीही तो विषय मागे सोडून दिलाय. पण सहसा माबोवर आयडी गेल्या जन्माचेही खोदून काढून प्रतिसाद देत असल्याचा अनुभव असल्याने सुखद धक्का बसला.
द्विपक्षीय निवडणूक पद्धत
द्विपक्षीय निवडणूक पद्धत म्हणजे सरकारी बँकांचे विलीनीकरण इतके सोपे प्रकरण वाटते का? मजा आणत आहेत राव लोक
मुळात धाग्याच्या शीर्षकात्त व
मुळात धाग्याच्या शीर्षकात्त व मजकूरातच संकुचित विचार आहे. भाजप व काँ यांचा पक्षाचा निर्माण, ईतीहास, कारकीर्द, संघटन हे मुद्दे लक्षात न घेत बहुतेक निव्वळ कालच्या निकालानांतर मनात आलेला भितीदायक विचार या धाग्यातून जास्त मांड्ला गेला आहे असे वाटते. हेतू बद्दल शंका नाही, मांडणी थोडी गंडलीये, माफ करा!
मजबूत विरोधी पक्ष असणे ही संतुलीत लोकशाहीची गरज आहे, हे नक्कीच मान्य आहे. मात्र ७० वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष तसा पर्याय भविष्यात देऊ शकणार नाही हे आता सूर्यप्रकाशाएव्ह्डे स्वच्च्छ आहे. (त्यासाठी वेगळा बाफ लागेल.. पण राहुल महाशयांनी त्याची तजवीज करून ठेवली आहे हे स्पष्ट आहे. त्यांची दुसरीतरून्ण पिढीतील नेते देखिल या निवडणूकीत तोंडावर आपटले आहेत). तेव्हा तशा भ्रमात न राहता, दुसर्या ईतर पक्षामध्ये असे नेतृत्व व संघटना असलेला पर्याय प्रस्थापित होणे हे जास्त शक्य आहे. मुळात संपूर्ण काँ पक्ष आणि त्यांची कार्यकारिणी ही एका फॅमिली च्या भोवती गुंफलेली सर्कस होती. अन्यथा मनमोहन सिंघ यांसारखा ऊत्तम अर्थमंत्री आज आपल्या व्यवस्थेतून शुल्लक काडी प्रमाणे वेगळा न होता. या ऊलट भाजप हा नेहेमीच तत्वनिष्ठीत व संघटना केंद्री पक्ष राहिलेला आहे.
काँग्रेस शिवाय दुसरा विरोधी पक्ष, जो या देशाच्या मातीशी, मुळांशी, प्रश्णांशी अधिक घट्ट जोडलेला आहे तोच पक्ष खरे तर विरोधी पक्ष असावा. आणि या निवडणुकीनंतर मला वाटते आपल्या लोकशाहीची भविष्यातील वाटचाल त्याच मार्गाने होणार आहे. या हायजेन्बर्ग यांच्या विधानाशी १००% सहमत. हे आपल्या देशासाठी, व लोकशाहीच्या सुधारणेसाठी चांगलेच आहे.
(राष्ट्रवादी कडे तशी संधी व अनुभव होता पण दुर्दैवाने त्यांचेही नेतृत्व निव्वळ सत्ता आणि परिवार पोषण याच्या आहारी गेले आणि एक ऊत्तम पर्याय नष्ट झाला.)
पुढील किमान १० वर्षे तरी राष्ट्रीय पातळीवर भाजपा काही सत्तेतून जात नाही हे नक्की. त्यांची दुसरी नेत्रूत्व फळी आत्ताच तयार देखिल झाली आहे. आणि तसे धरूनच चालावे. तूर्तास त्यावर राज्य सरकारां मार्फत वचक व अंकुश ठेवता येऊ शकतो हे मतदारांनी दाखवून दिलेच आहे. तेव्हा ते तसेच राहू द्यावे.
काँग्रेस ला ईतीहासात जमा करायच्या निर्णयावर काल शिक्कामोर्तब झाले. आता फक्त सोपस्कार/प्रक्रीया बाकी आहे. ज्यांचे नेतृत्वच मानसिक काविळीने ग्रस्त आहे ते देशाला प्रकाश दाखवतील अशा फुकटच्या आशेत राहू नये हेच ऊत्तम.
या ऊलट ,भाजप नेता व पक्ष याबद्दल असेच म्हणावे लागेलः
यहां राह पर चलने वाले तो करोडो है, मगर राह बनानेवाला आखीर मिल ही गया!
मी आधी म्हट्ले होते तसे https://www.maayboli.com/node/69038
This election is watershed moment for Congress and Indian politics (for better). लोकशाहीला अपेक्षित नवा अध्याय व नवी वाट या निकालाने दाखवून दिली आहे. खरे तर या निवडणूकी च्या निकालावर भाष्य करणारे अनेक तज्ञ, लिखाण, व भाष्य नजीकच्या काळात ऐकायला वाचायला मिळेल.
एक मात्र नक्की, ईस देश ने एक बार फिर से करवट बदली है. अब की बार लोगों की सरकार.
पुढील किमान १० वर्षे तरी
पुढील किमान १० वर्षे तरी राष्ट्रीय पातळीवर भाजपा काही सत्तेतून जात नाही हे नक्की. >> योग, जनतेने मोदींना निवडून दिले आहे की भाजपाला?
माझ्या मते मोदींना.
मोदी नाही तर कोण ह्या प्रश्नाचे ऊत्तर आता भाजपाला शोधायचे आहे. २०२४ मध्ये पुन्हा भाजपाच्या नावांवर मते मागायची की मोदींच्या हे सुद्धा ठरवावे लागेल. पुन्हा मोदींच्या नावाने मत मागावे लागणे जबरद्स्त मोठी रिस्क आहे.
देश म्हणजे रायबरेली, अमेठी, गुजरात, बंगाल नाही सत्तापालट ईनेएविटेबल असतो.
दहा वर्षांची अँटीईन्क्बंन्सी
नेतृत्वबदल करण्याची नितांत गरज
पक्षातल्या अँटीसोशल चेहर्यांना डच्चू
स्मूथ पॉलिसी एक्झ्क्युशन ची वानवा
जनतेच्या आणि ईतर जगाच्या भयंकर वाढलेल्या अपेक्षा
पाच वर्षात जे ऊठतील ते ईश्यू
आणि सगळ्यात मोठे काँग्रेसच्या नावाच्या आणि ईतिहासाच्या कुबड्या न घेता येणे
अश्या सगळ्यांना एकदम तोंड द्यावे लागणार आहे आणि हीच कॉग्रेसची संधी असणार आहे आणि ती ते घेतीलही.
पुढची निवडणूक 'मोदी असे आहेत आणि तसे आहेत' 'ह्यांनी हे वाईट केले आणि ते वाईट केले' असा आकांडतांडव करण्यापेक्षा काँग्रेसने विकासाच्या अजेंड्यावर बोलण्यात घालवले तर हिंदुत्व, चौकीदार, १९८४, नथुराम वगैरे कोणत्याही सामान्य माणसाच्या खिशात नव्याने पाच पैसे न टाकू शकणार्या गोष्टी आपोआप बाजूला होतील. जे जनतेला हवे आहे.
काँग्रेस ला ईतीहासात जमा करायच्या निर्णयावर काल शिक्कामोर्तब झाले. आता फक्त सोपस्कार/प्रक्रीया बाकी आहे. ज्यांचे नेतृत्वच मानसिक काविळीने ग्रस्त आहे ते देशाला प्रकाश दाखवतील अशा फुकटच्या आशेत राहू नये हेच ऊत्तम. >> हे जरा बोस्टिंग झाले.
काँग्रेसकडे आता अजून हरण्यासारखे काही नाही भाजपाकडे हरण्यासारखे सगळे काही आहे...असेही बघता येते.
>>हे जरा बोस्टिंग झाले.
>>हे जरा बोस्टिंग झाले.
नाही. ही reality आहे.
ठीक आहे.. there are two perspectives/two sides..!
नरेंद्र च्या जागी देवेंद्र. बांधणी सुरू आहे.
>>काँग्रेसकडे आता अजून हरण्यासारखे काही नाही भाजपाकडे हरण्यासारखे सगळे काही आहे...असेही बघता येते.
२०१९ च्या निवडणूका आधी देखिल लोकं असेच म्हणत होते.. फक्त कॉंग्रेस ला पटले नाही!
बाकी एक नमूद करायचे राहिले:
>>तोवर अशी आशा आणि प्रार्थना करुया की भाजप सरकार या विजयाचा आपल्याला हवा तो अर्थ काढून मतदारांना गृहीत धरणार नाही. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो योग्य ठरवेल आणि देशाच्या भल्यासाठी काम करेल.
धागाकर्त्याने काल (निकाल जाहीत झाल्या नंतरचे) मोदीजीं चे भाषण ऐकले असेल तर नेमकी याच अनुशंगाने त्यांनी शंका दूर करून सर्वाना आश्वासन दिले आहे. we have to trust him as we have done before!
चांगला धागा आणि चर्चा.
चांगला धागा आणि चर्चा. भाजपाच्या यशात "काँग्रेस" चा सिंहाचा वाटा आहे हे दुर्लक्षुन चालणार नाहि. एखाद्या ब्रँडची चलती असे तोवरच त्याची ब्रँडवॅल्यु कॅश करता येते, नाहितर तो ब्रँड लायाबिलिटी ठरतो. चॅप्टर ११ किंवा डिसमँटल करणे याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहि. थोडक्यात, काँग्रेस ब्रँड ठेवायचाच असेल तर त्या ऑर्गनायझेशनचं रिस्ट्रक्चरिंग होणं आवश्यक आहे अथवा नविन नांव, नविन नेते एकत्र येउन एक नविन पक्ष उभारला गेला तरंच भाजपावर अंकुश ठेवता येइल...
इत्क्या प्रतिकुल स्थितीतही
इत्क्या प्रतिकुल स्थितीतही कोन्ग्र्सच्या १० जागा वाढल्या आहेत
>>चांगला धागा आणि चर्चा.
>>चांगला धागा आणि चर्चा.
आणि नजर लागलीच...!
इत्क्या प्रतिकुल स्थितीतही
इत्क्या प्रतिकुल स्थितीतही कोन्ग्र्सच्या १० जागा वाढल्या आहेत.
>> खरोखर नेत्रदीपक कामगिरी. बाजारात भाजी खरेदी करताना १०० रुपयाचा चुना लागला तरी आपण फुकट मिळालेल्या कोथिंबिरीच्या जुडीवर समाधान मानावे , कसं ?
कॉंग्रेस मुक्त वगैरे काही
कॉंग्रेस मुक्त वगैरे काही नाही ही सरळ सरळ फक्त द्विपक्षीय निवडणूक पद्धतीकडे वाटचाल आहे. कॉंग्रेसला आणि देशाला अजून त्याची सवय नाही इतकेच.
काही वर्षात, फार फार तर अजून तीन चार निवडणुका, मोजणी च्या शेवटाच्या फेरीपर्यंत सत्तेवर कोण येणार ते सांगता येणार नाही असे चित्र असेल. तीस चाळीस जागांच्या फरकाने दोघांपैकी एक पक्ष सत्तेवर येईल. रिजनल पार्टी लोकसभेच्या निवडणुका लढवणार नाही. Swing states असतील.. It's all good. Mark my words. Happy
नवीन Submitted by हायझेनबर्ग on 24 May, 2019 - 17:29>>>
सहमत,, असे झाले तर देशासाठी तो अशिर्वादच असेल..
राज्यस्तरीय पक्ष (महाराष्ट्र,
राज्यस्तरीय पक्ष (महाराष्ट्र, तामिळनाडू, आन्ध्र, तेलंगाणा, ओडिशा, बंगाल) पुढच्या २० वर्षात कुठे नाहिसे होणार नाहीत. पुढच्या ५ वर्षात भाजपा सरकारने काही मेजर झोल केले तर जनता २०२४ मध्ये काँ ला निवडून देतील. राहुल गांधी शिवाय काँ मध्ये पर्यायी नेत्रुत्व नाही आणि सर्वांना गांधी घराण्याच्या नेत्रुत्वाची सवय आहे. त्यामुळे त्यात काही बदल होईल असे वाटत नाही. काँ चे खरे भवितव्य २०२४ च्या निवडणुकी नंतर ठरेल.
२०२४ ला खरेच निवडणूक होईल का
२०२४ ला खरेच निवडणूक होईल का ? सध्याचे आंतर राष्ट्रीय अस्थिरता / जागतिक महायुद्धाचा येणाऱ्या काळातील आवाका पाहुन कदाचित राष्ट्रपती राजवट असेल
Pages